खाणे पिणे आणि खूप काही : चवीचा कॅलिडोस्कोप
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही >> खाणे पिणे आणि खूप काही : चवीचा कॅलिडोस्कोप
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे पिणे आणि खूप काही : चवीचा कॅलिडोस्कोप Bookmark and Share Print E-mail

altसई कोरान्ने , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पेप्सी कोला, बर्फाचा गोळा म्हटल्यावरच अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या असतील. प्लास्टिकच्या उभ्या पिशवीतला पेप्सी कोला आणि बर्फोचा गोळा खाल्ला नाही अशी प्रौढ मंडळी सापडणारच नाहीत, इतकी याची मोहिनी आहे. बालपणीच्या आठवणींना इंद्रधनुषी रंगाच्या आणि चवीच्या कॅलिडोस्कोपमधून फिरवून आणणाऱ्या या पेप्सी कोला आणि बर्फ गोळ्याविषयी... १९८० व त्याच्या जवळपासच्या उन्हाळ्यामध्ये तुमचे बालपण गेले असले तर खाऊच्या पशातले आणि वाढदिवसाला मिळालेले प्रत्येक चार आणे तुम्ही कदाचित ‘पेप्सी कोला’ (हे नाव कसे पडले याचा उलगडा अजून झालेला नाही) नावाच्या एका विलक्षण वस्तूवर घालवले असतीलच. मोठय़ा ब्रॅंडच्या हानीकारक कोला पेयांकडे माझे बोट नाही; मी बोलत आहे ते लांब, अरुंद प्लास्टिकच्या पिशवीत भरलेल्या बर्फाच्या अर्धवट सेट झालेल्या रंगीत गमतीबद्दल. या पिशवीचे टोक कुरतडून मेंदूचा बर्फ होईपर्यंत त्यातलं मिट्ट गोड, रंगीत, कृत्रिम चवीचं बर्फाचं पाणी चोखण्यात काय मजा वाटायची!
जगातल्या प्रत्येक पालकाचा या वस्तूला विरोध असेल; आणि पालकांचा विरोध असलेल्या प्रत्येक गोष्टीसारखीच, जगातल्या सगळ्या मुलांना पेप्सी कोलाची पट्टी हवीहवीशी असायची. आई-वडिलांपासून लपवून पेप्सी कोला खाण्यात एक वेगळं थ्रिल असायचं. शाळेतून येताना-जातानाचे बस आणि रिक्षाचे पसे वाचवून, मित्र-मत्रिणींशी ठरवून, (आपल्याला खूप महत्त्वाचे वाटणारे पण वाण्याला चीड आणणारे) निर्णय घेत, अखेर त्या दिवशीचा फ्लेवर निवडायचा. मग धावत जवळच्या बागेत किंवा तत्सम सावलीच्या ठिकाणी जाऊन  पेप्सी कोला सावकाश चोखत आनंद लुटायचा.. आयुष्य किती सरळ सोपं होतं!
आणि आपल्या प्रिय बर्फाच्या गोळ्याला आपण कसे विसरणार? निरनिराळ्या अवतारात हा बर्फाचा गोळा गेली कित्येक वर्षे देशभर िहडतो आहे. आपल्या देशातला उन्हाळा आणि बालपण हे गोळ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. शहरी मॉल संस्कृतीतदेखील, altहायजेनिक या नावाखाली का होईना, गोळा आलाच. शाळेबाहेरच्या गोळ्याच्या गाडीशी याची काहीच तुलना नाही. गाडीवरचा गोळा प्लास्टिकचे ग्लोव्हज घालून केलेला नसतो आणि त्यात मिनरल वॉटरही नसते आणि तरीही या ‘अस्वच्छ, धोकादायक’ गोळ्याची चव मॉलमधल्या गोळ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असते! कोपऱ्यावरच्या गोळ्यावाल्याच्या धूसर काचेच्या बाटल्यांमध्ये इंद्रधनुष्यातला प्रत्येक रंग असतो--पिवळा, केशरी, हिरवा, जांभळा, लाल, तुम्ही म्हणाल तो! धारदार किसणीवर घासून बर्फाचा बारीक कीस गोळावाल्याच्या हातात येऊ लागला की माझ्या तोंडाला पाणी सुटते. मग तो बर्फाचा गोळा धूसर पांढऱ्या काचेच्या ग्लासात भरला जातो. त्यावर खास चाट मसाला भुरभुरवून जेव्हा गोळेवाला रंगीबेरंगी बाटल्यांमधून विविध चवींची सरबते ओतू लागतो, तेव्हा माझ्या डोक्यात आंबट, गोड आणि किंचित मसालेदार चवींचा कॅलिडोस्कोप आकार घेऊ लागतो. त्या नंतर सुरू होते एक एन्डलेस सायकल -- बर्फ उरला असेल तर सरबत मागायचे आणि सरबत उरले असले तर आणखीन बर्फ मागायचा--या निरागस खेळातच कितीतरी वेळ जायचा !
लहानपणी गोळा आणि पेप्सी कोला हे दोन बर्फाचे गोड पदार्थ भरपूर खाल्ले (अजूनही खाते). जरा मोठं झाल्यावर मुंबईच्या एका जुन्या, कलोनिअल क्लबमध्ये  सॉर्बे     (Sorbet) खायचा प्रसंग आला. या  सॉर्बे प्रकारातला बर्फ गोळा पेप्सी कोलाहूनदेखील बारीक होता आणि चवी अगदी ताज्या फळांचा. कृत्रिम रंग आणि कृत्रिम चवींचा जराही मागमूस नाही. कुठे आमचे  लांबट प्लास्टिकमधले पेप्सी कोला आणि काडीवरचे गोळे. हा  सॉर्बे  आला तो लेसच्या doily वर क्रिस्टलच्या सुंदर ग्लासात. पुदिन्याचे एक ताजे पान त्यावर अलगद ठेवले होते! या ग्लॅमरस  सॉर्बेचा एक चमचा तोंडात घालताच विरघळतो. एखाद्या आकर्षक मुलाच्या प्रेमात पडणाऱ्या तरुण मुलीच्या मनासारखा. त्याची चव हळूहळू तोंडात अगदी शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पसरते.. एखादा सुंदर सुवास खोलीत पसरतो तसा. चार आण्याच्या पेप्सी कोलासारखाच आणि तरी किती वेगळा उच्च दर्जाचा आणि आई-वडिलांना पटेल असा!
जुन्या आठवणींचा खोलवर तळ शोधत असताना आणि प्रेग्नन्सीमध्ये चोरून काला खट्टा गोळे खाताना, माझ्या मनात एकदा प्रश्न पडला,  पेप्सी कोलाला जसा  सॉर्बे सापडला, तसा गोळ्याला कुणी पाश्चात्त्य मित्र सापडेल का? ग्रानिता नावाच्या एका इटालिअन पदार्थात मला माझे उत्तर सापडले. साखरेच्या पाकात फळांचा रस आणि पाणी घालून फ्रिज केलेला हा पदार्थ गोळ्यासारखाच असतो.  सॉर्बेचाच चुलत भाऊ पण  सॉर्बेपेक्षा जाडसर कण असलेला. उखीरवाखीर तोडलेल्या बर्फाप्रमाणे काही तुकडे मोठे आणि काही लहान असणारा हा परदेशी गोळा कडांकुडुम करत खाण्यात खूप मजा असते--मग एखादी दाढ तुटली तरी हरकत नाही! इटलीमध्ये ग्रानिताचे टेक्स्चर प्रत्येक क्षेत्रात बदलते--कुठे  सॉर्बेसारखे पटकन वितळणारे आणि कुठे अगदी जाडसर. मुळात समाजाची अथवा पालकांची अनुमती असलेला गोळा असू शकतो याचीच मला गंमत वाटते!
हापूस आंब्याचा सीझन असताना आंब्याचा  सॉर्बे करायचे ठरवले. ही रेसिपी सोपी आणि सुंदर आहे. रूक्ष उन्हाळ्यात पटकन होण्यासारखी--उकडत असताना स्वयंपाकघरात मोजून पाचच मिनटांत होते! बाकीचे काम तुम्ही एखादी डुलकी घेत असताना,  सुखद, थंडगार दिवसांची स्वप्ने पाहत असताना फ्रीझर करतो. तुम्ही ही रेसिपी करून पाहा (सोबतच्या चौकटीत) माझा आग्रहच आहे. लहानपणच्या जुन्या, धूळभरल्या आठवणींच्या रस्त्यावर ती तुम्हाला घेऊन जाईल!

altहापूस आंब्याचा सॉर्बे
साहित्य:

* १२५ ग्रॅम साखर
* २५० मिली लिटर पाणी
* २ + १ हापूस आंबे
* सजावटीसाठी पुदिन्याचे पान
कृती:
१. एखाद्या जाड बुडाच्या भांडय़ात साखर आणि पाणी घालून मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत ढवळावे. साखर विरघळल्याबरोबर खाली उतरवावे आणि गार होऊ द्यावे.
२. दोन हापूस आंब्यांची साले काढून त्यांचे मोठे तुकडे करावे. कोय टाकून द्यावी. आंब्याच्या फोडींचा मिक्सरमध्ये रस करून घ्यावा.
३. गार झालेल्या पाकात आंब्याचा रस मिसळावा.
४. किमान ४-६ तास फ्रीझरमध्ये ठेवावे. अर्धवट सेट झाल्यावर काटय़ाने खरवडावे. पुन्हा २-४ तास फ्रीझरमध्ये ठेवावे.
५. खाण्यास देताना पुन्हा काटय़ाने खरवडून, उरलेल्या आंब्याच्या फोडींबरोबर बाऊलमध्ये घालावे. वर पुदिन्याचे पान ठेवावे आणि लगेच खायला द्यावे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो