करिअरिस्ट मी : गहिरा अनुबंध
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : गहिरा अनुबंध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : गहिरा अनुबंध Bookmark and Share Print E-mail

altउत्तरा मोने , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
श्रावणी देवधर आणि सई देवधर. दोघीही मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या, तरीही दोघींचे विषय वेगळे. चित्रपट दिग्दर्शन करणाऱ्या श्रावणी आता चॅनल हेड होऊन करिअरची नवीन इनिंग खेळताहेत, तर अभिनेत्री असणाऱ्या सईने आता मालिकेच्या निर्मितीत उतरून नवी खेळी सुरू केली आहे. आयुष्याने दिलेल्या संकटांना एकत्रितपणे सामोरं जाताना दोघींमधला अनुबंध अधिकच गहिरा होतो आहे.. १ सप्टेंबर २०१०.. गोकुळाष्टमीचा दिवस .. रात्रीची वेळ .. प्रख्यात सिनेमॅटोग्राफर देबू देवधर यांच्या अंत्यदर्शनासाठी चित्रपटसृष्टीतली समस्त मंडळी त्यांच्या घरी जमली होती.. श्रावणीताई आणि त्यांची एकुलती एक मुलगी सई यांचा आधारच निखळला होता.. सईने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि आता हे सगळं आपल्यालाच करायला हवं, या जबाबदारीने ती उठली.. तिने बाबाला आंघोळ घातली.. जिन्सची पँट, नवीन शर्ट घातला.. त्याच्या गळ्यात नेहमी अडकवलेला गॉगल गळ्यात घातला, हार घालू दिला नाही. ज्या मानाने बाबा आयुष्यभर जगला त्याच मानाने तिने सगळ्यांच्या साक्षीने तिच्या लाडक्या बाबाला शेवटचा निरोप दिला.. स्मशानातली सगळी क्रियाकर्मही स्वत: सईनेच केली..चितेला अग्नीही तिनेच दिला.. गोकुळाष्टमीचा दिवस असल्याने तिकडे कृष्णजन्माची वेळ झालेली आणि इकडे सई तिच्या बाबावर अंत्यसंस्कार करत होती.. आणि योगायोग असा की बरोबर एक वर्षांनंतर गोकुळाष्टमीच्याच दिवशी बरोबर त्याच वेळी सईला बाळंतपणातल्या वेणा सुरू झाल्या आणि तिची मुलगी ‘नक्षत्र’ हिचा जन्म झाला..
एक मुलगी म्हणून प्रत्यक्ष वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एक वेगळंच धाडस लागतं. हे धाडस सईकडे कुठून आलं? खरंतर आजीकडून हा वारसा तिच्यापर्यंत आलाय, असं म्हणायला हरकत नाही. श्रावणीताईंची आई डॉ. प्रबोधिनी सरकार. वडील डॉ. पांचू गोपाल सरकार. दोघंही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ऑर्डीनन्स फॅक्टरीत डॉक्टर म्हणून काम करत होते. श्रावणीताईंच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईला कळा सुरू झाल्या आणि त्या हॉस्पिटलमधे गेल्या. त्यांचा घसा सुकला म्हणून त्यांनी सिस्टरला पाणी आणायला सांगितलं. कळा वाढतच गेल्या आणि काही क्षणातच बाळाने जन्म घेतला. त्याही परिस्थितीत त्या उठल्या, त्यांनी बाजूच्या ट्रेमधून कात्री घेतली आणि नाळ कापून बाळाला शेजारच्या ट्रेमध्ये ठेवलं. श्रावणीताईंच्या जन्माची ही कथा. आईमधलं धाडस, तिचे संस्कार श्रावणीताईंनी त्यांची मुलगी सई हिच्यावर केलेत. आईचं दिग्दर्शन, देबूदांची कॅमेरामनची दृष्टी आणि आजी-आजोबांचे संस्कार यातून कलाकार आणि माणूस म्हणून सईची जडणघडण उत्तम झाली.
स्टार प्लसच्या ‘सारा आकाश’ या मालिकेतून सई अभिनेत्री म्हणून गाजली असली तरी कॅमेरा, सेट, फिल्म या गोष्टी तिला काही नवीन नव्हत्या. नाना पाटेकरांबरोबर ‘प्रहार’मध्ये ती होती. सई परांजपेंचा ‘चुडियाँ’. अमोल पालेकरांचा ‘दायरां’ यात होती आणि श्रावणीताईंच्या ‘लपंडाव’ या चित्रपटासाठी तर तिला उत्कृष्ट बाल कलाकाराचा राज्य पुरस्कारही मिळाला होता. शिवाय कोलगेट, कॉफिटोज चॉकलेट, अमूल आइस्क्रीमसारख्या काही जाहिरातीतून ती झळकली होती. शांती, मृगनयनीसारख्या दर्जेदार मालिकांमधल्या कामाचा अनुभव तिच्या गाठीला होता. पालेकरांच्या ‘कच्ची धूप’मध्ये तर ती ३ वर्षे होती. त्यामुळे या पाठबळावर सईला ‘सारा आकाश’पासून सुरू झालेल्या तिच्या नायिकेच्या कारकीर्दीला नक्कीच न्याय देता आला.
ती म्हणाली, ‘‘कुठल्याही कामात दिग्दर्शकाला आणि कॅमेरामनला काय म्हणायचंय हे तुम्हाला नेमकं कळावं लागतं. आईबाबांमुळे या गोष्टी मला चांगल्या कळत गेल्या. मुळात माझे आईबाबा माझे उत्तम समीक्षक आहेत. त्यामुळे माझे सगळे निर्णय हे त्यांच्या सांगण्यावरूनच झालेले आहेत. आता लग्नानंतर शक्तीच्या बाबतीत झालंय. तोही आज या क्षेत्रात यशस्वीपणे वावरतोय. आता जेव्हा निर्माती म्हणून या क्षेत्रात उभं राहायचं मी ठरवलं तेव्हाही आई आणि शक्ती दोघांचा पािठबाच मला बळ देतोय असं वाटतं.
‘सारा आकाश’नंतर ‘कसोटी  जिंदगीकी’, ‘सीआयडी’, ‘डॉन’ ,‘एक लडकी अंजानीसी’,‘ बात हमारी पक्की है’, ं‘काशी’ अशा अनेक मालिकांमधून किंवा ‘नच बलिये’, ‘फियर फॅक्टर’सारख्या रियालिटी शोजमधून सई प्रेक्षकांसमोर येतच राहिली. श्रावणीताईंना तिचं कौतुक आहे, मालिकेत घोडय़ावर बसून पोलो खेळणं, एअरक्राफ्टमध्ये बसणं किंवा फियर फॅक्टरमध्ये भाग घेणं, यासारख्या कठीण गोष्टी तिने केल्यात.  अर्थात श्रावणीताईंचीच धाडसीवृत्ती सईमध्ये आहे. श्रावणीताई सांगतात, ‘‘ तिने खूप चांगल्या पद्धतीने आपलं करिअर घडवलं. जसं माझ्या आईने मला मोठं केलं, तसंच मी सईला केलं. तिने तिचं स्वत:चं असं स्थान निर्माण केलं याचा मला आनंद आणि समाधान आहे. भारतभर तिचे फॅन्स निर्माण झालेत.  प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने वयाच्या २२व्या वर्षी लग्न केलं. तेव्हाही  ‘लग्नाचे नातेसंबंध जर दृढ असतील तर आपण काहीही करू शकतो’ हा तिचा विचार आम्हाला पटला होता. अर्थात तिने आम्हाला दोघांना बरोबरीने कामं करताना पाहिलं होतं आणि तिचंही तसंच झालं. लग्नानंतर शक्ती आणि सईने अनेक प्रोजेक्ट्समधून एकत्र काम केलं आणि त्यांचं नातं अधिकच पक्कं होत गेलं.’’
मुळात श्रावणीताई आणि देबूदा यांच्यातला संवाद, त्यांचं नातंच सईला खूप काही देऊन गेलंय. बाबाने आईला दिलेला आदर, दोघांची एकमेकांच्या कामातली मदत, दोघांचं सगळ्यांना सांभाळून पुढे जाणं तिने पाहिलंय. त्यामुळे एक करिअरिस्ट म्हणून तिची आईच तिची रोल मॉडेल  आहे.
श्रावणीताईंनी आत्तापर्यंत लपंडाव, सरकारनामा, सिलसिला है प्यार का, लेकरू, पेहेचान यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांचं तसेच झी टीव्हीवरच्या ‘साईबाबा’ या महामालिकेचं दिग्दर्शन केलंय. अनेक कॉर्पोरेट फिल्म्स, लघुपट याचं दिग्दर्शन करून अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला मिळालेत. आणि आता  एक नवी सुरुवात म्हणून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीच्या ‘क्रिएटिव्ह हेड’ या अत्यंत जबाबदारीच्या पदावर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करताहेत.
देबूदा आणि श्रावणी यांचं सहजीवन म्हणजे एकरूपतेचं उत्तम उदाहरण. देबूदांशिवाय त्यांचं पान हलत नव्हतं. ते असताना साध्या चेकवर सहीसुद्धा त्यांनी कधी केलेली नाही. पण त्याच श्रावणीताई आज त्यांच्याशिवाय खंबीरपणे आयुष्याला सामोरं जाताहेत. त्या सांगतात, ‘‘जेव्हा कॅन्सरमुळे तो वाचू शकणार नाही हे निश्चित झालं तेव्हा त्यानेच मला काम करण्यासाठी प्रवृत्त केलं. त्याच दरम्यान ‘स्टार प्रवाह’ची संधी आली. मला वाटलं मला हे सगळं जमेल का? कारण चॅनल, त्याचा टीआरपी, त्याची गणितं थोडी वेगळी असतात. पण देबूने मला आत्मविश्वास दिला. तो त्या शेवटच्या दिवसात हॉस्पिटलमध्ये असताना माझे प्रोमो बघायचा मला सूचना करायचा. फोटोग्राफ़ी, लायटिंग यात बदल केल्यावर किती फरक पडेल याची कल्पना द्यायचा आणि मग मात्र मी प्रत्येक मालिकेच्या संपूर्ण टीमशी जाऊन बोलायला लागले. आणि स्टार प्रवाहचा लुकच बदलला. या लुक बदलण्यात माझाही लुक बदलून गेला, कारण दरम्यान मला सांगायला समजवायला देबू शरीराने नव्हता. तो जाण्यापूर्वी ३/४ महिने आधीच मी ‘स्टार’मध्ये लागले. एकतर नोकरी करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.  देबू आजारी, आई आजारी, वडील म्हातारे. या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या आणि आर्थिक स्थिती कमजोर होती. पण या सगळ्यात ‘स्टार प्रवाह’ने, त्यातल्या सगळ्यांनीच खूप मोठा आधार दिला.’’
देबूदांनंतर काही महिन्यांतच श्रावणीताईंची आईही कॅन्सरनेच गेली. आता वडील खूपच आजारी आहेत. गेले जवळजवळ २ महिने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ते जेव्हा आयसीयूत होते तेव्हाही सई आणि श्रावणीताई दोघी आपापलं करिअर सांभाळून त्यांची काळजी घेत होते. नेमका याच दिवसात श्रावणीताईंचा पाय फ्रॅक्चर झाला. अशा परिस्थितीतही घरून सगळं काम त्यांनी केलं. या वेळी शक्तीचीही त्यांना खूपच मदत होते. श्रावणीताई सांगतात की देबूने जे माझ्या आईबाबांसाठी केलंय ते शक्ती आमच्यासाठी करतो.
दिग्दर्शन करणाऱ्या श्रावणीताईंची चॅनल हेड बनून दुसरी खेळी सुरू झाली आहे तर अभिनेत्री असणारी सईची स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी सुरू होत्येय. तिचीही दुसरी इनिंग सुरू होते आहे. शिवाय घरच्या आघाडीवरही दोघी एकमेकींच्या मीटिंग्स, कामं सांभाळून आजोबांची शुश्रूषा आणि छोटय़ा नक्षत्रचा सांभाळ हे सगळं नियोजनबद्ध रीतीने करत असतात. त्यातच कधी कधी असेही प्रसंग येतात जे त्यांना अधिकच कणखर बनवून जातात. एका रात्री श्रावणीताई आणि त्यांचे बाबा दोघंच घरात होते. बाबा अंथरुणाला खिळलेले. अचानक त्यांच्या खोलीत शॉर्टसíकट झालं. धुराचा वास यायला लागला. त्यांच्या खोलीत ऑक्सिजनचे सिलेंडर्स आहेत. एखादं जर फुटलं तर.. या कल्पनेनेच श्रावणीताईंना घाम फुटला. सई जवळच राहात असल्याने त्यांनी तिला फोन केला आणि दोघींनी परिस्थिती आटोक्यात आणली.
श्रावणीताई सांगतात, ‘‘देबू गेला तेव्हा इंडस्ट्रीत सगळ्यांना वाटलं आता श्रावणीचं कसं होणार. पण मी ‘अरेरे बिच्चारी’ असं कुणाला म्हणू दिलं नाही. सईचं बाळंतपण केलं, आईबाबांना सांभाळलं, करिअरची एक नवी इिनग सुरू केली, एवढंच नाही तर अगदी जुन्या गाडीचं लोन माझ्या नावावर करून नवीन गाडी घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी एकटीने केल्या. लाईफस्टाईलमध्ये कोणताही बदल न करता. खरंतर आपली व्यक्ती गेली की ‘काहीही लागलं तरी सांगा’ हे शब्द इतके फसवे असतात ते प्रत्ययाला येतं. प्रत्येक दिवसाने आणि देबूने दिलेल्या प्रेरणेने मला स्ट्रॉँग केलं. ‘स्टार प्रवाह’ने मला एक आत्मविश्वास दिला, नवीन अस्तित्व दिलं. प्रसंग आपल्याला कणखर बनवतो हे आजीपासून सई पाहत आली, त्यामुळे तीही स्ट्राँग झाली आणि आई मुलीचा हा वारसा नक्षत्रही पुढे नेईल याची खात्री आहे.’’
आयुष्यातले इतके अनुभव दोघींनी झेललेत की त्यांना वाटतं आता याहून भयंकर संकट काय येणार? त्यामुळे सईचं आईला  एकच सांगणं असतं की आपण एकत्र असलो ना की येणारं कोणतंच संकट आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही.   आयुष्यातल्या प्रसंगाकडे बघण्याची ही ताकद असेल तर आई-मुलीच्या या नात्याला एक भक्कम आधार मिळतो आणि त्यातूनच निर्माण होतो एक गहिरा अनुबंध.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो