ब्लॉग माझा : वसंत भेटी
मुखपृष्ठ >> ब्लॉग माझा >> ब्लॉग माझा : वसंत भेटी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग माझा : वसंत भेटी Bookmark and Share Print E-mail

सुचित्रा साठे - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altनित्याच्या सवयीने मर्यादित चौकटीतल्या या ‘वसंतलीला’ माझ्या अंगवळणी पडलेल्या असतात. घराबाहेर पडल्यावर ‘मोगरा फुलला’ म्हणत किंवा पिकलेल्या जांभळाच्या पायघडय़ा बघताना त्याच्याशी ‘शब्देविण संवादु’ होतच असतो, जेव्हा जेव्हा वसंत वाऱ्यांचा झिम्मा चालू होतो तेव्हा ‘ती’ पुन्हा एकदा सजीव होतात आणि ‘आनंद मनी माईना’ अशी अवस्था होते. अखंड फिरणाऱ्या कालचक्रामुळे कूस पालटावी इतक्या सहजतेने ऋतुबदल घडून येत असतात. ‘हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे’ असं इंदिरा संतांनी सुचवलेलं ऐकेपर्यंत शिशिर ऋतूचा स्वच्छंद वात येतो. पानांशी त्याच्या कानगोष्टी होतात आणि खाली येण्याची जणू मॅरेथॉनच रंगते. थंडीची शिरशिरी कमी होते आणि ‘गंधयुक्त तरीही उष्ण’ असे ‘वात’ वाहू लागतात. ‘पानगळ विनाश नसून ती फक्त सुंदर स्थिती असते, रिक्त होण्याची, पुन्हा बहरून येण्याची,’ अशी आकाशवाणी होत असतानाच ऋतुराज वसंताचे आगमन होते.
शैशवातल्या अल्लडपणाने टाळ्या पिटणारी पिंपळाची आमसुली रंगाची पालवी, मोहोरलेली आम्रमंजिरी माझ्या घराच्या खिडकीतून डोकावून ‘वसंत आला बरं का’ असं माझ्या कानात सांगते. नित्याच्या सवयीने मर्यादित चौकटीतल्या या ‘वसंतलीला’ माझ्या अंगवळणी पडलेल्या असतात. घराबाहेर पडल्यावर ‘मोगरा फुलला’ म्हणत किंवा पिकलेल्या जांभळाच्या पायघडय़ा बघताना त्याच्याशी ‘शब्देविण संवादु’ होतच असतो, पण कधीतरी थोडय़ा हटके स्वरूपात ‘तो’ सामोरा येतो. त्या भेटीची ‘क्षणचित्रे’ माझ्या स्मृतिपटलावर कोरली जातात. जेव्हा जेव्हा वसंत वाऱ्यांचा झिम्मा चालू होतो तेव्हा ‘ती’ पुन्हा एकदा सजीव होतात आणि ‘आनंद मनी माईना’ अशी अवस्था होते.
एकदा वाशीला लग्नाला निघाले होते. लवकर पोहोचल्याने नवऱ्यामुलीखेरीज कोणीही ओळखीचं नाही. त्यामुळे इतका वेळ तिथे बसून करायचं काय, प्रश्नच पडला. समोरच्या बागेकडे लक्ष गेले नि मी तिकडेच मोर्चा वळविला. फिरत्या, बसक्या कारंज्याखाली आंघोळ करून मृदगंधाचं अत्तर लावून, टवटवीत झालेल्या कातरलेल्या हिरवळीकडे बघत, मी जरा पुढे गेले आणि डोळे विस्फारून बघतच राहिले. ही गुलाबी छत्री इथे कोणी उघडून उभी करून ठेवली आहे, असा प्रश्न सहज मनात यावा इतका तो ‘टॅबेबुइया’ फुलून आला होता. मोहात टाकणाऱ्या आकाराची, अतिशय तलम, नाजूक, क्रेपच्या कागदासारख्या पोताची, झालरीसारखी कड असलेल्या, आरस्पानी गुलाबी फुलांनी झाडाच्या माथ्यावर इतकी गर्दी केली होती की, पानांना संकोचाने खालीच यावे लागले होते. झाडावर असतील त्याच्यापेक्षाही खाली जास्त फुलांचा सडा, नव्हे, वसंताची गुलाबी रांगोळी! ही ‘पुष्पकुटी’ नजर खिळवून ठेवणारी या मोहजालातून बाहेर येऊन सभोवताली पाहिलं तर टॅबेबुइयाच्या परदेशी छत्र्यांची सुनियोजित वसाहतच दृष्टीस पडली. बागेच्या रचनाकाराच्या सौंदर्यदृष्टीला मनोमन धन्यवाद देत लग्नाचा मुहूर्त गाठायला मी धाव घेतली.
टॅबेबुइयाचा गुलाबी तरंग विरत असतानाच गडद रंगाच्या काटेसावरीने मनावर गारूड केले. कालिदासाचा एक ‘सुबक’ नाटय़प्रयोग बघून ‘हरपले मन झाले उन्मन’ या अवस्थेत नाटय़गृहाच्या पायऱ्या उतरत असताना गडद गुलाबी काटेसावरीचं फूल टपकन् वरून माझ्या पायात घोटाळलं. प्रतिक्षिप्त क्रियेने वरती बघितलं तर आकाशाच्या काळपट निळ्या चादरीवर लाल फुलांची नक्षी रेखाटून जणू डोक्यावर मांडवच घातला होता. तळहाताएवढय़ा किरमिजी रंगाच्या, मेणचट, मऊशार, गुबगुबीत, पाच पाकळ्यांच्या फुलांनी काटेसावर नखशिखांत मढली होती. अंगावरचे काटे, फांद्यांना चिकटलेली एकटी फुलं यांचा तोल सांभाळत चक्राकार फांद्यांची टोकं आकाशाकडे झुकली होती. पिवळ्या पुंकेसरांची गर्दी मधाचा साठा सांभाळण्याचं गोड काम करीत होती. वसंताच्या साजशृंगारातले हे मानकरी फुलं उतरवून कच्च्या केळ्यासारखी हिरवी बोंडं केव्हा लटकवतात पत्ताच लागत नाही. वाळून तपकिरी झाल्यावर ही बोंडं पाच शकलांनी उकलतात आणि दूरदृष्टीने परागीभवनासाठी कापसाचे पुंजके लंबगोलाकार काळ्या बियांना घेऊन वाऱ्याबरोबर उडत राहतात. ‘सावर रे, सावर रे’ म्हणण्यात काही अर्थच नसतो. वसंताची ही ‘लाली’ स्मृतीत चिरंतन विसावली नाही तरच नवल.
तीच गोष्ट बहाव्याची. नागपूरहून परतीच्या प्रवासात गाडी मध्येच थांबली आणि उघडय़ा माळरानावर लखलखीत सुवर्णकांतीने चमचमणारा सौंदर्याचा पुतळा खिडकीसमोर आला. एका निसर्गप्रेमीने त्याची सर्वाशी ओळख करून देताच सगळ्यांचेच डोळे लकाकले. त्या चुटपुटत्या भेटीने भेटीची अधीरता आणखीनच वाढली. घंटाळी परिसरात शोध घेताना त्या झाडापेक्षा मीच वसंतभेटीसाठी आतूर झाले आणि.. घंटाळी मंदिराच्या पायरीवर मी बसले होते. मावळतीचं ऊन पांघरून निष्पर्ण फांद्यांचा सांगाडा प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस उभा होता. मनातला ‘वसंत’ जागा होता. जरा रोखून त्या आडाकडे पाहिलं तर एका फांदीच्या टोकाशी पिवळ्या फुलांचा घोस लटकताना दिसला. मानेचा व्यायाम करीत निरीक्षण केलं आणि ‘हरवले ते गवसल्याची’ खात्रीच पटली. काही दिवसातच एक एक दागिना अंगावर चढवून राजस्त्रीनं शृंगार करावा तसे सोनपिवळ्या रंगाचे घोस अंगा-खांद्यावर रुळायला लागले. प्रत्येक घोसात खाली निमुळता होत गेलेला हातभार लांब देठ, त्याच्या दोन्ही बाजूंना चार-पाच पाकळ्यांची सतेज फुले. वरची फुलं फुललेली तर खालची आता आम्हीही फुलतच आहोत या विचारात हरवलेली, वसंतस्पर्शाने माझ्या डोळ्यादेखत बहरून आलेला बहावा बघताना ‘मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो’ हे कविवर्य सुरेश भटांचे शब्द पिंगा घालत होते. मग सहवासाच्या ओढीने पानं, फुलं, शेंगा यांचा खो खोही पाहत राहते. झाडावर एकच कुणीतरी मुक्कामाला हजर राहते याची नोंद घेते. अतीव सुंदर बहावा पहिल्याच भेटीत ‘वहावा’ मिळवून जातो हे मात्र खरं!
उत्सवी वसंत सोहळ्यात लालपिवळ्या रंगाच्या आतषबाजीबरोबरच सुगंधाची ही लयलूट होते. ध्यानीमनी नसताना ‘अवचित तुझी रे भेटचि होते’ अशी किमया घडते आणि बारतोंडीची गंधभेट होते. मला वृक्षांची ओळखपरेड करून देणाऱ्या वैदेहीचा रात्री ९-९। ला फोन येतो. ‘ताबडतोब खोपट एसटी स्टँडच्या फाटकात ये. झाड बहरलेलं आहे, पण बहर किती दिवस टिकेल माहीत नाही.’ माझा ‘आत्ता..’ खूप लांबतो. सुटीत राहायला आलेल्या पण आता कंटाळलेल्या, माझ्या तीन-चार वर्षांच्या नातीला, रतीला, जाता येता रिक्षाने जायची लालूच दाखवून मी पटकन स्टँडवर येते. फाटकात घुटमळत असताना वाऱ्याने हळूच सुगंधी कानगोष्टी केल्याच. ‘अवचिता परिमळू, झुळकला अळूमाळू’ असं नवल घडलं. एकचित्ताने डोळे मिटून खोल श्वास घेत तो गंध अनुभवला. ‘गंध फुलांचा गेला सांगून, शुभ्र फुलांचे घ्या रे दर्शन’ आणि म्हणून माना उंच करीत घुमटाकार झाडाकडे बघण्याचं ‘पुढचं पाऊल’ उचललं. पानांच्या गर्दीतून निशिगंधासारख्या दिसणाऱ्या, एक-दीड इंच लांब, पुंकेसरांना निमुळत्या होत जाणाऱ्या चारपाच पाकळ्यांच्या नळीत लपवणाऱ्या, दहाबारा फुलांचे एकच संयुक्त फळ बनविणाऱ्या आणि बारतोंडी हे नाव सार्थ करणाऱ्या शुभ्र सुवासिक फुलांचे गुच्छ नजरेस पडू लागले. झाडांच्या सौंदर्याचं आकंठ रसपान करताना वैदेहीने झाडाची क्षमा मागून दोन-तीन फुले आमचं अनुकरण करीत असलेल्या रतीच्या हातात ठेवली. घरी जाताक्षणी फुलं फ्रीजमध्ये ठेवत ‘मी ही फुलं उद्या माझ्या घरी घेऊन जाणार आहे हं’ असं उडय़ा मारीत जाहीर करणाऱ्या रतीच्या मनात शुभ्र फुलांनी घर केलेलं बघून मीही खूश झाले.
अशा कितीतरी ‘वसंत भेटी’ मनात अगदी ताज्या आहेत. डोलणाऱ्या गुलमोहराने केलेलं स्वागत, जाई-जुई-मोगरा-मदनबाण यांनी घमघमलेले कोपरे, सेंटर पॉइंटमधल्या बाव्हळ्याच्या शेंगांचा दिमाख, घंटाळीतल्या कैलास पतीचा फुलांचा कंबरपट्टा, अंगाला गुलाल माखून येणारे पळसपांगारे, सुंदर युवतीच्या लत्ताप्रहाराने फुलणारा बी-केबिनजवळचा अशोक यांनी माझ्या मनातला वसंत सतत चिरतरुण ठेवला आहे. ‘भेट तुझी माझी स्मरते’ म्हणत मी स्मृतिकोषात रममाण झाले असताना इकडे वसंताने काढता पाय घेतलेला असतो. ‘वाळकं पान गळताना सांगत असतं, वसंत आता येणार आहे, वसंत ओरडतच येतो की मी लगेच जाणार आहे’ हे खरं वास्तव असतं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो