वाई- भोर शूटिंगचे हाँट स्पॉट
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त >> वाई- भोर शूटिंगचे हाँट स्पॉट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाई- भोर शूटिंगचे हाँट स्पॉट Bookmark and Share Print E-mail

 

बदलती आर्थिक समीकरणं..
प्रभा कुडके - रविवार, १० जून २०१२

सातारा जिल्ह्य़ापासून जवळ असलेल्या वाई गावाची ओळख मंदिरांचे गाव म्हणून आहे. परंतु ही ओळख केवळ इतकीच मर्यादित नाही तर बॉलीवूडकरांच्या दृष्टीने मुंबईनजीक असलेला सर्वात उत्तम शूटिंग स्पॉट म्हणून याची ख्याती आहे. कमी खर्चात उत्तम लोकेशन्स मिळणारा हा एकमेव स्पॉट असल्याने अनेक शूटिंग्ज या ठिकाणी वरचेवर होतात. गावात होणाऱ्या शूटिंगमुळे इथल्या लोकांचं राहणीमान आणि आर्थिक स्तर कमालीचा उंचावलेला आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.. : प्रभा कुडके

असं म्हटलं जातं की, कुठल्याही गोष्टीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यास आपल्याला अडचणी येत नाहीत, पण आपल्याच महाराष्ट्रातील एका खेडय़ाला मात्र हे लागू पडत नाही. लाइट, कॅमेरा, अ‍ॅक्शन असं म्हटल्यावर कुठला डायलॉग बोलायचं आणि कुठली पोझ द्यायची हे

प्रशिक्षणाविना अगदी उत्तम घडत आहे. गेली कित्येक वर्षे हे त्याच अव्याहतपणे आणि कुठलीही अडचण न येता घडताना आपल्याला दिसेल. साताऱ्यानजीक असलेल्या वाई आणि भोर गावातील अनेक गावकऱ्यांनी  बॉलीवूडच्या सुपरस्टार्सबरोबर पडदा शेअर केला आहे. त्यामुळे सलमान खान, विद्या बालन, शाहरुख खान यांना पाहणं त्यांच्यासाठी नवीन राहिलेलं नाही. त्यामुळेच स्टार कितीही मोठा असला तरी त्याच्या सहीसाठी किंवा एका फोटोसाठी इथे रांगा लागत नाहीत.
या मातीत अनेक चित्रपट घडले आणि इथली लोकेशन्स परदेशातही हिट झाली. या सर्व घडामोडींमुळे वाई आणि भोरमधील आर्थिक गणितं बदलू लागली. इथला प्रत्येक रहिवाशी गावात शूटिंग आहे म्हटल्यावर आता कामाची काहीच ददात असणार नाही या आशेने शूटिंगची वाट पाहतो. वर्षांतील जवळपास २०० दिवस या गावांमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या चित्रपटाचे किंवा मालिकेचे शूटिंग हे सुरू असते. त्यामुळेच शेतीच्या जोडीला मोठय़ा पडद्यावर चमकण्याची संधीही इथल्या गावकऱ्यांना मिळत आहे.
वाई आणि भोरमध्ये हा बदल काही एका दिवसात किंवा एका रात्रीत घडला नव्हता, तर हा बदल घडण्यासाठी काही वर्षे गेली. आज गावाची रचना पाहाल तर अत्यंत साधीसुधी टुमदार घरं आपलं लक्ष वेधून घेतात. स्वतच्याच जगात खूश असलेलं हे एक वेगळं जग आहे असं म्हटल्यास हरकत नाही. या गावातील सर्व नागरिक शूटिंगच्या दिवसांत काही ना काही करण्यात मग्न असतात. त्यामुळेच वाईकरांसाठी शूटिंगचे दिवस म्हणजे उत्तम कमाईचे दिवस असं म्हटल्यास वावगं ठरू नये.         
गेल्या दोन वर्षांपूर्वी वाईत असलेल्या लॉजची संख्या केवळ ६ ते ८ इतकी होती. आजच्या घडीला या लॉजची संख्या तब्बल २० इतकी झालेली आहे. नवनवीन हॉटेल्स गावात उभारली गेली आहेत. गावातील स्थानिकांना रोजगाराचे विविध मार्ग खुणावू लागले. गावाच्या बाहेर जाऊन काही करण्यापेक्षा गावात होणाऱ्या शूटिंगच्या माध्यमातून इथले स्थानिक उदरनिर्वाहाची साधनं शोधू लागली आहेत. भोरच्या मातीत लहानाचा मोठा झालेला राजीव वाघ ऊर्फ राजा. भोरच्या परिसरात राहणारा हा राजा.. शूटिंगच्या काळात खरोखर इथला राजा असतो. राजा गेली ७ वर्षे शूटिंगसाठी एखादं चांगलं लोकेशन शोधून देण्याचं काम करत आहे. शूटिंग कुठलं आहे हे जाणून घेऊन त्यानुसार लोकेशन शोधण्यासाठी राजा आणि त्याचा असिस्टंट आशीष हे दोघे सज्ज असतात. याकरता दिवसाकाठी अंदाजे ७०० रुपये यांना मिळतात.
याकरता नेमकं काय करावं लागतं? हे सांगताना राजा म्हणतो, अगदी राहण्यापासून ते शूटिंग संपेपर्यंत कलाकारांना कुठल्या हॉटेलमध्ये थांबवायचं. त्यासोबत इतर कलाकारांची व्यवस्था कुठे करायची, या अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवून कराव्या लागतात. एकूणच काय तर शूटिंगला येणाऱ्या लोकांची गरज काय यानुसार आपल्याला त्यांना सर्व उपलब्ध करून द्यावे लागते. स्थानिक लोकांना शूटिंगला आणायचं, त्यांना किती वेळ कुठे उभं करायचं, त्यांना कुठला डॉयलॉग बोलायचा आहे हे सांगायचं या अशा अनेक गोष्टी राजा करत असतो. एकूणच काय तर राजा हरकाम्या आहे. शूटिंग आणि त्यासंदर्भातील अधिक माहिती देताना तो म्हणतो, गावात शूटिंग सुरू झालं की एक वेगळाच उत्साह गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो, कारण शूटिंग हे शेतीव्यतिरिक्त उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे गावकरीही गावात शूटिंग होत असताना आनंदी असतात. राजा वर्षांचे बारा महिने हेच काम करतो का? या प्रश्नावर मात्र तो लग्गेचच नकार जाहीर करतो. तो म्हणतो, वर्षांतील बारा महिने मुळात शूटिंग होत नाही. शूटिंग नसताना मी सलूनचा व्यवसाय करतो.
‘सुवासिनी’, ‘बाबू बॅन्डबाजा’, ‘दे धक्का’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘विठा’, ‘कुटुंब’, ‘काकस्पर्श’ अशा अनेक चित्रपटांसमवेत हिंदी चित्रपटांच्या शूटिंगसाठी राजा तैय्यार असतो. राजा याआधी नाटकात काम करत होता. त्यामुळे त्याला या क्षेत्राची बऱ्यापैकी माहिती होती. त्यामुळेच तो हे काम करण्यात अगदी पटाईत झालेला आहे. तो दिवसाकाठी ७०० रुपये मिळवतो. हे सातशे रुपये राजासाठी खूप आहेत, असं तो म्हणतो. शूटिंग किमान २० ते २५ दिवस चालत असल्यामुळे त्याचं महिन्याचं गणित उत्तम बसलेलं आहे.
शूटिंग नसल्यावर सलून हे त्याच्यासाठी उपजीविकेचं साधन आहे हे तो नम्रपणे कबूल करतो! पण तरीही राजाचा खरा जीव रमतो तो शूटिंगमध्ये हे सांगण्यास तो विसरत नाही. तो म्हणतो, त्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे, जी तुम्हाला सतत काहीतरी वेगळं करण्यास प्रवृत्त करत असते. पैसा तर मिळतोच पण आत्मिक समाधान जे असतं ते काही औरच आहे, असं राजा म्हणतो.
मंदार शेंडय़े या नावाने अनेक वलयांकित चित्रपटासाठी खारीचा वाटा बजावलेला आहे. मंदारच्या नावावर ‘स्वदेस’, ‘ओंकारा’ यासारखे अनेक हिंदीसह मराठी चित्रपटही आहेत. मंदार हा वाई गावात शूटिंग सुरू झाल्यावर स्थानिक समन्वयक म्हणून काम करतो. या भागातील ८० टक्के समन्वयक हे नाटक किंवा चित्रपट क्षेत्राशी संलग्न असल्याचंही तो सांगतो. अधिक बोलताना तो म्हणतो, वारंवार होणाऱ्या शूटिंगमुळे वाई आणि भोरचा मोठय़ा प्रमाणात कायापालट झालेला आहे.
समन्वयक म्हणून गावातील निरनिराळ्या जागा दाखवण्यापासून ते सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम मंदार करतो. समन्वयक म्हणून काम काय असतं याची विस्तृतपणे माहिती देताना तो म्हणतो, समजा ४० दिवसांचं शूटिंग आहे तर त्या दिवसांची शूटिंग कंपनीची जी काही गरज आहे ती सर्व पुरवण्याचं काम आम्ही करतो. मंदारला त्याच्या उत्पन्नाविषयी विचारल्यास तो म्हणतो, किमान ३ ते ५ हजार दिवसाचं उत्पन्न आहे. लॉजवरून सकाळी ६ वाजता कलाकार निघतात तिथपासून ते अगदी रात्री शूटिंग संपेपर्यंत खूप काही कामं करावी लागतात. त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणं हे काम सर्वात महत्त्वाचं आहे. शिवाय समन्वयकाचं काम म्हणजे ते कुणा एका व्यक्तीचं नाही, तर त्याकरता हाताशी अजून किमान तीन मुलं घेऊन काम करावं लागतं. स्थानिकांना या शूटिंगचा खूपच फायदा झाला. ग्रामपंचायतीलाही यामुळे फायदा होऊ लागला. गावातील सुखसुविधांसाठी फंड देणं किंवा ग्रामपंचायतीला ठराविक दिवसाला पैसा मिळू लागला. त्यामुळे ग्रामपंचायतही कुठल्याही शूटिंगला नाही म्हणत नाही.
गावातील स्थानिकांना मजूर, ज्युनिअर आर्टिस्ट अशी कामं अगदी सर्रास मिळताहेत. या सर्व गोष्टीचं श्रेय मंदार प्रकाश झा यांना देतो. तो म्हणतो, प्रकाश झा वाईला येण्याआधी अनेक चित्रपटांचं इथे शूटिंग झालेलं होतं, पण या ठिकाणी खरा व्यावसायिकपणा आला तो केवळ प्रकाश झा यांच्यामुळेच. प्रकाश झा यांनी ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’, ‘गंगाजल’ यांसारखे चित्रपट या ठिकाणी चित्रित केले. त्या वेळी त्यांनी स्थानिकांना कॅमेरा अ‍ॅंगल्स, डायलॉग डिलिव्हरी कशी करावी यांसारख्या टिप्स दिल्या होत्या. त्यामुळे वाईकरांना प्रकाश झा येणार म्हटल्यावर आपला सच्चा मित्र येतोय असंच वाटतं.
प्रकाश झा यांच्यानंतर आशुतोष गोवारीकर यांनी या गावात ‘स्वदेस’ या चित्रपटाचे शूटिंग  केले होते. तब्बल पाच महिने या गावात शाहरुखचे वास्तव्य होते. शिवाय ‘स्वदेस’ हा चित्रपट ऑस्करवारीला गेल्यामुळे या गावातील अनेक लोकेशन्स परदेशातील लोकांपर्यंत पोहोचली.
या अशा सर्व गोष्टींचा गावातील स्थानिकांना खूप फायदा झालेला आहे. हा फायदा नेमका काय आहे हे सांगताना तो म्हणतो, पावसाळ्यात पेरणीनंतर इथल्या शेतकऱ्याला तसं काही काम नसतं. मुख्य म्हणजे पावसाळ्यानंतर इथे शूटिंग्ज सुरू होतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराचं माध्यम उपलब्ध होतं. दिवसाकाठी किमान ३०० ते ५०० रुपये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून इथले स्थानिक कमावतात. शिवाय शूटिंग आहे म्हटल्यावर इतर छोटी कामं तर खूप असतात. अगदी ऐनवेळी खड्डा खणण्यापासून ते झाडावर झेंडे लावणं अशी काहीही छोटी मोठी कामं असतात. ऐनवेळी अनेक कामं निर्माण होत असल्याने स्थानिकांना या काळात खूप मागणी असते. साधे दोन ओळींचे डायलॉग बोलायला येणं म्हणजे या लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. या अशा लोकांना गर्दीच्या समोर उभं करून अनेक गोष्टी साध्य होतात. यासाठी सतत लोकांच्या शोधात राहणं, त्यांचा शोध घेऊन शूटिंग सुरू होण्याच्या आधी त्यांची नेमकी काय आणि कशासाठी गरज आहे हे सांगून या लोकांना एकत्र आणावे लागते, असं तो सांगतो.
वाई आणि भोरमध्ये आसपास किमान २५ छोटी खेडेगावं आहेत. शूटिंग फ्रेंडली असलेल्या या गावातील लोकांनाही आता शूटिंगचं अप्रूप वाटेनासं झालेलं आहे. दिवसाला साधारण २०० ते ३०० रुपये मिळाल्यावर, त्याबरोबरीला जेवणाची व्यवस्था होते त्यामुळे गावकरीही गर्दीत उभं राहायला तयार होतात.
शूटिंगच्या काळात खेळणारा पैसा हा सबंध गावाचा चेहरामोहरा बदलवण्यास हातभार लावतो. स्वत संगणकाच्या व्यवसायात कार्यरत असल्यामुळे शूटिंग नसल्यावर यांना काय करावं हे टेन्शन नसतं. शूटिंगची तयारी म्हणजे नेमकं काय करावं लागतं? या प्रश्नावर मंदार म्हणतो, अनेकदा मुंबईला मीटिंगला येऊन चित्रपट काय आहे कशावर आधारलेला आहे, या अशा अनेक गोष्टींची माहिती मिळवावी लागते. लोकेशन्सचे फोटोग्राफ सादर करावे लागतात. हे एक प्रकारे प्रेझेंटेशन असते.
मेणवलीचा घाट हवाय पण थोडय़ा वेगळ्या अ‍ॅंगलने हवाय असं म्हटल्यावर त्याकरता आपण अधिक वेगळ्या पद्धतीने कुठून शूट करू शकतो याचा विचार केला जातो. स्थानिकांशी ओळखी कराव्या लागतात. स्थानिकांना हाताशी घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टी सहजशक्य होत नाही असं तो म्हणतो.
आज या व्यवसायाचं त्याला काहीच कुतूहल वाटत नाही. पहिल्या दोन वषार्ंत आपण  वेगळ्या क्षेत्रात काम करतोय असं सतत वाटायचं, पण आता मात्र हे सवयीचं झालेलं आहे. आर्टिस्टकडून मिळालेली दाद कामाचा शीण घालवते. पुन्हा नव्या दमाने आणि जोमानं कामासाठी सज्ज होतो, असं तो म्हणतो.  
वाई हे पर्यटन स्थळ नाही. त्यामुळे शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचं साधन म्हणजे शूटिंग. यामुळे इथल्या दुधवाल्यापासून ते लॉन्ड्रीवाल्यापर्यंत अनेक व्यवसाय जोमाने वाढू लागले आहेत. अगदी शूटिंगच्या वेळी लागणाऱ्या साध्या गोळ्या, बिस्किटांसमवेत इतर अनेक गोष्टींची निकड भासू लागली आहे. गावात असणारे कॅटरिंगवाले पूर्वी फक्त लग्नासाठी जेवण पुरवायचे ते आता या शूटिंगच्या ४० दिवसांची उत्तम व्यवस्था करू लागले आहेत.
गावात ज्यांची पूर्वी रिक्षा होती त्यांनी खास शूटिंगच्या निमित्ताने ये-जा करण्यासाठी उपयोग होईल म्हणून आता मोठय़ा गाडय़ा घेतल्या आहेत. शूटिंगची व्यवस्था करण्यासाठी खास या गाडय़ा घेतल्या गेल्या आहेत. पूर्वी या गावाची ओळख पेन्शनर्सचं गावं अशी होती. आज या गावाला स्वतची एक वेगळी ओळख लाभली आहे. लाइट, कॅमेरा, अ‍ॅक्शनचे धडे गिरवत हे गाव स्वतची एक वेगळी ओळख निर्माण करू लागलेय. इथली तरुण पिढी उदरनिर्वाहाची अनेक नवीन माध्यमं शोधू लागली आहेत. राजा आणि मंदारसारखे अनेक चेहरे गावात होणाऱ्या शूटिंग कंपन्यांना काय हवं, काय नको हे पाहण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
हिंदी चित्रपटांची नावे..
‘सिंघम’, ‘स्वदेस’, ‘ओंकारा’, ‘मृत्यूदंड’, ‘इश्किया’, , ‘गंगाजल’, ‘अपहरण’, ‘दबंग’.  
मराठी- हुप्पा हुय्या, देऊळ, तुकाराम, शाळा, कुटूंब इ.
दिवसाकाठी स्थानिकांचे उत्पन्न-
ज्युनियर आर्टिस्ट- अंदाजे ३०० ते ५०० रुपये.
जमाव म्हणून उभे राहिल्यास- अंदाजे २५० ते ३०० रुपये.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो