हृदयस्पर्शी ‘काकस्पर्श’
मुखपृष्ठ >> लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला >> हृदयस्पर्शी ‘काकस्पर्श’
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

हृदयस्पर्शी ‘काकस्पर्श’ Bookmark and Share Print E-mail

altदीर आणि वहिनी यांच्यातलं प्रेम, ही कन्सेप्ट काही नवीन नाही. पण तरीही ‘काकस्पर्श’मधील ही प्रेमकहाणी वेगळी ठरते ती या प्रेमातल्या आसक्तीच्या अभावामुळे..
रोहन टिल्लू
चित्रपटांमधील प्रेम हे आतापर्यंत केवळ दोन पातळ्यांवरच मांडलेलं आहे. एक ‘मी तुला मिळवण्यासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतो’ आणि ‘मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो’. पण या दोनही भावनांच्या मध्ये असलेल्या आणि तरीही या दोन्ही भावनांच्या पलिकडे पोहोचलेल्या प्रेमाची कहाणी म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि ग्रेट मराठा एण्टरटेन्मेण्ट निर्मित ‘काकस्पर्श’ हा चित्रपट! मुळात हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा होती. सामान्य भाषेत त्याला ‘हवा गरम असणं’ म्हणतात. आणि हे गरम हवा भरलेले फुगे आपोआप खाली येतात. त्यामुळे हा चित्रपटही तशीच निराशा करणार का, असा प्रश्न घेऊन तुम्ही चित्रपटगृहात गेलात, तर तुमचा प्रश्न चुकीचा ठरेल एवढं नक्की!
कोकणातल्या एका गावात स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेली ही कथा! गावात म्हणण्यापेक्षाही त्या गावातील दामले कुटुंबात! या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा हरीदादा (सचिन खेडेकर), त्याचा लहान भाऊ महादेव (अभिजीत केळकर), बहिण, हरीदादाची बायको तारा (मेधा मांजरेकर), घरातच राहणारी अलवणातील विधवा आत्या (सविता मालपेकर) आणि हरिदादाची तीन लहान मुलं असं हे नांदतं खेळंत कुटुंब! महादेवाचं लग्नाचं वय झाल्यानंतर तत्कालिन रितीप्रमाणे हरिदादा त्याला घेऊन दुसऱ्या गावातील रानडय़ांच्या ‘दुर्गा’ला पाहायला जातो. पहिल्या भेटीतच दुर्गा (केतकी माटेगांवकर) महादेवालाच नाही, तर हरिदादालाही आवडते. दुर्गाला तर हरिदादा हाच आपला नवरा आहे, असं वाटतं. पुढे लग्नानंतर फलधारणेची पुजा झाल्याच्या रात्रीच महादेव तापाने फणफणतो आणि त्याचा मृत्यू होतो.
महादेवाच्या दहाव्याला त्याच्या पिंडाला कावळा शिवत नसतो. त्यावेळी हरिदादा त्या कावळ्याला बोलावण्यासाठी काहीतरी पुटपुटतो आणि कावळा झटकन येऊन पिंडाला शिवतो. या पहिल्या प्रसंगातून चित्रपटाची सुरुवात होते. पुढे फ्लॅशबॅक पद्धतीने घटना घडलेल्या दाखवतात. महादेवाचं निधन झाल्यानंतर घरची विधवा आत्या दुर्गाचं (लग्नानंतरची उमा) केशवपन करण्यासाठी नाव्ह्याला बोलावते त्यावेळी हरिदादा मधे पडून ते थांबवतो. यानंतर हरिदादा नेहमीच उमाच्या पाठीशी खमकेपणे उभा राहतो.
दरम्यान घरावर एकामागोमाग एक अनेक संकटं येतात. गावातील उपाध्याय (वैभव मांगले) हे हरिदादाविरोधात आणि पर्यायाने दामले कुटुंबाच्या विरोधात अनेक कट करत असतात. उमा मोठी होते (प्रिया बापट) तसं तिच्या मनातलं हरिदादाचं स्थान पक्कं होतं. हरिदादालाही मनोमन ती आवडत असते. याच वेळी हरिदादाच्या बायकोच्या ताराच्या पोटात गुल्म होऊन ती आजारी पडते. मरणाच्या आधी तारा हरिदादा आणि उमा दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला देते. मात्र हरिदादा तो फेटाळून लावतो. पुढे काही काळानंतर हरिदादा उमाशी बोलणंही टाकतो, तिच्यासमोर येणंही टाळतो. तिच्यासाठी आपला जिवलग मित्र बळवंत (किशोर रावराणे) याच्याशी टोकाला जाईल एवढे भांडण करतो. मात्र तिची काळजी करणे मात्र थांबवू शकत नाही. अखेर उमा अन्नपाणी टाकते आणि तिची तब्बेत खालावते.
हरिदादा तिच्याशी बोलतो का, त्यांची प्रेमकहाणी आकार घेते का, हरिदादाला उमाचा स्वीकार करण्यापासून नेमकी कोणती गोष्ट थांबवत असते, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायची असल्यास ‘काकस्पर्श’ पाहण्यावाचून गत्यंतर नाही.
या चित्रपटासाठी सर्वप्रथम गिरीश जोशी या पटकथा लेखकाचं अभिनंदन करायला हवं. त्याने कुठेही काळाचं भान न सोडता अतिशय उत्तमपणे चित्रपट एकत्र बांधला आहे. त्यानंतरचे सर्व सोपस्कार महेश मांजरेकर, त्यांची तंत्रज्ञ टीम आणि कलाकारांची टीम यांनी अत्यंत उत्तमरित्या पार पाडले आहेत. या चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे वाडा. या पात्राची निवड योग्य झाल्यामुळे चित्रपटाला एक वेगळंच परिमाण लाभलं आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू ही अत्यंत परफेक्ट आहे.
कलाकारांच्या बाबतीतही महेश मांजरेकर यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतल्याचं दिसून येतं. सचिन खेडेकरने अत्यंत उत्तम प्रकारे आपलं कॅरेक्टर उभं केलं आहे. त्याच्या अभिनयात त्याने दाखवलेलं सोशिकपण, खमकेपण, धिरोदात्तपण हे वाखाणण्यासारखंच आहे. त्याचबरोबर विशेष कौतुक करावंसं वाटतं ते केतकी माटेगांवकरचं. ही भूमिका तिच्या वयाला साजेशी असली, तरी काळाच्या चौकटीचा विचार केला, तर त्यावेळच्या मुलींना भोगाला लागणारा त्रास प्रत्यक्षात भोगल्याचं दाखवणं, हे खरंच खूप मोठं आव्हान तिने उत्तमरित्या पेललं आहे. मराठी चित्रपटसृष्टीला तिच्या रूपात एक चांगली गायक अभिनेत्री मिळेल, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. त्यानंतर भाव खाऊन गेली आहे ती प्रिया बापट. तिनेही मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. उमाचं कुढत राहणं, तिला वाटणारी भीती, हरिदादाबद्दलचं प्रेम, नंतर होत गेलेला मनस्ताप या सगळ्याच भावना तिने आपल्या चेहऱ्यावर करेक्ट उमटवल्या आहेत. विशेष म्हणजे तिच्या पुतण्याचा आपल्या पत्नीबरोबर बंद खोलीत चाललेला रोमान्स ऐकताना तिने केलेला अभिनय आणि त्यानंतर खाड्कन तिचं भानावर येणं, हा प्रसंग तर अंगावर काटा आणणारा आहे. त्याशिवाय, ‘मी कोणत्या सुखाला मुकतेय, निदान ते तरी मला मेलील कळू दे’ या वाक्यातली अगतिकता दाखवताना तिचा अभिनयही लाजवाबच.
सविता मालपेकर यांनी आत्याचं काम अगदी चोख केलं असलं तरी त्यांच्या भूमिकेची लांबी कमी करता आली असती. नंतर विधवा आत्याचं काही प्रयोजनच चित्रपटात उरत नाही. त्यामुळे गणपती गेल्यानंतर उरलेल्या मखराइतकीच ती अनावश्यक वाटते. मेधा मांजरेकरनेही उत्तम काम केलं आहे. सक्षम कुलकर्णी आणि अगदी छोटय़ाश्या भूमिकेत मनवा नाईकही भाव खाऊन गेले आहेत. विशेष कौतुक किशोर रावराणे आणि वैभव मांगले या दोन नटांचं. त्यांनी आपल्या अभिनयातील एक वेगळाच बाज लोकांसमोर दाखवला आहे.
चित्रपट अगदीच निर्दोष आहे, असं नक्कीच नाही. बळवंत आणि हरिदादा या दोघांनी मिळून मुंबईला विधवांसाठी आश्रम काढल्याचं दाखवलं आहे. त्याचं प्रयोजन अद्याप कळलेलं नाही. बरं, त्या आश्रमात नेमकं काय काम चालतं, काही काम चालतं का, हेदेखील स्पष्ट होत नाही. त्यामुळे उगाच फ्लॅशबॅक आणि फ्लॅश ऑनचं गिमिक खेळण्यासाठी तर त्या आश्रमाची स्थापना दाखवलेली नाही ना, असा एक प्रश्न पडतो.
तांत्रिक बाबींमध्येही चित्रपट उत्कृष्ट झाला आहे. चित्रपटातील सर्वच गाणी अगदी टिपिकल कोकणातल्या ओव्या, अभंग, जात्यावरच्या ओव्या या पठडीतील असल्यानं ती लगेच अपील होतात. विशेषत ‘कुठे पाठ फिरवूनी गेला निवारा’ हे राजश्री पाठकने गायलेलं गीत चित्रपटात नेमका परिणाम साधतं. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग या बाबतीत मराठी चित्रपटाने गेल्या काही वर्षांत विलक्षण प्रगती केली आहे. त्यामुळे या बाबी ‘काकस्पर्श’मध्येही खटकत नाहीत. पण या सर्व तांत्रिक गोष्टींच्या पलिकडे जाऊनही हरिदादा आणि उमा यांच्यातील निस्पृह, अनासक्त प्रेम लक्षात राहतं, हे या चित्रपटाचं खरं यश म्हणावं लागेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो