श्रावणबाळाची आई
मुखपृष्ठ >> लेख >> श्रावणबाळाची आई
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

श्रावणबाळाची आई Bookmark and Share Print E-mail

altशनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बिलकूल खानाबदोश जिंदगी जगलेल्या शाहीद कपूर आणि त्याची आई नीलिमा अझीम यांनी त्यासाठी प्रचंड संघर्ष केला. नीलिमा यांनी आई म्हणून आपलं कर्तव्य केलं आणि त्याचंच ऋण मानून शाहीद आधुनिक श्रावणबाळ होऊन आता पुत्र कर्तव्य निभावतो आहे..
मैं अपने खयालातों का कहां से आगाज (आरंभ) करूं यह मैं समझ नहीं पा रही हूं..। मातृत्व म्हणजे काय, ते मी कितपत समर्थपणे पेलू शकले.. कितपत आदर्श आईपण निभावलंय हे माझी दोन्ही मुलं, मोठा शाहीद ज्याला मी साशा म्हणते आणि माझा धाकटा लेक इशानच सांगू शकतील. अहोरात्र, वर्षांचे ३६५ दिन मातृत्व हा थैंकलेस जॉब तुम्हाला निखळ आनंदाचे क्षण देतात, त्या क्षणांचा अपरिमित ठेवा जीवनभर पुरतो. माझ्याकडे आता पत्नीपद नाही.. पण मातृत्वाची पदवी मात्र माझ्याकडून कुणी कधीही हिरावून घेणार नाही.. मग मी आणखी कशाची अपेक्षा करावी?
‘मदर्स डे’चं सेलिब्रेशन करण्यासाठी मी आदर्श आईचा कितपत पर्याय आहे हे मी सांगणं अयोग्य ठरेल, पण गुणी मुलांची आई मी मात्र आहे. माझा साशा तर आधुनिक श्रावणबाळ आहे.
मी दिल्लीत असताना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी पंकज कपूर यांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी लग्न केलं. माझं करिअर तेव्हा बहरास येत होतं. मी बिरजू महाराज यांची पट्टशिष्य होते, माझे संपूर्ण भारतात कथ्थकचे कार्यक्रम होत असत. अभिनय, लिखाण, दिग्दर्शन यातही मी वाटचाल करत होते. शाहीद ऊर्फ साशाच्या वेळी मला आई होण्याची चाहूल लागली आणि मी मोहरून गेले. माझ्या आईने, वडील (अनवर अझीम-पत्रकार-उर्दू लेखक) यांनीही मला मातृत्वाचा आग्रह सोडावा असं कळकळीने सांगितले. कारण माझ्या या वयाला मातृत्वाच्या जबाबदाऱ्या पेलणार नाहीत, करिअरला विशेषत: कथ्थकला रामराम ठोकावा लागेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण, मातृत्वासाठी मी इतकी आसुसले होते, की एका क्षणापुरताही करिअरचा विचार माझ्या मनाला शिवला नाही. शाहीदचा जन्म माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी दिल्लीत झाला. साशाचं भाग्य  तो प्रसिद्ध लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांचा पणतू तर अन्वर आझम (वडील) पत्रकार-लेखकांचा नातू म्हणून जन्माला आला. त्याच्यावर हिंदी-उर्दू साहित्य, कला, नृत्य यांचे उच्च संस्कार झालेत. साशा सहा महिन्यांचा होईपर्यंत माझे नृत्याचे कार्यक्रम सुरू होते. दरम्यान, मी आणि साशाचे वडील पंकज कपूर यांच्यामध्ये तीव्र मतभेदांना सुरुवात झाली आणि साशा तीन महिन्यांचा होईपर्यंत आम्ही विभक्त झालो.. साशाचे वडील तेव्हा त्यांच्या करिअरमध्ये वाव मिळण्यासाठी चाचपडत होते, तर मी तेव्हा चांगलीच नावारूपाला आले होते. आमचे मतभेद वाढत गेले. त्यानंतर मी साशाची आई म्हणून सिंगल पेरेन्ट ठरले. माझ्या अब्बाजानकडून माझी सांपत्तिक स्थिती चांगली असली तरी आमच्या दोघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणं अयोग्यच होतं. पंकज कपूरने विभक्त झाल्यानंतर दोघांच्या उदरनिर्वाहापासून हाथ झटकले. साशा आणि मी त्याच्या बालपणी दिल्लीत होतो. त्यानंतर मी मुंबईत आले, तेव्हा मात्र लेकाचं व माझं पोट भरण्यासाठी मला प्रचंड संघर्ष करावा लागला. लहानशा घरात राहून दिवस कंठलेत, कधी तर नळाला पुरेसं पाणीही नसायचं, पण आंघोळ करून शूटिंगला जाणं भाग असायचं, तेव्हा अनेकदा रस्त्यावरच्या फुटलेल्या जलवाहिनीतल्या पाण्याने चेहरा -हातपाय धुऊन शूटिंगला मी पोहोचलेय..
माझ्या आणि शाहीदच्या हालांना तेव्हा पारावर उरला नव्हता. ते दिवस, तो संघर्ष तो आणि मी अजून विसरलेलो नाहीे. मी आणि साशाने पोटापाण्यासाठी अनेक शहरं बदलली, अनेक घरं-ठावठिकाणे बदलले.. बिलकूल खानाबदोश-सी जिंदगी बन चुकी थी । पण, कुठलीही तक्रार न करता माझा हा गोड मुलगा मला साथ देत राहिला. साशा मोठा-तरुण होईपर्यंत, त्याच्या आताशा प्रसिद्ध झालेल्या पित्याने एका शब्दाने आमची विचारपूस केली नाही.. किमान त्यांनी मुलाची तरी करावी. त्या दिवसांचे व्रण साशा पुसण्याच्या प्रयत्नात आहे, पण माझ्या मनावरचे ओरखडे पुसले जात नाहीत..
डान्स जो मेरी विरासत है, उसे मिली है। त्याचाच वापर त्याला पुढे झाला. आयुष्यातला संघर्ष कमी व्हावा म्हणून अकराव्या वर्षांपासून बालकलाकारांच्या रूपात त्याने काम करायला सुरुवात केली. त्यात जमेची बाजू ही की, मी धर्माने मुस्लीम तर त्याचे वडील पंकज हे हिंदू, पण त्याच्यावर मात्र कुठलाही विशिष्ट धर्म पाळण्याची सक्ती कधी दोघांनी केली नाही, त्यामुळे त्याचा विश्वास धर्मापेक्षा माणुसकीवर अधिक राहिलाय.
मुंबईत सुरुवातीच्या काळात जगताना आम्ही दोघंही पार बावचळून गेलो होतो. या अजनबी-अंजान शहरात आमचं म्हणावं असं कुणी नव्हतं. आम्ही मुंबईत आहोत, हे पंकज कपूरांना कळून त्यांनी आपल्या लेकाकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाही, ही मी शोकांतिका मानते पिता-पुत्राच्या नात्याची. साशा तरुण होईपर्यंत त्याचे त्याच्या वडिलांशी ‘इल्युजनरी रिलेशनशिप’ राहिली. साशाच्या मानसपटलावर त्याचे वडील त्याला ठाऊक होते.
मी सिनेमे, नृत्य, टीव्ही सीरिअल जी कामं प्रतिष्ठेने मिळत गेली, ती करत गेले, कारण मला माझ्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करणं अशक्यप्राय होतं. साशाभोवती मन घुटमळत असे. साशाला आणि पर्यायाने मलाही जीवनात स्थैर्य लाभावं म्हणून मी राजेश खट्टर (अभिनेता)शी दुसरं लग्न केलं. त्याच्याशी देखील सूर जुळले नाहीत, पण मी इशान या दुसऱ्या मुलाची आई झाले. आयुष्याची परवड थांबली नसली तरी साशाने चित्रपटसृष्टीत त्याचे पाय हळूहळू रोवले. त्याला यश मिळत गेलं आणि तेव्हा कुठे त्याच्या पित्याला त्याची आठवण झाली. साशाला घेऊन त्यांनी अलीकडे वर्षांपूर्वी ‘मौसम’ हा चित्रपट काढला, पण तो अयशस्वी ठरला. साशाचं मोठेपण की, त्याने पित्याचा पूर्वीचा व्यवहार जराही लक्षात न ठेवता त्याच्या दिग्दर्शकीय पहिल्या चित्रपटात आनंदाने काम केलं व त्या काळात इतर सगळ्या चित्रपटांचे दरवाजे बंद केलेत. शाहीद आपला धाकटा सावत्र भाऊ इशानवर जीव ओवाळतो. माझ्यासाठी व इशानसाठी त्याने वर्सोव्याचा हा फ्लॅट घेतला. साशाच्या जीवनात अपयश, यश, मान-सन्मान, प्रेमभंग (करीना आणि इतर) असे कितीही निराशजनक प्रसंग आलेत, पण मला दु:ख होऊ नये म्हणून त्याने मला फक्त सकारात्मक बाजू वेळोवेळी सांगण्याचा वेडा अट्टहास सतत केला. एके काळी माझा संघर्ष, माझी उपेक्षा, माझे मोडलेले वैवाहिक संबंध सारं काही मी त्याच्या जवळ शेयर करत असे, आजही करते, आज मी त्याचा मुलगा झालेय आणि तो माझी आई.
राजेश खट्टर नंतर मी रझा खान यांच्याशी विवाह केला, पण तोही विवाह टिकला नाही.  कारणं काहीही असोत, पण साशाचे अशा काही बाबतीत माझ्याशी मतभेद झालेत खरे, पण, तरीही तो आपल्या कर्तव्यापासून तसूभर ढळला नाही.
साशा आणि मी सतत स्थैर्याच्या, सुखी कुटुंबाच्या शोधात वणवणत राहिलो, अगदी आजही त्यापासून दोघंही वंचितच राहिलोय, हीच खंत आहे. माझ्या लाडक्याला मी सुखी घराच्या चार भिंती आई असूनही देऊ शकले नाही, ही माझी उणीव.. माझ्या बिनधास्त जीवनाविषयी त्याने मला कधी ताळेबंद विचारला नाही, जो त्याचा अधिकार होता, त्याने कधीही मला उलट उत्तर दिलं नाही. साशा अभिनेता म्हणून कितपत गुणी आहे, हे मी सांगणार नाही, पण मुलगा मात्र लाखात एक आहे.
साशाने मला आणि इशानला सुखात तर ठेवलं आहेच, पण त्याचे वडील व त्यांची द्वितीय पत्नी (सुप्रिया कपूर) यांच्याशीही प्रेमाचे संबंध, सलोख्याचे संबंध तो राखून आहे. घराच्या भिंती ढासळल्या तरीही माझा साशा त्या भिंतीना टेकू देऊन ठामपणे उभा आहे. तो आहेच माझा श्रावणबाळ !

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो