अनघड अवघड : संवाद वाटा
मुखपृष्ठ >> अनघड.. अवघड >> अनघड अवघड : संवाद वाटा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनघड अवघड : संवाद वाटा Bookmark and Share Print E-mail

altआई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ओढूनताणून मुलांना समोर बसवून लैंगिकतेवर बोलणं अनेकांना कृत्रिम वाटतं. अशा वेळी आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ‘मला काय वाटतं’ हे सांगणं, ही संवादाची उत्तम सुरुवात होऊ शकते. मुलं कम्फर्टेबल असणं हा या संवादातला अतिशय महत्त्वाचा भाग. त्यामुळे बोलताना त्या क्षणी जरी खूप काही हासिल झालं नाही, तरी पुढच्या संवादाची दारं उघडी राहतील, हे पाहणं खूप आवश्यक ठरतं. एका आईशी बोलत होते. त्यांचा नववीतला मुलगा हल्ली अगदी हरवल्यासारखा, गोंधळलेला दिसतो, असं त्या सांगत होत्या. या वयात असं बिखरं-बिखरं वाटण्याची अनेक कारणं असू शकतात, लैंगिकतेशी संबंधित कारणं हा त्यातला एक पैलू. आमच्या बोलण्याची गाडी तिथे आल्यावर त्या म्हणाल्या, तसं काही असेल असं वाटत नाही. त्याने मला कधी सांगितलं नाही- विचारलं नाही. एरवी आम्ही अनेक विषयांवर बोलत तर असतो.
बऱ्याच घरांमधून मुलांचं आई-वडिलांशी अगदी छान नातं दिसतं. मुलं आपले मित्रमैत्रिणी, वर्गातली धमाल याबाबत घरी खूप काही सांगत असतात. त्यामुळे आमची मुलं आमच्याशी सगळं शेअर करतात, असं आईबाबा अभिमानाने सांगतात. खरंच, टीनएजर्सचं आईवडिलांशी छान नातं असेल तर अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. पण या सगळ्या शेअरिंगमध्ये लैंगिकतेशी संबंधित बाबी या सगळ्यात सहसा फारशा डोकावत नाहीत. बऱ्याचदा पालकांच्या पिढीला याबाबतीत बोलायला संकोच वाटतो. त्या संकोचातून एक प्रकारचा अवघडलेपणा- ताण येतो. खरं तर असा ताण मुलांनाही असतो. हा विषय घरी बोलण्याचा विषय नाही, हे एव्हाना मुलांनीही मनाशी ठरवून टाकलेलं असतं. त्यामुळे या विषयावर घरी काहीही न बोलण्याची कसरत त्यांनाही करावी लागते. साधारण नववी- दहावी- अकरावीच्या मुलांशी बोलताना आईबाबांशी कधी बोलला आहात का हे सगळं, असं विचारलं, तर मुलंही सांगतात- या असल्या गोष्टी काय घरी बोलायच्या असतात का? मुलग्यांच्या बाबतीत हे खासकरून जास्त प्रमाणात होतं.
मुलं काही विचारतच नाहीत हो, मग आपणहून काय सांगत बसायचं त्यांना? मुलं कशी होतात, वगैरे माहीतच असतं की त्यांना. आजवर अनेक टीनएजर्सच्या आईबाबांकडून मला हे ऐकायला मिळालं आहे. मुलं विचारत नाहीत म्हणून आम्ही सांगत नाही, अशी एक पळवाट त्यात असते. गंमत म्हणजे स्वच्छता, धार्मिक चालीरीती, चांगल्या-वाईटाचे संस्कार अशा अनेक बाबी मुलांनी आपणहून आपल्याला कुठे विचारलेल्या असतात? तरीही आपण त्या त्यांना सांगतोच. कारण कुटुंब म्हणून जी मूल्यव्यवस्था आपण मानतो, त्याच्याशी या सगळ्याचा थेट संबंध आहे.
लैंगिकतेच्या संदर्भातही मूल्यव्यवस्था हा फार महत्त्वाचा पैलू आहे. याबाबत बऱ्याचदा स्पष्ट बोललं जात नाही, पण आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींनी पालकांची पिढी अस्वस्थ होत असते. मधल्या काळात इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव पिल्सच्या अनेक जाहिराती टीव्हीवर झळकल्या. त्यातले काही भाग आधीच्या पिढीला खटकले. शिवाय त्या जाहिराती असल्यामुळे संभाव्य साइड इफेक्ट्सवर त्यात बोललं जात नाही. अनेक आईबाबांनी आपापसात बोलताना यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पण मुलांशी बोललं गेलं का?
मुलांशी लैंगिकतेवर बोलायला ही एक चांगली संधी असू शकते. ओढूनताणून मुलांना समोर बसवून लैंगिकतेवर बोलणं अनेकांना कृत्रिम वाटतं. अशा वेळी आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ‘मला काय वाटतं’ हे सांगणं, ही संवादाची उत्तम सुरुवात होऊ शकते. मात्र हे सांगणं म्हणजे ‘मुलांना ऐकवणं’ होऊ नये. ‘काय ही लक्षणं तुमच्या पिढीची’, ‘कसं होणार तुमचं’, अशा छापाचे ताशेरे झोडणं असू नये. ‘आपल्या घरात हे असलं काही चालणार नाही,’ अशी धमकीवजा वाक्यंही त्यात असू नयेत. यातून पुढचा संवाद खुटू शकतो. तुम्ही मुलांना सुनवायला समोर बसला आहात, असा वास जरी त्यांना लागला, तरी पुढच्या वेळी मुलं तुम्हाला टाळायला पाहणार हे नक्की. मुलं कम्फर्टेबल असणं हा या संवादातला अतिशय महत्त्वाचा भाग. त्यामुळे बोलताना त्या क्षणी जरी खूप काही हासिल झालं नाही, तरी पुढच्या संवादाची दारं उघडी राहतील, हे पाहणं खूप आवश्यक ठरतं.
‘मला अमुक जाहिरात खटकते आहे’, ‘मला तमुक गोष्ट पाहून काळजी वाटते आहे’, अशा स्वरूपाचा संवाद ठेवला, तर आपला एकंदर रोख प्रत्यक्ष मुलांवर (किंवा एकूणच त्यांच्या पिढीवर) न राहता मूळ विषयावर राहतो. यानेही संवादाची दारं उघडी राहायला मदत होते. लैंगिकतेच्या अनुषंगाने मुलांच्या भावविश्वात प्रचंड उलथापालथ होत असते. अशा वेळी कुठलंही बोलणं त्यांच्या खासगी स्पेसपर्यंत जाईल ही काळजी मुलांना असू शकते. त्यामुळे आपलं खासगीत्व जपलं जाणार आहे, हा विश्वास मुलांना मिळणं फार महत्त्वाचं आहे.
अनेकदा लैंगिकतेशी संबंधित विषयावर बोलायला सुरुवात केली, की मुलं अतिशय अस्वस्थ होतात. अशा वेळी त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद अगदीच थंडा आणि निरुत्साही असू शकतो. चेहरा अतिशय कोरा असू शकतो. ‘काय कटकट आहे,’ असा एक भाव त्यावर असू शकतो. ‘मला हे सगळं सांगायला मी काय कुक्कुलं बाळ आहे का, मला तर सगळं आधीच माहीत आहे,’ असाही सूर त्यांच्या चेहऱ्यावर उमटू शकतो. त्यामुळे पालकांना फार नाउमेद वाटू शकतं. अशा वेळी आपला ट्रॅक चुकतो आहे की, हे सगळं मुलांना वाटणाऱ्या असुरक्षिततेतून आलं आहे, याचा सारखा अदमास घेत राहावा लागतो. कधी कधी फार न ताणता सोडून देणं, थांबणं, हा मोठा सुज्ञपणा ठरू शकतो. गंमत म्हणजे आईबाबांना नाउमेद करणाऱ्या अनेक प्रसंगांमधूनही संवादाचा पाया रचला जातच असतो. नंतर कधीतरी मुलांना आईबाबांशी बोलावंसं वाटलं, तर या सगळ्या प्रसंगांची पाश्र्वभूमी त्याला असतेच.
‘दोस्ताना’ सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ‘गे’ (समलिंगी संबंध राखणारे पुरुष) शब्दाबद्दल मुलांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं. अनेकदा मुलांच्या जगात केवळ अर्वाच्य विनोदासाठी हा शब्द वापरला जाऊ लाला. मी काम करत असणाऱ्या एका नववी-दहावीच्या मुलांच्या गटात काही ‘गे’ संदर्भातले विनोद सांगून अखंड खिदळणं चालू होतं. मुलांनी त्यातले काही एसएमएस जोक्स मलाही सांगितले. विनोदाची पातळी मात्र फारच घसरते आहे, असं वाटल्यावर ‘गे’ असणं हा व्यक्तिगत चॉइस आहे आणि त्याबाबतीत सैलपणे विधानं करणं मला आवडलेलं नाही,’ एवढंच मी त्याला सांगितलं आणि विषय तिथेच थांबला.   पुढे काही दिवसांनी याच मुलांच्या गटाबरोबर होते. काही वेगळ्या संदर्भातून सुरुवात होऊन बोलणं परत ‘गे’ या विषयावर आलं. या वेळी मुलं खिदळली नाहीत. गे असण्याबद्दल त्यांना काही प्रश्न होते, ते विचारणं सुरू झालं. ‘गे’ म्हणजेच छक्का ना?’ असंही एकानं विचारलं. याचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं होतं. तो मुलगा म्हणाला, ‘पण आमच्या वर्गात तर सगळे म्हणतात, गे म्हणजे छक्के. बरं झालं तुला विचारलं.’ मुलांच्या जगात अशा अनेक गैरसमजुती ठाण मांडून बसलेल्या असतात. या बऱ्याचदा बाहेर येतच नाहीत, त्यामुळे त्यांचं निराकरण होणं तर आणखीनच दूरची गोष्ट.
मध्ये एका अठरा वर्षांच्या मुलाच्या आईनं मला अभिमानानं सांगितलं, ‘माझ्या मुलाने अडचणीत आणणारे प्रश्न मला कधीही विचारले नाहीत.’म्हणजे या मुलाला सगळ्या आवश्यक गोष्टी माहीत आहेत, असं समजता येईल का? आणि माहीत असतील, तर या योग्य सोर्सकडून कळल्या आहेत, की त्याच्याच आमच्या मागच्या वयाच्या मुलांकडून अर्धवट विचित्र स्वरूपात कळल्या आहेत? की आई दृष्टीआड सृष्टी मानून सुखी आहे? की त्या बोलण्यातून येणारा ताण नकोसा वाटतो म्हणून त्या वाटेकडे वळणं नकोच असं होतं?
लैंगिकतेशी संबंधित संवाद ही पालकांसाठी कायमच तारेवरची कसरत राहिली आहे. आजच्या जगात वावरण्यासाठी मुलांना सक्षम करण्यासाठी आईबाबांची पिढी जे जे आवश्यक ते ते करते आहेच. अशात मग लैंगिकतेच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी, त्यातलं योग्य-अयोग्य काय, हे मुलांना समजायला हवं असेल, तर संवादाच्या वाटा कितीही बिकट वाटल्या तरी धुंडाळल्यावाचून पर्याय नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो