स्त्री समर्थ : गावी आली विकासाची ‘गंगा’
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : गावी आली विकासाची ‘गंगा’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : गावी आली विकासाची ‘गंगा’ Bookmark and Share Print E-mail

altभारती भावसार , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
उन्हाळा आला की, ग्रामीण भागातील महिलांचे पाण्याअभावी फार हाल होतात. परभणी जिल्हय़ातील सायाळा हे छोटं गावही त्याला अपवाद नव्हतं. पिण्याचं पाणी आणण्यासाठी महिलांची अथक वणवण सुरू होती. या महिलांच्या दिवसाची सुरुवातच डोक्यावर हंडे-कळश्या घेऊन पाणी भरायला जाण्याने व्हायची. शेवटी बचतगटाच्या माध्यमातून सायाळा गावच्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला. गावातील बोअरवेल नव्याने खणून, हिंडून पैसे गोळा करून त्यांनी टाकी बांधून पाण्याची कायमस्वरूपी सोय केली. निरक्षर महिलांनी संघटित होत केलेला प्रकल्प गावाचा चेहरा-मोहरा बदलणारा होता.
परभणी जिल्ह्य़ातील सायाळा हे जेमतेम चार हजार लोकवस्तीचं गाव. परभणी-गंगाखेड मार्गावर १५ किलोमीटर अंतरावर वसलेलं. तालुक्याच्या ठिकाणाहून यायचं म्हटलं तरी मुख्य रस्त्यापासून गावात एक किलोमीटर पायी चालत यावं लागतं. अशा सायाळामध्ये २००४ साली स्थापन झालेल्या बचतगटांनी गावात विकासाची गंगा आणली. गावाला वर्षांनुवर्षे भेडसावणारी पाण्याची समस्या या बचतगटाच्या महिलांनी संघटित होऊन सोडवली.
सायाळामध्ये २००४ साली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सहयोगिनी आल्या. गावात अशा उपक्रमाला दाद मिळेल का याबाबत त्यांनाच धाकधूक होती. काही ओळखीच्या घरांत बचतगटाचं महत्त्व सांगणारे छोटेखानी कार्यक्रम पार पडले. पण प्रतिसाद तितकासा सकारात्मक नव्हता. मग त्यांनी सरपंच, पोलीस पाटील यांची भेट घेतली व गावात महिलांची माविमच्या कार्यकर्त्यांनी सभा घेतली.
त्यानंतर जुलै २००४ मध्ये १२ जणींचा मिळून गौतमी महिला स्वयंसाहाय्यता बचतगट स्थापन झाला. वंदना कांबळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गावातल्या बहुतांशी महिला निरक्षर. हातावर पोट असणाऱ्या. दिवस उजाडल्यावर शेतात कामाला जायचं हा त्यांचा दिनक्रम. त्यामुळे दर महिना २० रुपये बचत काढायची ऐपतही त्यांची नव्हती. तरी रडत पडत का होईना बचत सुरू झाली. गटातल्या एका महिलेला अचानक पैशाची निकड भासली. तेव्हा तिला गटाकडून फक्त २ टक्के दराने कर्ज मिळालं. सावकाराकडून १० टक्के व्याजाने पैसे मिळायचे. ही तफावत बघून, गटाच्या माध्यमातून कशा प्रकारे एकमेकींच्या अडीअडचणी सोडवता येऊ शकतात, ते महिलांना प्रत्यक्षात कळालं. मग महिलांना बचतगटाची ओढ वाटू लागली.
दर महिन्याला केलेल्या बचतीतून महिलांच्या आर्थिक गरजा भागू लागल्या. हळूहळू गावात इतरही बचतगट सुरू झाले. पण बचतगटाचं कार्यक्षेत्र व्यापक केल्याशिवाय गटाची पाळंमुळं रुजणार नाहीत, हे माविमच्या कार्यकर्त्यांनी हेरलं. मग त्यांनी रमाई गाव विकास समितीची स्थापना केली. गाव समितीच्या फलकाचं मोठय़ा दिमाखात अनावरण करण्यात आलं. याच कार्यक्रमात एक अनोखा सोहळा पार पडला. गावातील अमोल पंडित या अनाथ मुलाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी महिलांच्या बचतगटांनी स्वीकारली. ‘गावातला एक लई हुशार मुलगा असा गरिबीपाई घरी बसला तर कसं चालन.. त्याने खूप पुढं जावं अशी आमची इच्छा हाय,’ असं म्हणत बायकांनी त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
गटाचं महत्त्व पटलं तशी महिलांची बांधीलकी वाढू लागली. एक महिला निंबोळ्या गोळा करून दोन पैसे कमवायची. एकदा निंबोळ्या वेचताना तिला विंचू चावला. पण कामं पूर्ण न करता गेलं तर ठरलेली बचत कशी होणार या काळजीनं तिनं निंबोळ्या गोळा केल्या. त्या जमा केल्या मगच वैद्याकडे गेली. सुदैवानं विंचवाचं विष चढलं नव्हतं. पण त्यापेक्षा हिला आजची बचत ठरल्याप्रमाणे झाल्याचा आनंद जास्त झाला!
पहिल्या वर्षांनंतर गौतमी गटाला २५ हजार रुपयांचं कर्ज मंजूर झालं. त्यांनी गटातील महिलांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या जनकल्याण बचतगटाच्या महिलांनी म्हशी घेतल्या व दुग्धव्यवसाय सुरू केला. बचतगटाच्या भक्कम आधारामुळे महिलांची गाडी रुळावर आली ती कायमचीच. महिला आता धीट होऊ लागल्या होत्या. घराबाहेर पडू लागल्या. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा ठरावीक दिवशी ग्रामसभेला हजेरी लावू लागल्या. पण महिलांमधील खऱ्या गुणांची पारख झाली ती वेगळ्याच निमित्ताने..
उन्हाळा सुरू झाला की, सायाळामध्ये पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागायच्या. इतर वेळी कधी विहिरीचं तर कधी हापशीचं पाणी मिळायचं. पण फेब्रुवारी-मार्च उजाडला की, विहिरी कोरडय़ा व्हायच्या. त्यातच काही वर्षांपूर्वी गावात असणाऱ्या एकुलत्या एका हातपंपाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानं पाण्याचा तोही आधार गेला. गावातल्या बायकांना मैलोन् मैल पायपीट करावी लागायची. पाण्याचे हंडे वाहून मान दुखायची तर कंबर-पाठ एक व्हायची. रोजची अर्धा किलोमीटर जा-ये करावी लागायची. बायकांना पाण्याच्या या त्रासानं भंडावून सोडलं होतं.
बचतगटांच्या एका बैठकीत माविमच्या एका प्रस्तावाची माहिती महिलांना मिळाली. राज्यातल्या ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठीचे प्रस्ताव महामंडळाकडून मागवण्यात आले होते. पाण्याच्या समस्येने हैराण झालेल्या महिलांनी तेव्हाच पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याचा निर्धार केला. त्यांचा निर्धार तडीस जाईपर्यंत अनेक अडचणी आल्या पण महिला डगमगल्या नाहीत. त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला तोही अवघ्या काही महिन्यांत.
गावाबाहेरून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात जुनी बोअरवेल होती. पण येथील पातळी घटल्यानं पाणी मिळेनासं झालं होतं. महिलांनी पहिल्यांदा येथे अधिक खोल जाणारे पाइप टाकून घेतले. सुदैवाने बोअरवेलला पाणी लागलं. त्यानंतर महिलांनी गटाच्या बचतीतून व लोकसहभागातून उभारलेल्या निधीच्या जोरावर पाण्याची टाकी बांधली. हातपंपाच्या साहाय्याने हापशीचं पाणी टाकीत सोडलं. एक हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असणारी टाकी उभारल्यानं गावाची पिण्याच्या पाण्याची सोय झाली. यासाठी वंदना कांबळे, नंदाताई सूर्यवंशी, अवंतिकाबाई दगडे, प्रतिभा साळवी, गयाबाई जोंधळे, आशाबाई कांबळे, लक्ष्मीबाई कठाळे आणि सुरेखा पवार यांनी हिरिरीनं पुढाकार घेतला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व लोकांचा विरोध असतानाही महिलांनी अखेर पाण्याचा तिढा सोडवला. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर माविमच्या जिल्हा कार्यालयानं सायाळाचा पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव मंजूर केला. प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतीनं जागा दिली पण आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. काही निधी माविमकडून मिळणार असला तरी उर्वरित निधी गावाने गोळा करायचा होता. गटाकडून प्रत्येकी एक हजार रुपये गोळा करायचं ठरलं. काहींनी वैयक्तिक निधी देण्याचीही इच्छा व्यक्त केली. पण त्यानंतर गावात वेगळेच वारे वाहू लागले. बायका गटाच्या बैठकींना वगैरे जातात इथपर्यंत ठीक होतं. पण असं काही करतायत, कळल्यावर घरातील पुरुषांचं वागणं बदललं. घरातून पैसे मिळणार नसल्याचं ठणकावून महिलांना सांगण्यात आलं. अशिक्षित महिलांची कोंडी करण्याची तयारी सुरू झाली. पण महिला डगमगल्या नाहीत, त्यांनी गाव पिंजून काढलं, अक्षरश: घरोघरी जाऊन प्रत्येकाकडून फूल ना फुलाची पाकळी असा निधी गोळा करत ३५ हजार रुपये गोळा केले.
अखेर पाण्याची टाकी उभारली गेली..प्रकल्प पूर्णत्वास गेला.
गावातच पाण्याची सोय झाल्याने महिलांना खूप दिलासा मिळाला. पाण्याच्या विवंचनेत त्यांचं जगणं जणू हरवलं होतं. मुलांकडे वेळ द्यायचं राहून जायचं. कधी घरातलं करता करता स्वत:कडे बघायला वेळही मिळायचं नाही. पाण्याच्या संकटामुळे शारीरिक त्रास तर होताच पण मानसिक ताणही होताच. तो दूर झाल्यानं महिला ताज्यातवान्या झाल्या.
महिलांनी प्रकल्प पूर्ण केल्यावर गावातला त्यांचा मान वाढला. जवळपास सगळ्या महिला चाळिशीच्या आसपासच्या व निरक्षर होत्या. अनेकींनी कधी तालुक्याचं ठिकाणही पाहिलं नव्हतं. पण आता गावाच्या विकासाबाबत त्या कमालीच्या जागरूक झाल्या आहेत. गावात आता प्रौढ साक्षरता वर्ग सुरू झालेत. त्यामुळे जवळपास सगळ्या महिलांना कामापुरतं लिहिता वाचता येतंय. गावात शिकणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलंय.
नुकताच स्त्री-अर्भकाला वाचवण्याचा संदेश देणारं ‘लेक वाचवा’ हे अभियानही गावात पार पडलं.
माविमच्या इतर गावांतील उपक्रमांना गावातील महिलांचे बचतगट भेटी देतायत. त्यातून प्रेरणा घेऊन सावित्रीबाई फुले बचतगटाच्या सुरेखा पवार या महिलेने कुक्कुटपालनाचा जोडधंदा सुरू केलाय.
गावाचा चेहरामोहरा आता पालटू लागलाय. म्हणूनच बचतगटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या महिलांनी गाजवलेल्या कर्तृत्वाला दाद द्यावी लागेल. कारण वर्षांनुवर्षे भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येचा छडा लावत त्यांनी खऱ्या अर्थाने गावात विकासाची गंगा आणली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो