प्रसार-भान : मूल्ये माध्यमांची आणि संसदेची
मुखपृष्ठ >> प्रसार-भान >> प्रसार-भान : मूल्ये माध्यमांची आणि संसदेची
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रसार-भान : मूल्ये माध्यमांची आणि संसदेची Bookmark and Share Print E-mail

विश्राम ढोले ,शुक्रवार, ४ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  
alt

वादग्रस्त माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक यांची कानउघाडणी ब्रिटिश संसदेच्या समितीने नुकतीच केली आहे. या पाश्र्वभूमीवर माध्यम-धंद्यात याच ‘मुघला’ने आणलेल्या ‘मरडॉकीकरणा’चे फायदे घेणारी भारतीय माध्यमे आणि भारतीय कायदेमंडळे यांच्याकडे पाहता येईल का?  
वृत्तपत्रे फक्त ‘वाचणे’ किंवा टीव्हीचे कार्यक्रम फक्त ‘पाहणे’ याच्या पलीकडेही माध्यमांबाबत रुची किंवा भान असणाऱ्या बऱ्याच लोकांना रुपर्ट मरडॉक हे नाव निदान ऐकून तरी माहीत असते आणि ज्यांना ते माहीत असते त्यांनी ते नाव फार काही चांगल्या किंवा विधायक संदर्भात ऐकलेले नसते. खरे तर असे व्हायला नको.

कारण अधिकृतपणे सांगायचे झाले तर मरडॉक हे जगातल्या एका बलाढय़ आणि खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय माध्यमसमूहाचे मालक आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपासून ते इंग्लंडपर्यंत आणि अमेरिकेपासून ते भारतापर्यंत या माध्यमसमूहाचे साम्राज्य पसरलेले आहे. आणि त्या अर्थाने ते जागतिक माध्यमसम्राट किंवा इंग्रजीमध्ये सांगायचे तर मीडिया मुघल आहेत. पण मरडॉक यांच्या बाबतीत या उपाध्यांच्या मागे केवळ आदर वा आब आहे, असे नाही. या उपाध्यांच्या आड त्यांच्या कार्यसंस्कृतीविषयीचा असंतोष आणि उपहासही दडला आहे. त्याचे पडसाद अनेक वेळा उमटत असतात. ब्रिटिश सांसदीय समितीने नुकतेच त्यांच्यावर ओढलेले ताशेरे त्याचेच एक उदाहरण. पण मरडॉक यांच्यावरील आणखी एक टीका एवढय़ापुरतीच ही घटना मर्यादित नाही. या ताशेऱ्यांचे स्वरूप वादग्रस्त असले तरी गंभीर आहे. माध्यमसम्राट या उपाधीलाच सुरुंग लावणारे आहे. आणि मुख्य म्हणजे माध्यमांच्या सुटत चाललेल्या प्रसारभानाबद्दल एखादी व्यवस्था किती सजग आणि संवेदनशील असू शकते याचे ही घटना प्रतीक आहे.
खरं तर हे प्रकरण तसे जुने आहे. मरडॉक यांच्या मालकीच्या न्यूज ऑफ दि वर्ल्ड या ब्रिटिश टॅबलॉइडने बातम्या मिळविताना लोकांचे मेल हॅक केले आणि खासगी गुप्तहेरांचीही मदत घेतली.. असे करताना लोकांच्या खासगीपणाचा भंग केला, असा हा आरोप आहे. या दैनिकाच्या संपादकीय कर्मचाऱ्याविरुद्ध अशी चौकशी सुरू असतानाच व्यवस्थापनासह रुपर्ट आणि जेम्स रुपर्ट मरडॉक या त्यांच्या मालक पिता-पुत्रांविरुद्धही चौकशी झाली. कारण आपल्या मालकीच्या दैनिकामध्ये अशा प्रकारची - नीतिमूल्यांना आणि संकेतांना न मानणारी - पत्रकारिता आपल्या दैनिकामध्ये चालते याची पुरेशी कल्पना असूनही त्यांनी त्या साऱ्या प्रकाराकडे हेतुत: दुर्लक्ष केले असा त्यांच्यावर आरोप होता. त्याच्याविरुद्ध ब्रिटनमध्ये खूप ओरड झाली. लोकभावना संतप्त होत्या आणि मुख्य म्हणजे मरडॉक यांच्या शैलीच्या पत्रकारिता संस्कृतीला विरोध असणारे आणि त्याचा फटका खाल्लेले लेबर आणि लिबरल डेमोक्रॅटस्सारखे पक्ष ब्रिटिश संसदेत आक्रमक होते. या साऱ्या दबावातून त्याची सांसदीय समितीपुढे चौकशी सुरू झाली. गेल्या वर्षी जुलमध्ये मरडॉक पिता-पुत्रांची त्या संदर्भात समितीपुढे जाहीर साक्ष झाली. जगभरातील टीव्हीवर ती दाखविण्यात आली. त्या वेळी त्यांच्या अंगावर ‘पाय’ (खाद्यपदार्थ) फेकण्याचा खास टीव्हीशरण स्टंटही झाला. एका माध्यमसम्राटाची पुरेशी नाचक्की झाली. पण तेवढे कमी म्हणून की काय, या समितीने या साऱ्या चौकशीअंती जो अहवाल सादर केला त्यात रुपर्ट मरडॉक यांच्यावर ओढण्यात आलेले ताशेरे फारच गंभीर आहेत. ‘एवढय़ा मोठय़ा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमसमूहाचे मुख्य म्हणून राहण्यास रुपर्ट मरडॉक हे लायक गृहस्थ नाहीत,’ असा अत्यंत गंभीर आणि मरडॉक यांच्यासाठी तेवढाच अपमानकारक निष्कर्ष या समितीने काढला आहे. हा निष्कर्ष जरी समितीने मतक्याने काढला नसला तरी एखाद्या उच्चस्तरीय समितीने एखाद्या अत्युच्च माध्यमस्रमाटाविरुद्ध इतका गंभीर आक्षेप घ्यावा ही घटनाच मुळात अनेक गोष्टी सांगून जाते.
मरडॉक यांच्या माध्यममालकीचा इतिहास आणि त्यांनी माध्यमांच्या क्षेत्रात आणलेली वेगळी कार्यसंस्कृती हा नेहमीच चच्रेचा, प्रशंसेचा आणि टीकेचा विषय राहिला आहे. आणि हे महत्त्वाचे आहे, कारण त्यांची ही कार्यसंस्कृती केवळ इंग्लंडपुरतीच मर्यादित नाही. त्याचे परिणाम भारतासह इतरही अनेक देशांत पसरलेल्या त्यांच्या एकूणच माध्यमसाम्राज्याला लागू आहेत. अनेकजण तर त्याचे वर्णन मरडॉकीकरण असे करतात. विशेषत: वृत्तमाध्यमांच्या बाबतीत तर या मरडॉकीकरणावरील टिकेला अजून धार येते. अगदी भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर टीव्ही पत्रकारितेवरील क्राइम, सेलिब्रिटी आणि क्रिकेट या तीन ‘सीं’च्या वाढत्या प्रभावाचे अपश्रेय टीकाकार बऱ्याच अंशी मरडॉक यांच्या मालकीच्या स्टार समूहाला देतात. इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर विद्यापीठात शिकविणारे भारतीय वंशांचे प्राध्यापक दया थुस्सू यांचे लिखाण या संदर्भात वाचण्यासारखे आहे. व्यापारी मूल्यांना प्राधान्य देणे, विविध प्रकारच्या माध्यमांवर मालकी प्रस्थापित करणे आणि त्यासाठी आक्रमक प्रयत्न करणे, प्रसंगी चांगल्या प्रसिद्धीच्या आमिषापोटी राजकीय नेत्यांकडून मालकीसंबंधी हवी ती कामे करून घेणे, नियम वाकविणे आणि व्यापारी फायद्यासाठी खळबळजनक, गल्लाभरू, ग्लॉसी कार्यक्रम वा बातम्या देत राहणे ही या मरडॉकीकरणाची काही लक्षणे आहेत, असे टीकाकार सांगतात. अर्थात हा रोग फक्त मरडॉक यांच्याच समूहापर्यंत मर्यादित आहे असे नाही. ही लागण कमी-अधिक प्रमाणात इतरही अनेक माध्यमसमूहांमध्ये आणि देशांमध्ये दिसते. म्हणूनच त्यांच्यावरील ही चौकशी आणि हा गंभीर ठपका फक्त मरडॉक यांच्यापुरताच मर्यादित नाही. अशा प्रकारची पत्रकारिता करणाऱ्या वा माध्यमव्यवहार करणाऱ्या सर्वावरच ठेवलेला हा ठपका आहे.
मरडॉक यांच्या ब्रिटनमधील माध्यमविस्ताराविषयी आणि तिथे रुजविलेल्या कार्यसंस्कृतीविषयीचे आक्षेप तसे जुनेच आहे. थॅचर यांच्याशी हातमिळवणी करून तिथे त्यांनी केलेला माध्यमविस्तार यापूर्वीही टीकेचा विषय झाला होता. अमेरिकेत रीगन आणि इतरही राजकीय शक्तींशी तशीच हातमिळवणी करून मरडॉक यांनी न्यूज कॉर्पोरेशनचे अवाढव्य साम्राज्य उभारले आणि वाढविले. भारतातील त्यांचा माध्यमविस्तारही वाद आणि आक्षेपांपासून अलिप्त नव्हता. म्हणूनच माध्यमसम्राट हे त्यांचे बिरूद केवळ कौतुकापोटी किंवा आदरापोटी नव्हते. ब्रिटिश सांसदीय समितीच्या ठपक्यामुळे तर त्याभोवतीच्या उरल्यासुरल्या वलयाभोवतीही आता प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
पण प्रश्न फक्त मरडॉक यांच्यापुरता नाही. त्यांच्या बिरुदाचा तर नाहीच. माध्यमांच्या क्षेत्रात स्थिर आणि वैध होत चाललेल्या एका संस्कृतीविरुद्ध नोंदविलेला हा आक्षेप आहे. तो राजकीय असेलही कदाचित; पण असे आक्षेप घेण्याचे स्वातंत्र्य कायदे बनविण्याची जबाबदारी असलेल्या संसदेसारख्या राजकीय व्यवस्थेला असतेच. या साऱ्या प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या देशातील परिस्थिती पाहिली तर खरेच चिंता वाटते. मुळात माध्यमांच्या मालकांना तर जाऊच द्या, चुकार - बेजबाबदार पत्रकारालाही शिक्षा करण्याची - निदान दरडावण्याची - हिंमत आपल्याकडील राजकीय शक्ती दाखवू शकतील? पत्रकारिता करताना सामान्य व्यक्तीच्या न्याय्य हक्कांचा, खासगीपणाचा, संवेदनांचा भंग होत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन जबाबदारपणे, सातत्यपूर्ण पातळीवर त्याची चौकशी करण्याचे, कारवाई करणण्याचे प्रयत्न तरी आपल्याकडे कितपत झाले? आणि ज्या पत्रकारितेच्या शैलीवरून मरडॉक यांच्यावर इतका गंभीर ठपका ठेवण्यात आला तशा प्रकारची पत्रकारिता कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत इतक्या मोठय़ा माध्यमसमूहाच्या मालकाला ‘तुम्ही चुकताहात, तुमची जबाबदारी ओळखा,’ असे सांगण्याची हिंमत राजकीय व्यवस्था दाखवतील?
गेल्या काही वर्षांत माध्यमांची मालकी, त्यांतील वाढती नफेखोरीची लालसा, त्यासाठी अनेक प्रकारच्या संकेतांची केलेली पायमल्ली, कुप्रथांना दिलेली वैधता असे प्रकार पाहिले, पत्रकारितेला झालेली पेड न्यूजसारखी खास मालकप्रणीत कॅन्सरची बाधा पाहिली तर अशी काही गंभीर आणि जबाबदार चौकशी आपल्याकडेही होण्याची गरज आहे हे उघड आहे. एरवी ब्रिटिश संसदेचे, तेथील प्रथांचे अनुकरण करणाऱ्या आपल्या राजकीय शक्ती ब्रिटिश सांसदीय समितीच्या या उदाहरणापासून काही शिकतील? काही प्रेरणा घेतील?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो