गोष्टी भावभावनांच्या : दहशत
मुखपृष्ठ >> गोष्ट भावभावनांची >> गोष्टी भावभावनांच्या : दहशत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोष्टी भावभावनांच्या : दहशत Bookmark and Share Print E-mail

altआई - बाबा तुमच्यासाठी
नीलिमा किराणे , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बाबांच्या संतापाचा उद्रेक अनेकांसमोर झाल्यामुळे छोटय़ा सोनाला स्वत:ची लाज वाटते. हळूहळू कोणात मिसळता येईनासं होतं, ती कोषात जाते. हे असंच चालू राहिलं तर लवकरच एक अत्यंत भित्री, निर्णयक्षमता नसणारी, कुणाचंही ऐकून घेणारी अशी सोना तयार होईल. म्हणजे ती शिस्तशीर, हुशार व्हावी अशा उद्देशानं बाबा संतापत असले, तरी प्रत्यक्षात त्या संतापामुळेच ती बावळट आणि आत्मविश्वास हरवलेली होते आहे. वेताळाला खांद्यावर घेऊन विक्रमादित्य पुन्हा चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘ राजा, तू परत येणारच या खात्रीने मी तुझ्यासाठी नवनवीन प्रश्न नेहमीच शोधून ठेवतो. बघ ही गोष्ट-’’
काकाच्या लग्नात छोटी सोना भावंडांशी खेळत होती. मित्राशी गप्पा मारणाऱ्या बाबांनी ओळख करून देण्यासाठी सोनाला हाक मारली. आपल्याच नादात असलेल्या सोनाचं दोन-तीन हाकांनंतर लक्ष गेलं. तोपर्यंत बाबांचा आवाज थोडा चढलाच होता. सोना धावत बाबांकडे गेली.
‘‘मूर्ख, किती हाका मारतोय, बहिरी आहेस का?’’ बाबा ओरडले. दचकलेल्या सोनाची मान खाली गेली. ‘‘दीपक, ही माझी मुलगी सोना.’’  बाबांनी ओळख करून दिली. ‘‘कितवीत आहेस बाळ तू?’’ काकांनी विचारलं. ‘‘तिसरीत’’ बावरलेली सोना तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
‘‘जरा जोरात सांग की. अंगात जीव आहे की नाही?’’ बाबा खेकसले. सोनाच्या तोंडाला आणखी कोरड पडली. ‘‘गोड आहे सुनील तुझी मुलगी’’ असं म्हणत दीपककाकांनी पेढा दिला तरी सोनाची छाती धडधडत  होती.
* * * *
जेवणाच्या पंगतीच्या मधून पळापळी करणाऱ्या मुलांत सोनाला पाहून बाबांच्या कपाळावर आठी पडली. त्यात गरम आमटीची बादली घेऊन येणाऱ्या वाढप्याला सोना नेमकी धडकली आणि काही समजायच्या आत तिच्या गालावर खाडकन थप्पड बसली. ‘‘मूर्ख, पंगत ही काय खेळायची जागा आहे ? बेअक्कल ’’ भर पंगतीत शोभा झाल्यानं सोना खजील झाली. तिच्या डोळय़ांत पाणी तरळलं, गळय़ापाशी काहीतरी जड, दुखल्यासारखं झालं. आवंढा गिळत ती तिथून पटकन पळाली. चटके बसलेला पाय नळाखाली धुताना आईनं तिच्या पाठीवर थोपटलं तशी ती आईच्या कुशीत हुंदके देत रडत राहिली. बाबांचा चढलेला आवाज आणि भडकलेला चेहरा तिला विसरता येतच नव्हता.
‘‘एवढय़ाशा मुलीला असं मारायचं का? भाजलंय केवढं पायाला.’’ घरी आल्यावर आई बाबांना म्हणाली. ‘‘तेच तर. भाजून घेण्यापर्यंत मस्ती करायची?सुनीलच्या मुलीला ‘वळण नाही’ असंच म्हटले असतील सगळे. वागायची अक्कल नाही.’’ इति बाबा. तशी आई गप्प बसली. थोडय़ा वेळानं राग शांत झाल्यावर बाबांनी सोनासाठी चॉकलेट आणलं, तिला जवळ घेतलं, पण सोना भिऊन दूर सरकून बसली.
* * * *
मैत्रिणीच्या वाढदिवसाहून घरी परतायला उशीर झालेली आठवीतली सोना एका मैत्रिणीच्या सोबतीनं हळूच चोरासारखी घरात शिरली. त्याबरोबर चिडलेल्या बाबांचा स्फोट झाला.
‘‘उशीर का झाला ?’’ त्या आवाजानंच सोना थरथरली. खाली मान घालून उभी राहिली.  
‘‘आता का वाचा बसली? काय विचारतोय मी?’’ बाबा आणखी बिथरले.
‘‘..’’
‘‘जबाबदारीनं वेळेवर निघता येत नाही? वाढदिवस, पाटर्य़ा वाढतंच आहे.  शिस्त नको?’’
‘‘ सगळय़ा जणी होत्या बाबा..त्यांनी..आग्रह केला.’’ सोना अडखळत म्हणाली. पण तेवढय़ानंही बाबा खवळले. सोनाच्या पाठीत बाबांचा एक दणका बसला आणि दोन मुस्कटात. सोनाच्या सोबत आलेली मैत्रीण दारातून गुपचूप  बाहेरच्या बाहेर पळाली.
‘‘अहो, किती संताप एखाद्या गोष्टींसाठी? एवढय़ा मोठय़ा मुलीला मारतात का? तिनं फोन करायला हवा होता, पण राहतं कधीकधी मैत्रिणींच्या नादात. मार्क थोडे कमी पडले तेव्हा पण असंच संतापलात.’’ आई मधे पडली. बाबांचा हात थांबला, पण तोंडाचा पट्टा चालूच होता.
‘‘हो, आहेच मी तापट. पण उपयोग काय? तुझ्या लाडानं बिघडलीय. आईबापापेक्षा मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतायत. तिच्या भल्यासाठीच मारतोय ना? शिस्त नाही, रात्रीची एकटी आली, काय काय बातम्या वाचतो आपण, हिला अक्कल नको?’’ बाबांचे वटारलेले डोळे आणि आविर्भाव पाहून आईपण दचकली. आपल्या खोलीत जाऊन सोना छातीशी उशी घट्ट धरून रडत बसली. बाबांचा चढलेला आणि आईचा दबलेला आवाज ऐकताना तिला खूप अस्वस्थ वाटत होतं, काय होतंय कळत नव्हतं.
थोडय़ा वेळानं शांत झालेले बाबा सोनासाठी आइसक्रीम घेऊन आले.           
* * * *
रिक्षावाल्याने सांगितलेले पैसे बरेच जास्त वाटले, म्हणून सोनानं त्याच्याकडे टेरिफकार्ड मागितलं. तर तो उलट तिच्याशीच जोरजोरात वाद घालू लागला. तसे गुपचूप त्यानं मागितले तेवढे पैसे देऊन सोना घरात शिरली. तिला घाम फुटला होता आणि छाती धडधडत होती. संध्याकाळी ‘मूर्खासारखे’ पैसे दिल्याबद्दल बाबांनी तिला धारेवर धरलं, पुन्हा आईबाबांचा वाद झाला.
पुढचे अनेक प्रसंग वेताळानं झरझर दाखवले. वर्गामध्ये न केलेल्या चुकीबद्दल शिक्षिका सोनाला वरच्या स्वरात रागावत होत्या. वस्तुस्थिती सांगायची सोनाला हिंमत झाली नाही. खाली मान घालून ती ऐकून घेत राहिली. नववीत मार्क कमी पडल्याबद्दल बाबा रागावत होते, नातलगांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात कोपऱ्यात तंद्रीत एकटय़ाच बसलेल्या सोनावर फ्रीज होत राजाला दिसणारं दृश्य अस्पष्ट होत गेलं.
* * * *
वेताळ म्हणाला,‘‘ राजा, सोना दिवसेंदिवस भित्री, एकलकोंडी आणि बावळट होत चाललीय. चुका करते आणि बाबांचा ओरडा, मार खाते. बाबांच्या अपेक्षा ती पूर्णच करू शकत नाही आणि ते संतापतात. सोना कधी सुधारणार? हा तिढा कसा संपवायचा राजा.’’
राजा म्हणाला, ‘सोनाच्या समस्येची सुरुवात बाबांच्या अतिरेकी संतापातून झाली आहे वेताळा. तिला त्यांची दहशत बसली आहे. लहानपणी लग्नातल्या प्रसंगांत सोनाची थोडी चूक होती पण तिच्या वयाच्या आणि चुकीच्या मानानं बाबांनी फार मोठी शिक्षा दिली. हेच पुन:पुन्हा घडत असणार.  ‘आपल्या मुलीला वळण नाही,’ असं सगळे म्हणतील किंवा ‘तिला वागायचं कळत नाही’ या अपेक्षाभंगाच्या भीतीतून आलेला आपला राग बाबांना त्याक्षणी सर्वात महत्त्वाचा असतो आणि वर ‘हो, आहे मी तापट’ हे त्यांचं समर्थन असतं. छोटय़ा सोनाची चूक असल्यामुळे ती खजील होते. अपमान, दुख, असहाय वाटणं, भीती अशा त्रासदायक भावनांचा उद्रेक छोटय़ा सोनाला झेपत नाही आणि हे सगळं ज्यामुळे सुरू होतं, त्या बाबांच्या ओरडय़ाची आणि संतापाची तिला दहशत बसते. असं सतत घडल्यानंतर, कुणीही  वरच्या पट्टीत बोललं, अगदी रिक्षावालासुद्धा-की घाबरून नांगी टाकणं ही तिची नैसíगक प्रतिक्रिया बनते.  
आई सोनाला समजू शकते पण बाबांपुढे आईचं काही चालत नसल्यामुळे सोनाला आधार सापडत नाही. दहशत वाढत जाण्यानं आत्मविश्वास संपतो आणि ती स्वत:ला आक्रसून घेत जाते. अशा वेळी ती मनातल्या मनात स्वत:ला बावळटपणा करण्याबद्दल, अगतिकपणाबद्दल कोसत असणार आणि आणखी खच्ची होत असणार.
‘‘ मला तुझं सगळं म्हणणं नाही पटत राजा. बाबांचं सोनावर प्रेम आहे. त्यांना ती एक चांगली व्यक्ती व्हायला हवी आहे म्हणून ते रागावतात. पण तिची काळजी आणि लाडही करतात.’’
‘‘सोनाला भाजल्याबद्दल किंवा रात्री एकटी येण्याबद्दल बाबा काळजी दाखवतात. त्यांच्या मनात प्रेम आणि काळजी असेलही. पण सोनापर्यंत ते कुठे पोहोचतं?’’  चारचौघांत मुलीवर ओरडणं आणि दणका देण्याचा अर्थ ‘बाबांना काळजी वाटते’ असा सोना कसा घेणार ?’’
रागाच्या भरात आपण जरा जास्तच केलं याचं बाबांना नंतर भान येतं. ते तसं सोनाशी स्पष्टपणे बोलले, तर तिच्या दुखावलेपणावर फुंकर बसेल. पण नंतर चॉकलेट नाही तर आइसक्रीम आणणं म्हणजेच त्यांचं प्रेम किंवा आपण अतितीव्र प्रतिकिया दिल्याचं त्यांना समजलंय, असं सोनानं कसं समजून घ्यावं? कारण ते पुन:पुन्हा घडतंच आहे. विलक्षण त्रासदायक भावनांच्या कल्लोळातून पुन:पुन्हा जाणाऱ्या सोनाला ते विसरता तर येतच नाही, उलट बाबांची दहशत बसते. त्यांच्याबद्दल मनात कायमचा दुरावा निर्माण होता. दुर्दैव असं की हा अदृश्य पण अत्यंत गंभीर परिणाम  बाबांच्या लक्षातही येत नाही.
अशा ताणलेल्या प्रसंगाचा परिणाम तिथेच संपत नाही, तो सगळीकडेच झिरपतो. बाबांचा संताप आणि आईच्या गप्प बसण्यातून सोनाला अप्रत्यक्षपणे संदेश कोणता जातोय? तर ‘बाबा संतापून ओरडले की आपली चूक असो वा नसो, आपण गप्प बसायचं असतं, असाच ना?’ त्यामुळे सोनाला हळूहळू वरच्या आवाजातल्या संवादाचीच भीती बसते. कुणाला विरोधच करता येत नाही. बाबांच्या संतापाचा उद्रेक अनेकांसमोर झाल्यामुळे तिला स्वत:ची लाज वाटते. हळूहळू कोणात मिसळता येईनासं होतं, ती कोषात जाते. हे असंच चालू राहिलं तर लवकरच एक अत्यंत भित्री, निर्णयक्षमता नसणारी, कुणाचंही ऐकून घेणारी अशी सोना तयार होईल. म्हणजे ती शिस्तशीर, हुशार व्हावी अशा उद्देशानं बाबा संतापत असले, तरी प्रत्यक्षात त्या संतापामुळेच ती आत्मविश्वास हरवलेली होते आहे.  
‘‘आता यावर उपाय काय राजा?’’
‘‘सर्वात प्रथम बाबांनी स्वत:च्या रागाचं आणि त्यानंतरच्या प्रतिक्रियेचं उदात्तीकरण करणं थांबवणं गरजेचं आहे. अपेक्षाभंग झाल्यावर राग येणं चूक नाही, पण तो व्यक्त करण्याची पद्धत चुकीची आहे. त्यांनी सोनाचं ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. प्रसंगांकडे डोळसपणे पाहायला पाहिजे. तिला समजावून सांगितलं पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत तर सोनाचा बोलण्याचाही आत्मविश्वास दहशतीत हरवलाय. तिला मोकळं करून हळूहळू आपलं म्हणणं मांडायलाही शिकवावं लागेल.
‘‘मुलीच्या मनातला दुरावा आणि आधारहीन वाटणं आईबाबांनी गंभीरपणेच घ्यायला हवं. काही बाबतीत ठाम राहून, बाबांशी आणि सोनाशी शांतपणे संवाद साधण्याची जबाबदारी आई पार पाडू शकते वेताळा..’’
..राजानं चमकून पाहिलं. काहीच न बोलता वेताळ खांद्यावरून अदृश्य झाला होता.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो