ब्लॉग माझा : असेही क्षण.. प्रवासातले.. प्रवासापूर्र्वीचे
मुखपृष्ठ >> ब्लॉग माझा >> ब्लॉग माझा : असेही क्षण.. प्रवासातले.. प्रवासापूर्र्वीचे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग माझा : असेही क्षण.. प्रवासातले.. प्रवासापूर्र्वीचे Bookmark and Share Print E-mail

altधनश्री देसाई , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्लॅ टफॉम्र्स आणि ट्रेन्स या दोन गोष्टी भन्नाट आहेत. तुम्हाला इथे इतक्या गोष्टी दिसतात, जाणवतात, समजतात.. आणि कधी कधी  तर इतक्या गर्दीत तुम्ही तुम्हाला स्वत:लासुद्धा जाणवत नाहीत! असे असंख्य अनुभव देते ट्रेन आणि  प्लॅटफॉम्र्सही.. कधी पुढच्याला धक्काबुक्की करून पुढे जाताना दिसणारं निर्ढावलेपण.. तर कधी धावत्या ट्रेनमध्ये कोणाला तरी चढायला होणारी मदत, कधी हळदीकुंकू तर कधी नोकरी बदलण्याची पार्टी तर कधी सीटची अदलाबदली.. सारंच कसं वेगळं.. ठरलेलं .. तरी निराळं!! मी खूपदा ऐकते ‘किती कंटाळा येतो प्रवासाचा, काही उपयोग नसतो त्या तेवढय़ा वेळेचा’ अनेकदा मलाही पटतात या गोष्टी, पण तरी मला माझा प्रवासाचा वेळ प्रिय आहे.. म्हणजे ट्रेनमध्ये उडी मारून सीट मिळविताना वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यापासून ते ट्रेन थांबल्यावर नकळत घराकडे धावणाऱ्या पायांच्या गतीपर्यंत.
एकदा मूड खूप खराब होता, राग मनात मावत नव्हता, तरी वरून स्वत:ला मी शांत ठेवत होते. ट्रेन येताना दिसली, आज गर्दी जरा जास्तच होती. उडी मारणाऱ्यांची गर्दीपण वाढू लागली आणि माझी अस्वस्थताही! बाजूला ‘ती’ अचानक येऊन उभी राहिली. ट्रेन जवळ यायला लागली आणि माझ्या बाजूची  ‘ती’ मला विचारायला लागली, ‘मिळेल न चढायला?’, मी काही म्हणायच्या आत ट्रेन समोर आली आणि उडी मारण्याची सवय नसलेल्या तिची उडी साहजिकच चुकली आणि रोजची सवय असणाऱ्या माझी उडी तिच्या चुकीमुळे गडबडली. कशीबशी बसायला जागा मिळाली.. आणि हाताला चांगलंच लागल्याचं जाणवलं. मनातला राग आणि त्यात ती जखम.. मला रडावं की राग काढावा कळलं नाही आणि तितक्यात ती दिसली. थोडय़ा अंतरावर बसलेली, जरा गर्दीला घाबरलेली, पण जागा मिळविल्याचा आनंद चेहऱ्यावर असलेली आणि माझा संताप शेवटी तिच्यावर निघालाच. तितक्या रागात नक्की तिला काय काय बोलून गेले तेही माहीत नाही. फक्त तिचा असहाय्य चेहरा दिसला आणि मग मी थांबले. काही वेळ गेला आणि मलाच माझी चूक कळली आणि तिला सॉरी म्हणायला मी तिच्याकडे वळले, पण ती शांत झोपून गेली होती सगळं विसरून.. मला अस्वस्थ करून!
* * *
काल त्या तुलनेत कमी गर्दी होती. परत येताना.. मी पुस्तक वाचत बसले होते आणि समोर रबर, कानातले विकणारी बाई आली.. कमरेला बांधलेलं पोर, पोराचं रडणं आणि हिचं वस्तू विकणं. दोन्ही जोमात चालू होतं. लोक कधी तिच्या पोराला पाहत, कधी तिच्याशी काही बोलत, कधी वस्तू विकत घेत. सगळं छान चालू. मी फक्त पाहत होती एका कोपऱ्यातून. स्टेशन आल्यावर त्या बाईने अचानक ठरवलं आणि ती तिच्या सामानासकट आणि कमरेवरच्या पोरासकट उतरायला गेली.  इतक्यात.. कसं काय माहीत.. ते रडणारं पोर, एकदम मला पाहून हसलं.. आणि जोरात बाय म्हणालं. मला वाटलं मीच काहीतरी ऐकलं, पण जसंकाही मला खोटं ठरवयलाच ते पोर परत मला गोडसं हसून बाय म्हणू लागलं. ते निरागस हसणं आणि मला वळून वळून पाहणं.. मनात म्हटलं, कुठेतरी काही असेल तुझ्याशी..  इतकं छान हसलास माझ्याशी त्या थोडय़ाशा गर्दीतही.
* * *
तिने इंडिकेटर पाहिला, दोन मिनिटांत ट्रेन यायची होती, मित्रांच्या घोळक्यात ती दोघंही उभी होती. अखंड मस्करी चालू, पण मनात दोघांचं आपलंच काहीसं सुरू होतं, जणू सगळ्यांमध्ये असूनसुद्धा ते एकमेकांशीच बोलत होते. ‘‘आता परत कधी?’’ त्याने मनातच विचारलं..
‘‘माहीत नाही रे, पण नाही जमणार कदाचित.’’ तिने मनातच उत्तर दिलं आणि नेमकं तेव्हाच त्यांनी एकमेकांकडे बघितलं, दोघे हसले, त्याने तिला नजरेनेच सांगितलं, ‘आली गं तुझी ट्रेन.’ आणि ती निघाली, बाकीच्यांना बाय करून, पण त्या सगळ्या भावनांच्या वादळात तिने त्याच्याशी हात मिळवलाच नाही.. अरे राहून गेलं का? पण फक्त त्याच्या डोळ्यात एकदा शेवटचं पाहून ती चढली ट्रेनमध्ये. इतकं ठरवलेलं असतानाही तिने त्याला वळून पाहिलंच, त्यालाही ते माहीत असल्यासारखंच!
बाकीच्या मित्रांचा विचार न करता ती त्याला खूप वेळ पाहत राहिली.. तिचं हे असंच, मनात येईल तेच करायचं, त्याला सोडतानाही त्याला अखंड पाहत राहायचं.. तोही तसाच, जास्त व्यक्त न होणारा, पण मनात तिला सतत जपणारा, गर्दीत काळजी घेणारा.
तोपण मित्रांबरोबर चढला त्याच्या ट्रेनमध्ये, मनाचा एक भाग तिच्याबरोबर गेला हे पक्कं  समजून. तिचा एसएमएस येईल का? मी करू का? आता कशाला, त्रास उगीच.. पण खूप बरं वाटलं आज भेटून. भले नाव नाही आपल्या नात्याला पण तरी.. एक अनामिक नातं जणू, आयुष्य बनल्यासारखं..  तितक्यात त्याच्या मित्राने त्याला काही विचारलं आणि तोपण मनातलं बाजूला ठेवून उत्तरं देऊ लागला.
तो एक काळा ठिपका होईपर्यंत तिने मागे वळून पाहिलं, मग तिला अचानक जाणवलं की, आता खरंच कधी? तुला खूप काही सांगायचं राहिलं आहे. ऑफिसमध्ये खूप कंटाळा येतो रे, अरे नवीन पुस्तकाबद्दल बोलायचं आहे, ते नवीन गाणं ऐकलंस का?.. अरे, तुला दर दिवशी मेल लिहिते मी आणि मग सेव्ह करते आणि मग तिला अचानक जाणवलं की, खूप कारणं आहेत आजची भेट शेवटची ठरवायला. पण खरंच आपण लांब जाऊ अशाने.. मनात किती गोष्टी सांगते तुला, कधी खूप हसले की, तू आठवतोस, डोळ्यातलं पाणी पुसताना. ‘‘मला तुला रडताना नाही बघवत’’ या तुझ्या वाक्याची आठवण होते..
बापरे.. विचार नाही करायचा.. म्हणून तुझाच विचार करते आहे की.. माझिया मना, जरा थांब ना, पाउली तुझ्या माझिया खुणा.. तुझे धावणे अन् मला वेदना!!!.. माझिया मना!!!

* * *
‘‘सकाळी सकाळी वैताग नुसता.. डोकं फिरवून ठेवलं.. च्यायला झेपत नाही तर एवढं अंगावर घ्यायचंच कशाला?’’ घरातून पाय बाहेर टाकता टाकता अक्षय मनातल्या त्राग्यालाही वाट मोकळी करून देऊ लागला. पावलं भरभर रिक्षांच्या रंगेकडे वळत होती पण मनाची नुसती आग आग होत होती.. त्याला बायकोचा त्रासिक चेहरा आठवला..
सदानकदा कशी ती कुठल्या ना कुठल्या चिंतेत असते? आणि मग कधी कधी आपल्यावरपण आगपाखड करते!
‘‘अरे किती हळूहळू रिक्षांची रांग सरकते आहे पुढे .. ८:५९ची ट्रेन गेली तर सॉलिड पंचायत होईल ना..’’ बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्याला अध्र्या घामाघूम अवस्थेत रिक्षा मिळालीच. ‘‘चला, आता ट्रेन मिळून दे फक्त.. बस्स.’’ रिक्षाच्या वेगात परत त्याचे विचार सुरू झाले..  
त्याची बायको.. आज सकाळी उठल्यापासूनच जरा त्रासलेली दिसली. त्यात लेकीला बरं नाही म्हटल्यावर तिला अजूनच चिंता!
‘‘अरे पण म्हणजे तुझी चिंता तू काय माझ्यावर टाकणार? नाही जमत तर करू नकोस ना.’’ तो रोजच्या सारखाच उठला, चहा घेतला आणि पेपर वाचत बसला.. त्यात काय होतं एवढं भडकण्यासारखं.. तरी ती चिडली. ‘‘असा काय करतोस.. ही काय वेळ आहे पेपर वाचायची? मलापण जायचं आहेना ऑफिसला. त्यात गुड्डला बरं नाही. जरा कामात मदत कर ना.’’  त्याने ऐकल्यासारखं केलं पण परत पेपर वाचायला लागला. कुठे तरी त्याच्या मनात आलं की करेल ती सगळं .. रोजच करते आणि छान आवरते की! पण आज ती खरंच वैतागली होती. खूप बोलून, भडकून, भांडूनसुद्धा जेव्हा ‘जैसे थे’ परिस्थिती दिसली तेव्हा तिने त्याच्या हातून पेपर खेचून घेतला आणि निघून गेली..
‘‘मी करते म्हणून कळत नाही, जेव्हा एक दिवस धावत धावत शेवटच्या क्षणी ट्रेन पकडायला लागेल ना तेव्हा समजेल मी रोज काय कसं करते ते.’’ त्याला तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून जरा वाईट वाटलं, पण ही काय पद्धत झाली काय? माझापण काही आत्मसन्मान आहे. आणि मग तिचं जेवण, गुड्डला सांभाळणं, आवराआवर करणं.. आणि त्यात अखंड बडबड! त्याने आपलं आवरलं, त्यातही जरा उशीरच झाला.. तिने ठेवलेला नाश्ता न करताच तो बाहेर पडला! कामं काय कधी कोणी केली नाहीत.. आणि काय ऑफिसं सांभाळली नाहीत. पण नुसता राग राग करते..  शेवटी बोललाच  तिला, ‘‘झेपत नाही तर करू नकोस!’’.. तिच्या रागाची जागा तोपर्यंत असाह्यतेने घेतली होती, ती कसंबसं त्याला बोलली, ‘‘मग कोण करणार.. रोजच उशीर, आणि काही मदत नाही.. रोजच धावत्या ट्रेनमागे धावा आणि तरी न रडता घरातल्यांसमोर हसा.’’  त्याने पायात बूट घातले आणि ती त्याला बोलली ‘‘अरे नाश्ता तर कर, तुला काढून ठेवला होता.’’ तो काही न बोलता निघाला.. दार लावणार इतक्यात ती धावत दाराकडे आली, ‘‘अरे नीट जा.. उशीर झाला म्हणून उगीच धावू नकोस.. काळजी घे!’’
त्याने वळूनही नाही पाहिलं. आणि निघाला ‘‘च्याला सकाळ खराब नुसती.’’
अचानक रिक्षा थांबली! सकाळचं ट्रॅफिक जाम!!
‘‘अरे बापरे. चुकणार वाटतं आपली ट्रेन.’’ मग त्याला अचानक ती आठवली, कशी रोज ट्रेन मिळत असेल हिला. पण जास्त थांबला नाही तो त्या विचारात..
रिक्षा स्टेशनवर पोहोचल्यावर तो धावत आपल्या ट्रेनसाठी निघाला.. ट्रेन निघत होती..
‘‘घेऊ.. की.. सोडू?’’..
‘‘प्रयत्न करून पाहू’’.. तो धावत त्याच्या डब्यापर्यंत पोहोचला.. ट्रेन आता जरा स्पीडमध्येच होती.. तरी त्याने प्रयत्न केला..
‘‘उशीर झाला म्हणून उगीच धावू नकोस..’’  
.. बस एक पाय टाकल्यावर मिळेल.. मिळून जाईल..
‘‘अरे नीट जा..’’  
ट्रेनचा वाढता स्पीड. त्याने उडी मारून पाय ठेवला..
आणि .. काही तरी चुकलं..
‘पडला रे कोण तरी.. का चढतात धावत्या ट्रेनमध्ये?. अरे त्याला आधी बाजूला खेचा नाही तर जायचा ट्रेनच्या खाली.’ अक्षयला कोणी दोघा-तिघांनी बाजूला घेतला होता.. जरा सावरल्यावर तो एका बेंचवर बसला.. काय झालं असतं आज एका क्षणात? त्याला विचारसुद्धा नाही करवला..
‘काळजी घे..’ त्याला बायकोचे शब्द आठवले त्याने पहिला फोन तिलाच केला.. ‘‘काय रे नीट चढलास का? एवढा काय तो राग? असो, नीट जा आता, आणि पोहोचल्यावर पहिला नाश्ता कर.. कळलं का?’’ त्याला काही बोलवेना..
‘‘अगं.. सॉरी..’’
‘‘तू ठीक आहेस ना? सगळं ठीक ना?’’ ..
‘‘हो.. आता सगळं ठीक आहे! तुझ्या काळजीने आज तारलं मला ..’’
ट्रेनच्या आवाजात सगळं तिला नीट नाही कळलं पण इतका नक्की कळलं की ..
आता सगळं ठीक आहे!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो