आरोग्यम् : सफेद पदर
मुखपृष्ठ >> आरोग्यम् >> आरोग्यम् : सफेद पदर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आरोग्यम् : सफेद पदर Bookmark and Share Print E-mail

डॉ. कामाक्षी भाटे ,शनिवार, ९ जून २०१२
डॉ. पद्मजा सामंत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
धुपणी हा पांढरा स्राव जाणं ही वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्त्रियांची तक्रार असते. पण सुरुवातीच्या टप्प्यात ती लपवली जाते. आणि मग त्याचा त्रास वाढत जातो. पांढरा पदर म्हणजे नेमकं काय आणि न लाजता डॉक्टरी उपाय करणं का गरजेचं आहे, हे सांगणारा लेख..
‘सफेद पाणी जाणे’ याबद्दल स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न, अनेक  समज-गैरसमज असतात. पांढरा पदर गेला तर खूप अशक्तपणा येतो, असे स्त्रियांना वाटते. याबद्दल त्या कोणाशी बोलण्यासही कचरतात. आपल्यापासून आपल्या पतीलाही याची लागण  होईल, ही भीतीही त्यांना कुरतडत असते. आणि हीच तक्रार मुलीने केली तर आई अधिकच घाबरते.
एकदा एक महिला घाबरीघुबरी होऊन सांगत आली. ‘माझ्या अठरा वर्षांच्या मुलीला खूप पांढरं जातंय. काहीतरी करून तिला बरी करा.’ मी जेव्हा तिला काही प्रश्न विचारले- ते पुढीलप्रमाणे -
पाणी नेहमी जातं कां? ती म्हणाली नाही. कधी कधी जातं.
घडी घ्यावी लागते का? छे छे! नाही.
कधीपासून जातंय? आठ वर्षांपासून! (म्हणजे जवळजवळ पाळी यायला लागल्यापासून)
वास येतो का ? नाही!
तुम्ही  पाहिलंत का? छे छे!  मी कसं काय बघणार? याचा इलाजही तिने अनेक वर्षे, अनेक डॉक्टरांकडून, तपासून न घेता, मधूनमधून करून पाहिला होता.
वरील उदाहरणावरून असे वाटते की पाळीचक्र, त्यानुसार बदलणारा, कमी-जास्त होणारा योनीस्राव आणि याबाबतीत पाळायचे स्वच्छतेचे नियम एवढी सर्वसाधारण माहिती सर्व स्त्रियांना, मुलींनाही असली पाहिजे.
शरीराचे काही भाग थोडेसे ओलसर राहणे नैसर्गिकरीत्या अपेक्षित आणि आवश्यकही असते. डोळे, नाक, तोंड योनीमार्ग या भागांतील अंतत्र्वचा बाहेरच्या त्वचेपेक्षा नाजूक असते. तसेच या अंतत्र्वचेला घर्षणापासून जपण्यासाठी व या अवयवांचे  काम सुरळीत चालण्यासाठी तेथे स्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथीही असतात.
डोळे सुकू  लागले तर नकळत आपण पापण्यांची उघडझाप करतो आणि अश्रूंंचा पातळ थर डोळ्यांवर निर्माण करतो. तोंड सुकले तर पाणी प्यायची आठवण होतेच, नाही का? तसेच योनीमार्गाचेही आहे. तेथील अंतत्र्वचा नाजूक पण चिवट असते. या मार्गाचे निसर्गाने नेमून  दिलेले काम म्हणजे संभोग आणि प्रसूती. या दोन्ही क्रियांमध्ये येथील पेशी मोठय़ा प्रमाणावर ताणल्या जातात. सूक्ष्म जखमा होतात. कधी कधी हा भाग थोडा फाटतो, पण या जखमा तितक्याच लवकर भरूनही येतात. याचे कारण शरीरातील अंतस्र्राव (हॉर्मोन्स). या घर्षणाच्या, ताणले जाण्याच्या वेळी या अंतत्र्वचेचे संरक्षण व्हावे म्हणून ही त्वचा अनेक थरांमध्ये घडली जाते आणि वेळोवेळी आवश्यक त्या प्रमाणात तेथे स्रावही निर्माण होतात.
हा स्राव- काही प्रमाणात झडलेल्या मृत पेशी, काही प्रमाणात गर्भाशयाच्या तोंडावरील ग्रंथींचा (सव्‍‌र्हायकल ग्लॅण्ड्स) स्राव, काही प्रमाणात योनीच्या अंतत्र्वचेतून स्रवलेला द्रव- यांनी बनलेला असतो. यात काही उपकारक जिवाणू (फ्रेण्डली बॅक्टेरिया)सुद्धा असतात. या स्रावाने योनीमार्ग आपोआप स्वच्छही होत असतो. हा भाग आत पाणी वगैरे घालून धुवायची गरज नसते. त्यामुळे नैसर्गिक स्राव वाहून जातो आणि  अपायही होतो. या सफेद पाण्याची काळजी वाटणाऱ्या व तक्रार करणाऱ्या साधारण तीस टक्के महिलांमध्ये काहीच आजार नसतो, असे आढळून आले आहे.
वर उल्लेख केलेले डॉडरलीन जिवाणू (फ्रेण्डली बॅक्टेरिया) आणि इस्ट्रोजेन यामुळे या स्रावाची आम्लता (अ‍ॅसिडिक पी. एच.) टिकवली जाते. धुण्याने व केमिकल्स वापरण्याने ही आम्लता हिरावून घेतली जाते.
मुलगी पौगंडावस्थेत आली की इस्ट्रोजेन बनू लागते. गर्भाशयाच्या मुखावर ग्रंथी वाढतात. योनीची त्वचा चिवट व जाड होते आणि आम्लता वाढते. पाळीच्या वेगवेगळ्या वेळी त्या त्या वेळच्या गरजेनुसार स्रावाचे प्रमाण, त्यातील पाण्याचे प्रमाण बदलत असते. या वयात मुलींचे शरीर संभोग आणि प्रजनन यासाठी तयार होत असते. हळूहळू बीज बनण्याची क्रिया नियमित होऊ लागते.
पाळीचे पहिले काही दिवस कमी असलेला स्राव दोन पाळ्यांच्या मधोमध प्रमाणात वाढतो, पातळ होतो. कारण जर संभोग झाला तर बीज फलित करण्यासाठी शुक्रजंतूंना गर्भाशयात वर प्रवेश करायला द्रव माध्यम लागते. या नंतरच्या दिवसात योनीचा स्राव घटतो आणि जाडसर होतो. जसजसे वय वाढते , इस्ट्रोजेन कमी होते व त्याअभावी योनीची अंतत्र्वचा पातळ होते व सुकतेसुद्धा! उपकारक जिवाणू कमी झाले की आम्लताही कमी होते. म्हणून या वयात काही महिलांना, इन्फेक्शन नसले तरीही या भागात खाज, जळजळ, सुकेपणा, संभोगाच्या वेळी सुक्या झालेल्या भागात दुखणे इ. त्रास होतात.
ही झाली योनीमार्गाच्या स्रावाची पाश्र्वभूमी! आता वेगवेगळ्या वयोगटांत कुठचे त्रास संभवतात व त्यांचे निराकरण कसे केले पाहिजे ते पाहूया. कधीकधी अगदी छोटय़ाशा मुलीला घेऊन आई  ओ.पी.डी.त येते. मुलगी सारखी खाजवते, शू करताना रडते, दुखते म्हणून सांगते. चड्डीवर पिवळट डाग दिसतात, आंघोळ घालताना खालची जागा लालसर झालेली दिसते, असे या आईचे सांगणे असते. या केसेसमध्ये सर्वाधिक कारण असते स्वच्छतेचा अभाव! संडासाच्या जागेहून पुढे आलेले जंतू अथवा आतडय़ांतले कृमी (जंत). या वयात अनेक मुलामुलींना जंतांचा त्रास असतोच!
मुलींच्या शरीराची मांडणी अशी आहे की योनीमार्ग गुदद्वाराच्या अगदी लागूनच पुढे असतो. स्वच्छता करताना पुढून पाठी जाण्याऐवजी हात पाठून पुढे आला तर जंतू या नाजूक योनीत पटकन् जाऊ शकतात. यासाठी डॉक्टर योग्य ते औषध देतीलच, पण स्वच्छतेचे नियम पाळणे आपल्याच हातात आहे!
जर छोटी मुलगी अशी खाजेची, दुखण्याची तक्रार वारंवार करीत असेल तर पालकांनी आपल्या लहानग्या मुलीचे यौनशोषण होत नाही ना, याची खातरजमा करून घेतली पाहिजे व तिच्या संरक्षणाबद्दल डोळ्यांत तेल घालून सावध राहिले पाहिजे. एवढी छोटीशी मुले आपल्याला कोण काय करते हे सांगू शकत नाहीत. यापुढचा वयोगट आठ-दहा ते चौदा-पंधरा वर्षांच्या मुलींचा! या वयात शरीरधर्मानुसार नैसर्गिक लैंगिक विचार येतात. त्यामुळेही वेळोवेळी पातळ स्राव निर्माण होतो. क्वचितप्रसंगी हस्तमैथुन करताना एखादी वस्तू आतमध्ये जाते व काढता येत नाही, आणि भीतीने कोणाला सांगताही येत नाही. मग चुरचुरणे, पाणी जाणे इ. तक्रारी निर्माण होतात. हे वय स्वत:ची लैंगिकता नव्याने अनुभवायचे असते. मुलांमुलींमधील आकर्षणाने शरीरसंबंध येऊ शकतो. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर इ.ची माहिती नसते आणि माहिती देणारेही कोणी नसते. म्हणून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे तसंच मुलींशी संवाद साधणे आवश्यक आहे.
हे वयही यौनशोषणाच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे असतात. जवळच्या वडीलधाऱ्या किंवा जिव्हाळ्याच्या नातेवाईक-मित्र यांच्या सान्निध्यात विश्वासाने वावरताना य मुलींचे शोषण होऊ शकते. त्या सुद्धा स्वत:ला अपराधी समजतात आणि तक्रार करीत नाहीत. या स्थितीतल्या मुलींना गुप्तरोगांचा धोकासुद्धा असतो.
सॅनिटरी पॅड्स, टॅम्पून्स   
पाळी येणाऱ्या मुली आजकाल कपडय़ाची घडी क्वचितच घेतात, अधिकत: त्या सॅनिटरी नॅपकिन वापरतात. त्यामुळे  स्वच्छता व्यवस्थित  असते. पण काही जणी जर टॅम्पून वापरत असल्या तर इन्फेक्शन टाळण्यासाठी टॅम्पून साधारण सहा तासांत बदलावाच! अस्वच्छ पॅडस्मुळे अथवा त्यांच्या आवरणाच्या अ‍ॅलर्जीमुळेही बाहेरच्या व आतल्या त्वचेला दाह होऊ शकतो. खाज, स्राव इ. तक्रारी निर्माण होऊ शकतात.
औषधे व हॉर्मोन्स
आपण आधी पाहिलेच आहे की इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे गर्भाशय व त्याच्या मुखावरील ग्रंथी कार्यरत होतात. गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना, कधी कधी या ग्रंथी वाढून ‘इरोजन ’ निर्माण होते. इंग्रजीत इरोजन म्हणजे झिजणे, पण येथे हा अर्थ घ्यायचा नाही. गर्भाशयाच्या मुखाच्या आतल्या ग्रंथी बाहेर वाढतात व खूप पातळ पाणी जाते. खाज आली नाही तरी ओलसरपणा कंटाळवाणा वाटतो. मग काही डॉक्टर ‘पुढे मागे कॅन्सर होऊ नये म्हणून’ गर्भाशय काढून टाकायचा सल्ला देतात. इरोजन म्हणजे कर्करोग नाही. याचे निदान पॅपस्मिअरने करता येते. पॅपस्मिअरनंतर कॉल्पोस्कोपी, बायोप्सी हे कॅन्सरची शंका असेल तरच करावयाचे असतात.
जंतुसंसर्गामुळे जाणारे पाणी
जेव्हा सफेद पाणी दरुगधीयुक्त असते, योनीमार्ग व बाहेरच्या त्वचेला खाज येते, लघवी करताना आग होते, ओटीपोटात दुखते, क्वचित तापही येतो तेव्हा ‘इन्फेक्शन’ वा जंतुसंसर्ग नाही ना याची खात्री डॉक्टरी तपासण्यांनी करून घ्यावी. जसे बाकीचे आजारही जिवाणू, विषाणू, प्रोटोझोआ, फंगस (बुरशी) यांमुळे होतात तसेच योनीमार्गाचेही आहे. यातील काही इन्फेक्शन्स अतिस्राव निर्माण करतात, तर काही जखमा, चट्टे इ. निर्माण करतात.
आता आपण यातील स्राव-डिस्चार्ज निर्माण करणाऱ्या जंतूंची ओळख करून घेऊया. जिवाणूंमुळे होणारे अतिस्राव दोन प्रकारे- म्हणजे लैंगिक संबंधांद्वारा- आणि लैंगिक संबंधांशिवायही होऊ शकतात. बॅक्टिरिअल व्हजायनोसिस असे भारदस्त नाव असलेला एक आजार आहे. सफेद पाण्याची तक्रार करणाऱ्या जवळजवळ ३०-४० टक्केमहिलांमध्ये हा आढळतो. यात दरुगधीयुक्त पाणी जाते, खाज येते. तपासणीत खूप लालसरपणा, सूज वगैरे नसते, पण सफेद स्राव खूप असतो. याचे स्मिअरद्वारा निदान होते व त्याप्रमाणे औषधोपचार केले जातात. लैंगिक संबंधांमुळेच व्हजायनोसिस होतो असे नाही. त्यामुळे जोडीदाराचा इलाज केलाच पाहिजे असे नाही. कॅण्डिडायासिस हे नाव बऱ्याच वेळा  कानावर पडते. फंगस इन्फेक्शन (एक प्रकारची बुरशी) असेही बऱ्याच जणींनी ऐकले असेल. अल्प प्रमाणात आपल्या शरीरात या फंगसची बीजे असू शकतात. जेव्हा काही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा हे फंगस डोके वर काढते.
आजारपणात खूप अ‍ॅण्टिबायोटिक्स (प्रतिजैविके) घ्यावी लागतात. मग आधी उल्लेख केला होता ते उपकारक डॉडरलीन जिवाणूही नष्ट होतात व कॅण्डिडा जोर धरते. मधुमेह खूप वाढला तर हमखास योनीमार्गात खाज येणे, लघवीला जळजळणे, सफेद दहय़ासारखा स्राव येणे, या तक्रारी उद्भवतातच!
दीर्घकाळचा संधिवात अथवा काही इम्युनॉलॉजिकल आजारांमध्ये स्टिरॉइड्स घ्यावी लागली तरी प्रतिकारशक्ती कमी होते आणि कॅण्डिडा बळावते. यात खूप प्रवाही ‘द्रवरूप/पातळ’ स्राव नसला तरी दहय़ासारखा घट्ट स्राव अंतत्र्वचेला चिकटलेला दिसून येतो. यासाठी योनीमार्गात ठेवायला गोळ्या, बाहेर लावायला मलम, क्वचितप्रसंगी पोटातही औषधे घ्यावी लागतात.
 ट्रायकोमोनिआसिस
हा लैंगिक संबंधांद्वारे संसर्ग होणारा त्रासदायक इन्फेक्शनचा प्रकार आहे. हा प्रोटोझोआ नावाच्या सूक्ष्म जंतूंमुळे होतो. यात हिरवट-पिवळट रंगाचा, दाट, बुडबुडे असलेला स्राव असतो. खूप खाज येते आणि लघवीला आग आग होते. याच्या इलाजात जोडीदाराचा इलाजही आवश्यक असतो.
हे झाले फक्त योनीमार्गात स्राव निर्माण करणारे जंतू.
दोन जिवाणू असे आहेत की त्यांचे परिणाम फक्त सफेद पाणी, खाज इथपर्यंत सीमित नसून ओटीपोटात सूज येणे, अण्डनलिकांवर सूज येणे, वंध्यत्व, एक्टोपिक गर्भधारणा एवढे गंभीर असतात.  गोनोऱ्हिआमध्ये सफेद पाणी, जळजळ होतेच शिवाय ओटीपोट, अण्डनलिका इथपर्यंत सूज पसरते. क्लॅमायडिआ हा जिवाणू ५० टक्के स्त्रियांमध्ये काही लक्षणे निर्माण न करताही मोठी हानी करू शकतो तर काही महिलांमध्ये सफेदपाणी , रक्तमिश्रित स्राव निर्माण होतात.
उतारवयातील सफेद पाण्याचा त्रास
उतारवयातल्या महिलांना आपल्या तक्रारी बोलून दाखवायला फारच भीड वाटते. या वयात योनीची अंतत्र्वचा पातळ झालेली असते. घर्षणाने ती दुखावते, जखम झाली तर कमी आम्लतेमुळे पटकन बरी होत नाही. इन्फेक्शन होते. झालंच तर कॅण्डिडा निर्माण करणारा मधुमेह झालेलाच असतो. लघवीलाही त्रास होतो. इस्ट्रोजेनच्या क्रीम अथवा गोळीने ही लक्षणे बरी होतात.
कर्करोग
गर्भाशयाच्या मुखाचा, योनीमार्गाचा कर्करोग हे सफेद पाणी जाण्याचे मुख्य कारण मुळीच नाही! पण जर कर्करोगाची जखम असली तर तेथे जंतुसंसर्ग होऊन रक्तमिश्रित स्राव जाऊ शकतो!
आता सगळ्याचा सारांश सांगायचा तर- प्रत्येक केसमध्ये सफेद पाणी धोकादायक असतेच असे नाही. त्यामुळे दुशिंग-योनीमार्ग पाण्याने धुणे, डिओडरण्ट्स वापरणे इ. करू नये.
खास करून लहान बाळांची स्वच्छता करताना या भागात पावडरचा वापर जास्त करू नये. त्यांना साफ करताना हात पाठून पुढे न नेण्याची दक्षता घ्यावी.
नैसर्गिक स्राव व अनैसर्गिक स्रावांतील फरक लक्षात घ्यावा. नेमाने पॅपस्मिअर करून घेण्याने गंभीर आजार टाळता येतात हे लक्षात ठेवावे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो