आरोग्यम् : स्त्रियांचे ‘नाजूक’ आजार
मुखपृष्ठ >> आरोग्यम् >> आरोग्यम् : स्त्रियांचे ‘नाजूक’ आजार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आरोग्यम् : स्त्रियांचे ‘नाजूक’ आजार Bookmark and Share Print E-mail

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांना होणाऱ्या अनेक आजारांमध्ये पिशवी खाली सरकणे, गर्भाशय खाली येणे यांसारख्या गोष्टी आढळू शकतात, ज्याचा त्रास दीर्घकाळ सहन करावा लागतो. सुमारे दहा टक्के स्त्रियांना हा आजार होतो, मात्र त्यातील ५० टक्केच लोक डॉक्टरांकडे जातात. काय आहे हा आजार आणि त्यावर उपाय काय?
बाईचे गर्भाशय म्हणजे तिच्या मुठीएवढा अवयव आहे. उलटय़ा टांगलेल्या बटव्यासारख्या पिशवीचे स्नायू अत्यंत घट्ट व चिवट असतात. ही पिशवी ओटीपोटातल्या पोकळीत स्नायुबंध व स्नायूंची आवरणे यांच्या आधाराने, तिच्या जागेवर राहते. लहान वयात व बाळंतपणे झालेली नसताना सर्व स्नायू व स्नायुबंध मजबूत असतात.
गर्भाशयाच्या पिशवीच्या पुढच्या भागात मूत्राशय (लघवीची पिशवी) व पाठच्या भागात मोठे आतडे (गुदा) असते. हे अवयवही ओटीपोटात चपखल बसलेले असतात.
गरोदरपणात आणि बाळंतपणात ओटीपोटातील सर्व अवयवांवर व खासकरून गर्भपिशवी आणि योनीमार्ग यांच्यावर ताण पडतो. गर्भपिशवी गरोदरपणी तर योनीमार्ग बाळंतपणात ताणले जातात. गरोदरपणी गर्भाचे, गर्भजलाचे, वारेचे वजन मिळून साधारण चार-साडेचार किलो एवढे वाढते. या काळात रक्तातील प्रोजेस्टेरोन या हार्मोन्समुळे स्नायूंना शिथिलपणा आलेला असतो. मग प्रसूतीदरम्यान अरुंद योनीमार्गातून बाळ प्रचंड ताकदीने बाहेर ढकलले जाते. त्या स्नायूंवरही अत्यंत ताण पडून ते खेचले जातात. प्रसूतीनंतर काही महिन्यांनी या अवयवांना पूर्ववत आकार आणि ताकद येत जाते. म्हणूनच बाळंतिणीला चांगला आराम मिळणे, पोषक आहार उपलब्ध असणे अत्यावश्यक असते; परंतु काही ओढाताणीत व अत्यंत जोर केल्याने स्नायूंच्या वरची आवरणे (फॅशिया) फाटतात. ते काही पूर्ववत होऊ शकत नाहीत. गर्भाशयाला वर धरून ठेवणारे स्नायुबंध (लिगामेंटस्) अती खेचले गेल्याने ढिले पडतात आणि मग गर्भाशय आपल्या जागेवरून खाली सरकते.
अती ताणाने योनीमार्गाची समोरची किंवा पुढची भिंत ढिली पडली तर मूत्राशय या भिंतीतून डोकावू लागते (सिस्टोसील) म्हणजे मूत्राशयाचा हर्निया व योनीमार्गाची मागची भिंत ढिली पडली तर गुदा भिंतीला ढकलून (रेक्टोसील) गुदाचा हर्निया होतो. योनीमार्गाच्या खालच्या भिंती ढिल्या पडल्या तर त्या खाली सरकून योनीमार्गातून बाहेर पडू शकतात. त्यामुळे शरीरसंबंधाच्या वेळी ढिलेपणा जाणवतो.
या सर्वाची नक्की आकडेवारी किती, याचे प्रमाण किती, ही आकडेवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी आढळते. साधारणत: दहा टक्के महिलांना हा त्रास असू शकतो, तर त्यापैकी केवळ ५० टक्के महिलाच डॉक्टरांकडे जातात. अंग खाली सरकणे, पिशवी खाली येणे या प्रकाराची सविस्तर कारणे, त्या अनुषंगाने असणाऱ्या महिलांच्या तक्रारी, त्यासाठी आवश्यक इलाज वगैरे पाहू.
आपण मनुष्यप्राणी द्विपाद आहोत. म्हणून गुरुत्वाकर्षणाने शरीराचे आतले अवयव खाली खेचले जाणे नैसर्गिक आहे; परंतु त्यांना जागच्या जागी धरून ठेवणारे स्नायू मजबूत असतील तर तसे होत नाही.
त्याची काही कारणे
अनेकदा व कमी अंतराने पाठोपाठ प्रसूती होणे.
प्रसूती होण्यास खूप वेळ लागणे.
कधी बाळ मोठे असल्याने स्नायूंची आवरणे अती ताणाने फाटणे.
घरच्या घरी प्रसूती करताना खूप खेचताण होणे.
क्वचित प्रसंगी चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने फोर्सेप्स (चिमटा) लावला जाणे. इत्यादी कारणांनी स्नायुबंध किंवा स्नायूंची आवरणे अतिशय ताणली जाऊन सैल पडून लोंबतात किंवा फाटतात. त्यामुळे आतले अवयव हळूहळू खाली सरकू शकतात.
जर त्या महिलेला अतिशय दमा किंवा खोकला असेल तर वरीलप्रमाणे सैल झालेले अवयव झटपट खाली उतरतात.
कुपोषित महिलांमध्येही याचे प्रमाण जास्त असते. आपल्या देशात ५० टक्के महिला- मुली अ‍ॅनिमिक आहेत, तर ८० टक्के गरोदर मातांना अ‍ॅनिमिया आहे. सुदृढ शरीरासाठी केवळ लोहतत्त्वच नव्हे तर आहाराचे इतर घटकही- जसे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, कॅल्शियम हेदेखील पुरेशा प्रमाणात बाळंतिणीला मिळायला हवेत. अशक्त असताना खूप शारीरिक कष्ट पडले तरी अंग बाहेर येते.
बाळंतपणात आलेला स्नायुबंधामधील सैलपणा असणाऱ्या महिलेला स्थूलपणा असेल तर अवयव खाली सरकतात ते वयाबरोबर जास्त जाणवते. कधी गर्भाशयात, अंडाशयात मोठय़ा गाठी होणे, पोटात काही कारणांनी पाणी साठणे याचा ताण पडूनही गर्भपिशवी खाली उतरते.
क्वचित प्रसंगी गर्भाशयाला जाणाऱ्या मज्जातंतूमध्ये बिघाड असणे किंवा मणक्यातून जाणाऱ्या स्पायनल कोर्ड (मज्जारज्जू)मध्ये काही जन्मजात दोष असेल तर अशा मुलींना अगदी तरुण वयातसुद्धा पिशवी खाली सरकण्याचा त्रास होऊ शकतो.
महिला काम करतानाची बसण्या/वाकण्याची पद्धत (पोस्चर) अंगीकारतात, जसे की खूप वेळ उकिडवे चवडय़ावर बसून धुणी-भांडी करणे, यामुळे गर्भपिशवीवर ताण पडतो आणि अशी महिला जर अशक्त असेल किंवा नुकतीच बाळंतपणातून उठली असेल तर गर्भाशय खाली उतरते.
शेवटचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजनच्या अभावामुळे गर्भाशयाचे स्नायू, गर्भाशय उचलून धरणारे स्नायुबंध, हाडे, त्वचा, योनीमार्गाची आंतरत्वचा कमकुवत होऊन सैल पडते. पूर्वी कधीही तक्रार नसतानाही पाळी गेल्यानंतर काही महिलांना अंग खाली आलेले जाणवू लागते.
प्रोलेप्सची लक्षणे- नेमका कोणता भाग सैल पडून खाली सरकला आहे किंवा योनीमार्गात त्या अवयवाचा हर्निया झाला आहे यावर संबंधित लक्षणे दिसून येतात किंवा अवलंबून असतात.
जर गर्भाशय खाली सरकत असेल तर त्याच्याशी जुळलेल्या स्नायुबंधांवर लिगामेण्टस्वर ताण येऊन कंबरदुखी जाणवते (लोवर बॅक पेन). या कंबरदुखीवर इलाज करताना प्रोलेप्सची शक्यता लक्षात घेतली नाही तर कंबरदुखीवर इलाज होणार नाही. दुसरे लक्षण म्हणजे योनीमार्गात वजन किंवा भार जाणवतो. विशेषत: लघवी-शौचाला बसले असताना, अंग धुताना हाताला काही फुगीर लागते, अशी तक्रारही काही महिला करतात.
जेव्हा मूत्राशयाची पिशवी सैल पडलेल्या योनीमार्गातून डोकावू लागते तेव्हा लघवी पूर्णपणे न झाल्याची भावना होते. काही महिलांना लघवी पूर्ण करण्यासाठी योनीमार्गातून बोट घालून मूत्राशयाची पिशवी, गर्भाशय वर ढकलावे लागते. थोडी लघवी साठून राहत असल्याने पुन:पुन्हा लघवीचा जंतुसंसर्ग होऊ शकतो.
मूत्रनलिका आणि मूत्राशय यांचे खाली असलेले स्नायुबंध ताणले जाऊन तुटले असल्यास स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनस म्हणजे जोर केला असता थोडीशी लघवी गळते. जोराने शिंकताना, खोकताना, एखादी वजनदार वस्तू उचलताना जोर केल्यास, इतकेच काय, फार जोरात हसतानाही थोडी लघवी कपडय़ात गळते. हा त्रास लाजिरवाणा वाटतो. कोणाला सांगायचे कसे, म्हणून बऱ्याच महिला अंगावर काढतात. अगदीच त्रास वाढला तर डॉक्टरांकडे जातात. जसे बद्धकोष्टात जोर केल्याने प्रोलेप्स वाढतो तसे रेक्टोसीलने (गुदाचा भाग योनीमार्गाच्या सैल भिंतीतून आत सरकल्याने झालेला हर्निया) पोट साफ न झाल्याची भावना सतत राहते.
काही वेळा दुसऱ्या-तिसऱ्या गर्भारपणातच महिलेला शरीर (गर्भाशय) बाहेर आल्याचे जाणवते. बाळाला इजा होईल का, म्हणून खूपच काळजी वाटते. गरोदरपणात गर्भाशयाला भरपूर रक्तपुरवठा होत असल्याने खाली आलेले गर्भाशयाचे मुख सुजते; लाल होते व रक्तस्रावही होऊ शकतो. जसजसा गर्भ वाढतो तसे खाली उतरलेले गर्भाशय वर ओढले जाते. सहसा याने प्रसूतीला काही अडचण येत नाही.
गर्भाशय बाहेर येण्याच्या काही पायऱ्या (स्थिती) आहेत. गर्भाशय किंचित खाली सरकणे, गर्भाशयाचे मुख योनीमार्गाच्या अगदी तोंडाशी येणे, गर्भाशय योनीमार्गातून बाहेर येणे, अध्र्यापेक्षा जास्त गर्भाशय योनीमार्गातून बाहेर येते, पूर्णपणे गर्भाशय योनीमार्गातून बाहेर येते आणि अशा वेळी योनीमार्ग पूर्णपणे गर्भाशयावर उलटा होतो व बाहेर दिसतो. गर्भपिशवी उतरते त्याबरोबरच लघवीची पिशवी व गुदाही उतरू शकते.
यावर उपाय तीन गोष्टींवर अवलंबून असतात- महिलेचे वय, गर्भाशयाची व इतर अवयवांची स्थिती आणि महिलेची शारीरिक परिस्थिती अर्थात भविष्यात मुले हवीत का आणि पाळीसंबंधी तक्रारी या गोष्टीही लक्षात घेतल्या जातात. एकदा पिशवी खाली उतरली म्हणजे योनीमार्गाच्या तोंडापर्यंत आणि योनीमार्ग सैल असेल तर औषधोपचार नसतो. शस्त्रक्रियाच करावी लागते. इथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, या शस्त्रक्रिया विकसित करण्यात पाश्चात्त्य डॉक्टरांच्या बरोबरीने भारतीय डॉक्टरांचे (मुंबईतील) योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. पुरंदरे, डॉ. शिरोडकर यांच्या नावाने तर विकसित शस्त्रक्रिया जगप्रसिद्ध आहेत. डॉ. सुनावाला, डॉ. खन्ना, डॉ. नाडकर्णी, डॉ. विरकूड इ. नावे खूप अभिमानाने घेतली जातात.
तरुण महिलांमध्ये गर्भाशय उचलून ओटीपोटात बसविताना सैल स्नायुबंधांना कृत्रिम आवरणाने (जाळी किंवा पट्टय़ा) आधार दिला जातो. या शस्त्रक्रिया- योनीमार्गातून, लॅप्रोस्कोपीने किंवा पोट उघडून केल्या जातात.
वयस्क महिला, ज्याची मुलं मोठी आहेत, पाळी बंद झाली आहे- अशांना गर्भाशय काढून टाकून सैल झालेल्या योनीमार्गाला व दाराला थोडं खट्ट करण्याची शस्त्रक्रिया करता येते.
अतिशय वृद्ध व जर्जर महिला, आजाराने ग्रस्त असेल तर केवळ गर्भाशय वर सरकवून योनीमार्ग शिवला जातो, पण अशांना नर्सिग केअरची गरज असते. इथे एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे की, अंग बाहेर येण्याची तक्रार महिला अंगावर काढतात तेव्हा योनीमार्गाची आंतरत्वचा घासली जाऊन जखम होते व दरुगधीयुक्त पाणी जाऊ लागते. तेव्हा घरात लेकी/सुनांना ही अडचण लक्षात येते. केवळ कर्करोग नाही याची खातरजमा करून छोटय़ा असणाऱ्या शस्त्रक्रियांचा सल्ला दिला जातो. यासाठी काही विशेष तपासण्या असतात का? कधी युरिनरी इनकॉन्टिनस योनीमार्ग सैल झाल्याने नसून मूत्राशयाच्या स्नायूंचे कार्य बरोबर न चालल्याने असू शकते. म्हणजे जोर केल्यावर लघवी गळत असेल तर प्रथम लघवीमध्ये जंतुसंसर्ग नाही याची खात्री करावी लागते. नंतर युरोडायनेमिक स्टडी नावाची तपासणी करतात. जर मूत्राशयाच्या स्नायूंचे काम योग्य प्रकारे चालत असेल तर स्ट्रेस इनकॉन्टेन्ससाठी योनीमार्गातून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.
यासाठी प्रतिबंधक उपाय आहेत का? अर्थात! परंतु ही पावले मुलगी लहान असतानाच, तरुणपणी, बाळंतपणात वगैरे उचलली पाहिजे. वयात येणाऱ्या मुलींमध्ये कुपोषण टाळण्यासाठी प्रथिने, लोहयुक्त व जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहार, व्यायामाने शरीर निरोगी व बळकट ठेवणे अनिवार्य आहे. बाळंतपणात आणि स्तनदा मातांची आहाराची वाढीव गरज लक्षात ठेवली पाहिजे.
इथे व्यायामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गरोदरपणी (पीजेटल एक्सरसाइज) बाळंतपणानंतर (पोस्टनेटल एक्सरसाइज) करणे खूप आवश्यक आहे. गरोदरपणातील व्यायामामुळे बाळंतपण सुकर होते. जास्त खेचताण होत नाही- म्हणजे पिशवी उतरणार नाही व बाळंतपणानंतर खेचताणीने व जोर केल्याने सैल झालेले स्नायू घट्ट करण्यासाठी पोस्टनेटल एक्सरसाइज उपयुक्त ठरतात. नैसर्गिक बाळंतपणानंतर ३-४ आठवडय़ांनी व सिझेरियननंतर सहा आठवडय़ांनी हे व्यायाम सुरू करता येतात. त्यामुळे ओटीपोटातले व योनीद्वाराचे व मार्गाचे स्नायू बळकट होतात.
साधारणत: घरी प्रसूती करू नये. गर्भाशयाचे मुख उघडल्याशिवाय दाईने/डॉक्टरांनी मातेला जोर करू देऊ नये. जास्त खेचाताण न करता सुयोग्य हाती बाळंतपण व्हावे. बाळंतपणात पोषक आहार, आराम मिळावा. ओटीपोटाच्या स्नायूंचा सोपा व्यायाम शिकून घ्यावा, पोटपट्टा बांधून ओटीपोटाच्या सैल स्नायूंना आधार द्यावा.
प्रोलेप्स न होऊ देणे निदान ७० टक्के तरी आपल्या हाती आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो