बिधान बरुआच्या निमित्ताने... जगण्याचा हक्क
मुखपृष्ठ >> लेख >> बिधान बरुआच्या निमित्ताने... जगण्याचा हक्क
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बिधान बरुआच्या निमित्ताने... जगण्याचा हक्क Bookmark and Share Print E-mail

altमंगला आठलेकर ,  शनिवार, २६ मे २०१२
‘समिलगी संबंध’ ही मूलत: काही भयानक किंवा सर्वनाश ओढवणारी गोष्ट नसावी. तशी ती असती तर सर्वनाश झाला असता. कारण जगाच्या आरंभापासून समिलगी संबंध अस्तित्वात असल्याची साक्ष देशोदेशींच्या इतिहासात आणि पुराणग्रंथात पाहायला मिळते. पाश्चात्त्य देशांनी सादर केलेले जे पाहणी निष्कर्ष आहेत ते पाहिले असता असं लक्षात येतं की एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोक हे समिलगी आकर्षण असलेले असतात. याचाच अर्थ असा की, जगभरातले लाखो आई-बाप या प्रश्नाशी संबंधित आहेत. मग आता तरी आपण त्यांचे प्रश्न समजून घेणार आहोत की नाही, समाज म्हणून त्यांचा विचार करणार की नाही?
आसाममधील बिधान बरुआ या एकवीस वर्षांच्या तरुणाला अखेर मुंबई हायकोर्टानं िलगबदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी तर दिलीच, शिवाय ही शस्त्रक्रिया करण्यात त्याला कोणाचीही आडकाठी येऊ नये यासाठी पोलीस संरक्षण देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानं समिलगी संबंध ठेवणं ही ज्यांची नसíगक गरज आहे त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला असेल यात शंका नाही.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक समिलगी संबंध ठेवणारे लोक जगण्याच्या आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. पण त्यांच्या वाटय़ाला घृणा आणि तिरस्कार यापलीकडे काही येत नाही. त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरजही इतरांना वाटत नाही. पाश्चात्त्य देशात समिलगी संबंधांची जोरदार चर्चा होत असताना आपल्याकडे ‘लेस्बियन’ आणि ‘होमो सेक्शुअल’ या इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्दही नाहीत. इतका हा प्रश्न आपण झटकून टाकला आहे.
समिलगी आकर्षणाचा प्रश्न हा अल्पसंख्याकांचा प्रश्न आहे, असं म्हणत बहुसंख्य त्याकडे डोळेझाक करतात. शिवाय हा प्रश्न लैंगिक संबंधाशी निगडित आहे, नीती-अनीतीचा प्रश्न तिथं धसाला लागणार असतो. अशा प्रश्नाचा सहानुभूतीनं  विचार करण्यासाठी मान्यता द्यायची म्हणजे आपल्याला हा सारा अनीतीचा कारभार पटतो, अशी एक प्रकारे कबुली द्यायची. त्यातून आपणही त्याच वर्गात मोडतो की काय, असा आरोप होण्याचं भय! त्यापेक्षा हे प्रश्न आमच्या समाजात कधी अस्तित्वातच नव्हते, असा पवित्रा घेणं आपल्याकडच्या ढोंगी लोकांना जास्त मानवतं.
समिलगी आकर्षणाचा प्रस्थापित नीतिमत्तेला आव्हान देणारा हा जो प्रश्न आहे तो एकटय़ा-दुकटय़ाचा नाही. यात धर्म, जात, वर्ण, पंथ,गरिबी-श्रीमंती, शहर-खेडं यांच्या पलीकडे जाणारी सार्वत्रिकता दिसते. नसíगक-अनसíगक, प्रकृती-विकृती,     नतिक-अनतिक यांच्या व्याख्यानांनाच आज हे लोक आव्हान देताहेत. लैंगिक संबंध हे स्त्री-पुरुषातच घडून आले तर ते नसíगक, नतिक हे कुणी ठरवायचं, असा प्रश्न ते करताहेत. स्वत:ला संस्कृतिरक्षक म्हणवणारे लोक या प्रश्नाचा साध्या कलाकृतीच्या रूपानंही स्वीकार करायला तयार नसतात. मुळात सामाजिक नतिकतेची एक चौकट तयार करून त्या चौकटीबाहेरचं जीवन जगू पाहणाऱ्याला आपण जगणंच  कसं काय नाकारू शकतो, हा खरा प्रश्न आहे.
‘समिलगी संबंध’ ही मूलत: काही भयानक किंवा सर्वनाश ओढवणारी गोष्ट नसावी. तशी ती असती तर सर्वनाश झाला असता. कारण जगाच्या आरंभापासून समिलगी संबंध अस्तित्वात असल्याची साक्ष देशोदेशींच्या इतिहासात आणि पुराणग्रंथात पाहायला मिळते. पाश्चात्त्य देशांनी सादर केलेले जे पाहणी निष्कर्ष आहेत ते पाहिले असता असं लक्षात येतं की एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोक हे समिलगी आकर्षण असलेले असतात. याचाच अर्थ असा की, जगभरातले लाखो आई-बाप या प्रश्नाशी संबंधित आहेत. अगदी आपण ज्यांचा फार आदर करतो असे आपले वरिष्ठ, आवडते कलावंत, आपले स्न्ोही, मित्र, अगदी जवळचे नातेवाईक.. कदाचित आपलं एकुलतं एक मूलसुद्धा समिलगी आकर्षण असलेलं असू शकतं. जगातल्या कुठल्याही समाजाचा असा सव्‍‌र्हे घेतला तर  लक्षात येईल की, लेस्बियन्स किंवा होमो सेक्शुअल्स नाहीत असा समाज नाही. म्हणूनच या लोकांना काय म्हणायचं आहे ते ऐकलंच पाहिजे.
समिलगी संबंधावर ‘हे दुख कुण्या जन्माचे’ हे पुस्तक मी २००४ साली लिहिलं. त्या निमित्तानं मी अनेक लेस्बियन्सना भेटले. या मुली स्वत:च्या लेस्बियन जीवनपद्धतीविषयी माझ्याशी बोलल्या. त्यांची संख्या लक्षात घेण्याइतकी मोठी आहे. केवळ मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता शहरापुरतीच ती मर्यादित नाही. अगदी गडचिरोली, अमरावतीतल्या खेडेगावातसुद्धा अशा मुली आहेत हे पाहिलं. त्यांच्या संघटना, त्यांची काम करण्याची पद्धत, घरीदारी त्यांच्या वाटय़ाला आलेली घृणा आणि जगण्यासाठी त्यांची चाललेली धडपड पाहिल्यावर वाटलं की, पूर्वापार चालत आलेल्या नतिकतेच्या कल्पनांतून , त्या बाहेरचं जे काही आहे ते सारं ‘अनतिक’ म्हणून आपल्याला बाद करता येणार नाही.
माझ्या पुस्तकात मी ज्या अनेक लेस्बियन्सच्या मुलाखती घेतल्या, त्यातल्या बहुतेकींनी त्यांचं खरं नाव मी उघड करू नये, अशी विनंती केली. कारण खरी ओळख जिथं उघड होते तिथं त्यांची नोकरी जाते, त्यांना राहत्या घरातून बाहेर काढलं जातं. समाजाच्या नजरा त्यांना ओरबाडून काढतात. आणि अखेरीस आत्महत्येशिवाय दुसरा कुठला पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक राहत नाही.
पण त्या साऱ्या जणीत गीता कुमाना नावाच्या एका लेस्बियननं मात्र मला स्पष्ट सांगितलं, ‘‘माझ्यासाठी टोपणनाव वगरे वापरू नकोस. माझ्या खऱ्या नावानं लिहिणार असशील तरच मी तुझ्याशी बोलेन.’’ आणि तिनं धाड धाड माझ्यावरच प्रश्नांची सरबत्ती  सुरू केली. ती म्हणाली,
‘मी डावखुरी आहे.. काही आक्षेप?
मी पारसी आहे.. काही आक्षेप?
मी गोरी, मध्यम उंचीची आहे.. काही आक्षेप?
मी लेस्बियन आहे.. काही आक्षेप?
बाकी गोष्टींना तुमचा आक्षेप नसणार. मग मी लेस्बियन आहे यालाच आक्षेप का? हे तर जगायलाच परवानगी न देण्यासारखं झालं.. तुमच्याहून आम्ही कुठं आणि कशा वेगळ्या ठरतो? आम्ही तुमच्यासारखंच मतदान करतो, तुमच्यासारखाच कर भरतो. आम्ही लेस्बियन आहोत म्हणून ‘तुम्हाला कर भरता येणार नाही.’ असं कुणी म्हणतं का? हा फरक संपायचा असेल तर सरकारनंच काही पावलं उचलायला हवीत. यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वारंवार आम्हाला आमचा प्रश्न चच्रेत ठेवला पाहिजे. ही उमेद बाळगतानाही मला मनातून माहीत आहे की, माझ्या हयातीत आम्हाला मान्यता मिळणार नाही. पण एकत्र येऊन असाच प्रयत्न सुरू राहिला तर पुढच्या पिढीला आमच्यासारखं अंधारलेलं आयुष्य जगावं लागणार नाही.’’
समिलगी संबंध ठेवणाऱ्या या मुलींना वाटतं की, समाजानं आपल्यासाठी मोकळं, भयनिर्भर वातावरण निर्माण करायला पाहिजे. मानवी मूल्यातलं सर्वात महत्त्वाचं मूल्य म्हणजे न्यायप्रियता. पण हा न्याय काही या मुलींना मिळत नाही. त्या म्हणतात, ‘‘संवेदनशील माणसांनी आमच्याबरोबर असायला पाहिजे,  पण संवेदनशीलता दूरच, उलट ‘तुम्ही इथं मुळात आहातच का,’ असा भाव लोकांच्या नजरेत असतो. आयुष्याचा एक पलू लपवून कायम जगत राहायचं याचा फार मोठा ताण आमच्या मनावर येतो.’’
अठ्ठावीस वर्षांची शरदिनी सांगत होती, ‘‘ ..आम्ही लेस्बियन्स आहोत हे कळलं की आमची नोकरी जातेच.पण आम्हाला सर्वात जास्त त्रास होतो तो लोकांच्या नजरांचा. ‘मुलगा की मुलगी?’ हे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यांत असतं. माझ्या ‘शरदिनी’ नावाचं ‘शरद’ करून नेमप्लेट खराब करणारे लोक आहेत. माझ्या मोटरसायकलची सीट खराब कर, टायर पंक्चर कर.. असा त्रास देणारे लोक आहेत. का? तर मी बाईसारखी दिसत नाही. काहीतरी वेगळी दिसते. आणि म्हणून माझी हवी तशी कुचेष्टा करण्याचा हक्क लोकांना आहे. सर्व दिशांनी आमची फक्त कोंडीच होते. काही लेस्बियन्सना स्वत:च्या घरातही बलात्काराला सामोरं जावं लागतं. त्यांच्या मनाविरुद्ध लावलेलं त्यांचं लग्न हा एक प्रकारचा बलात्कारच असतो त्यांच्यावर.’’
तर दीपालीचं म्हणणं असं होतं की, ‘‘..समाजानं आमचं मन समजून घेण्याची खूप गरज आहे. आमचे अनुभव काय असतात हे विचारण्यापेक्षा आमचं भय काय आहे हे समजून घ्यायला हवं. मी लेस्बियन आहे याची मला लाज वाटत नाही. पण मी जर हे जाहीररीत्या बोलले आणि माझी नोकरी गेली तर माझ्या पाठीशी कोण आहे? माझ्या दारात उद्या पोलीस आले आणि मला ‘आत’ टाकतो म्हणाले तर? पोलीस लेस्बियन्सना ‘अननॅचरल सेक्स’ या गुन्हय़ाखाली तुरुंगात टाकू शकतात. दंगली घडतात, त्यांचं निमित्त करून आम्हाला मारून टाकलं तर? कोण उभं राहणार आहे आमच्या पाठीशी? आपल्याकडे सुरक्षिततेची हमी आहे का? मी आत्ता स्टेजवर जाऊन लेस्बियन असल्याचं जाहीर करते. जिथं दलितांनासुद्धा अजून बदडलं जातं तिथं कसली आली आहे सुरक्षितता?कायद्याचं काय संरक्षण आहे आम्हाला?’’
एकेका लेस्बियनचं मनोगत ऐकताना हलून जायला होत होतं. खरंच, आपल्या समाजाच्या नीतिमत्तेच्या व्याख्या इतक्या ठिसूळ, कच्च्या, भुसभुशीत आहेत की, जगण्यासाठी मदत करणारं एखादं ठाम तत्त्वज्ञान त्यातून उभं राहत नाही. लैंगिक संबंधांतली नीतिमत्ता तर त्या त्या व्यक्तीच्या सोयीनुसार आकार घेणारी, दुटप्पीपण लक्षात यावं, अशा अनेक जागा त्यात आहेत. तरीही एकदा लग्न झालं की सगळा स्त्री-पुरुष संबंध नसíगक, नतिक होतो, कारण स्त्री-पुरुष हे  प्रजोत्पादनासाठीच निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील संबंधांना निसर्गाची आणि कायद्याचीही मान्यता आहे. मूल स्त्रीला होतं आणि त्यासाठी पुरुषबीजाची आवश्यकता असते, हा निसर्गाचा नियम आहे. स्त्री आणि पुरुषाचं लग्नही याच हेतूनं लावलं जातं. पण एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीशी किंवा एका पुरुषानं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणं ही विकृती आहे. कारण त्यांची शरीरं परस्परांना लैंगिक सुख देण्या-घेण्यासाठी पूरक नाहीत. निसर्गानं त्यांना ती परवानगी दिलेली नाही. म्हणून कायद्यानंही त्यांच्या संबंधांना मान्यता नाही.
मग आपल्या वाटय़ाला केवढी तरी उपेक्षा, िनदा येणार हे ठाऊक असूनही अपरिहार्य असल्यासारखी ही माणसं याच जीवनपद्धतीला धरून का राहतात? अशी कोणती शक्ती, प्रेरणा त्यांना सर्वमान्य जीवन जगण्यापासून परावृत्त करीत असते आणि लोकांच्या कल्पनेतही नसलेलं जगणं जगायला भाग पाडते, ही त्यांची निवड असते का? की जन्मत:च अशी वेगळी शरीर-मनाची रचना घेऊन हे लोक जन्माला येतात? त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू न देण्याचा हक्क आपल्याला कोणत्या जोरावर प्राप्त होतो?
समजा, आपल्या घरात एखादी मुलगी अशी जन्माला आली की जिला निसर्गत:च स्त्रीदेहाचं आकर्षण आहे किंवा असा बिधान बरूआसारखा मुलगा जन्माला आला की ज्याला मुलीसारखं वागावंसं वाटतं आणि जो मुलाच्या प्रेमात पडला आहे तर आपण अशा मुलांना मारून टाकणार? हे कसलं पाप आपल्या घरात जन्माला आलं म्हणून त्यांना पुरून टाकणार?आपल्या घरात मतिमंद मूल जन्माला आलं.. आंधळं, मुकं किंवा बहिरं मूल जन्माला आलं म्हणून त्याचा त्याग करतो? त्याला धिक्कारतो? ते बिचारं मूल जे काही मोडकं शरीर त्याच्या वाटय़ाला आलं ते घेऊन जगण्याची धडपड करतं तेव्हा त्याच्यावर आत्यंतिक प्रेम करत आणि त्याला जगण्याचा आत्मविश्वास देत आपण त्याचा सांभाळ करतो ना? मग आपल्या घरात समिलगी आकर्षणाची प्रेरणा घेऊन एखादं मूल जन्माला आलं तर त्याला त्याचा जगण्याचा हक्क दिला पाहिजे, असं आपल्याला वाटायला हवं की नको?
अशा मुलांनी स्वत:च्या शरीर-मनाच्या सुखासाठी जी वाट शोधली असेल ती त्यांच्यापुरती नसíगकच असणार. आपण आपल्या चष्म्यातून त्यावर अनसíगक असा शिक्का कसा मारू शकतो? ही मुलं दुसऱ्या कुणाला लुबाडत नाहीत, दुखावत नाहीत, त्यांच्यासारख्याच इच्छा आणि भावना घेऊन आलेली मुलं शोधतात आणि इतर कुणाच्या अध्यात-मध्यात न पडता स्वत:चं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी समाज त्यांना का नाकारतो? का वाळीत टाकतो?
उत्तर हेच की,‘समाज’ म्हणून आम्ही इतके दुटप्पी आहोत की, आम्हाला फक्त कशाची वाच्यता नको. चोरून, लपूनछपून अनतिक काम करणारे लोक आम्हाला चालतात. त्यांचं सामाजिक, राजकीय, साहित्यिक स्थान पाहून आम्ही त्यांना सन्मानानं व्यासपीठावर बसवणार. त्यांच्याकडून नतिकतेचे धडे घेणार आणि उघडपणे आपली सेक्श्युअ‍ॅलिटी जाहीर करणाऱ्यांना आम्ही शिक्षा करणार!
म्हणजे मग समिलगी संबंधांना मान्यता मिळायला हवी का? यावर असा प्रतिप्रश्न करता येऊ शकेल की, भिन्निलगी संबंधांना मान्यता कुणी दिली? एखाद्या गोष्टीला मान्यता देणारे वा न देणारे आपणच असतो. आपले निर्णय आपल्याला नव्या परिस्थितीत आणि नव्या संदर्भात तपासून बघता आलेच पाहिजेत.
समिलगी संबंध हा स्वैराचार आहे असं म्हटलं जातं. पण भिन्निलगी संबंधात तो नाही? घरी बायको असताना बाहेरच्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवणारे विवाहित पुरुष आपल्या समाजात नाहीत? लग्न झालेलं असताना परपुरुषाच्या आकर्षणात पडलेल्या स्त्रिया कमी आहेत? पॉकेटमनीसाठी तास-दोन तासांसाठी कॉलगर्ल म्हणून काम करणाऱ्या कॉलेजमधील मुलींची संख्या कमी आहे? प्रकृतीला हानिकारक असे ड्रग्ज, सिगारेट, दारू वगरे नशिल्या पदार्थाच्या अधीन झालेल्या स्त्री-पुरुषांची संख्या कमी आहे? स्वैराचार हा कुठल्याही एका गटाचा, घटकाचा विशेष नसतो. तो व्यक्तिगत असतो. तेव्हा भिन्निलगी समाजामध्ये मोठं पावित्र्य, नीतिमत्ता आहे आणि समिलगी संबंधांना मान्यता दिल्यानं ती धुळीला मिळणार आहे, असं अजिबात नाही.
पण दुर्दैवानं समाज सगळ्याच्या वर असतो. तो कायद्यालाही जुमानत नाही. तो अशा लोकांची मानहानी करतच राहतो, त्यांची छळणूक करतो, त्यांना जगणं नकोसं करतो. आणि समाजाच्या छळाला कंटाळून त्यांनी एकदाचा जीव दिला की केवढी तरी सांस्कृतिक सफाई आपण केली म्हणून धन्य होतो. जगण्यातल्या लंगिक क्रियेला असं अवाजवी महत्त्व दिलं गेल्यानं माणसाचं जीवन अधिक गुंतागुंतीचं, दु:खमय झालं आहे. समिलगी संबंधांच्या निमित्तानं एकूणच लैंगिकतेचा विचार मोकळेपणानं व्हायला हवा, ही आज प्रत्येक समाजाची गरज आहे. कारण जीवन हे  त्यापलीकडेही खूप आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो