पसाय-धन : गात जा गा, गात जा गा..
मुखपृष्ठ >> पसायधन >> पसाय-धन : गात जा गा, गात जा गा..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पसाय-धन : गात जा गा, गात जा गा.. Bookmark and Share Print E-mail

अभय टिळक, शुक्रवार, ८ जून  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्वतचे पापक्षालन, स्वतसाठी मोक्षमुक्ती, स्वर्गप्राप्ती यांची मातबरी तीर्थयात्रेप्रमाणे वारीत नाही; याची कारणे संतविचारातच सापडतात..
ज्येष्ठातील पौर्णिमा सरली की उभ्या मराठी मनाला वेध लागतात ते पंढरीच्या पायवारीचे. पंढरीची वारी म्हणजे मराठी संस्कृतीची आत्मखूणच जणू! आषाढीच्या या पायवारीला ज्ञानदेवांनी मोठे गोड आणि तितकेच अन्वर्थक नाव दिलेले आहे - विठ्ठलयात्रा. वरकड तीर्थयात्रा आणि ही विठ्ठलयात्रा यात मूलभूत असा गुणात्मक फरक आहे. संतविचारातील गाभामूल्यांचे जिवंत दर्शन घडते वारीत. ‘तीर्थयात्रा’ आणि ‘पंढरीची पायवारी’ यांच्या हेतूमध्येच महद्ंतर आहे.

जे तारून नेते अथवा जिथून तरून जाता येते त्या स्थळाला ‘तीर्थ’ म्हणतात. त्यामुळे, या जीवनामधून तरून जाऊन मोक्षप्राप्ती अथवा स्वर्गप्राप्ती घडावी, हा तीर्थयात्रेमागील पूर्वापार विचार. परिणामी, तीर्थयात्रेचा संबंध पुण्यसंचयाशी आणि त्या पुण्यसंचयाशी संबंधित कर्मकांड, उपवास, स्नानविधी, दानधर्म, दंडणमुंडन, व्रतवैकल्ये यांच्याशी आपण जोडलेला आहे.
 तीर्थयात्रा आणि विठ्ठलयात्रा यांच्यातील मुख्य गुणात्मक फरक आहे तो इथेच. पापक्षालन, मोक्षमुक्ती, स्वर्गप्राप्ती यांची मातबरीच संतविचाराला वाटत नाही. त्यामुळे, तीर्थयात्रेशी संबद्ध यच्चयावत धारणाकल्पना पायवारीसंदर्भात अप्रस्तुत ठरतात. संतविचाराला प्रपंच त्याज्य नाही. परिणामी, प्रपंचात ‘बुडण्या’ची भीतीच अप्रस्तुत ठरून तिच्या सापेक्ष असणारी ‘तरण्या’ची महत्ता निर्थक ठरते. स्वर्गलोकाचे आकर्षण संतांच्या विचारविश्वात अजिबातच नाही. कारण पंढरी हे भू-वैकुंठ असल्याने या पृथ्वीवर जन्म घ्यावा अशी तीव्र इच्छा स्वर्गातील अमरांच्या पोटी बळावते, अशी संतांची धारणा आहे.
राहता राहिला प्रश्न मुक्तीचा. संपूर्ण विश्वात एकच शिवतत्त्व नांदत असल्याने ज्ञान-अज्ञान, जीव-शिव, कर्म-अकर्म, बंध-मोक्ष यांसारख्या द्वंद्वांची उत्पत्तीच मुळात आगम विचारात संभवत नाही. ‘मुक्त कासया म्हणावे। बंधन तें नाहीं ठावे’।। इतक्या नि:संदिग्ध शब्दांत तुकोबांनी यच्चयावत द्वंद्वात्मकता पार निकालात काढलेली आहे! ‘भक्ती’ ही संतविचारानुसार अवस्था आहे. ही अवस्था, हे ऐक्य (‘भक्त’ म्हणजे ‘जोडलेला’) जन्मजातच स्वयंसिद्ध असते.   विश्वात्मक चैतन्याशी असे ऐक्य अभिजातच असेल तर त्या ऐक्याचा आनंदसोहळा सांडून मुक्तीची अभिलाषा कोण आणि का धरेल, इतकी संत विचाराची मोक्षाबाबतची भूमिका स्पष्ट आहे. स्वभावत:च परखड आणि नि:संग असणारे तुकोबा तर, ‘भय नाही जन्म घेता। मोक्षसुखा हाणों लाता,’ अशा रोखठोक शब्दांत मोक्षमुक्तीबाबत एकंदरच संतविचाराचा दृष्टिकोण प्रातिनिधिक स्वरूपात मांडतात.
पंढरी, पंढरीचा विठ्ठल आणि पंढरीची पायवारी यांचा विचार आपल्याला संतविचाराच्या या पाश्र्वपटावर करावा लागतो. इथे प्रथम ध्यानात घ्यायला हवे ते पंढरी क्षेत्राचे संतांना भावलेले आगळेपण. पंढरपुराला माहात्म्य प्राप्त झाले ते विठ्ठलापेक्षाही मातृपितृभक्त असलेल्या पुंडलिक मुनींमुळे, ही बाब ‘सेक्युलर’ संतविचाराच्या संदर्भात विलक्षण सूचक ठरते. दुसरे म्हणजे, पुंडलिकाने आरंभलेल्या मातापित्यांच्या सेवेला भुलून पंढरीला धावत आलेला परमात्मा तिथे ‘अनुच्छिष्ट’ रूपात तिष्ठत थांबलेला आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि कृष्ण या आठ पूर्वावतारांत अनुक्रमे अद्भुत, करुण, भयानक, बीभत्स, हास्य, रौद्र, वीर आणि शृंगार या आठ रसांचा आविष्कार भगवंताने घडविलेला असल्याने, या आठांतील एकाही रसाने न उष्टावलेले (अनुच्छिष्ट) ध्यान धारण करून ते परतत्त्व पंढरीस विटेवर उभे आहे, अशी संतांची भावना बोलते. पंढरीला ‘समचरण’ आणि ‘समदृष्टी’ असा विटेवर उभा असणारा श्री विठ्ठल विश्वावर कृपेचा वर्षांव करण्यासाठी शांतरसाचा आविष्कार घडवत उभा आहे. आधीच्या अवतारांप्रमाणे त्याने कोणते ना कोणते शस्त्र अथवा अस्त्र हाती धारण केलेले नाही. तुकोबांची साक्ष काढायची, तर हाती ‘प्रेमपाश’ घेऊन पंढरीस आलेला विठ्ठल हा ‘प्रेमाचा पुतळा’ आहे. त्याच्या आगमनाने विख्यात झालेली पंढरी, तुकोबांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘प्रेमाची साठवण’ आहे.
हाती प्रेमपाश घेऊन प्रेममयनगरीत भक्ताच्या प्रेमाखातर तिष्ठत असलेल्या त्या प्रेमपुतळ्यास भेटण्यासाठी निघालेल्या त्याच्या प्रेमिकांचा मेळा म्हणजे आषाढीची पायवारी. पायवारीची संतांना अभिप्रेत असलेली संकल्पना अशी आहे. ‘तीर्थयात्रा’ आणि ‘वारी’ यांच्यातील फरक हाच. अन्य तीर्थयात्रांप्रमाणे संकल्प, उपवास, विधिनिषेध, दंडणमुंडण असा कर्मकांडाचा कोणताही बडिवार इथे नाही. विठ्ठलाकडे काहीही मागण्यासाठी वारी नाही. जगाला प्रेमाचे वाटप करणारा ‘उदारांचा राणा’ विटेवरती उभा आहे. त्याचेच गुणगान करीत त्याच्याकडे जा आणि काही मागायचे झालेच तर केवळ प्रेम मागा, असा तुकोबांचा सांगावा. ‘गात जा गा गात जा गा। प्रेम मागा विठ्ठला।।’ असे तुकोबा आवर्जून बजावतात. पंढरीचा क्षेत्रमहिमा हा असा आहे. जीवाला मोक्ष मिळावा म्हणून तीर्थयात्रा करायचा घाट लोक घालतात. पुन्हा एकवार तुकोबांचेच शब्द उसने घ्यायचे तर, ‘मुक्ति कोणी तेथे हाती नेघे फुका। लुटतील सुखा प्रेमाचिया।।’ असा पंढरीचा महिमा आहे. संतांच्या दृष्टीने पंढरीची वारी करायची ती प्रेमसुखाची लयलूट करण्यासाठी.
संतविचारातील पायाभूत मूल्यांची पंढरीच्या पायवारीशी सघन सांगड आहे ती अशी. प्रेम या मानवी गाभामूल्याचा परिपोष करणारे साधन म्हणूनच संत वारीकडे बघतात. प्रेमाच्या पोटी उगम होतो समतेचा. ‘अहंता खंडावी समता वर्तावी’ हा संतकार्याचा केंद्रबिंदू असल्याचे निवृत्तिनाथ उच्चरवाने सांगतात. समतेची वर्तणूक जगात साकारायची, तर प्रथम अधिष्ठान हवे प्रेमाचे. ते प्रेम पंढरीत उदंड आहे म्हणून त्या गावाला नित्य येरझार घालावी, यावर संतविचाराचा कटाक्ष आहे. ‘वारी’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘येरझार’! संतविचारात मध्यवर्ती स्थान आहे ते समूहभावनेला. ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ अशी शब्दयोजना ज्ञानदेव ‘पसायदाना’मध्ये करतात त्या मागील इंगित हेच. आषाढीची पायवारी म्हणजे ‘पसायदाना’तील चल् (‘चल्’ म्हणजे फिरत्या) भक्तीचा रोकडा आविष्कार.
‘तीर्थयात्रा’ या संकल्पनेचा सारा आशयच पार बदलून टाकणे, हा संत विचाराचा आणि संतकार्याचा एक असाधारण पैलू. अखिल विश्वावर मंगळाचा वर्षांव व्हावा यासाठी अविरत भ्रमण करणाऱ्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या पृथ्वीतलावर सतत सक्रिय राहो, असे मागणे ज्ञानदेव ‘पसायदाना’मध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात. या जगात अमंगलाचा फैलाव होतो व्यंकटीपायी. माणसाची एरवी सरळ चालणारी मती वाकडी चालते ती अहंकारापायी. या अहंकाराचा नाश हे अन्यथा मोठेच दुर्घट काम. अहंकाराचा नाश घडवून आणण्याचे, संतांच्या लेखी, एकमेव आणि हुकमी साधन म्हणजे पंढरीची वारी! ‘उठाउठी अभिमान। जाय ऐसे स्थळ कोण।।’, असा प्रश्न तुकोबा विचारतात आणि ‘ते या पंढरीसी घडे’, असे त्या प्रश्नाचे उत्तरही आपणच लगोलग सांगून टाकतात. वारीचे आणि पंढरीतील विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन घडल्याचे फलित सांगताना तुकोबा म्हणतात. ‘तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस। तात्काळ हा नाश अहंकाराचा.’ एकाच दगडात इथे तुकोबा दोन पक्षी मारतात. ‘तीर्थक्षेत्र’ या संकल्पनेचा आशय बदलत असतानाच, ‘अहंकाराचा नाश म्हणजेच मोक्ष’, अशी ‘मोक्ष’ या संज्ञेची अभिनव व्याख्याही ते सिद्ध करतात. संतविचाराचे हृद्गत म्हणजे ‘पसायदान’ आणि त्या ‘पसायदाना’चे मूर्त दर्शन वारीमध्ये घडते ते असे!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो