खाणे पिणे आणि खूप काही : गावाकडची चव - रोडगा वाहीन तुला..
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही >> खाणे पिणे आणि खूप काही : गावाकडची चव - रोडगा वाहीन तुला..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे पिणे आणि खूप काही : गावाकडची चव - रोडगा वाहीन तुला.. Bookmark and Share Print E-mail

altडॉ. प्रतिमा इंगोले , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रोडगे प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत असल्याने त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक रोडगे भाजणे ही एक कलाच आहे. शिवाय प्रसादरूपाने अनेकांच्या मुखी पडत असल्याने अनेकांना तृप्त करण्याची ताकदही त्यात आहे.

विदर्भात यात्रा आणि जत्रा खूप भरतात. या यात्रेतील एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो तो म्हणजे रोडगे पार्टी! विदर्भात ज्या ज्या देवांच्या जत्रा असतात ते ते देव नवसाला पावणारे असल्याचा दृढ लोकसमज आहे. त्यामुळे या देवांसाठी खास नवस केला जातो तो म्हणजे मला अमुक अमुक मिळू दे, मी तुला पाच पायल्या, सव्वा पायली, एक कुडव ते एक पोत्यांचे रोडगे वाहीन वा करीन. अर्थात देवाला फक्त एकच रोडगा वाहायचा असतो व बाकी सगळे तिथे जेवायला घालून संपवायचे असतात. आता पंगत म्हटली की, माणसे लागणारच! तेव्हा हे वैशिष्टय़पूर्ण रोडगे म्हणजे सामूहिक खाद्यप्रकार आहे, पण ती विदर्भाची आगळीवेगळी खासियत आहे.
‘रोडगे’ रसना तृप्त करणारा खाद्यपदार्थ आहेच, पण त्याचबरोबर मन तृप्त करणाराही आहे. माझ्या आठवणीतील पहिले रोडगे आहेत ते वारीचे! ‘वारी’ म्हणजे पांडुरंगाची वारी नसून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्य़ांच्या सरहद्दीवर वसलेले एक हनुमंताचे जागृत देवस्थान आहे. तिथे पूर्वी किल्ला होता म्हणून त्याला वारी भैरवगडही म्हणत. ते माझे आजोबा स्व. बापूसाहेब ढाकरे यांचे कुलदैवत! त्यामुळे या वारीला दरवर्षीच कोणाचे तरी रोडगे असायचेच. या रोडग्यांची खास तयारी खूप आधीपासूनच, महिनाभरापासून सुरू व्हायची, कारण रोडग्यांसाठी गोवऱ्या लागायच्या. त्या गोळा करून ठेवायच्या अथवा शेण गोळा करून, त्याच्या गोवऱ्या थापून वाळवून ठेवायच्या.
रोडगे करण्यासाठी गहू निवडून जाडसर दळून आणायचे. हा आटा वा पीठ एखाद्या पोत्यातून व्यवस्थित बांधून घ्यायचं आणि त्याबरोबर तुरीच्या डाळीचे बासके घ्यायचे. रोडग्यांसोबत विदर्भात खातात ते साधे तुरीचे वरण आणि त्यावर शुद्ध तूप! हे तूपपण रोडग्यांसाठी साधारण महिनाभरापासून थोडे थोडे तापवून साठवले जाते, पण वरणावर लोणकढे तूप हवेच. विदर्भात भात खाण्याची पद्धत फारशी नाही. त्यातून रोडग्यांसोबत तर तो फारसा कोणाला लागतही नाही, पण नैवेद्याला लागतो म्हणून थोडे तांदूळ घ्यायचे.
रोडग्यांसोबत विदर्भात एकच भाजी केली जाते आणि ती म्हणजे जांभळ्या वांग्याची! कारण विदर्भात काटे नसलेली जांभळट वांगी पिकतात. ही वांगी आदल्या दिवशी एखाद्याच्या मळ्यातूनच थेट तोडून विकत आणतात. थोडी कोथिंबीर, थोडा लसूण की झाली तयारी! हे वांग्याचे बसके सर्वात वर टाकायचे. बैलगाडीतून हे सामान व माणसं एका रांगेत निघायचे. वारी दानापूरपासून दोन कोस अंतरावर! अशा चार-पाच बैलगाडय़ा पहाटेच्या उजेडात चालू लागायच्या. वारीला पोहोचेपर्यंत दिवस उगवायचा. मग तिथे आंघोळी व्हायच्या. वारीला वाण, कामोद आणि आड या तीन नद्यांचा संगम आहे. बायका घरूनच आंघोळी उरकून निघायच्या. मग सामूहिक स्वयंपाकाची तयारी व्हायची.
जगऱ्यासाठी चर खणला जायचा. त्यात गोवऱ्या पेटवून विस्तव केला जायचा. त्यावर वरण आणि भात शिजत ठेवायचे. काही पुरुष वांगी धुऊन आणायचे. मग विळ्यांवर ती चिरली जायची. त्याची चरचरीत फोडणी केली जायची. अलीकडे भाजीतून मसालेही वापरतात. मग रोडगे घडवायची चढाओढ लागायची. परातीतून थोडा ओवा व भरपूर मीठ घालून कणिक मळली व चुरली जायची. त्याच कणकेचे दिवे करून त्यातून तेल ओतले जायचे. आता यासाठी वाटय़ांचा वापर करतात. मग कणकेचा एक गोळा घ्यायचा. त्याला तेल लावून हातावर त्याची जाड पोळी करायची. त्याची घडी घालायची. दुसरी पोळी करून त्यावर ती घडी तेल लावून ठेवायची. गोलाकार आकार द्यायचा. पुन्हा तिसरी तशीच जाडसर पोळी करून त्याला तेल लावून त्यावर गोल ठेवायचा. पुन्हा पुरणपोळी करतो तसा गोलाकार उंडा करायचा. मग हे तयार रोडगे आधी निखाऱ्यावर भाजायचे. अर्थातच हे कामसुद्धा एखादा पुरुषच करायचा. तोपर्यंत वरण, भाजी व भात शिजलेले असायचे. ते बाजूला काढून निखाऱ्यावर ठेवायचे आणि खोदलेल्या खड्डय़ातील गोवऱ्यांच्या मंद विस्तवात मग हे रोडगे दाबून द्यायचे. वरून गरम राख पसरायची. विदर्भात याला ‘आहार’ म्हणतात (तसा त्याचा उच्चार ‘आर’च आहे). म्हणजे मंद विस्तव. या गरम भट्टीत मग मोहागी रोडगे भाजले जातात. तोपर्यंत देवदर्शन वगैरे उरकायचे. अर्थात या सगळ्यांच्या जोडीला गप्पागोष्टी असतातच. मंद आहारात रोडगे खरपूस भाजले जातात. छान गुलाबी अथवा टिक्के पडून काळसर होतात. मग ते चादरीवर अथवा धोतरावर काढायचे. राख झटकून पुसून फोडायचे व वाढायचे. एकदा देवाला रोडगा वाहिला की, मग केळीच्या पानांवर अथवा पत्रावळींवर पंगती वाढल्या जातात.
शेवटी रोडग्यांच्या मधला ‘मगज’ चुरून त्यात गूळ व तूप घालून चुरमा करून वाढला जातो. हीच त्या दिवशीची ‘स्वीट डीश’ असते, पण ती खूप चविष्ट लागते. पुजाऱ्यांपासून सगळे भरपेट जेवून तृप्त झाले की बायकांच्या पंगती बसतात. रोडग्यांचे वैशिष्टय़ म्हणजे कणिक जाड असल्यामुळे ती न चाळताच भिजवतात. आपोआप त्यात कोंडा राहतो. नंतर ती खूप चुरतात. त्यामुळे त्यात गोडवा येतो आणि उघडय़ा वाऱ्यात, गोवऱ्यांच्या मंद विस्तवात ती खरपूस भाजतात. अशा कणकेचा तयार रोडगा एखादा स्वर्गीय पदार्थ वाटावा इतका अप्रतिम होतो. तो विस्तवात भाजल्यामुळे पचायला हलका होतो. शिवाय ओवा व मीठ घातल्यामुळे रुचकर, स्वादिष्ट व पाचक होतोच, पण रवाळ कणकेमुळे तो चविष्ट होतो. तशीही ही कणिक पोळीपेक्षा घट्ट भिजवतात, त्यामुळे पाणी कमी वापरले जाते आणि त्यामुळे ती जास्त खरपूस भाजली जाते.
विदर्भातील रोडग्यांमध्ये श्रीमंत असो वा गरीब, सगळ्यांकडे ते साध्या वरणासोबतच वाढले जातात. फार तर तुपाचा फरक पडतो. म्हणजे लोणकढे तूप परवडले नाही तर वनस्पती तूप अथवा शेंगदाणा तेल वापरले जाते; पण भाजी मात्र वांग्याचीच असते. वारीच्या रोडग्यानंतर आठवतात ते आम्ही सगळे मिळून ओंकारेश्वरला गेलो तेव्हा केलेले रोडगे! ते तिथे तर खाल्लेच, पण परतताना दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे स्टेशनवर भूक लागली म्हणून माझे मामा व मी आम्हा दोघांनाही उरलेला शिळा रोडगा व मिरच्यांची चटणी दिली. अर्थात त्यावर कच्चं तेल. तो शिळा रोडगा तर इतका स्वादिष्ट लागला की, आजही ती चव स्मरणात आहे. आम्हा दोघांचंही वय त्या वेळी लहान म्हणजे साधारणत: अकराचे वगैरे असेल, पण तरीही तो रोडगा अद्यापि स्मरणात आहे.
लग्नानंतर अकोला जिल्ह्य़ातून अमरावती जिल्ह्य़ात आले, पण इथे आल्यावर रोडग्यांचे अधिकच प्रस्थ असलेले दिसून आले. कारण अमरावती जिल्ह्य़ात दर्यापूरजवळच महिनाभर ऋणमोचनची यात्रा भरते. या यात्रेत दर रविवारी भोवतालच्या गावातील लोकांचे रोडगे असतातच असतात. दर्यापूरजवळ ‘पनोरा’ गाव आहे. तिथे पूर्णाकाठी गावकरी रोडगे करतात. दर्यापूरजवळ बाग आहे. तिथे लखमाजीबुवा आहे. तिथे जाऊन लोक तेथील शेतात गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमेपर्यंत रोडगे करतात. दर्यापूरजवळच ‘मुऱ्हा देवी’ आहे. तिच्या मंदिरात नवसाचे रोडगे नवरात्रात वा चैत्रात लोक करीतच असतात. दर्यापूर ते आकोट रोडवर झोटिंगबुवा आहे. त्यांच्याजवळ नवसाचे रोडगे केले जातात. जवळच्या परतवाडा तालुक्यात बहिरमबुवा आहे. तिथे महिनाभराची यात्रा असते. या यात्रेत रोडगे करण्याची चढाओढ असते. तिथे हंडीतील मटण व रोडगेही करतात. पण ती काहीच मंडळी! खुद्द दर्यापुरातच आशा-मनीषाचे मंदिर आहे. तेही नदीकाठावर, तरीही शेतात आहे. तिथेही लोक रोडगे करतातच.
विदर्भात बहुतेक देवस्थानाच्या हद्दीत रोडगे करण्याची प्रथा आहे. याला कारण गाडगेबाबांचे लोकजागरणच असावे. पूर्वी या सर्व ठिकाणी कदाचित कोंबडय़ाचा अथवा बकऱ्याचा बळी दिला जात असावा, पण गाडगेबाबांनी बळीप्रथेविरुद्ध बंड पुकारले. त्याचा परिणाम म्हणून हे रोडग्यांचे प्रस्थ वाढले असावे, कारण गोलाकार रोडगाही डोक्यासारखाच गोल असतो. अमरावती जिल्ह्य़ातील बहुतेक जत्रा सव्वा महिना, महिना, पंधरा दिवस वा नऊ दिवस असल्यामुळे हे रोडगे प्रकरण जास्तच रंगते. एवढेच काय, दर्यापूर-अमरावती रस्त्यावर तर झाडोबा आहे. तिथे शेतात झाडाखाली चैत्र पाडव्याला रोडगे रंगतात. याशिवाय अष्टमहासिद्धीसारखे लहान-मोठे देव वा देवता असतातच.
या रोडग्याच्या पंगतीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यासोबत कांदा, मुळा, काकडी, मेथी, हिरवी पात यांचा घोळणा असतो. त्यामुळे हे जेवण पौष्टिक बनते. वरणामुळे प्रथिनं मिळतातच; शिवाय तुपामुळे लज्जत तर वाढतेच, पण पचनाला सोपे पडते.
अमरावती, अकोला जिल्ह्य़ांतील रोडगे प्रथा खूपच रुळलेली आहे, पण त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्य़ातील ‘झाशी-पळशी’ येथील महादेवाच्या मंदिरात शिवरात्रीला एका कुडवाचा एक रोडगा करतात. म्हणजे १६ किलो गव्हाच्या पिठाचा! विशेष म्हणजे त्यात मेवा म्हणजे काजू, बेदाणे, बदाम वगैरे घालतात आणि चर खोदून तो केळीच्या पानांमध्ये गुंडाळून गवऱ्यांचा विस्तवात ठेवतात. तो रोडगा शिजतो. खरपूस भाजला जातो, पण केळीची पानं तशीच हिरवीगार राहतात. त्यामुळे त्या रोडग्यात देवाचे स्वत्व उतरते, असे मानतात. दुसऱ्या दिवशी तो प्रसाद सर्वत्र वाटतात. भाविक त्यासाठी गर्दी करतात.
एकंदरित रोडगे प्रसाद म्हणून खाण्याची जास्त पद्धत असल्यामुळे त्यांना धार्मिक महत्त्व प्राप्त होते. ते प्राप्त होण्यास त्यांची चवही कारणीभूत ठरते. रोडगे जरी असे सामूहिक घडवले जात असले तरी काही हौशी गृहिणी ते घरगुती घमिल्यामध्ये गोवऱ्या पेटवून त्याचा विस्तव पाडून करतात अथवा अंगण असेल तर तिथे छोटा चर खोदून रोडगे भाजतात. अलीकडे गॅसवर रोडगे भाजण्याचे साधनही बाजारात उपलब्ध झाले आहे, पण त्याला गोवऱ्यांच्या जगऱ्यात भाजलेल्या खरपूस रोडग्यांची सर येत नाही. रोडग्यांसोबत वांग्याची भाजी ठरलेलीच असते. वांगी मिळाली नाही तर कोहळ्याची करतात. रोडगा खाल्ला तर जेवण जास्तच जाते म्हणून ‘रोडगा जीव झाला कोडगा’ अशी म्हणही रूढ झाली आहे, कारण रोडग्याच्या जेवणाची सुस्ती चढते.
आम्ही नवीन प्लॉट घेतल्यावर रोडगे करायचे ठरविले. स्वच्छ जागा म्हणून बांधलेल्या रेती भरलेल्या चौकोनात खड्डा केला. विस्तव पेटवला. त्यात रोडगे दाबले. काही वेळानंतर काढले तर सगळे जळून काळे झाले होते, कारण रेती खूपच तापली होती. शेवटी रोडगे मातीच्या खड्डय़ात तेही मंद विस्तवातच चांगले भाजले जातात हेच खरे! त्यावरून रोडगा हा पदार्थ पर्यावरणपूरक ठरतो, कारण त्याला माती, गोवऱ्याची गरम राख आणि उघडे आकाश लागते. रोडगे भाजणे हीही एक कलाच आहे, नाहीतर ते कच्चे राहतात. पण रोडग्यांमुळे चारजणांच्या मुखी घास पडतात. अनेकजण तृप्त होतात. खानदेशातील बट्टी अथवा बाटय़ा आणि रोडगे यात फरक आहे. कारण ही बट्टी तळतात शिवाय फोडणीच्या वरणासोबत खातात. त्याच्या पिठातही बरेचदा इतर धान्य मिसळतात. त्यामुळे रोडग्यांची लज्जत डाळबाटीला येत नाही. शिवाय तो रोडग्यांचा चुरमा त्याची तर नवलाई वेगळीच. कारण तो इतका लज्जतदार असतो की त्याच्यासारखा तोच! पण शहरी धावपळीत रोडगे घडविण्याइतका आणि भाजण्याइतका निवांतपणा कुठला! रोडगे निवांतपणी करण्याचा व निवांतपणी खाण्याचा खास पदार्थ आहे, एवढे खास.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो