धनसंपदा : गुंतवणूक म्युच्युअल फंड्समधली
मुखपृष्ठ >> धनसंपदा >> धनसंपदा : गुंतवणूक म्युच्युअल फंड्समधली
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

धनसंपदा : गुंतवणूक म्युच्युअल फंड्समधली Bookmark and Share Print E-mail

altधनश्री राणे , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
म्युच्युअल फंड्समधली गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय व योजना आहेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स सर्वाधिक लोकप्रिय असून त्यात केलेल्या गुंतवणुकीमुळे करात सवलत मिळते. याशिवाय लार्ज कॅप डायवसिर्फाईड म्युच्युअल फंडही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात. पण गुंतवणूकदार नव्याने वळत आहेत ते गोल्ड ईटीएफ व गोल्ड फंड्सकडे...
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय खुले आहेत. यासाठी इक्विटी फंड (भांडवल कंपन्यांमध्ये गुंतवणूक), फिक्स इनकम फंड , गोल्ड सेव्हिंग फंड (सोन्यातील निवेश) अशा पर्यायांचा विचार होऊ शकतो. मात्र यातही अनेक योजना असल्याने गुंतवणूकदार गोंधळात पडण्याची शक्यता अधिक. म्हणूनच म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता फायदेशीर ठरतील अशा पर्यायांचा आजच्या लेखात विचार करू या.
१.    पहिला आणि बहुतांशी गुंतवणूकदारांची पसंती असणारा म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे पायाभूत कंपन्यांशी निगडित बचत योजना (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स) वा करात सवलत देणारे फंड्स. या फंड्समध्ये आयकराच्या ८० सी कलमाद्वारे १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणे शक्य आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नावर लागणाऱ्या आयकरात सवलत मिळू शकते. तीन वर्षांसाठीच्या निश्चित कालावधीसाठी ही गुंतवणूक असते. याला ‘लॉक इन पिरियड’ असेही म्हणतात. थोडक्यात ठरावीक वर्षांसाठी तुमची रक्कम जमा राहते त्यामुळे दरम्यानच्या काळात ही रक्कम काढणे शक्य नसते. खरं तर आयकराच्या ८० सी कलमाद्वारे म्युच्युअल फंडमधील इतर योजनांसाठी असणाऱ्या कालावधीच्या तुलनेत हा सगळ्यात कमी कालावधी आहे. मात्र, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ईएलएसएस) या इक्विटी फंड प्रकारात मोडतात, त्यामुळे यात गुंतवणूक करण्यासाठी किमान ५ ते १० वर्षांचा कालावधी हा हवाच. शिवाय गुंतवणुकीवर मिळणारा नफा करमुक्त असल्याने पेआऊटसाठी तुम्ही डिव्हिडंटचा पर्याय निवडू शकता. म्हणजे झालेला नफा थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होईल.
२.     इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ईएलएसएस) शिवाय इतरही इक्विटी फंड बाजारात आहेत. मात्र यात केलेल्या गुंतवणुकीमुळे करात सवलत मिळत नाही. त्यामुळे हे फंड्स म्हणजे आयुष्यभरासाठीच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने गाठलेला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लार्ज कॅप डायवर्सिफाईड म्युच्युअल फंड ब्लू चीप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. मोठा विस्तार असणाऱ्या व भांडवलाच्या दृष्टीने बलाढय़ म्हणता येतील अशा कंपन्या उदा. बँकिं ग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या, ऑटोमोबाइल्स, आयटी,  सिमेंट, फार्मा इ. कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक असते.
३. इक्विटी फंडमधील आणखी एक प्रकार म्हणजे मिडकॅप व मल्टी-कॅप फंड्स. यातील गुंतवणुकीत जोखीम मोठी असल्याने अर्थातच अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते.
अशा फंड्समधून बाजारात फारशा प्रचलित नसलेल्या नवख्या कंपन्या व नजीकच्या भविष्यात मोठय़ा म्हणून उदयाला येणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात. या कंपन्या जसजशा विकसित होतात, तसे त्यांच्या समभागांचे मूल्य वाढत गेल्याने गुंतवणूकदारांना नफा होतो. मात्र, मिड-साईज कंपन्यांवर मोठय़ा कंपन्यांच्या तुलनेने बाजाराचा मोठा दबाव असतो. त्यामुळे एखाद्याने मिड-कॅप वा मल्टी-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतांना १० वर्षांच्या आसपासचा कालावधी गुतंवणुकीसाठी निश्चित केला पाहिजे.
४.     इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीमुळे तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाप्रमाणे वेळोवेळी उत्पन्न मिळत नाही. पण तुम्ही गुंतवलेल्या मुद्दलाची रक्कम उत्तरोत्तर वाढत जाते. म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीची पायाभरणी यातून होते. म्हणूनच पाच वर्षे व त्याहून अधिक कालावधीसाठी तुम्ही यात गुंतवणूक करणार असाल तर तुमच्या बचतीतून नियमित गुंतवणूक करण्यासाठी योग्य योजना आखलीच पाहिजे.
अ.    इक्विटी फंडने आतापर्यंत पारंपरिक मुदत ठेवींच्या तुलनेत कायमच उत्तम परतावा दिल्याचा इतिहास आहे.
ब.    यातून मिळणाऱ्या दीर्घकालीन नफ्याला करातून सवलत मिळते.
क.    म्युच्युअल फंडच्या मार्गाने इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केल्यास महागाई तसेच चलनवाढीसारख्या समस्यांशी दोन हात करणे शक्य होते.
ड.    इक्विटी फंडमध्ये केलेली गुंतवणूक अगदी पाच हजार रुपयांपासून करता येऊ शकते किंवा किमान पाचशे रुपयांच्या नियमित गुंतवणूकीपासून सुरुवात करू शकता.
याबाबत एक उदाहरण पाहू या. अंजू व प्रकाश यांना आर्या नावाची दोन वर्षांची गोंडस मुलगी आहे. अंजूला तिच्या भविष्यासाठी बचत करण्याची इच्छा आहे, जेणेकरून तिची मुलगी कॉलेजात गेल्यावर तिच्या शिक्षणाच्या खर्चाची सोय होऊ शकेल. अंजू एका शाळेत शिक्षिका असून प्रकाश उदयोन्मुख व्यावसायिक आहेत. ते दोघे तिशीच्या आसपासचे असून त्यांनी त्यांच्या मुलीच्या भवितव्यासाठी प्रॉव्हिडंट फंड खाते उघडले आहे. यासह आर्यासाठी अंजूने नियमित गुंतवणूक योजना हाती घेतली आहे. मुलीच्या भविष्यासाठी दर महिन्याला दोन हजार रुपयांची गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून मिड-कॅप वा मल्टी-कॅप फंड्समध्ये करण्यास अंजूने सुरुवात केली आहे.
५.    प्रकाश व्यावसायिक असल्याने उद्योगासाठीचं पुरेसं खेळतं भांडवल त्याच्याकडे असतं. ही रक्कम अल्प काळासाठी त्याच्या हाती असल्याने, तो म्युच्युअल फंडमधील अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये वळवू शकतो. हे फंड मार्केटमध्ये ९१ दिवस, १८२ दिवस अशा साधारण एक वर्षांहून कमी कालावधीसाठी गुंतवले जातात. सहा महिने इतकी मोठी रक्कम बँकेच्या खात्यात नुसती पडून राहण्यापेक्षा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये प्रकाश पैसे गुंतवू शकतो व त्यावर नफा मिळवू शकतो.
६.    अल्ट्रा लघुकालीन फंड्सप्रमाणे, गुंतवणूकदार बँकेतील मुदतठेवींप्रमाणे निश्चित मॅचुरिटी कालावधी असणाऱ्या योजनांचा विचार करू शकतात. नावाप्रमाणे निश्चित मॅचुरिटी योजना तीन महिने, सहा महिने किंवा एक वा दोन वर्षे अशा पूर्वनिर्धारित कालावधीसाठी असतात. फंड व्यवस्थापकांकडून गुंतवणूकदारांचा पैसा लघुकालीन फंड्समध्ये गुंतवला जातो. या फंड्सवर एक वर्षांच्या कालावधीसाठी १० टक्क्यांपर्यंत (महागाईचा निर्देशांक विचारात न घेता) वा २० टक्क्यांपर्यंत (महागाईचा निर्देशांक विचारात घेऊन) कर लागतो. म्हणूनच निश्चित मॅच्युरिटी योजना या २० ते ३० टक्के आयकर भरावा लागणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. कारण यामुळे मुदत ठेवीत रक्कम ठेवल्याने मिळणाऱ्या नफ्यापेक्षा अधिक नफा ग्राहकांच्या पदरी पडतो. महागाईचा निर्देशांक विचारात घेता यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यावरील कर ठरवला जातो. खासकरून गगनाला भिडलेली महागाईची परिस्थिती असताना चित्र पालटते. गुंतवणुकीतील खरा नफा दिसतो त्याहून कमी असतो. अशा वेळी तुम्हाला कमी कर द्यावा लागतो किंवा हे उत्पन्न करमुक्तही ठरू शकते.
७.    अर्थातच म्युच्युअल फंड्सद्वारे तुम्ही सोन्यातही गुंतवणूक करू शकता-गोल्ड ईटीएफ तसेच गोल्ड फंड्सच्या माध्यमातून. यातून होणारे फायदे पुढीलप्रमाणे -
१. तुम्ही गोल्ड फंडमध्ये अगदी ५ हजार रुपयांची गुंतवणूकही करू शकता. सोनाराकडे तुम्ही पाच हजार रुपयांचे दगिने केले तर तुम्हाला सोनाराला घडनावळ द्यावी लागते. पुन्हा हे दागिने मोडताना त्यात घट नोंदवून व्यवहार पुढे होतो. मात्र गोल्ड फंड वा ईटीएफमधून तुम्ही पाच हजार सोन्यात गुंतवले तर त्यात कोणतीही घट नाही ना कोणता दर कमी-जास्त होतो. तुमची गुंतवणूक निव्वळ ५ हजार रुपयांची असते.  अशा फंडमध्ये दरमहिना ५०० रुपये गुंतवता येतील अशा योजनाही आहेत. २. सोन्याची शुद्धता ३. सुलभ गुंतवणूक व सहज लाभ ४. नियमित गुंतवणूक-एसआयपी अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ५. सोने लॉकरमध्ये वगैरे ठेवण्याचे भाडे वाचते व आपण निश्च्िंात झोपू शकतो असा दुहेरी लाभ..            
(लेखिका वित्तनियोजिका आहेत.)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो