‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : कृषी परिस्थितीकी आणि हवामानाचा अभ्यास
मुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग >> ‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : कृषी परिस्थितीकी आणि हवामानाचा अभ्यास
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : कृषी परिस्थितीकी आणि हवामानाचा अभ्यास Bookmark and Share Print E-mail

डॉ.अमर जगताप - सोमवार, २३ एप्रिल २०१२
प्राध्यापक :  द युनिक अॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोलाच्या अभ्यासक्रमात घटक क्र. ३ अंतर्गत ‘भूगोल आणि कृषी’ या घटकाचा समावेश केला आहे. या लेखात आपण ‘कृषी परिस्थितीकी’ (घटक ३.१) आणि हवामान (घटक ३.२) या घटकांच्या स्वरूपाबद्दल आणि अभ्यासक्रमाबाबत चर्चा करणार आहोत. घटक क्र. ३.१ कृषी परिस्थितीकीमध्ये संमिश्र स्वरूपाचे घटक आहेत. यातील कृषी परिस्थितीकीचे मानवाच्या दृष्टिकोनातून महत्त्व हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याकरिता कृषी परिस्थितीकी या शब्दाचा अर्थ समजणे आवश्यक आहे. त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्ती या मुद्दय़ामध्ये देशातील व विशेषत: महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वितरणाचा, वापराचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मृदा, जल, पशुसंपत्ती, वनसंपत्ती इ. साधन संपत्तीचा अभ्यास अपेक्षित आहे. अभ्यासाचा रोख संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापन व संवर्धनावर असला पाहिजे. त्यासाठी हाती घेण्यात आलेले शासनाचे प्रयत्न विद्यार्थ्यांना माहीत असले पाहिजेत. पुढील मुद्दा पिकांसंदर्भात आहे. देशातील विशेषत: राज्यातील महत्त्वाची पिके, त्यांचे वितरण याचा अभ्यास आवश्यक ठरतो. पिकांवर परिणाम करणारे प्राकृतिक, हवामान आणि सामाजिक पर्यावरणाचे घटक कोणते? याचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. या घटकाच्या शेवटी पर्यावरणीय प्रदूषण आणि संबंधित आपत्तींचा मानव, पशू, पिके यांवर होणारा विपरित परिणाम नमूद केला आहे. या घटकाच्या अभ्यासाकरिता डॉ. साबळे यांचे ‘कृषी घटक’, सवदी यांच्या ‘भूगोलाची मूलतत्त्वे खंड १’ मधील निवडक प्रकरणांचा अभ्यास उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनी (डायरी) मधील पिकांच्या नव्या जाती, त्यांची वैशिष्टय़े इ. चा अभ्यास उपयुक्त ठरेल.
घटक क्र. ३.२ ‘हवामान’ - हा भूगोलाच्या अभ्यासक्रमातील सर्वात मोठा, सर्वाधिक संकल्पना असलेला आणि आकलनाच्या दृष्टिकोनातून काहीसा गुंतागुंतीचा वाटणारा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या घटकाच्या अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. सामान्यत: या घटकामधील मुद्दे तीन गटात वर्गीकृत करता येतील. गट क्र. १ मध्ये वातावरणाचा आणि त्यातील विविध घटक व प्रक्रियांचा अभ्यास आहे. हे सर्व मुद्दे पूर्णत: संकल्पनात्मक आहेत. त्यांचा अभ्यास करताना पायरी पायरीने एकेक मुद्दा व्यवस्थित समजावून घेऊन; त्याचे नीट आकलन करून पुढील मुद्दा अभ्यासावा. कारण प्रत्येक मुद्दा समजण्यासाठी आधीच्या मुद्दय़ाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. या घटकाच्या अभ्यासासाठी सवदी यांच्या ‘भूगोलाची मूलतत्त्वे खंड १’ या पुस्तकातील वातावरणशास्त्राची सर्व प्रकरणे उपयुक्त आहेत. वातावरणाच्या विविध घटकांचे महत्त्व व भूमिका याच्याशी संबंधित पुढील घटक ‘औष्णिक संतुलनाचा’ आहे. औष्णिक संतुलनावर वातावरणाचे तापमान पट्टे हा मुद्दा आधारित आहे. वातावरणीय तापमान पट्टय़ांवर वातावरणीय दाबपट्टय़ांची निर्मिती अवलंबून असते. वातावरणीय दाब पट्टय़ांवर ग्रहीय वाऱ्यांची निर्मिती अवलंबून असते. थोडक्यात आधी नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक मुद्दा आधीच्या मुद्दय़ावर आधारित आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा अभ्यासातून वगळता येणार नाही. त्यानंतर मान्सून, वायुराशी व सीमा, आर्वत यांचा समावेश होतो. यामध्ये वृष्टी, आद्र्रता या मुद्दय़ांचा समावेश नसला तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. कारण आद्र्रतेचा संबंध वृष्टीशी व वृष्टीचा संबंध नमूद केलेल्या सर्व घटकांशी आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद न केलेल्या काही घटकांचा अभ्यास आवश्यक आहे.
भारतीय हवामानाशी संबंधित मुद्दे गट क्र. २ मध्ये समाविष्ट करता येतील. परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. कारण भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था भारतीय मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय मान्सूनचा उदय, त्याचे विविध सिद्धांत, त्याचा प्रवास, वितरण याबाबी अभ्यासणे आवश्यक आहे. विशेषत: मान्सूनच्या निर्मितीचे आधुनिक सिद्धांत महत्त्वाचे आहेत. हा सर्व भाग संकल्पनात्मक स्वरूपाचा आहे. त्यातील एल निनो, ला निना, दक्षिणी दोलनाचा सिद्धांत इ. बाबी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. भारतातील पर्जन्यविषयक समस्या उदा. अवर्षण; पूर यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण व त्यातील स्थल-कालानुसार विचलन याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व घटकांच्या अभ्यासासाठी सवदींच्या ‘भारताचा भूगोल’ या पुस्तकातील भारताचे हवामान हे प्रकरण उपयुक्त ठरते.
हवामान घटकातील जल उपलब्धता व त्याचा पीक पद्धतीशी असलेला संबंध याच्याशी निगडित मुद्दे तिसऱ्या गटात समाविष्ट करता येतील. त्या मुद्दय़ांमध्ये अवर्षण, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम यांचा अभ्यास गरजेचा आहे. यात विविध क्षेत्रासाठीची पाण्याची उपलब्धता आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील विविध कृषी-हवामान विभाग आणि त्यानुसार आढळणारे पीक प्रारूप अभ्यासावे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार विविध विभागात कोणत्या पीक पद्धती अवलंबल्या जातात व त्यांची वैशिष्टय़े कोणती? त्याचबरोबर अल्पकालीन आणि उच्च पैदासक्षम बियाणांच्या वापराचा परिणाम व स्वरूप अभ्यासावे. या घटकाच्या शेवटी सद्यपरिस्थितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे दोन मुद्दे नमूद केलेले आहेत - सेंद्रीय शेती आणि शाश्वत शेती. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे; विशेषत: चुकीच्या शेती पद्धतीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता २१ व्या शतकात सेंद्रीय शेती आणि शाश्वत शेती या दोन्ही मुद्दय़ांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या मुद्दय़ांचा अर्थ समजावून घेऊन त्यांचे महत्त्व अभ्यासावे. त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर शासनाने केलेले प्रयत्न अभ्यासावेत. थोडक्यात ३.१ व ३.२ घटकांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी संकल्पना, इतर संकल्पनांशी असणारा संबंध, संबंधित आकडेवारी, समस्या आणि त्यासंदर्भातील शासनाच्या उपाययोजना या घटकांवर भर द्यावा. यातील प्रत्येक बाबींशी संबंधित चालू घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे.


 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो