स्त्री जातक : आजारपणाचा हक्क
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : आजारपणाचा हक्क
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : आजारपणाचा हक्क Bookmark and Share Print E-mail

altडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपली कुटुंबं ‘स्त्री-केंद्री’ असली तरी त्या केंद्रानंच कायम वर्तुळातल्या इतरांना ऊर्जा पुरवत राहावं, अशी एक घट्ट अपेक्षा सर्वाचीच असते. त्यामुळे आजारपण हा माझा हक्क आहे, असं स्त्रीला वाटतच नाही. शिवाय ‘मीच अंथरुण धरलं तर इतरांचं कसं निभेल?’ हे म्हणताना ‘आपल्याला पर्याय नाही’ हा सुप्त अहंकारही स्त्रीमध्ये असतो. शाळेत असताना मराठी भाषेत जे निबंधांचे विषय असायचे त्यात बाईंचा अत्यंत आवडता विषय म्हणजे, ‘आई आजारी पडते तेव्हा..’ असा होता. माझ्या एका मैत्रिणीनं (बहुधा स्वानुभवातून) त्यावर खूपच रसभरित वर्णन करणारं लेखन केलं होतं. ‘आईचं आजारपण म्हणजे घरातल्यांची उडालेली फे-फे आणि तारांबळ, घोटाळे आणि शेवटी ‘आई, तू कध्धी कध्धी आजारी पडू नकोस हं!’ असा लेकरांचा (आणि नवऱ्याचाही!) प्रेमळ आग्रह त्यात होता. हा आग्रह आईच्या मायेपोटी किती आणि उडालेल्या भंबेरीपोटी किती, यावर शंका घ्यायला भरपूर जागा होती. त्या वेळी तो निबंध सगळ्यांना खूपच आवडला होता आणि प्रत्येकीला त्याचा शेवट तर अगदी पटला होता. आईनं- म्हणजेच कर्त्यां बाईनं आजारी पडायचं ठरवलं तर आख्ख्या घरादारावर कळा येणार. बाई आजारी तर घर आजारी. सगळीकडे दुर्लक्ष आणि अवतार- ही समीकरणं डोक्यात पक्की होती ना! त्याच निबंधाचा आज विचार केला तर वाटतं, ‘तू कध्धी आजारी पडू नकोस’ हे वाक्य त्या माऊलीला जास्त आनंद देणारं असेल का ‘पुढच्या वेळी असं झालं तर आमची इतकी फे फे उडणार नाही हं आई, घरचं सांभाळून आम्ही तुझ्याकडे बघू!’ हे वाक्य जास्त आश्वस्त करणारं असेल? कदाचित त्या क्षणी पहिलं वाक्य असेलही. कारण मग ‘आपल्यावाचून सगळं कसं अडून बसतं’ या अहंकाराला गोंजारलं जाईल, पण लांबवर पाहिलं, तर दुसरं वाक्य वास्तवात यावं, असं कुणाही बाईला नक्कीच वाटेल यात शंका नाही. खरंच कर्त्यां बाईच्या आजारपणाचं एवढं संकट का वाटतं? तो साधा ताप, पाठदुखी किंवा आडवं पडायला लावणारं इतर गंभीर निमित्त असलं तरीही घरी-दारी असं अपंग झाल्यासारखे प्रतिसाद का येतात?
विनिताच्या घरी असंच घडलं. उन्हात थंडगार पाणी प्यायल्याचं निमित्त झालं आणि तिला सणकून ताप आला. घरात इनमीन चार माणसं. प्रत्येकाचे कान वेगळ्या दिशेने मोबाइलमध्ये किंवा डोळे टी. व्ही., संगणक, आयपॉडवर खिळलेले, असा एकूण माहोल. पन्नाशीची विनिता रौप्यमहोत्सवी संसाराची चाकं ओढून ओढून मेटाकुटीला आलेली, पण ‘तिच्या पाठबळावर’ गाडा चालू असल्याचं एक भव्य आणि उदात्त समाधान बाळगणारी! तिच्या आठवडय़ाभराच्या आजारपणाच्या ‘अ‍ॅटॅक’नंतर तिनं मला फोन केला, भेटायची वेळ मागितली. आल्या आल्याच पहिला प्रश्न विचारला, ‘मला आजारी पडण्याचाही हक्क नाही का गं?’ आजारपणात मौज वाटते म्हणून नाही, पण माझी ‘पॉझिटिव्ह’ दखल सगळ्यांनी घ्यावी म्हणून तरी? गेल्या आठवडय़ात मला जाणवलं, की पहिले दोन दिवस सगळ्यांची खूप धावपळ झाली. तारांबळ उडाली. त्या गडबडीतही माझी चौकशी करीत होते सगळे, पण तिसऱ्या / चौथ्या दिवशीही मला ताकद येईना- असं म्हटल्यावर जरा तणातणी झाली. बरीचशी कामं आऊटसोर्स केली गेली. प्रत्येकजण तात्पुरत्या जबाबदारीतून मोकळा झाला, पण नंतर जणू ‘माझी गरजच संपल्यासारखं’ मला वागविताहेत असं वाटायला लागलं. विश्रांती मिळाली, पण हक्कानं मिळाली असं नाही वाटत बघ.’
विनिताच्या बोलण्यावर मी जसजसा विचार करायला लागले, तसा बाईच्या आजारपणाच्या ‘हक्का’वर रेंगाळू लागले. घरच्या बाईला स्वत:चं- विशेषत: स्वत:च्या आरोग्याचं प्राधान्य नेहमीच खालच्या क्रमांकावर टाकावंसं का वाटतं? म्हणायला आपली कुटुंबं ‘स्त्री-केंद्री’ असली तरी त्या केंद्रानंच कायम वर्तुळातल्या इतरांना ऊर्जा पुरवत राहावं, अशी एक घट्ट अपेक्षा वातावरणातून इतरांच्या आणि स्त्रीच्याही मनावर बिंबवली जात असते. ‘आधी इतर मगच तू (किंवा मी!) असा विचार मग दृढ व्हायला लागतो. एक प्रकारे समाजानं घडवलेली (प्रसंगी लादलेली) ही त्याग वृत्ती मग आजारपणाच्या बाबतीतही तंतोतंत काम करते. अगदीच आडवं पडायची वेळ आल्याशिवाय दवाखान्याची पायरी चढायला बाई जात नाही. याचं एक टोकाचं उदाहरण आठवतं. माझ्या एका स्नेही बाईंना स्तनांमध्ये गाठ लागली. खरं तर अत्यंत सुशिक्षित, सुजाण अशा त्या बाई. ‘गाठ’ किती गंभीर असू शकते हे शास्त्रीयदृष्टय़ाही नीट माहीत असलेल्या. त्यांच्या मुलाची १२ वीची परीक्षा नेमकी तोंडावर आलेली होती. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झाली. परीक्षा पूर्ण होईपर्यंत सुमारे एक महिना त्यांनी कुणालाही त्या गाठीविषयी सांगितलं नाही. परिणामत: जो कर्करोग बरा व्हायला फार अडचण नव्हती, त्यानं त्यांचा बळी घेतला.
आपल्या आरोग्यापेक्षा इतरांच्या गरजा-प्राधान्य याला महत्त्व देणं याबरोबरच ‘पैसा खर्च करणं’ हा स्त्रियांच्या दृष्टीने संवेदनशील भाग असतो. तो कधी अपराधीपणातून आलेला असतो (किती पैसे आपल्यावर खर्च करायचे?) तर कधी दुर्लक्षातून. (एवढय़ा-तेवढय़ासाठी कशाला डॉक्टरकडे जायचं?) कधी एकटीला डॉक्टरकडे जायला नको वाटतं, सोबत हवी असते (पण घरातलं कुणी सापडत नाही..) म्हणूनही तपासण्या / उपचार लांबवले जातात आणि मघाच्या उदाहरणासारखी दुखणं विकोपाला गेल्यावरच जाग येते.
दुसरी महत्त्वाची भावना असते ती म्हणजे, ‘मीच अंथरुण धरलं तर इतरांचं कसं निभेल? स्वत:च लादून घेतलेल्या अतिरिक्त जबाबदारीच्या ओझ्यामुळे असं वाटू शकतं. त्यात ‘आपल्याला पर्याय नाही’ हा सुप्त अहंकारही असतो. मग ‘वाट्टेल ते झालं तरी मी कामं कशी खेचून निभावून नेऊ शकते’ ते पुराव्यानिशी शाबीत करण्याचा अट्टहास बळावतो. गमतीचा भाग म्हणजे असं करीत असताना इतरांनी आपलं दुखणं (आपण न सांगता!) जाणून घ्यावं / विचारावं / मदत करावी ही अपेक्षा कम हट्टही असतो- तो बहुतांशी पूर्ण न झाल्यानं येणारी एक हताश चिडचिड- त्रागा हे सर्व साथीदारही प्रवेश करतातच. कधी आपण आजारी पडलो तर त्याचं ‘व्यवस्थापनही’ एकटय़ालाच करावं लागणार ही धास्ती असते, त्याचाही वैताग येतो. त्यापेक्षा ते ‘आजारपण (आलं तरी) शक्यतो कबूल न करणंच चांगलं. ‘जितकं रेटता येईल तेवढं रेटायचं’ असाच सर्वसाधारण कल दिसतो, पण बाई असं म्हणायला धजत नाही की, ‘बाबांनो, आज/उद्या/परवा मी विश्रांती घेऊ इच्छिते, कारण मला xxx त्रास होतो आहे. घरातल्या माझ्या जबाबदाऱ्यांचं काय करायचं? कोण कोण काय करू शकणार आहे?’ .. हा म्हणजे पराकोटीचा पर्याय वाटतो!
सर्दी / ताप / सांसर्गिक आजार / गुडघेदुखी / रक्तदाब ही सर्वसाधारण जंत्री! पण स्त्री शरीराचे म्हणून काही आजार, गर्भाशय, योनीमार्ग, मूत्रमार्ग, अशा अवयवांचे आजार तर महिनोन् महिने अंगावर काढले जातात, ज्याचे दीर्घकाळ दुष्परिणाम बाईलाच भोगावे लागतात. रक्तातील हाय ब्लडप्रेशर चिंता करण्याजोगं कमी होणं अनेकदा वेगवेगळ्या लक्षणांमधून अनुभवाला येतं- (डोकेदुखी, चक्कर, प्रचंड थकवा, गोळे येणं इ.) पण तेव्हाही तात्पुरती लक्षणांना दाबून टाकणारी औषधं घेऊन भागवाभागवी केली जाते. सांगोवांगीचे उपचार, वरवरचे किंवा त्रास होणं लांबवण्यासाठीचे उपचार यामुळे नंतर येणाऱ्या आजारपणाची तीव्रता अधिकच वाढते.
‘आजारपणाचा हक्क’ न बजावल्याचा अजून एक परिणाम म्हणजे मानसिक ताणामध्ये होणारी वाढ. कधी कधी वेळेवर स्वत:च्या आजारपणाची दखल न घेतल्यामुळे नंतर आजार प्रत्यक्ष झाला नसला तरीही बारीकसारीक तक्रारी करण्याची सवय लागते. ही ंसंवेदनशीलता मग इतकी वाढते की, रोज वेगळा आजार झालाय असं वाटायला लागतं. आयुष्यभर न बोलता, अत्यंत पॅसिव्ह- दबलेल्या राहिलेल्या स्त्रिया उतारवयात खूप कुरकुऱ्या, दुखण्यांबद्दल सतत चर्चा करणाऱ्या, प्रत्येकापाशी उतरत्या प्रकृतीची गाऱ्हाणी मांडणाऱ्या होतात. कधी तर फार काही झालेलं नसतानाही ‘आभासी रोग’ शोधण्यासाठी दवाखान्यामागून दवाखाने पालथे घालतात. सतत डॉक्टर्स बदलत राहतात. एका सततच्या असमाधानानं, दुर्लक्षितपणाच्या भावनेनं त्यांच्या मनात घर केलेलं असतं. मग आजाराच्या अशा आक्रमक अभिनिवेशातून त्या जगाला ‘आता तरी माझ्याकडे पाहा’ असं ओरडून सांगू पाहतात. या सर्व गोष्टींना छेद देत स्वत:च्या प्रकृतीला यथायोग्य न्याय देणारी उदाहरणं जेव्हा दिसतात तेव्हा ती समोर ठेवण्याचा मोह टाळता येत नाही. सुरुवातीला उल्लेखलेल्या बाईंच्या अगदी उलट वागून स्वत:चं आणि कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवणारी एक मैत्रीण मला माहीत आहे. शासकीय नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक कार्यात झोकून देण्याचं स्वप्न रंगविणारी ही मैत्रीण. निवृत्तीनंतरच्या काहीच दिवसांत स्तनातली गाठ लक्षात आली. मुलांच्या महत्त्वाच्या परीक्षा तोंडावर आलेल्या, पण अत्यंत निर्धारानं आणि मोकळेपणानं तिनं घरच्यांना विश्वासात घेतलं, (त्याहीपूर्वी स्वत: कर्करोगाच्या विशेष रुग्णालयात एकटीनं जाऊन तपासण्या करून घेतल्या!) आणि सर्व उपचारांना ताबडतोब सुरुवात केली. पती आणि दोन्ही मुलं, सासर-माहेरचे ज्येष्ठ, सर्वाकडून जी झाली ती मदत नि:संकोचपणे आणि हक्कानं घेतली. पूर्ण विश्रांती, काळजी घेतली आणि गेली आठ र्वष- आजारातून बाहेर पडल्यावर हवंहवंसं सामाजिक कामही मनसोक्त करते आहे.
शारीरिक स्वास्थ्य आणि त्यातून मिळणारं मानसिक आरोग्य जपायचं असेल- आधी उल्लेखलेल्या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर ‘आजारपणाचा हक्क’ बजावायला स्वत:ला शिकवायला हवं. त्यासाठी खाली दिलेल्या सूत्रांना / तत्त्वांना पाळायला हवं.
१) खरं दुखणं कधी लपवू नये. २) तपासण्यांना ‘पुढच्या वेळी’ म्हणू नये. ३) आवश्यक तेव्हा बेधडक विश्रांती घ्यावी. (इतरांची विनाकारण, अति हळवेपणानं पर्वा करू नये. सर्व जण स्वत:ची किमान काळजी घेण्याइतके सक्षम असतात, नाही तर बनतात यावर विश्वास ठेवावा. ४) ‘मला पर्याय नाही’ हा सूक्ष्म, सुप्त पण ताकदवान अहंकार ताबडतोब सोडावा. ५) इतरांची लागेल ती मदत घेण्यात कुठलाही संकोच / लाज बाळगू नये. एरवी जी मदत बाई न मागता देते ती पुन्हा मागून घेण्यात काय अडचण? फक्त ती आक्रस्ताळेपणानं न मागता आपुलकीनं मागावी इतकंच. ६) ‘औषध आणायची राहिली! जाऊ दे! असं चुकूनही म्हणू नये. घरातल्यांना त्यासाठी हक्कानं पळवावं आणि तो ‘हक्क’ राहावा असा ‘संवाद’ आधी निर्माण करावा. ही सूत्रं पाळण्याचा जर मनापासून प्रयत्न केला तर ‘आजारपण’ निभावणं सोपंही जाईल आणि अंतिमत: सुखाचंही! इतरांनाही शुश्रूषा करायची, सेवा करायची, मदत करायची आणि हो- ‘त्यागाची’ संधी दिल्याशिवाय त्यांना तरी त्यातली मजा (आनंद) कशी कळणार?
म्हणून मैत्रिणींनो, ‘आजारपणाचा हक्क’ जरूर राबवा आणि प्रतिसाद काय मिळतो ते नक्की कळवा!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो