ग्रंथविश्व : माओवादी चळवळीची निराळी बाजू..
मुखपृष्ठ >> ग्रंथविश्व >> ग्रंथविश्व : माओवादी चळवळीची निराळी बाजू..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व : माओवादी चळवळीची निराळी बाजू.. Bookmark and Share Print E-mail

alt

अविनाश कोल्हे, शनिवार, १२ मे २०१२
आजकाल एक दिवस असा जात नाही की माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची बातमी नाही. एकीकडे आपला देश आíथक महासत्ता होण्याची स्वप्ने बघत आहे तर याच देशात काही वर्ग अन्न, निवारा, वस्त्र यांसारख्या गरजांसाठी झगडत आहे. ही विसंगती विदारक तर आहेच, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारी आहे. माओवाद्यांचे हल्ले सरकारी यंत्रणांवर आणि जंगल ठेकेदार / जमीनदार वगैरे धनदांडग्या वर्गावर होत असतात. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केले की देशाचा शत्रू क्रमांक एक म्हणजे माओवादी शक्ती होय. माओवादी चळवळीला एके काळी नक्षलवादी चळवळ म्हणत असत. ही चळवळ १९६७ मध्ये सुरू झाली होती. यथावकाश सरकारने चळवळ मोडून काढली. गेली काही वष्रे माओवादी शक्ती पुन्हा जोरात आल्याचे दिसते. या चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक राहुल पंडिता यांनी ‘हलो बस्तर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज माओइस्ट मूव्हमेंट’ पुस्तक लिहिले. मात्र यात ढोबळमानाने माओवाद्यांची भलामण केलेली आहे. राहुल पंडिता ज्येष्ठ पत्रकार असून ते ‘ओपन’ या मासिकात काम करतात. ते ‘द अब्सेन्ट स्टेट’ या गाजलेल्या पुस्तकाचे सहलेखक आहेत. त्यांनी या पुस्तकासाठी अनेक माओवाद्यांच्या मुलाखती घेतल्या. मात्र यात कोठेही सरकारची बाजू येत नाही. त्या अर्थाने हे पुस्तक एकांगी आहे.

कोबाद घांदी (अपभ्रंश: गांधी) या कथित माओवादी नेत्याला पोलिसांनी दिल्लीत कशी अटक केली, या प्रकरणाने पुस्तकाची सुरुवात होते.  २० सप्टेंबर २००९ रोजी दिल्लीत पोलिसांच्या हेरांनी घांदीची माहिती दिली. घांदी यांना अलीकडेच जामीन मिळाला आहे. लेखकाने आजच्या काळापासून सुरुवात करून दुसरे प्रकरण १९६७ सालच्या नक्षलवादी चळवळीचा इतिहास देण्यासाठी वापरले आहे. १९६० च्या दशकात आपल्या देशात प्रचंड दुष्काळ पडला होता. देशात भूकबळी पडत होते. मार्च १९६७ मध्ये दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गावातील लोक एकत्र आले आणि त्यांनी जमीनदाराला मारून टाकले. तेथून लढा सुरू झाला, जो आजही देशभर सुरू आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ‘पीपल्स डेली’ने याचे स्वागत केले होते. तेव्हापासून ही चळवळ जागतिक पातळीवर चच्रेत असते. १९७५ साली सरकारने किस्ता गौड आणि जंगम भूमय्या या दोन नक्षलवाद्यांना फाशी दिले.  सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक आणि विचारवंत ज्यां पॉल सार्त् यांनी याचा निषेध केला होता. नक्षलबारीनंतर या चळवळीने आंध्रात मूळ धरले. लेखकाने याचे सर्व महत्त्वाचे तपशील दिले आहेत. याच काळात माओवाद्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला. नव्या नेत्यांनी चारू मुजुमदार यांनी सांगितलेला ‘आधी वर्गशत्रूंचा नायनाट करा’ हा मार्ग बदलून ‘आधी गोरगरिबांना संघटित करू. या मार्गात जर धनदांडगे आले तरच त्यांना मारू’ असा नवा मार्ग मान्य केला( पृ. ४८).  प्रत्यक्षात ज्या प्रकारच्या िहसक घटना आजकाल घडत असतात त्यावरून हा बदल खरेच झाला आहे का, अशी शंका येते.
माओवाद्यांनी लपण्यासाठी सुरक्षित तळ बस्तर भागात तयार केला. २२ एप्रिल १९८० रोजी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी लेनिनवादी’ या पक्षाची घोषणा केली (पृ. ५४). याच काळात श्रीमंत वर्गाची नजर जंगलांवर पडायला लागली. परिणामी आदिवासी बेघर होऊ लागले. त्यांची रोजीरोटी धोक्यात आली. त्यांच्या मदतीला माओवादी धावून आले. या प्रकारे माओवादय़ांना शिरकाव मिळाला .
जंगलात कार्यरत असलेले माओवादी पकडणे खूप अवघड असते. तेथे त्यांचे समांतर सरकार चालते. त्यांचे कायदे चालतात. त्यांचा न्याय असतो. काही अभ्यासकांच्या मते, आता आदिवासींना दुहेरी शोषण सहन करावे लागते. एका बाजूने ठेकेदार, नोकरशहा हे पारंपरिक शोषक आणि आता माओवादी. सरकार माओवाद्यांशी चर्चा करण्याचे अधूनमधून प्रयत्न करीत असते. लेखक दाखवून देतो की, यातही एक पॅटर्न दिसतो. निवडणुका जवळ आल्या की माओवाद्यांशी चर्चा सुरू करायची. याद्वारे जनतेची सहानुभूती व मते मिळवायची. निवडणुका संपल्यावर पुन्हा पोलिसी कारवाई सुरू करायची. (पृ. ८३) यामुळे ही समस्या आहे तशीच आहे.
राहुल पंडिता यांनी माओवाद्यांच्या संघटना कशा असतात, त्यांचा कारभार कसा चालतो, त्यासाठी लागणारे पैसे कोठून येतात, यासाठी अनेक ठिकाणी जंगलात व्यापार करीत असलेल्या कंपन्यांना व कंत्राटदारांना खंडणी कशी द्यावी लागते वगैरे महत्त्वाचे तपशील दिले आहेत ( पृ. १०७).  माओवादी कसे आंतरराष्ट्रीय बाजारातून अद्ययावत बंदुका खरेदी करतात, त्याबद्दलचे व्यवहार कसे होतात वगैरे माहिती थक्क करणारी आहे. ही एक बाजू झाली. याची दुसरी बाजू म्हणजे माओवादी करीत असलेली विकासाची कामं. ज्या भागात माओवादी जोरात आहेत तेथील शाळांत शिक्षक वेळेत येतात, मुलांना व्यवस्थित शिकवतात. जर शिक्षकांनी यात टाळाटाळ केली तर माओवादी त्यांच्या पद्धतीने न्याय करतात. अनेक ठिकाणी माओवाद्यांनी गावकरी मदतीला घेऊन विहिरी बांधल्या आहेत. शेतीचे नवे प्रयोग सुरू आहेत. अशा कामांमुळे काही ठिकाणी माओवांद्याबद्दल सहानुभूती आहे.
लेखकाने आठवे प्रकरण अनुराधा शानबाग या माओवादी महिलेच्या कामाची चर्चा करण्यासाठी वापरले आहे. अनुराधा ही मुलगी मुंबई निवासी उच्चवर्णीय, उच्चवर्गीय. पण अशी मुलगी, जिला गरिबी बघवत नसे. यातूनच ती डाव्या चळवळीकडे ओढली गेली. तिने मुंबईतील सुखासीन जीवन सोडले आणि माओवाद्यांमध्ये सामील झाली. या प्रकरणात तिने केलेल्या कामाचे तपशील दिले आहेत. नागपूर विद्यापीठात अर्धवेळ प्राध्यापक असलेली अनुराधा दलित वस्तीमध्ये राहत असे आणि सर्व शहरभर सायकल चालवत फिरत असे. सतत चहा पिणे, कधीही वेळेवर न जेवणे वगैरेमुळे तिला अनेक आजार झाले. शरीर अनेक व्याधींनी पोखरले होते. तिचे १२ एप्रिल २००८ रोजी मुंबईत निधन झाले. असे अनेक ध्येयवादी तरुण या चळवळीकडे ओढले गेले होते हे जसे खरे. पण ही सर्व ‘वाट चुकलेली मंडळी’ होती हे खरे का, असा प्रश्न आता उपस्थित होतो.
शेवटच्या म्हणजे नवव्या प्रकरणात माओवाद्यांच्या नव्या रणनीतीची चर्चा आहे . एके काळी माओवादी मानत असत की, आधी ग्रामीण भाग काबीज केला पाहिजे. त्यानंतर शहरांवर हल्ला केला पाहिजे. ही माओची रणनीती होती. आता माओवादी असे मानतात की, ग्रामीण भागाप्रमाणे शहरातही काम केले पाहिजे. या नव्या रणनीतीनुसार अनेक शहरांत आता माओवादी सक्रिय झालेले आहेत (पृ. १६३) . माओवादी आकलनानुसार नव्या आíथक धोरणांमुळे शहरातील गरिबी भीषण होत आहे. परिणामी, आता माओवादी शहरांतही आहेत.
माओवादी जरी हिंसेचा वापर करीत असले तरी ते राजकीय कार्यकत्रे आहेत याचा विसर पडू देऊ नये, असे हे पुस्तक सतत बजावते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो