‘एव्हरेस्ट’ची जन्मकुंडली!
मुखपृष्ठ >> ब्लॉग >> ‘एव्हरेस्ट’ची जन्मकुंडली!
 

लोकसत्ता ब्लॉग

ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘एव्हरेस्ट’ची जन्मकुंडली! Bookmark and Share Print E-mail

alt

अभिजित बेल्हेकर , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज (२९ मे) एव्हरेस्टदिन! बरोबर आजच्या दिवशी सन १९५३ साली सकाळी साडेअकराच्या सुमारास एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग या दोन गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च अशा भूमीवर पहिले पाऊल ठेवले. यामुळे हा दिवस जगभरात ‘एव्हरेस्टदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी नुकतेच आमच्या मराठी गिर्यारोहकांनी या शिखराला गवसणी घातली. त्यांचे हे अभूतपूर्व यश आणि या दिवसाच्या निमित्ताने या एव्हरेस्ट शिखराची ही जन्मकुंडली!

एव्हरेस्टची जन्मकुंडली!
माऊंट एव्हरेस्ट उंची २९०३५ फूट! जगातील सर्वोच्च शिखर! जणू पृथ्वीवरील हा तिसरा ध्रुवच! दोन उत्तर दक्षिण क्षितिजाकडे धावणारे, तर उर्वरित तिसरा त्या अवकाशात उंच गगनभरारी घेणारा! उंचीचे हे असामान्यत्व घेऊनच कधी १९२१ पासून मानवाने या शिखराला झटा द्यायला सुरुवात केली आहे. पण त्याला पहिले यश यायला उजाडला तो २९ मे १९५३ हा दिवस! सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे ही ती पहिलीवहिली मानवी पावले! त्यांच्या या यशानंतर या शिखराचे ते सर्वोच्च टोक गाठण्याचे जणू मग वेडच लागले आणि त्यातून हा ‘एव्हरेस्ट’ही अवघ्या मानवजातीच्या हृदयस्थानी स्थिरावला.
खरेतर २९०३५ फूट उंचीच्या या सर्वोच्च शिखराचा इतिहास खूपच मजेशीर आणि धक्कादायक गोष्टींनी भारलेला आहे. सामान्य विचार केला तर हा इतिहास अनेकजण त्या १९५३ सालानंतर सुरू करतात. पण हा कालखंड सुरू होतो या पहिल्या यशाच्या तब्बल शंभर वर्षे अगोदरपासून! सन १८५०च्या आसपास त्या वेळेच्या ब्रिटिश सरकारच्या ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ या सरकारी विभागातर्फे हिमालयाच्या रांगांचे सर्वेक्षण सुरू होते. हे सर्वेक्षण सुरू असतानाच त्याच वर्षी राधानाथ सिखधर या एका भारतीय कर्मचाऱ्यास हिमालय रांगांतील ‘त्या’ शिखराचा शोध लागला. तत्कालीन साधनांद्वारे त्या वेळी त्याची उंची मोजण्यात आली असता ती भरली तब्बल २९००२ फूट! जगातील ही सर्वोच्च जागा म्हणून तिची १८५२ मध्ये अधिकृत घोषणा झाली. नेपाळ आणि तिबेट या दोन देशांच्या सीमेवर असलेला हा पर्वत तोवर ‘चोमोलुंग्मा’ या त्यांच्या देवीच्या नावाने ओळखला जाई आणि आजही जातो. ही ‘चोमोलुंग्मा’ म्हणजे स्वर्गाची देवी म्हणून या शिखराला ‘स्वर्गमाथा’ किंवा ‘सरगमाथा’ असेही म्हटले जाते. पुढे या ‘सरगमाथा’चा अपभ्रंश होत त्याचे सगरमाथा असे नामकरण झाले आणि आता या चुकीच्या नावाचाच आणखी चुकीचा उच्चार करत आपण या शिखराला ‘सागरमाथा’ असे म्हणू लागलो आहे. असो! तर ब्रिटिशांनी हे ‘स्वर्गमाथा’ शिखर सर्वोच्च असल्याचा शोध लावला. पुढे काही वर्षांनी १८६५ मध्ये ब्रिटिशांनीच या सर्वोच्च शिखराला ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’चे पहिले महासंचालक सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नावही बहाल केले. अशा रीतीने सन १८६५ मध्येच हे सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ या नावाने जगापुढे आले.
जगातील सर्वोच्च शिखर सापडल्याच्या बातमीपाठोपाठच ते सर करण्याची मानवाची नैसर्गिक प्रवृत्तीही लगेच उफाळून आली. पण याची उंची आणि त्यातली आव्हाने पाहता यासाठी मानवाने अगोदर दुरूनच त्याचा अभ्यास सुरू केला. सन १८९३ साली तत्कालीन ब्रिटिश सेनाधिकारी चार्लस ब्रुस आणि गव्हर्नर जनरल फ्रान्सिस यंगहजबंड यांनी हे शिखर सर करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी कर्नल ब्रुसने सुरुवातीला या पर्वतीय प्रदेशाचे नकाशे तयार केले. याआधारे ते तब्बल १९४०० फूट उंचीपर्यंत पोहोचले. खरेतर हिमालयातील ही तेव्हाची सर्वात उंचीवरची चढाई होती. पुढे १९१३ साली कॅप्टन जॉन नोएल या ब्रिटिश सेनाधिकाऱ्यानेही बंदी असलेल्या तिबेट मार्गे वेशांतर करत एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. अपयश आले तरी तो या शिखराच्या तब्बल ६० मैलांपर्यंत पोहोचला होता.
गिर्यारोहकांना खुणावणाऱ्या या सर्वोच्च शिखराने एव्हाना पाश्चात्त्यांना पुरते झपाटले होते. दरम्यानच्या काळात अमेरिकेचे एक संशोधक रॉबर्ट पिअरी हे १९०९ साली उत्तर ध्रुवावर, तर १९११ साली रोनाल्ड अमुंडसेन हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले. साहजिकच आता साऱ्यांनाच वेध लागले होते ते अवकाशात गेलेल्या त्या तिसऱ्या ध्रुवाचे!
पाश्चात्त्यांमध्येही ब्रिटिश आघाडीवर होते. एकतर या ब्रिटिशांचे जवळपास अध्र्या जगावर राज्य होते. यातून पृथ्वीवरील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ‘युनियन जॅक’ फडकवून जगात त्यांना आपला दबदबा निर्माण करायचा होता. यातूनच ‘एव्हरेस्ट’सारखे शिखर सर करण्याचा मान त्यांनाच मिळावा म्हणून १९२० साली यंगहजबंड यांनी ‘रॉयल जिऑग्राफिक सोसायटी’च्या वर्धापनदिनाच्या वेळी या मोहिमेचा एल्गार केला. त्यांच्या या घोषणेनंतर १९२१ ते १९४९ दरम्यान सलग आठ मोहिमा ‘एव्हरेस्ट’वर पाठवण्यात आल्या. या सर्व मोहिमा अपयशी ठरल्या तरी त्यातून ‘एव्हरेस्ट’ची वाट, चढाई, परिसर, हवामान, धोके यांचा बऱ्यापैकी अभ्यास झाला. या आठ मोहिमांमध्ये १९२४ साली गेलेली जॉर्ज मॅलरी आणि अँड्रय़ू आयर्विन यांची मोहीम तर त्या काळी खूप गाजली होती. या दोघांनी त्या वर्षी तब्बल २५५६० फुटांपर्यंत मजल मारली होती. ८ जून १९२४ रोजी या दोघांनी पुढे आगेकूच केल्यावर पुन्हा त्यांना कुणीही जिवंत पाहिले नाही. पुढे १९९८-९९ मध्ये याच मॅलरीसाठी एक शोधमोहीमही ‘एव्हरेस्ट’वर नेण्यात आली.

साधारणपणे १९२०च्या पूर्वी ‘एव्हरेस्ट’वर फारसे प्रयत्न न होण्यामागे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे तोवर या शिखराला खेटून असलेल्या नेपाळ आणि तिबेट या दोन्हीही राष्ट्रांमध्ये परकीयांना असलेली प्रवेशबंदी! १९२०च्या आसपास तिबेटने अशी बंदी उठवल्यावर त्या देशातून या मोहिमा सुरू झाल्या. १९४९ पर्यंत तिबेट मार्गे या मोहिमा सुरू होत्या. त्या वर्षी चीनने तिबेटवर आक्रमण करत त्याचा ताबा घेताच या बाजूने होणाऱ्या मोहिमा पुन्हा बंद पडल्या. पण योगायोग असा, की पुढच्याच वर्षी १९५० मध्ये नेपाळमधील राजसत्ता संपुष्टात आली आणि या देशाची दारे परकीयांना खुली झाली. ब्रिटिशांची पुढची मोहीम मग या नेपाळमधूनच गेली. यानंतर १९५२मध्ये ब्रिटिशांशिवाय अशी स्वित्र्झलडची पहिली मोहीम या शिखरावर गेली. आणि या मोहिमेतून रेमाँ लॅम्बर्ट या गिर्यारोहकाने शेर्पा तेनसिंगसोबत तब्बल २८३०० फूट उंचीपर्यंत मजल मारली. हा आजवरचा चढाईचा एक विक्रमच होता. पुढच्या खेपेला हे स्विस गिर्यारोहक शिखर गाठणार हे निश्चित होते. म्हणून त्यांच्यापूर्वीच ब्रिटिशांनी १९५३ साली पूर्ण तयारीनिशी आपली मोहीम उघडली आणि आजवरच्या अनुभवावर ‘एव्हरेस्ट’चे पहिले यश संपादन केले. कर्नल जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेत ब्रिटिश गिर्यारोहक डॉ. चार्ल्स एव्हन्स आणि टॉम बर्डिलिअन यांच्यासह न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि भारतीय शेर्पा तेनसिंग नोर्गे हे अन्य दोघेही होते. २६ मे १९५३ पर्यंत हे चौघे या शिखराच्या अगदी जवळ पोहोचले होते. पण याचवेळी कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठय़ात दोष झाल्याने दोन्ही ब्रिटिश गिर्यारोहकांना माघार घ्यावी लागली तर हिलरी आणि तेनसिंग यांनी पुढील तीन दिवसांत उर्वरित चढाई पूर्ण करत या सर्वोच्च शिखरावर मानवाचे म्हणून पहिले पाऊल टाकले. ‘२९ मे’च्या कामगिरीने जणू मानवाने पृथ्वीवरील त्या तिसरा ध्रुवावरही आपली मुद्रा उमटवली. अचाट शक्ती आणि प्रखर मानसिकतेच्या बळावर मिळवलेला हा विजय होता. उत्तुंगतेवरील या विजयाने त्याला जणू स्वर्गाचेच दार उघडले. गिर्यारोहणाला एक मोठी दिशा, चालना मिळाली. या यशाच्या जोरावर मानवाने मग अशी आव्हानाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. नवनवे विक्रम घडवले, अध्याय रचले. गिर्यारोहकांच्या जगात या दिवसाला मोठे महत्त्व आहे, ते याचसाठी!

उंचीच्या आकडेवारीची गंमत!
सन १८५० सर्वोच्च शिखर म्हणून एव्हरेस्टचा शोध लागल्यावर त्याची त्या वेळी घेतलेली उंची ही २९००२ फूट होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’तर्फे हिमालयाच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतीय सव्‍‌र्हेअर बी. एल. गुलाटी यांनी एव्हरेस्ट उंची मोजत ती २९०२८ असल्याचे जाहीर केले. १९७५ मध्ये चीननेही या शिखराची उंची मोजत त्याच्या शिखरावर ट्रायपॉड (तिकांडे) बसवले. १९९२ मध्ये अमेरिकेच्या वतीने टॉड बस्लन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोहिमेत नव्या तंत्रज्ञानानुसार एव्हरेस्टची उंची पुन्हा एकदा मोजून ती २९०२८ फूट असल्याचे जाहीर करण्यात आले. १९९९ साली अमेरिकेच्याच आणखी एका मोहिमेने सॅटेलाईट तंत्रज्ञानाची मदत घेत एव्हरेस्टची उंची मोजली आणि ती २९०३५ फूट भरली. अचूक तंत्रज्ञानावर जाहीर करण्यात आलेला उंचीचा हा आकडाच सध्या सर्वत्र ग्राहय़ धरला जात आहे.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो