आनंदाचं खाणं : तारुण्याच्या उंबरठय़ावर..
मुखपृष्ठ >> आनंदाचं खाणं >> आनंदाचं खाणं : तारुण्याच्या उंबरठय़ावर..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आनंदाचं खाणं : तारुण्याच्या उंबरठय़ावर.. Bookmark and Share Print E-mail

altवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , १९ मे २०१२
आहारतज्ज्ञ

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
या सदरात आता आपण तारुण्यातील मुलांच्या आहाराची माहिती घेणार आहोत. काय आणि कधी खायला हवं या वयोगटातल्या तरुणांनी..
बा लपणीचा खोडसाळपणा कमी झालेले आणि जबाबदारीचे ओझे मनावरती नसलेले .. मजा-मस्तीचे दिवस म्हणजे तरुणपण. अर्थात कॉलेजचं जगच वेगळं असतं. नाही म्हटलं तरी ती वेगवेगळी सबमिशन्स, टेस्ट्स, कॉलेजव्यतिरिक्तचे क्लासेस, त्याचा अभ्यास, वेळ मिळेल त्या वेळी होणाऱ्या ‘कट्टय़ावरच्या’ गप्पा, आई-वडील आपल्याला अजूनही ‘लहान समजतात’ ही बोच, स्वभावातील फरकामुळे होणारे मतभेद- फारच गुंतागुंत आहे ना ही? म्हणजे आज ‘आनंदाचं खाणं’ सदरामध्ये मी तुमच्याशी खाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर बोलणार नाहीए. फक्त लहान मुलांच्या खाण्यावरून आपण आयुष्याच्या पुढील टप्प्याविषयी बोलणार आहोत- म्हणजेच आजच्या युवापिढीच्या खाण्याविषयी!
मुलं लहान असतात ना (म्हणजे शाळेत असताना) त्या वेळी किंबहुना आयुष्याच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजेच बाळ पोटात असल्यापासून मुलाच्या (पोटात असताना आईच्या) खाण्या-पिण्याविषयी आपण जागरूक असतो. तोच प्रकार ‘वय’ वाढल्याची जाणीव झाल्यावर असतो. म्हणजे साधारण ३५ वर्षांच्या पुढे! मग १५-३५ वयामध्ये काय योग्य आहार जरुरी नसतो की ‘चलता है’ म्हणत किंवा ‘वेळ कुठे आहे आहाराचा विचार करायला’ म्हणून आपण आपल्या खाण्याकडे दुर्लक्ष करू शकतो? एकदा का शाळा संपली की ‘आपण मोठे झालो’ या विचारामध्ये आजची तरुण पिढी कुठेतरी गफलत करते. सर्वसाधारणपणे खालील मुद्दे तरुणांनो, तुम्हाला जर लागू पडत असतील तर हा लेख तुम्ही जरूर वाचा.
* ‘मोठे’ झाल्यामुळे कॉलेजमध्ये डबा न्यायला आवडत नाही.
* माझे कोणतेच मित्रमैत्रिणी डबा आणत नाही, मग मी का नेऊ?
* कॉलेज कॅन्टीन कशासाठी आहे?
* डबा खायला वेळ नसतो. दोन लेक्चर्समध्ये वडापाव खायला इझी असतो.
* कॉलेजनंतर अधिक लेक्चर्स असतात किंवा क्लासेस असतात, मग सकाळपासून कुठे डबा मिरवायचा?
* संध्याकाळी घरी पोहोचेपर्यंत खूप उशीर होतो. भूक लागलेली असते, मग ‘गाडीवरच’ खाणं आलंच की!
* रात्री मी आवर्जून घरचाच आहार घेतो/ घेते.
काही ‘सामान्य’ आरोग्य-तक्रारी :
* वजन जास्त वाढणं किंवा जरुरीपेक्षा बारीक असणं.
* केस गळणं किंवा अकाली पांढरे होणं.
* थकवा जाणवणं.
* डोळ्याखाली काळी वर्तुळं असणं.
* अधूनमधून हात-पाय-डोकं दुखणं.
* निस्तेज त्वचा असणं किंवा मुरुमांचा त्रास असणं.
* शांत झोप न लागणं किंवा सतत झोपाळलेलं असणं.
* कितीही वाजता उठल्यानंतर तरतरीत न वाटणं.
* अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता कमी होणं.
* जास्त चिडचिड होणं.
* मुलींना अनियमित मासिक पाळी येणं.
* कोणत्याही वेळी भूक लागणं किंवा भूकच न लागणं.
* पचनाच्या काही तक्रारी असणं, जसं बद्धकोष्ठता, छातीत जळजळ होणे वगैरे.
वरीलपैकी तीनपेक्षा जास्त लक्षणं जर तरुणांनो, तुमच्यामध्ये असतील तर नक्कीच तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण शरीरामध्ये काहीही कमतरता असेल तर आपलं शरीरच आपल्याशी संवाद साधतं. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. उदा. केसांच्या तक्रारी असतील तर शाम्पू बदलत बसण्यापेक्षा शरीर काय सांगतंय ते ऐका- जीवनसत्त्व अ, ओमेगा फॅट्स आणि जीवनमूल्य जस्तची कमतरता आहे ती भरून काढा! वगैरे वगैरे!
चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे परिणाम :
व्यायामाचा अभाव = लठ्ठपणा
अतिचरबी आणि शर्करायुक्त खाणं = मधुमेह/ वाढलेली कोलेस्टेरॉलची पातळी
मानसिक तणाव = अतिरक्तदाब
‘बाहेरील’ खाण्याचा त्रास = कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती
मधुमेह, अतिरक्तदाब वगैरे आजारांचा विचार आत्ता कशाला? चाळिशीनंतर बघू! असा विचार जर तुमच्या मनात आला असेल, तर तरुणांनो, जरा स्वत:ला सांभाळा. चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांसाठी वयाची मर्यादा नाही म्हणून जरा जपून!
कॉलेजच्या तरुणांसाठी योग्य जीवनशैली :
* खाण्यासाठी जगू नये, जगण्यासाठी खावे.
* योग्य पद्धतीने काम करण्यासाठी शरीराला योग्य आहाराची गरज असते, म्हणून ‘मित्र’ काय म्हणतील म्हणून किंवा ‘वेळ’ वाचविण्यासाठी घरचा डबा सोडून बाहेरचं खाल्लेलं ‘फास्ट फूड’ शरीराला फायदेशीर असतं असं नाही.
*  दिवसातून कमीतकमी पाच ते सहा वेळा अन्न घेतलं पाहिजे. ‘आम्ही काही दिवसभर खातच बसू का’ हा प्रश्न मनात येईल, पण दिवसभरात तीन मुख्य खाणी म्हणजे नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण- याव्यतिरिक्त मधल्या वेळी फळं, चणे-शेंगदाणे, चिक्की, लाडू, चिवडा वगैरे तुमच्या बॅगेमध्ये राहायला काहीच हरकत नाही.
* हॉटेलमध्ये खाणं किंवा ‘गाडीवर’ खाणं वाईट कधी आहे तर रोज रोज खाल्लं तर. किती प्रमाणात आणि किती वेळा महिन्यातून खावं हे आपल्या आरोग्यासाठी आपण ठरवलेलं बरं.
* कोणत्याही ‘फॅड आहारा’चा मार्ग न पत्करलेलाच बरा. कोणत्याही हीरोला डोळ्यासमोर ठेवून ‘बॉडी’ बनवण्याच्या नादामध्ये किंवा ‘झीरो फिगर’च्या नादामध्ये आहारामध्ये चुकीचे बदल कधीही करू नयेत. प्रत्येकाची उष्मांकांची आणि प्रथिनांची गरज शरीर ठेवणीप्रमाणे आणि शरीराच्या चलन-वलनानुसार ठरते. म्हणून ‘योग्य’ आहार सल्ल्यानुसार आपला आहार ठरवावा. कारण चुकीच्या आहाराचे दुष्परिणाम आज नाही तर उद्या दिसतातच. त्यापेक्षा पुढीलसारखे पदार्थ करून खा -
हरा-भरा पुलाव :
ब्राऊन तांदूळ १ कप, गाजर- फरसबी- मटार- फ्लॉवर पाव कप, मोड आलेली मटकी/ मेथी/ सोयाबीन चंक २ चमचे, पालक, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, तेल १ चमचा, दही २ चमचे, अख्खी वेलची, दालचिनी १-२ तुकडे, उभा चिरलेला कांदा १ छोटा, मीठ चवीनुसार.
कृती :
तांदूळ धुवून घ्यावेत. हातसडीचा तांदूळ नसेल तर दलिया वापरला तरी चालेल.  गरम तेलामध्ये कांदा आणि वेलची-दालचिनी टाकून परतून घ्या. हिरवी पेस्ट घालून, थोडं परतल्यावर दही आणि चिरलेल्या भाज्या, मोड आलेली मटकी/ मेथी दाणे घाला.  धुतलेले तांदूळ/ दलिया घालून, मीठ घालून दुप्पट पाणी घाला. वाफ येईपर्यंत शिजवा. काजू किंवा शेंगदाणे चवीप्रमाणे घातले तरी चालतील.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो