स्त्री समर्थ : तिची कहाणीच वेगळी
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : तिची कहाणीच वेगळी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : तिची कहाणीच वेगळी Bookmark and Share Print E-mail

संपदा वागळे ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्नाआधी फक्त दहावी पास असणाऱ्या मुलीने पुढे एम.ए.ची पदवी मिळवली तीही संसार व दोन मुलं सांभाळून. पोलीस दलात शिपाई म्हणून रूजू झाल्यावर, तिथेच न थांबता तिने कायद्याचं शिक्षणही घेतलं, कॉम्प्युटरचे विविध कोर्स केले. म्हणूनच ‘शिपाई ते विशेष न्यायदंडाधिकारी’ असा पल्ला ती गाठू शकली. पोलीस खात्यातील गुन्हे शाखा व न्यायदंडाधिकारी पदाची जबाबदारी अशी दुहेरी कसरत लीलया पेलणाऱ्या सरिता धनावडे यांच्याविषयी
altमाझ्यासमोर अमुक-अमुक अडचणी होत्या म्हणून मी तमुक तमुक करू शकले नाही.. अशी समर्थनं आपण अनेकजणींकडून ऐकतो. त्यांच्या म्हणण्याला सहमतीही दर्शवतो. एवढंच नव्हे तर ते गाऱ्हाणं ऐकताना ‘काय करेल बिचारी’ असा भावही आपल्या मनात दाटून येतो; पण अशा अनेक अडथळ्यांची शर्यत जिंकत, झेंडा फडकवणारी एखादी विरांगनाही आपल्याला भेटतेच की! जिद्दीच्या बळावर आपली शैक्षणिक पात्रता उंचावत ‘पोलीस शिपाई ते विशेष न्यायदंडाधिकारी’ असा प्रवास करणाऱ्या सरिता धनावडे या त्यापैकीच एक. या सरितेची कहाणीच वेगळी.
सरिता धनावडे या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील मळगे-खुर्द गावच्या. आईवडील शिक्षक होते. सरितालाही शिक्षणात रूची होती. पण वडिलांच्या मृत्यूमुळे तिचं शिक्षण थांबलं. ‘दहावी पास’ एवढाच शिक्का तिच्यापाशी राहिला. त्यानंतर ४-५ वर्षांनी म्हणजे  १९८६ मध्ये ती लग्न होऊन ठाण्यात आली. तोपर्यंत या मुलीने ट्रेनदेखील पाहिली नव्हती. आपल्या पत्नीचा शिक्षणाकडील ओढा बघून पती सुभाष धनावडे यांनी प्रोत्साहन दिलं  आणि तिने दूरशिक्षणाद्वारे बी.ए.चा अभ्यास सुरू केला. दरम्यान ती दोन मुलांची आईही झाली.
त्या वेळी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एवढी ओढग्रस्तीची होती की, सरिताकडे शिलाईचं काम जरी आलं तरी रात्री जागून का होईना, ती ते पूर्ण करून देत असे. कारण ते २ रुपयेही तिच्यासाठी मोलाचे होते. शिवाय पोस्टाची रिकरिंग व नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्सची एजन्सीही तिने घेतली होती. ठाण्याच्या मुख्य पोस्टात जेव्हा ती पैसे भरायला जात असे, त्यावेळी सेंट्रल मैदानात बॅन्डच्या साथीने सुरू असलेल्या ‘पोलीस परेडचं’ तिला विलक्षण आकर्षण वाटे. कितीतरी वेळ परेड बघत ती तिथे उभी राहायची. देवाने तिच्या मनातली इच्छा जणू ओळखली आणि १९९१मध्ये तिला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पोलीस भरतीसाठी कॉल आला. पण शारीरिक क्षमतेत ती कमी पडली.
 हे अपयश तिच्या यशाची पहिली पायरी ठरली. ती हार मानणारी नव्हतीच. तिने पहाटे उठून पोलीस ग्राऊंडवर धावण्याचा सराव सुरू केला. वजन ठरवून कमी केलं. व्यायामाने स्टॅमिना वाढवला. एकीकडे अभ्यास, संसार सुरू होताच. तिच्या या कष्टांना यश आलं आणि १९९२ मध्ये बी. ए.च्या शेवटच्या वर्षांला असताना सरिता सुभाष धनावडे ठाणे ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदावर भरती झाल्या.
लहान मुलं, अभ्यास सांभाळून पोलीस दलातील नोकरी करणं हे जिकिरीचं काम होतं. शिवाय ठाणे जिल्हा म्हणजे जव्हार, मोखाडा, तलासरी, कसारापर्यंतचा परिसर. महिला पोलिसांचं प्रमाणही त्या वेळी अल्प होतं. इमर्जन्सी बंदोबस्ताला कुठेही, केव्हाही जावं  लागायचं. पण मुलांना पाळणाघरात ठेवून, अभ्यासासाठी रात्री रात्री जागत त्यांनी सर्व व्यवधानं सांभाळली.
सरिता धनावडे या सुरवातीपासूनच गुन्हे विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी वेषांतर करणं, किंवा बारमध्ये पुरुष सहकाऱ्यांसमवेत ‘गिऱ्हाईक’ बनून जाणं.. या गोष्टी त्यांच्या पेशाच्याच एक भाग. एकदा एका बारवर टाकलेल्या धाडीत, त्यांनाच कोंडून घातल्याची वेळ आली होती. परंतु त्या म्हणाल्या, ‘वरिष्ठांकडून आमच्या सुरक्षिततेची नेहमीच काळजी घेतली जाते. अशा ऑपरेशन्सच्या वेळी आमचं एक पथक बाहेरही तैनात असतं. त्यामुळे टेन्शन नसतं.’
पोलिसांच्या डय़ुटीला काळावेळाचं बंधन नसतं, या संदर्भात त्यांनी एक अनुभव सांगितला. एकदा ठाण्याच्या सिव्हिल कोर्टात मेडिकलसाठी दाखल झालेल्या एका स्त्री गुन्हेगाराला जव्हार कोर्टात घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पोहचेपर्यंत रात्रीचे आठ वाजले. साहजिकच कोर्ट बंद झालं होतं. त्यामुळे तिला रात्री जव्हार पोलीस  स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवावं लागलं. यांनाही अर्थात रात्रभर तिच्यावर पहारा करत राहणं क्रमप्राप्त होतं. त्यात ती बाई ९ महिन्यांची गरोदर याचं एक टेन्शन आणि दुसरं मोठं टेन्शन म्हणजे त्यांची मुलं तिकडे संपूर्ण दिवसरात्र पाळणाघरातच होती.
नोकरी मिळाल्याने सरिता धनावडे यांच्या शिक्षणात खंड पडला नाही; उलट अधिकच उत्साहाने त्या अभ्यासाला भिडल्या. इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी एम. ए. (हिस्ट्री) ही पूर्ण केलं. पोलीस खात्यातील नोकरी करताना कायद्याचं ज्ञान असेल तर दुधात साखर या विचाराने पुढे एल एल. बी.ही केलं. एवढंच नव्हे तर एम. एस्सी.-आय टी, सी डॅक, ओरॅकल, युनिक्स, डिप्लोमा इन सायबर लॉ, फॉक्सप्रो, प्रोग्रामिंग, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स, डेस्क टॉप पब्लिशिंग.. असे कॉम्प्युटर संदर्भातील १० वेगवेगळे कोर्स केले. स्पेशल कमांडो कोर्स करून हे विशेष टेक्निकही आत्मसात केलं. आरोपीच्या वर्णनावरून त्याचे स्केच काढण्यातही मास्टरी मिळवली. कॉम्प्युटरमधील प्रावीण्यामुळे त्यांना वायरलेस मेसेज अटेंड करणे व त्याबरहुकूम सविस्तर माहिती तयार करून, ती आवश्यक तिथे पाठवणे हे काम दिलं आहे. शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नसल्यामुळे एल. एल. एम.चा पहिल्या वर्षांचा टप्पाही त्यांनी ओलांडला आहे.
एकीकडे शिक्षणाचं इंजिन सुसाट धावत असतानाच त्यांना कळलं की सरकारी नोकरीची १० वर्ष पूर्ण झालेल्या आणि कायद्याची पदवी असणाऱ्या व्यक्तींची सरकार ‘विशेष न्यायदंडाधिकारी’ म्हणून मॉर्निग कोर्टात नेमणूक करतं. त्यासाठी प्रथम त्या अर्जदाराच्या वरिष्ठांकडून गोपनीय अहवाल मागवला जातो. त्यानंतर कलेक्टर, कमिशनर व डिस्ट्रिक्ट जज अशा त्रिमूर्तीचं पॅनेल मुलाखत घेतं. त्यानंतर उच्च न्यायालयात सर्व कागदपत्रांची छाननी होते. या अग्निपरीक्षेत तावूनसलाखून निघाल्यानंतरच ऑर्डर निघते. त्या वेळी  अधीक्षकपदी असलेल्या अर्चना त्यागी यांनी संपूर्ण सहकार्य व प्रोत्साहन दिल्यामुळे  व आईने केलेल्या संस्कारांमुळे मला हे पद मिळू शकलं असं सरिता धनावडे यांनी आवर्जून सांगितलं. या पदावर नियुक्त झालेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला पोलीस कर्मचारी आहेत.
ऑगस्ट २००८ ते जुलै २००९ पर्यंत त्यांनी ठाण्याच्या कोर्टात ‘विशेष न्यायदंडाधिकारी’ म्हणून कार्यभार सांभाळला. त्यावेळी सकाळी ८ ते १० विशेष न्यायदंडाधिकारी आणि १० नंतर पोलिसाची वर्दी चढवून, ठाणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई अशी दुहेरी कसरत त्यांनी पार पाडली. या मॉर्निग कोर्टात निकाल देताना विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांना गुन्हेगाराला १०० ते ५००० रुपयांपर्यंत दंड करण्याचा व एक दिवसापासून सहा महिन्यांपर्यंत कारावास ठोठावण्याचा अधिकार असतो. या काळात धनावडे यांनी १०२९ केसेस निकालात काढल्या व जवळजवळ साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला. कारागृहातील अट्टल गुन्हेगारांची साक्षीदारांच्या मदतीने ओळखपरेड घेण्याचं कामही विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांकडे असतं. त्यांनी लिहिलेला सील्ड पंचनामा न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरतो. सरिता धनावडे यांनी अभिमानाने सांगितलं की, त्यांनी ओळख पटवलेले तीन गुन्हेगार आज जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
या पदावर काम करताना तुमच्या पुरुष सहकाऱ्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता यावर त्या म्हणाल्या, ‘या बाबतीत मी सुदैवी आहे. माझी क्षमता सिद्ध  झाली आणि बोलणाऱ्यांची तोंडे बंद झाली.’  
आज त्या पोलीस नाईकपदावर काम करत आहेत. त्या म्हणतात, आज पोलिसांची प्रतिमा डागाळली गेलीय. समाजाने पोलिसांच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा त्यांना सहकार्य केलं तर गुन्ह्य़ाची उकल पटपट होईल आणि गुन्हेही कमी होतील.
पोलीस खात्यातील नोकरीचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. तरीही या व्यवसायातील जोखीम आणि अस्थिरता जवळून बघितल्याने त्यांनी आपल्या मुलांना मात्र या क्षेत्रापासून लांब ठेवलंय. त्यांचा मुलगा निखिल ‘मेकॅनिकल इंजिनीयर’ आहे, तर मुलगी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी संपादन करून आता एम. बी. ए. करत आहे. त्यांचे पती, सुभाष यांचाही ट्रॅव्हलिंग व्यवसायात चांगला जम बसला आहे.
आज त्या कायद्याचे ज्ञान असल्यामुळे तळागाळाच्या लोकांना मोफत सल्ले देणे, त्यांची भांडणं सोडवणे आदी काम करतात.  शारीरिक क्षमतेच्या बाबतीत तर त्यांचं म्हणणं असं, आजही मी एकटी चारजणांना लोळवू शकते. डिपार्टमेंटमध्ये योगासनांच्या सरावापासून करमणुकीच्या कार्यक्रमापर्यंत सर्वत्र त्या पुढे असतात. नव्या नव्या उपक्रमांसाठी डेप्युटी सुपरिंटेंड ऑफ पोलीस राजेश्वरी रेडकर यांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा मिळतो.
आता पुढे काय याचंही उत्तर त्यांच्याकडे रेडी होतं. त्या म्हणाल्या, एल. एल. एम. तर मी पूर्ण करणारच आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात गुन्हे डिटेक्शनचं प्रमाण ४ ते ५ टक्के एवढंच आहे. कोर्टात चार्जशिट जातं त्यात अनेक त्रुटी राहतात. त्यासाठी २०१०पासून ‘विधि अधिकाऱ्याचं’ पद निर्माण केलं आहे. या जागेसाठी मी प्रयत्न करणार आहे.
सरिता धनावडे यांचा उत्साह, सतत नवनवं शिकण्याची उमेद बघून मला कुठेतरी वाचलेलं एक सुवचन आठवलं.. ‘आकाशात उत्तुंग भरारी मारण्यासाठी पंखात खूप बळ लागतं, पण आकाश होण्यासाठी मात्र एक जिद्दी मन पुरतं.’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो