धनसंपदा : सोने पे सुहागा
मुखपृष्ठ >> धनसंपदा >> धनसंपदा : सोने पे सुहागा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

धनसंपदा : सोने पे सुहागा Bookmark and Share Print E-mail

altधनश्री राणे , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ज्या किमतीत रेणू सोन्याचे दागिने खरेदी करू शकेल, त्यापेक्षा कमी किमतीत ती गोल्ड फंडमध्ये पैसे गुंतवून यथावकाश सोनं खरेदी करू शकते. कारण प्रत्यक्ष सोनं विकत घेणं म्हणजे यात दागिन्यांची मजुरी, सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी लागणाऱ्या लॉकरचं भाडं यासाठी वेगळे पैसे मोजणे आलेच. शिवाय सोन्याचे दागिने मोडताना नोंदवली जाणारी घट असतेच. मात्र गोल्ड ईटीएफमध्ये असा कुठलाही अतिरिक्त खर्च नाही. तसेच यातील सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न नाही. अनेक घराण्यांमध्ये जमीनजुमला, शेतीवाडी अशा मालमत्तेप्रमाणे कुटुंबातील सोन्याच्या दागदागिन्यांचा ठेवा पिढीजात संपत्तीमध्ये गणला जातो. हे सुवर्णवैभव एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपल्या कौटुंबिक वारशाचा एक भाग म्हणून हस्तांतरित केले जाते. कदाचित म्हणूनच सोन्याशी आपले भावनिक नाते जडले असावे.
फार पूर्वीपासूनच सोन्या-चांदीच्या अलंकारांशी, वस्तूंशी माणसाचा भाावनिक बंध तयार झाला आहे. कोकणात शाळा मास्तरीण असणारी सावित्री असो वा पुण्यात आयटी कंपनीत काम करणारी गायत्री किंवा औरंगाबादच्या ग्रामीण भागात सरपंच असणारी शुभांगी असो, आपल्याकडच्या प्रत्येक स्त्रीला सोन्यामध्ये केलेली गूंतवणूक त्यांच्या प्रतिष्ठेचे तसेच समृद्धीचे प्रतीक वाटत आली आहे. म्हणूनच आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून सोन्यामध्ये आपला पैसा गुंतवण्याच्या बाबीचा गांभीर्याने विचार करण्याची  वेळ आली आहे. याबाबत आजच्या लेखात चर्चा करूया.
सोने ; एक गुंतवणूक
१. सोन्याच्या अंगभूत मूल्यामुळे सोन्यातली गूंतवणूक कायम सुरक्षित मानली गेली आहे. देशातील राजकीय अस्थैर्य किंवा आर्थिक आणीबाणीच्या काळात शेअर बाजार किंवा रोखे यांच्या किमती वर-खाली येऊ शकतात. पण सोन्याचा दर नेहमी चढाच राहतो, म्हणूनच अशा अस्थिरतेच्या काळात सोन्यामधली गुंतवणूक म्हणजे चिंतामुक्त आणि सुरक्षित आहे.
२. याशिवाय दीर्घकालीन विचार करता महागाईच्या काळात किंवा अडचणीच्या काळात सोने तारणहार ठरू शकते. साधारणपणे असे म्हणता येईल की आपल्या दैनंदिन राहणीमानाचे वाढलेले मूल्य आणि सोन्याचे वाढलेले दर एकाच प्रमाणात वाढतात. म्हणजेच सोनं घेण्यासाठी ४० वर्षांपूर्वी एखाद्या गृहिणीला घरखर्चातून समजा ५-१० टक्के रक्कम बाजूला ठेवावी लागली असेल, तर तितकीच रक्कम (तितकेच टक्के) आजही कमावच्या स्त्रीला बचत करावी लागतेय. पूर्वीपेक्षा आता लोकांची मिळकत वाढली असली तरी सोन्याचा भावही त्याच पटीने वाढला आहे.थोडक्यात दोन्ही पिढय़ांच्या सोने विकत घेण्याच्या क्षमतेत फारसा फरक पडलेला नाही. म्हणूनच बहुधा सोने वडिलोपार्जित संपत्तीचा भाग बनले असावे.
सोन्यातील गुंतवणूकीचे पर्याय
दागिने वा अलंकार अशा स्वरूपात सोने विकत घेण्यापेक्षा तुम्ही सोन्याच्या चिपा किंवा सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. आता बँका, पोस्ट कार्यालये यांच्याकडून दिवाळी-दसरा अशा सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर २४ कॅरेट सोन्याची नाणी विकत घेण्याची संधी ग्राहकांना दिली जाते. ही नाणी ९९.९९ टक्केशुद्धता किंवा तत्सम मूल्याची असतात. मात्र बँका किंवा पोस्टाकडून ही नाणी परत घेतली जात नाहीत.
सोन्यात गुंतवणुकीचा दुसरा दीर्घकालीन पर्याय म्हणजे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ) किंवा सोन्यावर आधारित म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक. सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडून या फंड्सचे नियमन केले जाते. गोल्ड म्युच्युअल फंड्सकडून गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली जाते. पर्यायाने ९९.५ टक्के शुद्धता असणाऱ्या स्टँडर्ड सोन्यात तुम्ही गुंतवणूक करीत असता.
गोल्ड ईटीएफची किंमत सोन्याच्या दरावर अवलंबून असते. म्हणजेच जर सोन्याच्या किमतीत चांगलीच वाढ झाली तर गोल्ड ईटीएफची नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) वाढणार व एनएव्ही कमी झाले तर गोल्ड ईटीएफच्या किमती घसरणार. एनएव्ही म्हणजे गोल्ड फंडच्या प्रत्येक समभागाचे बाजारमूल्य. अर्थात ज्या किमतीला गुंतवणूकदार समभाग विकत घेतो वा त्याची विक्री करतो ते मूल्य. गोल्ड ईटीएफमधील तुमच्या गुंतवणुकीच्या नियोजनासाठी ग्राहकांकडून वर्षांला एकूण गुंतवणुकीच्या एक ते दीड टक्केफी आकारली जाते. म्हणूनच गोल्ड ईडीएफ कंपन्यांचे ग्राहक व त्यात झालेली गुंतवणूक यावर हा खर्च अवलंबून असतो. म्हणूनच योग्य गोल्ड ईटीएफची निवड करणे सर्वात महत्त्वाचे!
रेणू ही २९ वर्षीय संगीत शिक्षिका आहे. तिच्याकडे डीमॅट खातेही नाही, तसेच सध्या गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरामुळे ती सोने खरेदी करू शकत नाही. अशा वेळी रेणू दर महिना ५०० रुपये गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन उद्देशाने गुंतवू शकते.
दुसरं आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे ज्या किमतीत रेणू सोन्याचे दागिने खरेदी करू शकेल, त्यापेक्षा कमी किमतीत ती गोल्ड फंडमध्ये पैसे गुंतवुन यथावकाश सोन्याची खरेदी करू शकते. कारण प्रत्यक्ष सोने विकत घेणे म्हणजे यात दागिन्यांची मजुरी, सोने सुरक्षित ठेवण्यासाठी लागणाऱ्या लॉकरचे भाडे यासाठी वेगळे पैसे मोजणे आलेच. शिवाय सोन्याचे दागिने मोडताना नोंदवली जाणारी घट असतेच. मात्र गोल्ड ईटीएफमध्ये असा कुठलाही अतिरिक्त खर्च नाही. तसेच आपण थेट गोल्ड युनिट खरेदी करीत असल्याने या सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न नाही. शिवाय गोल्ड फंड किंवा ईटीएफवर संपत्ती करही आकारला जात नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे सोन्यात गुंतवणूक केल्याने तुमचे सोने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तुमच्या नावावर असल्याने अधिक सुरक्षित. म्हणूनच सोने चोरीला जाण्याचा, गहाळ होण्याचा धोका नाही. तसेच जेव्हा हवे तेव्हा रेणू म्युच्युअल फंड कंपनीला सांगून तिची गुंतवणूक काढून घेऊ शकते व त्या किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करू शकते.
सध्या बाजारात अनेक प्रकारचे गोल्ड फंड्स उपलब्ध आहेत. गोल्ड म्युच्युअल फंड्समध्ये फारसा फरक नसतो कारण त्यातून सोन्याचा दर प्रतीत होत असतो. मात्र गोल्ड फंडच्या नियोजनासाठी तुमच्या कंपनीकडून वर्षांकाठी आकारली जाणारी फी व इतरांची फी यातली तफावत नक्की बघा.
गुंतवणूकदारांनो याकडेही लक्ष द्या
गेल्या दशकात सोन्याच्या दरात खूप वाढ झाली. मात्र या दशकात सोन्याने गाठलेला हा दर म्हणजे १९८०च्या दशकानंतर आल्याचे विसरून चालणार नाही. १९९० च्या दशकात सोन्याचा दर काहीसा स्थिर किंवा ठराविक सीमेत बदलत होता. सोन्याचा दर एका ठराविक चक्रातून बदलत असल्याने सोन्यात केलेल्या गुंतवणुकीतून नेहमीच (अल्पावधीत) चांगला परतावा मिळेलच असे नाही.
रोखे किंवा समभागांप्रमाणे सोन्यात केलेल्या गुंतवणुकीतून उत्पन्न निर्मिती होत नाही. मुदत ठेवींवरील व्याजाप्रमाणे सोन्यातील गुंतवणुकीतून कोणत्याही प्रकारचे व्याज अथवा उत्पन्न मिळत नाही. म्युच्युअल फंड्समधील कंपन्यांना नफा झाला तर या कंपन्या ग्राहकांना डिव्हिडंड जाहीर करतात. मात्र, सोन्यातील गुंतवणुकीवर ना डिव्हिडंड मिळतो ना व्याज. म्हणूनच सोन्यातील गुंतवणूक म्हणजे ‘सुरक्षित’ या गृहितकातच शंका दडलेली आहे. म्हणूनच सोन्यातील गुंतवणूक म्हणजे ‘कमी धोका आणि नफा अधिक’ अशी नसून ‘मोठी जोखीम मोठा परतावा’ अशा स्वरूपातील आहे.
सोने असो शेअर बाजार किंवा मालमत्ता, गुंतवणुकीच्या प्रत्येक क्षेत्रात ठराविक कालावधीनंतर एक एक टप्पा येतो व वाटचालीचे एक चक्र पूर्ण होते. म्हणजे सोन्याच्या किमती, शेअर बाजार किंवा मुदत ठेवींवरील व्याज एकाच वेळी वाढलेले असणार नाहीत. म्हणूनच नियमित गुंतवणूकदाराने सर्व क्षेत्रांत थोडा थोडा पैसा अडकवला पाहिजे. सर्व बचत निव्वळ सोन्यात गुंतवून चालणार नाही. तुमच्या सध्याच्या गरजा व दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे. सोन्याच्या बरोबरीला तुमच्या बचतीतील काही भाग मुदत ठेवींमध्ये गुंतवला पाहिजे. तर घरातली लग्नकार्ये, शिक्षण अशा येत्या १०-२० वर्षांतल्या गरजा भागवण्यासाठी सोने तसेच इक्विटी फंड्समधील गुंतवणूक केव्हाही फायदेशीर.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो