मुक्तायन : हास्य-टॉनिक
मुखपृष्ठ >> मुक्तायन >> मुक्तायन : हास्य-टॉनिक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुक्तायन : हास्य-टॉनिक Bookmark and Share Print E-mail

altमुक्ता बर्वे , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रोजच्या आयुष्यातल्या विनोदाला आणि पर्यायाने त्या विनोदनिर्मितीतून होणाऱ्या हास्याला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.नवरसातला हास्यरस काढून टाकला तर जगणं अवघड होऊन बसेल.
मुलाखतीमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘तुम्हाला गंभीर भूमिका करायला आवडतात का विनोदी?’ याचं उत्तर देणं अवघड आहे. एखाद्या नटासाठी विनोदी काय किंवा गंभीर काय, कोणताही परकायाप्रवेश हा अवघडच असतो. एखाद्या नटाच्या दृष्टीने या दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला मिळणे मोठ्ठं आव्हान असतं. पण विनोदनिर्मिती करणं मला जास्त अवघड वाटतं. नाटक, सिनेमा, मालिका यात काही नाटय़मय घटना दाखवून, कधी इफेक्टस् वापरून, कधी वेगळ्या नेपथ्य, प्रकाशयोजना-वेशभूषा-रंगभूषेच्या सहाय्याने अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतात. बरेचदा कथानकातल्या भावनिक-नाटय़मय घटनांची आपण आपल्या आयुष्याशी सांगड घालू शकतो. समोरची पात्रं आपल्याला हवं तशी वागतात. कधी काळजाचा ठोका चुकतो, कधी काळजाला हात घातला जातो, आपल्याही नकळत टच्कन डोळ्यातून पाणी येतं, आपण हळवे होतो, रडतो आणि ती कलाकृती प्रेक्षक म्हणून आपल्याला आवडून जाते. तेव्हा नटाच्या दृष्टिकोनातून भावनिकतेचा आधार घेऊन प्रेक्षकांच्या मनात प्रवेश मिळवणं हे जास्त सोपं जातं. पण या उलट कोणताही भावनिक आधार नसताना विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जिंकणं हे आव्हानात्मक असतं, असं मला वाटतं.
केवळ विनोदी म्हणजे मनोरंजक असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. मनोरंजन हे विनोदातून, वैचारिक गोष्टीतून, गंभीर गोष्टींमधून कशातूनही होऊ शकतं, पण विनोदातून होणारं निखळ मनोरंजन हे मला अधिक भावतं. मराठी साहित्याला विनोदाची खूप मोठी परंपरा लाभली आहे. मराठी साहित्यातील विनोद म्हटल्यावर आपण प्र. के. अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांची नावे घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. पण त्याचबरोबर आणखीही खूप नावे घ्यावी लागतील, जशी की जोशींचा चिमणराव- गुंडय़ाभाऊ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं सुदाम्याचे पोहे, गडकरींनी-बाळकराम नावाने लिहिलेलं साहित्य ठकीचं लग्न, दत्तू बांदेकरांचं अतिशय गाजलेलं ‘दै. मराठा’ मधलं सदर (अर्थात याबद्दल मी फक्त ऐकलंय वाचलं नाही.) वि. आ. बुवा, द. मा. मिराजदार, मंगला गोडबोले, शिरीष कणेकर, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकरांच्या कथा इ. या ओघात अनेक नावं राहून जाणार आहेत, याची मला कल्पना आहे. पण हा माझा लेख म्हणजे ‘मराठी साहित्यातील विनोद’ या विषयाचा कोष नव्हे. त्यामुळे माझ्याकडून राहून गेलेली नावं तुम्ही मला कळवलीत तरी चालेल. माझ्या ज्ञानात भर घालून घ्यायला मला आवडेल. तर सांगायचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे मराठी साहित्यात दर्जेदार विनोदाची निर्मिती झालेली आहे त्याप्रमाणे सिने-नाटय़ सृष्टीतलाही फार मोठा सिनेमाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. अगदी दादा कोंडके, श्रीकांत मोघे, दामूअण्णा मालवणकर, बबन प्रभू, राजा गोसावी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, इंदिरा चिटणीस, मंदाकिनी भडभडे, मनोरमा वागळे, नयना आपटे, रंजना, वंदना गुप्ते, शुभा खोटे, शरद तळवलकर, निळूभाऊ फुले, मच्छिंद्र कांबळी, आत्माराम भेंडे, लक्ष्मण देशपांडे, राम नगरकर, गणपत पाटील, राजा मयेकर, मधू आपटे, सुहास भालेकर अगदी आपल्या लोककलामध्येसुद्धा विनोदाची खूप मोठी परंपरा आहे. काळू-बाळूचा तमाशा, प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, शाहीर साबळेंनीही आपल्या अनेक कलाकृतीने विनोदाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक विषयांवर भाष्य करून सादर केल्या. पारंपरिक दशावतार किंवा अगदी एकनाथांची भारूडं यातही विनोदाचा सुंदर समावेश झालेला दिसतो. रोजच्या आयुष्यातल्या विनोदाला आणि पर्यायाने त्या विनोदनिर्मितीतून होणाऱ्या हास्याला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सतत हसल्यानं माणूस आरोग्यसंपन्न होतो म्हणे. मला वाटतं ‘लाफ्टर क्लब’ ची संकल्पना त्याच विचारातून प्रेरित होऊन किंवा याच तत्त्वाच्या आधारावर जन्माला आली असावी. आपण आपला दिवस हसून सुरू करावा म्हणजे दिवस छान जातो असं सांगितलं जातं ते खरंच आहे. ‘अ डे विदाऊट लाफ्टर इज अ डे वेस्टेड’ असं फार सुंदर वाक्य मी कोठेतरी वाचलं होतं. हसणं ही आपल्या जगण्याची गरज आहे. नवरसातला हास्यरस काढून टाकला तर जगणं अवघड होऊन बसेल.
त्या हसण्याचेसुद्धा किती प्रकार? विनोदाला दाद म्हणून हसणे, समोर घडलेल्या गमतीशीर घटनांना हसणे, समोरच्यावर हसणे, अगतिकतेने परिस्थितीवर हसणे. पण हसणे हा अविभाज्य घटक आहेच.
मीसुद्धा अनेक विनोदी कलाकृतींमधून कामं केली. त्या विनोदामध्ये वैविध्य होतं लिखाणात, सादरीकरणात, माध्यमात. ‘हम तो तेरे आशिक है।’ सारखं मुळात आंतरधर्मीय विवाह आणि संसार हा विषय असणारं नाटक संजय मोनेंच्या खुमासदार लेखणीतून बाहेर पडल्यानं फार गमतीशीर वाटायचं. ‘घडलंय-बिघडलंय’सारखी रोजच्या सामाजिक- राजकीय विषयांवर भाष्य करणारी मालिका (ज्याला पॉलिटिकल सटायर म्हणता येईल). श्रीरंग गोडबोलेंच्या तिरकस विनोदी दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर यायची. ‘एक डाव धोबीपछाड’ हा चित्रपट मुळातच अतार्किक अशा पात्रांनी भरलेला असून किरण यज्ञोपवीत, सतीश राजवाडे, गिरीश जोशी या त्रयीनं त्यात धमाल उडवून दिली होती. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा ‘रोमँटिक कॉमेडी’ या सदरात मोडणारा चित्रपट, तर ‘फायनल ड्राफ्ट’ हे अत्यंत खरं-खऱ्या पात्राचं आयुष्यविषयक वेगळा विचार मांडणारं पण हलक्या-फुलक्या पद्धतीनं प्रेक्षकांना हसवणारं, भिडवणारं नाटक ते पार अगदी आता माझी चालू असलेली मालिका ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट.’  या सगळ्या सादरीकरणात वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगू, असं आपल्यामुळे कोणीतरी खळखळून हसतंय, आनंदी होतंय असं दिसलं ना, की आंतरिक आनंद मिळतो, समाधान मिळतं.
अगदी परवाच माझ्या एका नाटककार मैत्रिणीने म्हणजे मधुगंधा कुलकर्णीने तिचा फार सुंदर अनुभव मला सांगितला. तिनं लिहिलेलं ‘लग्नबंबाळ’ नावाचं एक तूफान विनोदी नाटक आता रंगभूमीवर खूप गाजतंय. खूप सुंदर लिहिलेलं,विजय केंकरेसरांनी छान बांधलेलं आणि फार उत्तम कलाकार सादर करत असलेलं हे नाटक त्या नाटकाचा कुठेतरी परगावी प्रयोग होता. प्रयोग नेहमीप्रमाणे अप्रतिम झाला. अनेक प्रेक्षक आत भेटायला आले. त्यातल्या एका बाईंनी तिला खूप मोठी शाबासकी दिली. त्या म्हणाल्या, त्याच्या कुटुंबातली कोणी खूप जवळची व्यक्ती त्यांनी नुकतीच गमावली. त्या घरातली मंडळी धक्क्यातून सावरलीच नव्हती. कशात तरी मन रमवावं म्हणून ती मंडळी नाटकाला येऊन बसली आणि त्या नाटकाने त्यांना मनमुराद हसवलं. ‘‘घरावर कोसळलेल्या या महाभयंकर दु:खामुळे आम्ही हसणंच विसरून गेलो होतो, पण तुमच्या नाटकामुळे आम्हाला खळखळून हसवलं. खूप दिवसानंतर आतून खरंच काहीतरी दु:खाव्यतिरिक्त वेगळं बाहेर पडलं. तुमचे मनापासून आभार आणि खूप आशीर्वाद.’’ हा अनुभव सांगताना मधुगंधा म्हणाली, ‘‘मुक्ता आपल्याला आपल्या कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळतात, आर्थिक मोबदले मिळतात, वरच्या पातळीवर आपल्या कामाची दखल घेतली जाते, पण त्या प्रेक्षकबाईंनी दिलेले आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या तुलनेत या सगळ्या गोष्टी खूप गौण वाटतात.’’ खरंच आपण मनोरंजन करताना कोणाला तरी इतका आनंद देऊ शकतो, खळखळून हसवू शकतो याचं खूप समाधान वाटतं. कामाच्या निमित्ताने ही संधी मला मिळते. मी स्वत:ला भाग्यवान समजते.
बाहेरच्या जगातली टेन्शन्स जशी वाढतात, तशी सप्लीमेंट्री म्हणून ‘हास्य-टॉनिक’ घेण्याची गरज वाढत जाते. मग विनोदी नाटकं, सिनेमे, मालिका, रिअ‍ॅलिटी शोज् यांचा भडिमार होऊ लागतो. कधी कधी या ओघात विनोदाचा दर्जा वरखाली होतो, कारण मराठी भाषेची एक गंमत आहे- एखाद्या शब्दाच्या उच्चारण्याची पद्धत जरी बदलली किंवा शब्द नुसता वरखाली केला तर ‘हास्यकारक विनोदाचा’, ‘हास्यास्पद विनोद’ कधी होईल हे आपलं आपल्यालाच कळणार नाही. त्यामुळे तेवढं भान ठेवून. ‘कुणी वंदा कुणी निंदा आमचा हसवण्याचा धंदा’ हे सूत्र मी मनाशी पक्क केलंय. सर्वांपर्यंत आनंद पोचवण्याचं हे काम आम्ही कलाकार मंडळी असंच चालू ठेवू. या लेखाच्या निमित्ताने मागच्या पिढय़ांमधील सर्व विनोदवीरांना मानाचा मुजरा!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो