लालकिल्ला : ‘ऑल इज वेल’
मुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : ‘ऑल इज वेल’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लालकिल्ला : ‘ऑल इज वेल’ Bookmark and Share Print E-mail

सुनील चावके - सोमवार, ४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भलत्यांचे महत्त्व वाढले की, काय सलते आहे हे कळेनासेच होते. महाराष्ट्राबद्दल काँग्रेसचे हेच झाले आहे नि होत आहे..
सारे काही आलबेल आहे, असे सारे काही आलबेल आहे, असे महाराष्ट्राच्या बाबतीत अखिल भारतीय काँग्रेसचे कर्ते पुरुष राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून होत असलेल्या प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा आलेख सातत्याने घसरत आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या आडमुठय़ा आर्थिक धोरणांमुळे हवालदिल झालेले सेन्सेक्स आणि निफ्टी अधूनमधून उसळी मारत असतात, पण महाराष्ट्रात काँग्रेस वर्षभरात एकदाही उसळी मारू शकलेला नाही.
भारतातून पळ काढू पाहणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांप्रमाणे महाराष्ट्रातील काँग्रेसजनांची अवस्था सैरभैर होत चालली आहे. नीचांक गाठणारा आर्थिक विकासदर, पत गमावणारा रुपया आणि वधारणाऱ्या कच्च्या तेलाप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी यांचा कारभार काँग्रेसजनांच्या मनात रोज काहूर माजवत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर नजर ठेवून असलेले दिल्लीतील तटस्थ निरीक्षक आणि महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचणारे अस्वस्थ काँग्रेसजन राहुल गांधी, सोनिया गांधी, अहमद पटेल, मोहन प्रकाश यांना पक्षाचा बुरूज ढासळत चालल्याचे  निदर्शनास आणून देण्याचे कर्तव्य बजावत आहेत. तरीही सोनिया गांधी नेहमीप्रमाणे मूक दर्शक बनल्या आहेत. अहमद पटेल पचेल तेवढेच ऐकून सोडून देतात आणि मोहन प्रकाश यांच्या डोक्यात प्रकाश पडेल एवढी आपली बौद्धिक झेप नसल्याची जाणीव त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर काँग्रेसजनांना होते. त्यामुळे काँग्रेसजनांसाठी एकमेव ‘आशा’ उरते ती म्हणजे राहुल गांधी. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या रुळावरून घसरलेल्या गाडीला ‘खेचण्याची’ क्षमता असलेल्या महाराष्ट्राच्या इंजिनात बिघाड झाला आहे, हे मानण्यास राहुल गांधीही तयार नाहीत. महाराष्ट्रात काळजी वाटावी असे राजकीय पेच किंवा तणाव आहेत तरी कुठे? एक तरी उदाहरण द्या, असे प्रतिसवाल यूपीए-२च्या तिसऱ्या वर्धापनदिनी ते पत्रकारांनाच करीत होते! छोटेमोठे पेचप्रसंग तर प्रत्येकच राज्यात उद्भवत असतात, असा स्वत:लाच दिलासा देत ते ‘ऑल इज वेल’च्या आविर्भावात चेहऱ्यावर हास्य फुलवत होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त माहोल बनवून काँग्रेसपेक्षा स्वत:ची अधिक फजिती करून घेणाऱ्या राहुल गांधी यांनी आता लोकसभेतील संख्याबळात दुसऱ्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या महाराष्ट्राकडे ‘मोर्चा’ वळविला आहे. काँग्रेस संघटना मजबूत करण्याच्या बाबतीत राहुल गांधी उत्तर प्रदेशचा किमान महाराष्ट्रही करू शकले नाहीत, पण त्यांचे लक्ष वळण्यापूर्वीच महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होईल, अशी पूर्वतयारी राज्यातील त्यांच्या विश्वस्तांनी करून ठेवली आहे. काय करावे आणि काय करू नये हा तमाम राजकीय पक्षांप्रमाणे काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे. शिवाय राहुल गांधी यांचा तो ‘वडिलोपार्जित’ पक्ष आहे. सत्तेतून गेल्यावर काँग्रेसमध्ये भाजपसारख्या लाथाळ्या सुरू झाल्या तर त्याचे कुणाला सोयरसुतक नसेल, पण सध्या हा पक्ष राज्यात सत्तेत असल्यामुळे आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेचे प्रतिकूल पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटत असल्यामुळे सत्तेत असेपर्यंत सर्वसामान्यांप्रति किमान जबाबदाऱ्या काँग्रेसला पार पाडाव्याच लागणार आहेत. त्यातच राज्यात काहीच नीट चाललेले नाही, असा समज आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जनमानसात दृढ करीत आहे.    
राज्यात वर्षभरापूर्वीपर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसचा पंचायत समित्या, जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वत्र पाडाव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस बघता बघता बलवान झाला, याची राहुल गांधींना जाणीवच नसावी. कारण हे सर्व घडत असताना ते उत्तर प्रदेशात दलितांच्या घरी जेवण्यात आणि कुर्त्यांच्या बाह्य़ा सरसावून उत्तर प्रदेशातील प्रस्थापितांना आव्हान देण्यात गुंतले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि अन्य पक्षांना हाताशी धरून आपला पुरता सफाया केला, ही वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणण्याचे धाडस अहमद पटेल, मोहन प्रकाश किंवा माणिकराव आदींना झाले नसावे. विदर्भाला सातत्याने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन पक्षाचे काय भले झाले, असा प्रश्न त्यांना पडेल तेव्हा काँग्रेसची अवस्था विदर्भातील दुष्काळग्रस्त भागासारखी झालेली असेल आणि तेथील काँग्रेसजनांवर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुकरण करण्याची वेळ येईल. आज काँग्रेसने विदर्भाला प्रदेशाध्यक्षपद आणि विदर्भाचे नेतृत्व करणाऱ्या नागपूरला कारण नसताना झुकते माप दिले आहे. एकटय़ा नागपूर जिल्ह्य़ाचा विचार केला तर विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, दत्ता मेघे, विजय दर्डा आणि अविनाश पांडे असे पाच खासदार, अ. भा. काँग्रेसमध्ये मुत्तेमवारांना राष्ट्रीय सरचिटणीसपद, अनीस अहमद आणि अविनाश पांडे यांना राष्ट्रीय सचिवपद, वासनिक यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद अशी सरबराई केली आहे, पण एवढे सारे करूनही आज विदर्भात काँग्रेसचा सफाया करण्यात राष्ट्रवादीची रणनीती यशस्वी ठरली आहे. विकासाच्या बाबतीत विरोधात असूनही एकटे नितीन गडकरी काँग्रेसच्या वैदर्भीय नेत्यांना पुरून उरले आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांमधील भ्रष्टाचार विदर्भाच्या मुळावर आला असला तरी काँग्रेसने ताकद दिलेले विदर्भातील नेते मूग गिळून गप्प आहेत आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काढलेला सिंचनातील भ्रष्टाचार हळूहळू थट्टेचा विषय बनत चालला आहे. विदर्भात काँग्रेसपाशी एकही महापालिका उरलेली नाही. चंद्रपूर आणि वर्धा या जिल्हा परिषदांपुरतीच काँग्रेसची ताकद उरली. विधान परिषद निवडणुकीत अमरावती व चंद्रपुरात काँग्रेस  उमेदवारांचा राष्ट्रवादीच्या सौजन्याने पराभव झाला. हे घडणार याची पूर्वकल्पना असूनही माणिकराव आणि मोहन प्रकाश यांनी अत्यवस्थ रुग्णाला आयसीयूमध्ये नेण्याऐवजी तो दगावल्यानंतर पोस्टमार्टम करण्यालाच प्राधान्य दिले, अशा तक्रारी काँग्रेसश्रेष्ठींकडे वारंवार पोहोचत आहेत.
वैदर्भीय नेत्यांची कामगिरी न बघता त्यांचे अनाठायी लाड करणाऱ्या काँग्रेसश्रेष्ठींनी सर्वोच्च अशा काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये डायलिसिसवर असलेले शिवाजीराव देशमुख आणि मुकुल वासनिक असे दोनच ‘नामधारी’ प्रतिनिधी नियुक्त करून महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याविषयी आपण किती गंभीर आहोत, हे दाखवून दिले आहे. वासनिक आणि देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे खरेखुरे प्रतिनिधी आहेत काय, असाही प्रश्न अनेकांना पडतो.
आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यभर काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ पद्धतशीरपणे घटवून राष्ट्रवादी काँग्रेसने २७ सदस्यांसह अव्वल क्रमांक गाठला आहे. प्रत्यक्ष निवडणुकींतील पराभवांमुळे काँग्रेसपाशी आधीच कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या पदांच्या संधी घटत चालल्या आहेत आणि महामंडळांवरील नियुक्त्या, मंत्रिमंडळाचा विस्तार, मुंबईच्या आणि प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचे महत्त्वाचे निर्णयही थंड बस्त्यातच पडले आहेत.
एवढे करूनही राहुल गांधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कामगिरीवर ‘प्रसन्न’ आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला दिसतो. मूळचे राजस्थानी ब्राह्मण आणि अलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थी नेते म्हणून सक्रिय असलेल्या मोहन प्रकाश यांच्यावर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा पगडा आहे. दोन दशके ते जनता दलाचे नेते शरद यादव यांचे अनुयायी होते. नव्वदीच्या दशकात मंडल-कमंडलच्या रस्सीखेचीतही ते जनता दलात टिकून होते, पण समाजवाद्यांच्या ओबीसीधार्जिण्या राजकारणात आपले काही भले होणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे ते काँग्रेसकडे सरकले, काँग्रेसविरोधी डीएनए कायम ठेवूनच. मोहन प्रकाश आज काँग्रेसच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरलेल्या महाराष्ट्र, गुजरात व जम्मू आणि काश्मीर या तीन राज्यांचे प्रभारी आहेत. (उत्तर प्रदेशात ‘पाहुणा’ बनून त्यांनी बजावलेली कामगिरी राहुल गांधी यांच्या लक्षात आली नसावी, असे गृहीत धरायला हरकत नाही.) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष बनून अनेक ओबीसी उमेदवारांना तिकिटे देत मोहन प्रकाश यांनी समाजवादी विचारांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. सदोष तिकीटवाटप अंगलट आल्याची कबुली नंतर राहुल गांधींनीही दिली, पण प्रकाश यांचे महत्त्व वाढतच गेले. काँग्रेसमध्ये  पोहोचलेले शंभू श्रीवास्तव, चंद्रजीत यादव, बेनीप्रसाद वर्मा, श्रीकांत जेना, भक्तचरण दास, सुबोधकांत सहाय या समाजवादी मंडळींना यापूर्वी संमिश्र यश मिळाले असले तरी त्यांच्या तुलनेत प्रकाश यांची प्रगती वेगवान ठरली. प्रकाश यांनी काँग्रेसमध्ये समाजवादी विचारपद्धती रेटण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रभारी होताच समाजवादी विचारसरणीचे हुसेन दलवाई यांना राज्यसभेचे बक्षीस मिळवून दिले. दलवाईंमुळे राज्यात काँग्रेसचे काय भले झाले याचे कोडे त्यांच्याच समाजाला सुटलेले नाही. काँग्रेसश्रेष्ठी मोहन प्रकाश यांचे ऐकणार असतील तर हुसैन दलवाईच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष होतील.
मोहन प्रकाश यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले अस्तित्व टिकवून महत्त्वाची पदे मिळविण्याची किमया साधली आहे. काँग्रेस पक्षातील समाजवादाचा पगडा असलेले ब्राह्मण नेते जनार्दन द्विवेदी यांना शह देण्यासाठी अहमदभाई पटेलांनी प्रकाश यांचा प्रभावीपणे वापर केल्याची चर्चा होत असते. सतत कुरघोडीच्या प्रयत्नात गुंतलेल्या द्विवेदींना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देताना पटेल यांनी त्यांच्या दृष्टीने संवेदनशील ठरणाऱ्या राज्यांत प्रकाश यांना संधी दिली आहे. शून्य जनाधार, मर्यादित राजकीय महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत नुकसान पोहोचविण्याचा नसलेला धोका व पटेल सांगतील ते काम करण्याची तयारी यामुळे महाराष्ट्रात गाळात जाणाऱ्या काँग्रेसच्या विपरीत प्रकाश यांचा आलेख वाढत चालला आहे. प्रदेशाध्यक्ष कधीही बदलला जाणार, अशी बोलवा असताना  माणिकराव ठाकरेयेणाऱ्या प्रत्येक बोनस दिवसाचे सोने करण्यात व्यग्र आहेत. काँग्रेसच्या सहा महिन्यांतील कामगिरीवरून ते स्पष्ट होते.
गेल्या दीड वर्षांपासून राज्याची सूत्रे हाती असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे नरसिंह राव ठरतील की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. नरसिंह राव धूर्त, चाणाक्ष, तल्लख बुद्धिमत्तेचे धनी होते. पण समजून उमजूनही ते अनेक महत्त्वाच्या घडामोडींकडे दुर्लक्ष करीत होते. एनडी तिवारी, अर्जुन सिंह, जी. के. मूपनार, माधवराव शिंदे यांच्याशी वैर घेऊन त्यांनी काँग्रेस पक्ष बुडवायला काढला. चव्हाणही विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम यांच्याशी अशाच पद्धतीने वागत असल्याची टीका होत आहे. मुख्यमंत्र्यांकडे कामासाठी चकरा मारून थकलेल्या काँग्रेसच्या आमदारांची कामे अजित पवारांकडे चुटकीसरशी होत असल्याचेही म्हटले जात आहे. दुसरीकडे शरद पवार त्यांच्या वैगुण्यांवर बोट ठेवण्याची एकही संधी सोडत नाहीत. सत्ताधारी आघाडीतच शीतयुद्ध पेटल्यामुळे भाजप, शिवसेना आणि मनसे या विरोधकांची चांदीच आहे. पण तरीही राहुल गांधी यांना हा सुप्त प्रवाह नजरेत पडत नसल्यामुळे ‘भय्या, ऑल इज वेल’ असे म्हणण्यातच ते दंग आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो