मुलांची धमाल,आजोबांची कमाल!
मुखपृष्ठ >> बालमैफल >> मुलांची धमाल,आजोबांची कमाल!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुलांची धमाल,आजोबांची कमाल! Bookmark and Share Print E-mail

श्रीपाद पु. कुलकर्णी ,रविवार ,१० जून २०१२

बन्या आणि टिन्या हातात बॅट-बॉल घेऊन हाश्य-हुश्य करीत घरात आले आणि लगेच घटाघटा पाणी पिऊ लागले . ते पाहून गजाभाऊ म्हणाले, ‘अरे, खेळून आलात ना.. लगेच असं घटाघटा पाणी पिऊ नये. जरा दम तरी खा.. आणि तसा लवकरच आटोपता घेतलेला दिसतोय खेळ.’ गजाभाऊ हसत म्हणाले.
‘काय करणार काका, त्या खिरेकाकू रागावल्या आम्हाला, किती आरडाओरडा करताय म्हणून आणि दिवेलागणी होत आली, जा घरी म्हणाल्या,’ टिन्या जरा त्रासिक आवाजातच बोलला.
‘अरे, बरोबर आहे त्यांचं. तुम्ही नुसतं खेळत नाही, खच्चून ओरडत असता.. म्हाताऱ्या, आजारी माणसांना त्रास होतो त्याचा.. नेहमी नाही तरी कधीतरी बोलणारच ना त्या..!’ गजाभाऊ समजावणीच्या सुरात म्हणाले.
‘बाबा, तुम्ही नाही खेळलात का हो कधी क्रिकेट?’ बन्यानं कुतूहलानं विचारलं.
‘हो, खेळलोय की. पण आमचं आपलं गावात राहायला असताना गल्लीतलं क्रिकेट. कडेला टुकूटुकू खेळायचं. बॉल कुणाच्या आवारात गेला की आऊट, असा नियम आणि मी नेमका तिकडंच मारायचो आणि आऊट व्हायचो.’ हे ऐकून मुलं हसली. गजाभाऊ पुढं सांगू लागले, ‘पण आमच्या नंतर कधीकधी संध्याकाळनंतर आमच्यापेक्षा मोठी टगी मुलं खेळायला यायची. ती आगाऊ मुलं आम्हाला कधी त्यांच्यात घ्यायची नाहीत. त्या वेळेला नुकतेच रस्त्यांवर लखलखीत उजेड पाडणारे दिवे बसवले होते. त्यामुळं त्यांचा खेळ लवकर संपायचा नाही. रस्त्याकडेच्या एका इमारतीच्या तळमजल्यावरच्या ७०-७५ वयाच्या बाबुरावांना त्या मुलांच्या या उशिरापर्यंत चालणाऱ्या खेळाकडं त्रास सहन करीत बघत बसायला लागायचं. पण त्या मुलांच्या नादी कोण लागणार?’
‘मग त्या आजोबांनी त्या मुलांना दटावायचं ना त्या खिरेकाकूंसारखं,’ टिन्या बोलला.
‘अरे, ती मुलं तुमच्यासारखी समजूतदार असती, दटावण्याला घाबरली असती तर ना..! ती मुलं कुणालाच जुमानायची नाहीत. पण एक दिवस काय झालं, बाबुरावांनी त्या मुलांना बोलावलं घरी. पाणीबिणी दिलं. ओळख करून घेतली आणि प्रेमानं म्हणाले, ‘बाळांनो, मलाही क्रिकेट फार आवडतं आणि तुम्हाला खेळताना बघून, खिदळताना ऐकून खूप आनंद वाटतो. पण खेळातही नियमितपणा हवा.. तुम्ही कधी लवकर येता, कधी उशिरा खेळता, कधी खेळताना कुणी दिसतच नाही. यात मजा नाही. तुम्ही रोज रात्री जरा वाहतूक वगैरे कमी झाली की या आपल्या महापालिकेनं फ्लडलाइटसारख्या लावलेल्या स्ट्रीटलाइट्सच्या मस्त उजेडात खेळत जा नं..’ ती खेळणारी मुलं अविश्वासानं आणि आश्चर्यानं एकमेकांकडे बघत राहिली. बाबुराव पुढं म्हणाले, ‘हे बघा, तुम्ही जर रोज रात्री नक्की खेळणार असाल तर दर शनिवारी रात्री माझ्याकडून बक्षीस म्हणून शंभर रुपये घेऊन जायचे.’ हे ऐकून मुलांनी एका सुरात कबुली दिली आणि आनंदानं चित्कारत आपापल्या घरी गेली.
नंतर ती मुलं रोज रात्री उशिरापर्यंत खेळत. पुढच्या शनिवारी रात्री ती बाबुरावांकडे वसुलीला गेली. बाबुरावांनीही सांगितल्याप्रमाणे मुलांच्या हातावर शंभर रुपये ठेवले. मुलं एकदम खूश. त्याच्या पुढच्या शनिवारीही मुलं हजर बाबुरावांकडे. बाबुराव म्हणाले, ‘बाळांनो, आज जरा औषधांना जास्त पैसे खर्च झाले, त्यामुळं तंगी आहे. तरी हे सत्तर रुपये जा घेऊन.’ मुलांनीही जास्त ताणलं नाही. बघू, पुढच्या वेळेला देतील आजोबा. ती त्यांचं आवडीचं खेळण्याचं काम नित्यनियमानं करीत राहिली आणि पुढच्या शनिवारी हजर झाली बाबुरावांच्या दारात. ‘मुलांनो, अजून माझी पेन्शन नाही मिळाली रे.. आता मी तुम्हाला फक्त ३० रुपयेच देऊ शकतो, तेवढे घ्या.’ असं म्हणून बाबुरावांनी त्यांची बोळवण केली. मुलं हिरमुसली, पण काही न बोलता गेली. पुढच्या शनिवारी मुलं पुन्हा  बाबुरावांकडे गेली तर बाबुराव लांब चेहरा करून बोलले, ‘बाळांनो, नाही रे मी तुम्हाला कबूल केलेले शंभर रुपये देऊ शकणार यापुढे.. तुम्ही एवढा माझ्यासाठी त्रास घेता, म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून फारफार तर १० रुपये देऊ शकेन बाबांनो.’ आता मात्र मुलांचे चेहरे खाडकन उतरले. त्यांनी आपापसात चर्चा केली.. ‘छे! यांच्या १० रुपयांसाठी अख्खा आठवडा रात्री उशिरापर्यंत खेळायला सांगितलंय कोणी! नको ते तुमचे पैसे आणि नको ते खेळणं.’ जी ती मुलं गेली हिरमुसून ती पुन्हा काही त्या गल्लीत रस्त्यावर खेळायला फिरकली नाहीत.
‘हाऽऽ हाऽऽ हाऽऽ.. काका, काय कमाल केली हो आजोबांनी!’ टिन्या उद्गारला. बन्यानंही त्याच्या हातावर टाळी दिली.
‘म्हणून तुम्हीही विचार केला पाहिजे. काहीही खेळताना, आरडाओरडा करताना आपल्यामुळे कुणाला त्रास होत नाही ना याचा! नाहीतर अशी खमकी माणसं भेटतात आणि फटफजिती करतात,’ असं बोलून गजाभाऊही मुलांच्या हसण्यात सामील झाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो