अनघड अवघड : कोलाहल...
मुखपृष्ठ >> अनघड.. अवघड >> अनघड अवघड : कोलाहल...
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनघड अवघड : कोलाहल... Bookmark and Share Print E-mail

altआई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांच्या जगातल्या मानसिक गुंतागुंतीची, आतल्या प्रचंड कोलाहलाची पालक म्हणून आपल्याला जाणीव हवी. ही जाणीव असण्यानेच खटकणाऱ्या गोष्टी जास्त कठोरपणे सांगणं टाळलं जाऊ शकतं, एकमेकांना बोचकारलं जाणं कमी होऊ शकतं. नाही तर शाब्दिक लढाया सुरू झाल्या की दोन पिढय़ांमध्ये दरी उभी राहायला वेळ लागत नाही. हे टाळायचं असेल तर मुलांचा आत्मसन्मान जपायला हवा. पौगंडावस्था हा मुलांच्या वाढीचा अतिशय संवेदनशील टप्पा. या काळात शरीरात बऱ्याच काही घडामोडी होत असतात. मनात, विचार करण्याच्या पद्धतीत खूप उलथापालथ होत असते. मुलांचं बाह्य़ स्वरूप झपाटय़ाने बदलत राहतं. दिसणं, वागणं, आवडीनिवडी, मित्र-मैत्रिणी सगळ्याच आघाडय़ांवर सारखेच बदल होत असतात. बऱ्याचदा या बदलांचा झपाटा इतका असतो की, मुलांचे आई-बाबा आणि त्यांच्या सहवासातली वयस्कर मंडळी या सगळ्याला तोंड देता देता पार हैराण होतात. त्यात मग छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून मुलांच्या स्वभावातला वाढता आक्रमकपणा, बंडखोरीची चुणूक दिसू लागते आणि बऱ्याच घरांमधून वातावरण गढूळ व्हायला सरुवात होते. मुलं वाढतानाचा सर्वात कसोटी पाहणारा हा काळ असतो, असं बहुतेक सगळ्या पालकवर्गाला वाटत राहतं. गंमत म्हणजे मुलांना स्वत:लाही हा काळ अवघड जात असतो. मुलं स्वत:ही अनेक आघाडय़ांवर ताण-तणावाशी सामना करीत असतात.
निसर्गनियमानुसार एखादी प्रजाती (स्पिशी) टिकून राहायची असेल, तर त्या प्रजातीचे नवीन जीव जन्माला येणं आवश्यक असतं. त्यासाठी समागमाची क्रियाही अपरिहार्य. या क्रियेशी सुखावह संवेदना जोडून निसर्गाने वंशसातत्यामागची प्रेरणा आणखीनच बळकट करून ठेवली आहे. माणूस वगळता सगळे सजीव नवा जीव जन्माला घालायला तयार झाले (ज्याला आपण वयात येणं म्हणतो) की त्यांच्या आयुष्याचा लैंगिक अध्याय सुरू होतो. ते स्वतंत्र होतात. ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी मग आवश्यक ते झगडणं, स्वत:चं अस्तित्व टिकवून धरणं आलंच. त्यासाठी अंगात आक्रमकपणा, बंडखोरी असणंही कमी-अधिक प्रमाणात गरजेचंच..! या सगळ्यासाठी या वयात प्रचंड ऊर्जा लागते. निसर्गाने वयात येताना प्रत्येक प्रजातीला ती बहाल केलेलीच आहे. अशी ऊर्जा ही या वयाची खासियत बनून जाते. ही ऊर्जा प्रचंडच- कधीही ऊतू जाण्याच्या स्थितीतली- मुलांच्या आत प्रचंड कोलाहल निर्माण करणारी. तिला योग्य प्रकारे मार्ग दाखवता नाही आला तर ती अक्राळविक्राळ स्वरूपात भलतीकडेच बाहेर पडू शकते. पण नेमका रस्ता सापडला तर त्यातून खूप काही सकारात्मकही घडू शकतं. म्हणूनच ध्येयासाठी झपाटलेलं असणं, त्यासाठी प्रचंड मेहनत करणं, हे सगळं याच वयात होऊ शकतं.
माणसाच्या बाबतीत मात्र या वयात खूप गुंतागुंत झाली आहे. शारीरिक पातळीवर मनुष्य प्राणी जेव्हा नवीन जीव जन्माला घालायला तयार होतो, त्या वयात तो सामाजिकदृष्टय़ा अजून स्वतंत्र झालेला नसतो. त्याला प्रत्यक्ष समागमाची संधी मिळेपर्यंत बराच काळ मध्ये जाऊ शकतो. हा काळ त्याच्यासाठी सहसा खूप आतल्या झगडय़ाचा असतो. गेली काही हजार वर्षे माणसाची संस्कृती, मूल्यव्यवस्था ज्या प्रकारे घडत आली आहे, त्याचा हा एक पैलू आहे. तो चुकीचा आहे, असं मात्र अजिबातच नाही. त्यातून अनेक फायदेही माणसाच्या पदरी पडले आहेत. संस्कृती, सामाजिक नेमनियम यांच्यामुळे माणसाची स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी खूपच कमी झाली, शांतता मिळाली, त्यामुळे स्वाभाविकच कलाशाखांचा, शास्त्रशाखांचा उदय आणि विस्तार होऊ शकला, माणसाचं जगणं अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजांच्या पलीकडेही विस्तारलं गेलं.
वयात येणं आणि सामाजिकदृष्टय़ा स्वतंत्र होणं, या दरम्यानच्या काळातल्या गुंतागुंतीचं मग नेमकं काय करायचं? स्वत:बद्दलचं काहीसं भान आलेली अध्र्याकच्च्या वयाची मुलं, ही आईबाबांसाठी कायमच तारेवरची कसरत राहिली आहे. मुलांना स्वत:विषयी काय वाटतं, स्वत:च्या नजरेत त्यांची प्रतिमा कशी आहे, यातून मुलांचा आत्मसन्मान (सेल्फ-एस्टीम) ठरत असतो. त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची आणि सेक्स्युअली अ‍ॅक्टिव्ह होण्याची सगळी गुंतागुंत या स्वत्वाशीच असेल, तर मग त्यावरच आपण लक्ष केंद्रित केलं तर? आपल्या मुलांचा आत्मसन्मान खणखणीत असेल, तर क्षणिक मोह, अवास्तव पीअर प्रेशर्स या गोष्टींना मुलं चांगल्यापैकी तोंड देऊ शकतात, हे गेल्या काही वर्षांमध्ये ठसठशीतपणे पुढे आलं आहे.
टीन एजर्स आणि त्यांची लैंगिक वर्तणूक यांच्या संदर्भातल्या संशोधनाने तर हे खासच अधोरेखित केलं आहे. आज पाश्चिमात्य जगात टीएन एजमध्येच मुलांचे लैंगिक संबंध सुरू होणं आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या टीन एज प्रेग्नन्सीज, अल्पवयीन माता, एड्स या समस्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर खूपच प्रमाणात काम होतं आहे. अशा मुलांचा आत्मसन्मान बराच दुबळा असतो, हे पुन:पुन्हा समोर येतं आहे. अशी मुलं स्वत:लाच खूप कमी लेखत असतात. त्यामुळे आपल्याला इतरांनी आदराने वागवावं अशी त्यांची मुळातच अपेक्षा नसते. स्वाभाविकच एखाद्या नातेसंबंधात त्यांना वापरलं जाणंही त्यांना खटकत नाही. आतापुरतं छान वाटणं, एवढय़ावर त्यांची कुणाशीही मैत्री होऊ शकते. बऱ्याचदा या नकारात्मक भूमिकेमुळे आयुष्यात काहीतरी ध्येय असणं, त्या दिशेने प्रयत्न करणं हेही त्यांच्याकडून होणं फारच कठीण.
आपल्याकडे अशा समस्यांचं प्रमाण तुलनेने कमी आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. विशेषत: मुलांनी चुकीच्या, त्रासदायक नातेसंबंधात अडकण्याचे अनेक प्रसंग पाहायला मिळतात. अशा वेळी कुणाला तरी आपण आवडतो आहोत, एवढय़ाने तेवढय़ापुरतं मस्त वाटणं- मग ती व्यक्ती कशी का असे ना- अशा पायावर हे नातेसंबंध उभे असतात.
अशा मुलांचा आत्मसन्मान बऱ्याचदा डळमळीत झालेला असतो.
मुळात हा आत्मसन्मान कसा ठरतो? अक्षरश: अनेक घटक आत्मसन्मान घडवण्यात हातभार लावत असतात. घरातलं वातावरण, कुटुंबीयांकडून मिळणारी प्रेमाची- आदराची वागणूक, कुटुंबाचा आर्थिक, सामाजिक स्तर, मुलांचं रूपरंग, शाळा-कॉलेजमधली अभ्यासातली प्रगती, मुलांचं मित्रमैत्रिणींचं वर्तुळ- या सगळ्या बाबी आत्मसन्मानाचा पाया रचण्यात हातभार लावत असतात. पण आत्मसन्मान हे बरंच नाजूक, गुंतागुंतीचं प्रकरण असतं. यातले अनेक घटक विरोधात असूनही केवळ एखाद्या बाबीमुळे एखाद्याचा आत्मसन्मान चांगला असू शकतो आणि अनेक गोष्टींच्या बाबतीत दान चांगलं पडूनही अगदी एखाद्याच गोष्टीमुळे त्याची पार रया जाऊ शकते.
आत्मसन्मानाचा पाया मुलांच्या अगदी लहानपणापासून रचला जात असतो. मुलांच्यातल्या चांगल्या गुणांची किंवा कृतीची प्रशंसा होते तेव्हा माझ्यात काहीतरी चांगलं आहे, माझ्या काही गोष्टी इतरांना आवडतात, ही भावना मुलांना फार सुखावणारी असते. बऱ्याच घरांमधून, ‘चांगल्या गोष्टींचं काय कौतुक करायचं, त्याने मुलं शेफारून जातात’, असा समज असतो. त्यामुळे बऱ्याचदा अशा गोष्टींबद्दल बोलणं टाळलं जातं आणि नेमक्या खटकणाऱ्या गोष्टी तेवढय़ा बोलल्या जातात. परिणामत: मुलांना काय वाटतं? घरच्यांना माझं काहीच आवडत नाही, ही गोष्ट आत्मसन्मानाच्या दृष्टीने फार घातक असते. पण म्हणजे ऊठसूट मुलांचं कौतुक करावं असंही नाही. त्यांची आवडलेली गोष्ट मोजक्या शब्दात त्यांना सांगणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, ‘‘मला तुझी काल खूप मदत झाली, त्याने बरं वाटलं’’ किंवा ‘‘तू काढलेलं हे चित्र छान आहे.’’ यात सरसकटीकरणही नको आणि त्याला जोडून येणारं अपेक्षांचं ओझंही नको. ‘‘काल तुझी खूप मदत झाली, नेहमी नेहमी करशील तर किती बरं वाटेल मला!’’ ही काही निर्भेळ प्रशंसा नाही. मुलांनाही हे कळतं.
टीन एजमध्ये मुलांच्या खटकणाऱ्या गोष्टींची यादी अगदीच मोठी असते. त्यामुळे त्या काळात कौतुकाच्या शब्दांचे प्रसंगच कमी येतात, असा अनेक आई-बाबांचा अनुभव असतो. पण तरीही त्या वयात असे प्रसंग शोधत राहावे लागतात. त्यांच्याबद्दल आवर्जून बोलावं लागतं. आत्मसन्मानाची इमारत उभी राहण्यात अशा
प्रसंगांचा मोलाचा वाटा असतो. म्हणून मुलांच्या जगातल्या या गुंतागुंतीची, आतल्या प्रचंड कोलाहलाची पालक म्हणून आपल्याला जाणीव हवी. ही जाणीव असण्यानेच खटकणाऱ्या गोष्टी जास्त कठोरपणे सांगणं टाळलं जाऊ शकतं, एकमेकांना बोचकारलं जाणं कमी होऊ शकतं. नाही तर शाब्दिक लढाया सुरू झाल्या की दोन पिढय़ांमध्ये दरी उभी राहायला वेळ लागत नाही. हे टाळायचं असेल तर मुलांचा आत्मसन्मान जपायला हवा.
आतल्या आत माजलेल्या प्रचंड कोलाहलातून शांततेचा एक रस्ता असाही निघू शकतो.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो