ब्लॉग माझा : स्टेसी
मुखपृष्ठ >> ब्लॉग माझा >> ब्लॉग माझा : स्टेसी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग माझा : स्टेसी Bookmark and Share Print E-mail

altआशय गुणे , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अंदाजे वीस वर्षांची ही मुलगी.. कमालीच्या आत्मविश्वासाने एकटी राहत होती.बऱ्याच वर्षांपासून बाबांना बघितले नव्हते.. आई अनेक मलांवर दूर राहत होती.. बुशने अमेरिकन सन्य इराकला पाठवले त्याला सात वर्षे झाली होती. सात वर्षांपासून तिला आपल्या बाबांना बघता आलं नव्हतं. ‘आपण आपल्या बाबांना परत कधी बघू का’ असा विचार तर तिच्या मनात येत नसेल ना.. जाऊ दे, मी तो विचार करणंच सोडून दिलं!..
अमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला किंवा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्याची कळी खुलते. मग ते तुमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. या जीवनपद्धतीत आपुलकीसुद्धा ‘लीगल’ आहे की नाही याचाच शोध घेणारी ही माणसं! त्यामुळे एकमेकांवर विश्वास कमीच. अशा ‘साच्यात’ दोन र्वष वावरताना मला ती भेटली. तिचे नाव स्टेसी.
आमच्या विद्यापीठाच्या शाखेत ती शिकत होती. तिचा विषय होता, जो माझा मास्टर्सचादेखील विषय होता. खर्चाचा प्रश्न सुटावा आणि अनुभव घ्यावा म्हणून मी शिकताशिकता विद्यापीठाच्या ‘बुक स्टोर’मध्ये काम करायचे ठरवले. याच ‘बुक स्टोर’मध्ये मला अनेक चांगले अनुभव तर आलेच, पण सामान्य अमेरिकन माणूसही जवळून बघायला मिळाला. इथेच माझी आणि स्टेसीची प्रथम भेट झाली. खांद्यापर्यंत सोडलेले सुंदर सोनेरी केस, गालांवर नसíगक गुलाबी रंग, बेताची उंची, मुलींना शोभेल एवढीच रुंदी व सदैव हसरा, पांढराशुभ्र चेहरा! कामाच्या पहिल्या दिवशी, मी माझ्या लॉकरमध्ये सामान ठेवत असताना ही माझ्या बाजूच्या लॉकरमध्ये तिचे सामान ठेवत होती. अमेरिकन रीत असल्यामुळे आणि शेजारी सुंदर मुलगी असल्यामुळे मी उद्गारलो . ‘‘शुभ प्रभात! कसं चाललंय?’’
‘‘एकदम मजेत.. आज माझा पहिला दिवस आहे,’’ ती म्हणाली. आमच्या बोलण्याने वेग पकडला. आलेली पुस्तकं तपासायची, त्यांच्या विषयाप्रमाणे एकत्र करायची व त्यांना शेल्फमध्ये लावायची हे आम्हा दोघांचे काम होते. त्यामुळे साहजिकच बोलणं होत असे.
‘‘तुला तुझ्या घरच्यांची आठवण येत नाही का रे? तुला इकडे कंटाळा येत असेल ना?’’ काम करताना एकदा अचानक तिने मला हा प्रश्न विचारला. मी अर्थात पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले. पण मला इकडे कंटाळा येत नाही, असं कळल्यावर तिने प्रचंड आश्चर्य व्यक्त केले! तिच्याशी बोलायला मजा वाटायची. याचे मुख्य कारण म्हणजे तिच्यातला साधेपणा.
दिवस भरभर चालले होते. बुक स्टोरची नोकरी संपली होती. परवडत नसल्यामुळे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना तात्पुरती सुट्टी दिली होती. त्यामुळे स्टेसीशी काहीच संपर्क नव्हता. एकदा रात्री असाच कपडे धुण्यासाठी घराबाहेर पडलो. (होय! अमेरिकेत जर तुम्ही भाडय़ाच्या घरात राहत असाल, तर सर्व भाडेकरूंसाठी एक लॉन्ड्री मशीन लॉंड्री मशीन असतं, तिथे नंबर लावून कपडे धुवायचे असतात. कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले, यंत्र सुरू केले आणि मागे वळलो. बघतो तर हातात कपडे घेऊन दारात स्टेसी उभी! ‘‘तू इथे कसा? तू इकडेच राहतोस का?’’ तिने मला विचारले. ‘‘एनीवेज, आपण बुकस्टोर सोडल्यावर भेटणं कठीण होतं. त्यांनी आपल्याला जास्त तास दिले नाहीत कामाला. डॉलर्स पण कमी देत होते. म्हणून मी बाहेर नोकरी करते. तू कुठे काम करतोस?’’
संभाषणाच्या गाडीचे रूळ ‘पगार’ या स्थानकावर जेव्हा येतात, तेव्हापासून ती गाडी पुढे भयंकर वेगाने आणि उत्साहाने पळू लागते!  ‘‘मी अमेरिकेत राहत नाही, त्यामुळे मला बाहेर काम करायला परवानगी नाही,’’ मी उत्तरलो. बाहेर याचा अर्थ विद्यापीठाच्या हद्दीच्या बाहेर.
‘‘काय सांगतोस!  तू खर्च कसा भागवतोस?’’ तिने आश्चर्याने विचारले. मी नोकरी शोधत असल्यामुळे पुढे काही बोललो नाही.
त्यानंतर स्टेसी अधूनमधून भेटू लागली. आमच्या बाजूला बसायला छोटीशी जागा होती. ती मला बऱ्याच वेळेला तिकडे फोनवर बोलताना दिसायची. मला बघून हात करायची किंवा कधी कधी येऊन बोलायची. इकडचे तिकडचे प्रश्न विचारायची. नोकरी मिळाली की नाही, याची चौकशी करायची. अधूनमधून भारताबद्दलदेखील विचारायची. मी पण थोडीफार उत्तरं देऊन निघून यायचो. दरम्यान, मी एका मोटेलमध्ये रात्रपाळी करू लागलो होतो. ‘तसल्या’ नोकऱ्या करायला आम्हाला परवानगी नव्हती आणि म्हणून मी कुणा अमेरिकन माणसाला त्याची दाद लागू देत नव्हतो आणि म्हणून मी नोकरी करतोय याची स्टेसीलादेखील कल्पना नव्हती.
एकदा नाताळच्या आदल्या दिवशी स्टेसी दिसली. संध्याकाळची वेळ होती. त्यांनतर मला मोटेलवर जायचे होते. स्टेसीला नाताळच्या शुभेच्छा दिल्या व तिनेदेखील त्या मला हसत हसत परत दिल्या. ‘‘मग, काय करणार नाताळच्या निमित्ताने?’’ मी एक सहज प्रश्न केला. स्टेसीचा चेहरा पडला. ती मला सांगू लागली. ‘‘मी ख्रिसमस असून घरी जाऊ शकत नाही.. मागच्या वर्षी पण नाही जाऊ शकले. डॉलर्सचा प्रॉब्लेम आहे रे.. खर्च इतके वाढले आहेत.. मी काम करते तिकडे जास्त डॉलर्स पण मिळत नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येते. माझे बाबा इराकला आहेत.. युद्ध आहे ना!’’
‘‘म्हणजे, तू कुठे राहतेस?’’ मला अपेक्षित होतं की ती माझ्याच शहरात राहत असेल आणि रोज कॉलेजला यायचं तसं येत असेल. ‘‘मी व्हर्जििनयाहून आले आहे. मी इकडे नाही राहत. आम्हाला टेक्सास स्वस्त पडतं रे. म्हणून मी मागच्या जुलमध्ये इकडे शिकायला आले. तेव्हा मला नोकरी नव्हती. सारे डॉलर्स आई पाठवायची. पण नंतर ते महाग जायला लागले. घरचे भाडे, सगळ्याचे इन्शुरन्स, वेगवेगळे कर भरणे यात मला डॉलर्स पाठवणं कठीण होऊ लागलं. म्हणून मी इकडे नोकरी पत्करली. पण तुला माहिती आहे ना, आपल्याला बुक स्टोरमध्ये किती पगार मिळायचा.. ते नुसतं काम करून घ्यायचे. म्हणून मी नोकरी बदलली. पण परिस्थिती तशीच आहे.. काही उरत नाही. मागच्या वर्षी मी काही ‘गिफ्ट’ पाठवू शकले नाही माझ्या आईला.. या वर्षीदेखील डॉलर्स नाही. मला बाबांना इराकला पण ‘गिफ्ट’ पाठवायचे आहे.. पण काय करू.. आय मिस माय फादर सो मच!’’
स्टेसी हे सगळं शांतपणाने सांगत होती. डोळ्यात पाण्याचा एक थेंब नाही. उगीच हातवारे नाहीत. आवाज चढवलेला नव्हता किंवा उगीच भावनात्मक दबलेला नव्हता. तिच्या वागण्यात खूप परिपक्वता दिसत होती. परिस्थिती ही अशी आहे आणि  त्याचप्रमाणे आपण जगायचे आहे, याची तयारी होती. मी भारताहून जरी आलो असलो, तरी तिची परिस्थिती बऱ्यापकी माझ्यासारखीच होती.. आईवडिलांपासून लांब, परिवारापासून लांब.
‘‘मग तू व्हर्जिनियाला कधी जाणार?’’ मी विचारलं.
‘‘माहिती नाही रे. माझ्याकडे डॉलर्स जेव्हा येतील, साठतील तेव्हा ठरवेन. आजच मी माझ्या आजोबांशी बोलत होते. त्यांना पण माझी खूप आठवण येते. पण बिचारे इकडे येऊ शकत नाहीत. त्यांना जे पेन्शन मिळते त्यात त्यांना इकडे यायचा विमान प्रवास परवडत नाही. यू नो? मी त्यांची लाडकी नात आहे. मी बाळ होते तेव्हा माझे आजीआजोबा चार महिने राहिले होते आमच्याकडे. तेव्हापासून त्यांचा माझ्यावर जीव आहे.’’
हे सगळे मला नवीन होते. आम्हाला भारतात अमेरिकेबद्दल काय सांगितले जाते? इथे तर भारताप्रमाणे आजीआजोबांचा नातवंडांवर जीव आहे. देश कुठलाही असो.. सामान्य माणसं सारखीच की!
त्याच वर्षी मी भारतात जाऊन आलो होतो याचे तिला फार कौतुक होते. त्या दिवशी तिने मला विचारले. ‘‘तू भारतात जाऊन आलास.. कमाल आहे तुझी.. एवढा खर्च कसा काय मॅनेज केलास?’’ तिच्या या प्रश्नाने मात्र मला थोडे खजिल झाल्यासारखे झाले. मी तिकिटाचे अध्रे पसे घरून मागवले होते याची तिला दाद नाही लागू दिली मी!
‘‘कुठे राहतात तुझे आजीआजोबा?’’ मी विचारले, ‘‘व्हर्जििनयालाच का?’’
‘‘नाही रे. ते तर कॉलोरेडोला असतात. ते मला नेहमी म्हणतात, फोनवर बोलण्यात फक्त कृत्रिम मजा येते. तुला समोरासमोर बघावेसे वाटते. त्यात खरा आनंद आहे. आता आठ र्वष झाली, मी त्यांना बघितले नाही. जे काही बोलणं होतं ते फोनवरूनच!’’
मी तिची अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या किंचित अंधूक वातावरणात तिचे कानातले चमकले आणि ती अधिक सुंदर दिसली! मग ती स्वत:च्या बाबांबद्दल सांगू लागली.
‘‘इराकचे युद्ध सुरू झाल्यापासून माझे बाबा तिकडेच आहेत. महिन्यातून एकदा फोन करतात. मागच्या वर्षी त्यांनी मला एक ‘फर’चा कुत्रा पाठवला होता. मी तो माझ्याबरोबर इकडे घेऊन आले आहे. पण मला माझे बाबा हवे आहेत. काही वर्षांनी माझे लग्न होईल.. तेव्हा मला ते इकडे हवे आहेत. लोक का युद्ध करतात रे?’’
‘सेपरेट फॅमिलीज!’ तिचा मुद्दा हा आम्हा सर्वाचाच मुद्दा आहे की! राजकारण्यांच्या स्वार्थापायी जगाचे नकाशे बदलत आले आहेत, बदलत चालले आहेत आणि अजून किती दिवस बदलतील काही कल्पना नाही. पण तिच्या जिद्दीबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर उत्पन्न झाला.
अंदाजे वीस वर्षांची ही मुलगी.. कमालीच्या आत्मविश्वासाने एकटी राहत होती. आठ वर्षांपासून आजीआजोबांना बघितले नव्हते.. बऱ्याच वर्षांपासून बाबांना बघितले नव्हते.. आई अनेक मलांवर दूर राहत होती.. बुशने अमेरिकन सन्य इराकला पाठवले त्याला सात र्वष झाली होती. सात वर्षांपासून तिला आपल्या बाबांना बघता आलं नव्हतं. ‘आपण आपल्या बाबांना परत कधी बघू का’ असा विचार तर तिच्या मनात येत नसेल ना.. जाऊ दे, मी तो विचार करणंच सोडून दिलंय!..
त्यानंतर स्टेसी अधूनमधून भेटायची.. कधी लायब्ररीत, तर कधी खायच्या ठिकाणी. थोडं बोलणं व्हायचं. मी भारतात कधी जाणार याची मात्र ती आवर्जून चौकशी करायची. मी अमेरिका सोडताना तिला भेटायची इच्छा होती, पण बऱ्याच दिवसांपासून ती दिसली नाही. कदाचित ती व्हर्जििनयाला जाऊ शकली असेल या आनंदात मी भारतात परत आलो.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो