स्त्री समर्थ : बंदिनी सौदामिनी
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : बंदिनी सौदामिनी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : बंदिनी सौदामिनी Bookmark and Share Print E-mail

altप्रशांत असलेकर , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चुलीत फेकल्या गेलेल्या पुस्तकांमुळे तिचा शिक्षणाचा मार्ग बंद झाला. पण शिकण्याच्या ओढीनं तिने त्यावरही मात केली. तब्बल १६ वर्षांनी नववीत अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करत वकिलीची सनद घेण्यापर्यंतचा
अ‍ॅड. शशिकला रेवणकर यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. आदिवासी, कातकरी समाजातल्या गरजू महिलांच्या केसेस नि:शुल्क लढवतांना त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचं मोलाचं कार्यही त्या पार पाडत आहेत. संसारात अडकलेल्या बंदिनीची सौदामिनी होण्यापर्यंतची ही कहाणी.. अ‍ॅ ड. शशिकला रेवणकर हे नाव ठाणे जिल्ह्य़ातल्या कल्याण-अंबरनाथ परिसराला नवं नाही. त्यांच्या झुंजार वकिलीच्या जोरावर त्यांनी लढलेल्या केसेसमुळे अनेकांना त्या परिचित आहेत. पण या बिनधास्त वकिलीणबाईंच्या भूतकाळाविषयी फार थोडय़ा जणांना माहिती असेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या अ‍ॅड. शशिकला यांचा जीवनसंघर्ष त्यांच्या समर्थपणाची साक्ष देणारा तर आहेच शिवाय इतरांसाठी आदर्शवतही आहे.
अ‍ॅड. शशिकला रेवणकर मूळच्या कारवारच्या. पंचवीस माणसांच्या एकत्र कुटुंबात वाढलेल्या. शाळेतल्या अत्यंत हुशार विद्यार्थिनी. यासह त्या सांस्कृतिक कार्यक्रमात जितक्या आघाडीवर असायच्या तितक्याच खेळातली बक्षिसे पटकवायच्या. शाळकरी वयातच केव्हातरी कविता करायची सवय जडली आणि हा कवितेचा हा छंद जीवनात आजतागायत कायम आहे.
शशिकलाताई नववीत असताना एक दिवस त्यांचा भाऊ शाळेत आला. ‘घरी पाहुणे आले आहेत’ असे म्हणून घरी घेऊन गेला. पाहुणे त्यांना ‘बघण्यासाठी’ आले होते. शशिकलाताईंच्या मनात नसूनही त्यांना नवरीमुलगी म्हणून दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलगी पसंत पडली. गडबडीने त्याच दिवशी संध्याकाळी साखरपुडा झाला व महिन्याभरात त्यांचं लग्नही लागलं. पुन्हा शाळेत जायला मिळेल, या आशेने भाबडय़ा शशिकलाने सासरी जाताना आपलं दप्तर बरोबर नेलं होतं. पण शाळेत जायला काही मिळालं नाही. पण पुस्तकं वाचायची आवड काही त्यांना गप्प बसू देत नसे. एक दिवस त्यांच्या पतीनं त्यांना चुलीजवळ अभ्यासाचं पुस्तक वाचताना बघितलं. त्याला इतका संताप आला की त्या रागात त्याने ताईंची सगळी पुस्तकं चुलीत भिरकावली. शाळेच्या पुस्तकांशी नातं संपलं आणि त्या परंपरेच्या जोखडात बंदिनी झाल्या.
शिक्षण बंद झालं तरी संसार सुखाचा सुरू होता असंही नव्हतं. नवरा व सासू शीघ्रकोपी होते. नवरा वरचेवर मारहाण करायचा. त्यांच्या वैवाहिक आयुष्यातला एकही दिवस सुखाचा गेला नाही. शशिकलाताईंच्या पतीचे सोनारकामाचे दुकान होते. ते विशेष चालत नसल्यानं नवऱ्याची सतत चिडचिड व्हायची. त्यातच दुकानाच्या मालकी हक्काबाबतची एक केस कोर्टात सुरू होती. या केसच्या निमित्ताने त्यांना बऱ्याचदा डोंबिवलीतील तेंडुलकर वकिलांच्या ऑफिसात जावे लागे. तिथे त्यांच्यासारख्याच अनेक दुखी, अबला स्त्रिया वकिलांचा सल्ला घ्यायला यायच्या. शशिकलाताईंना वाटायचे, जर आपण शिकलो असतो तर या स्त्रियांसाठी त्यांच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी नक्कीच काहीतरी केले असते. आणि त्याच वेळी  आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार शशिकलाताईंच्या डोक्यात पक्का होऊ लागला. घरची आíथक परिस्थिती सुधारावी हा हेतू त्यामागे होताच.
दोन मुलांच्या जन्मानंतर पतीचा विरोध डावलून त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश घेतला. नवऱ्याची मिळकत अपुरी पडत असल्यानं त्यांनी कपडे विकण्याचं कामही सुरू केलं. शिर्डीच्या साईबाबांवर त्यांची दृढ श्रद्धा होती. इतक्या बिकट परिस्थितीतही त्या कविता करत. साईबाबांसंबंधीच्या त्यांच्या काही कविता ‘साईलीला’ या मराठी मासिकात प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यातून त्यांना मुंबईच्या साईनिकेतनमध्ये नोकरी मिळाली.
१९८६ साली पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांची परीक्षा पंधरा दिवसांवर आलेली असताना त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. परिस्थिती इतकी हलाखीची होती की, पतीचं श्राद्ध करण्याएवढे पसेही जवळ नव्हते. सासरच्यांनी पतीच्या निधनाला त्यांनाच जबाबदार ठरवत भरपूर मानसिक त्रासही दिला. पण शशिकलाताई खचल्या नाहीत. त्यांचा प्रवास सुरूच होता.
पतीच्या निधनानंतर नोकरी करून व कपडे विकून त्यांनी पदवी मिळवली. नंतर एलएल.बी.च्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. पुणे विद्यापीठाचे ग्रंथपाल शहाजी काळे यांनी त्यांना खूप मदत केली. वर्षभर नोकरी आणि मुलंबाळं यामुळे अभ्यासाला वेळच मिळत नसे. मग त्या परीक्षेपूर्वी एक महिना मुलांना आपल्या altविश्वासातल्या शेजारी लता सुळे हिच्याकडे सोपवून पुण्याला श्री. काळे यांच्याकडे जायच्या. वर्षांचा अभ्यास त्या एका महिन्यात करायच्या. अशा तऱ्हेने परिस्थितीशी झगडून त्यांनी वकिलीची सनद मिळवली. सुरुवातीला अ‍ॅड. गणपतराव नलावडे व तेंडुलकर वकील यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांनी पुढे स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. अ‍ॅड. शशिकला रेवणकर यांनी स्वत: स्त्री म्हणून आयुष्यात खूप भोगलं आहे. त्यामुळे कुठल्याही महिलेचा खटला त्यांच्यासाठी फक्त एक ‘केस’ नसते. त्या जागी ‘मी’ असते तर काय केलं असतं? ह्य़ा भावनेतून त्या ‘केस’कडे बघतात. म्हणूनच स्त्रियांवरील अन्यायासंबंधीचे खटले लढताना त्यांच्या अंगात वाघिणीचे बळ संचारते. स्त्रियांवरच्या अन्यायांविरुद्ध लढताना त्या सौदामिनीसारख्या तळपतात, दुग्रेसारख्या लढतात.
आजवर अनेक स्त्रियांना त्यांनी पोटगी, घर, पतीच्या पेन्शनमधील हिस्सा, संपत्तीतला वाटा, स्त्रीधन परत मिळवून दिलंय. आदिवासी-कातकरी समाजातील महिलांना त्रास देणाऱ्या सवर्ण वर्गातील राजकीय पुढाऱ्यांना वठणीवर आणलंय. त्यांचं कार्यालय म्हणजे अन्यायपीडित महिलांसाठी  आशेचा किरण आहे. अ‍ॅड. शशिकला रेवणकर प्रत्येक स्त्रीची केस आत्मीयतेने समजून घेतात. त्यांना कायद्याच्या अंगाने, तिच्या हक्कांची जाणीव करून देतात. तिचा आत्मविश्वास जागवतात. त्या महिलांना कायम सांगतात, ‘परिस्थितीला शरण जाऊ नका. संघर्ष करा. परिस्थितीत आपल्याला हवे तसे बदल घडवून आणा. आवश्यक ती मदत मी करेनच. पण हिम्मत मात्र तुम्हालाच धरली पाहिजे.’
अंबरनाथ परिसरात तर अ‍ॅड. शशिकला यांच्या ऑफिसमध्ये स्त्रिया रडत रडत येतात आणि तिथून बाहेर पडताना हसत हसत जातात, असं गमतीनं म्हटलं जातं. केस लढायला पसे नाहीत म्हणून अ‍ॅड. रेवणकर कोणत्याही स्त्रीचे काम कधीही अडवून ठेवत नाहीत. अनेक वेळा तर त्यांनी पदरमोड करून या महिलांना न्याय मिळवून दिलाय. आपली वकिली निव्वळ पसे कमवण्यासाठी नव्हे तर मुख्यत: स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचे एक माध्यम, एक साधन म्हणून करतात.
अ‍ॅड. शशिकलाताई रेवणकर यांनी अनेक गुंतागुंतीच्या केसेसमध्ये आपले कायद्याचे ज्ञान वापरून अनेक स्त्रियांना न्याय मिळवून दिला आहे. अंबरनाथ परिसरात अनेक वीटभट्टय़ा आहेत. वीटभट्टीचे मालक कातकरी-आदिवासी समाजातल्या मजुरांची अनेक तऱ्हेने पिळवणूक करतात. एकदा एका प्रतिष्ठित वीटभट्टी मालकाची त्याच्याकडे काम करणाऱ्या एका कातकरी बाईवर वाईट नजर गेली. रात्रीची वेळ पाहून त्याने तिच्या झोपडीत शिरून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या त्या बाईने आरडाओरडा केला. तिची आई व वहिनी धावत आल्या. त्या तिघींनी प्रतिकार म्हणून वीटभट्टी मालकाला सरपणाच्या लाकडांनी मारले. मालक जखमी झाला. सूड म्हणून त्याने पोलिसात उलटी तक्रार नोंदवली. त्या बाईचा पती, भाऊ व वडिलांनी मिळून आपल्याला मारल्याची तक्रार त्याने केली. परिणामी त्या सर्व कुटुंबाचा रोजगार तर गेलाच उलटपक्षी पोलीस स्टेशन व कोर्टाच्या फेऱ्या मारण्याची वेळ त्यांच्यावर आली. ही केस शशिकलाताईंकडे आली. त्यांनी प्रथम वृत्तपत्रात बातमी देऊन वीटभट्टी मालकाचे व पोलिसांचे पितळ उघडे पाडले. ज्या दिवशी मारहाण केल्याचे पोलीस फिर्यादीत नमूद होते त्या दिवशी हे तिन्ही पुरुष मजुरीसाठी परगावी होते, तशा तऱ्हेचे प्रमाणपत्र दाखवून त्यांनी खटला सेशन कमिट (चालविण्यास अयोग्य) करून घेतला. पेपरात बातम्या आल्यामुळे मालकाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. तो नरमला. त्याने त्या कातकरी बाईची माफी मागितली. या केसमध्ये शशिकलाताईंनी एक रुपयाही फी म्हणून आकारला नाही.
दुसऱ्या एका प्रकरणात संबंधित महिलेचा पती परदेशात नोकरीला होता. तिच्या सासरचे लोक त्या स्त्रीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते. तिने त्याला स्पष्ट नकार दिला व माहेरी म्हणजे अंबरनाथला निघून आली. पुढे तिच्या सासरच्या लोकांनी तिला माहेरी येऊन मारहाण केली व तिचे स्त्रीधनही त्यांनी जबरदस्तीने हिसकावले. या प्रकरणाची फिर्याद नोंदवायला दोन्ही ठिकाणचे पोलीस टाळाटाळ करत होते. तिच्या सासरचे लोक वडाळ्यातले वजनदार व्यक्तिमत्त्व असल्याने स्थानिक पोलिसांवरही त्यांचा दबाव होता. यामुळे ती स्त्री पार खचून गेली होती. शशिकलाताईंकडे ही केस आल्यावर त्यांनी अगदी गृहमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण नेलं. त्यांना या प्रकरणात लक्ष घालणं भाग पाडलं. त्यामुळे पोलीस वठणीवर आलेच व त्या स्त्रीचे स्त्रीधनही परत मिळाले.
त्यांनी सोडविलेल्या केसेसपकी सर्वात महत्त्वाची केस होती वेडसर नवरा असलेल्या एका अल्पवयीन मुस्लिम महिलेची. हैदराबादच्या एका सोळा वर्षांच्या मुस्लिम मुलीचे अंबरनाथच्या एका मुलाशी घाईगडबडीने लग्न लावण्यात आले. लग्नानंतर मुलीला आपला पती मतिमंद असल्याचे कळले. तो काहीच कमावत नव्हता. त्याची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्याचे राहते घर, त्याच्या मालकीचे होते. ती मुलगी लोकलमध्ये कंगवे, फण्या विकून आपले व नवऱ्याचे पोट भरत होती. तिचा दीर रिक्षा युनियनचा लीडर होता. त्याची नजर त्या स्त्रीच्या राहत्या घरावर पडली. त्याने गोड बोलून, दुरुस्तीच्या बहाण्याने त्या स्त्रीला व तिच्या पतीला घराबाहेर काढले. त्याने घर विकण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्या स्त्रीने विरोध करताच तिला त्याने मारहाण केली. ती पोलिसात तक्रार करायला गेली तर तिची तक्रार पोलीस नोंदवून घेईनात. शशिकलाताईंकडे ही केस आल्यावर त्या स्वत: पोलीस स्टेशनला जाऊन भांडल्या. पोलिसांना तिची तक्रार नोंदवून घ्यायला त्यांनी भाग पाडले. नंतर त्यांनी त्या तरुणीला समजावलं. ‘ही वेळ रडायची नाहीये. तुलाच खंबीर झालं पाहिजे. मी दरवेळी तुझ्या अडचणीला धावून येऊ शकत नाही. तुझ्यावरच्या अन्यायाचा प्रतिकार तुलाच केला पाहिजे.’ शशिकलाताईंच्या बोलण्यानं ती महिला इतकी प्रभावित झाली की त्या दुर्बळ महिलेचं रूपांतर एका रणचंडिकेत झालं. तिने आपल्याच घराला लावलेलं कुलूप तोडलं. घरात घुसली आणि कोयता घेऊन दारात उभी राहिली. दिरालाही तिने धमकावलं, ‘जर माझ्या घराचा सौदा करशील तर सगळ्यांत आधी मी तुझा खून करीन.’ तिचं हे रूप बघून सासरचे सगळेच घाबरले. दीरही नरमला. आता ती स्त्री सुखाने आपल्या घरात राहते आहे. शशिकलाताईंच्या सान्निध्यात अशा अनेक दुर्बळ, पीडित महिलांचा आत्मविश्वास जागला आहे. जागत आहे.
एकदा शशिकला रेवणकर यांच्या हद्दीतील एक गुंड नगरसेवक, त्याचे अनधिकृत बांधकाम तोडू नये म्हणून बांधकामावर ‘स्टे’आणू पाहत होता. सरकारी वकील म्हणून शशिकलाताईंनी तो ‘स्टे’ मिळू दिला नाही. तेव्हा त्या नगरसेवकाने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावर शशिकलाताईंनी उत्तर दिले, ‘मरण कधीतरी येणारच आहे. त्याच्या भीतीने मी वाईट, बेकायदेशीर कामाला साथ का देऊ?’ ही निडरता, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे म्हणूनच नववीत अर्धवट सुटलेले शिक्षण; हजार अडथळे पार करून त्यांनी सोळा वर्षांनी पूर्ण केले. राज्य सरकारच्या बाल न्याय सल्लागार समितीच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले आहे. अबला म्हणून ओळखली जाणारी एक स्त्री प्रखर जिद्दीच्या जोरावर काय साध्य करू शकते, याचं अ‍ॅड. शशिकला रेवणकर हे बोलकं उदाहरण आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो