.. एक मच्छर इन्सान की जिंदगी बदल सकता है!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

.. एक मच्छर इन्सान की जिंदगी बदल सकता है! Bookmark and Share Print E-mail

सायली तामणे ,सोमवार, ११  जून  २०१ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

करिअर आणि पैसा यामागे जीव खाऊन पळत सुटलेल्या भाऊगर्दीत असे काही प्रकाशाचे कवडसे आपल्याला दिसतात, जे आपले ज्ञान, शिक्षण आणि  कौशल्यांचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी वेगळ्या वाटा निवडतात. समाजभान जोपासत प्रत्यक्ष कामात उतरलेल्या अशा काही निवडक तरुणाईची  ओळख करून देणारे मासिक सदर-
सु रुवातीलाच चारुता गोखले हिच्या करिअरचा प्रवास आणि या लेखाचे शीर्षक यांचा संबंध स्पष्ट करायला हवा. तो असा की, सध्या चारुता आदिवासी भागातील मलेरिया या (मच्छरांमुळे पसरणाऱ्या!) रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काम करते. पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांपेक्षा निश्चितच वेगळी व आव्हानपूर्ण करिअर तिने निवडले. आपले शिक्षण व समाजातील गरजा याची सांगड घालत तिने स्वत:साठी एका वेगळ्याच करिअरची निर्मिती केली आहे.
‘द लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नलने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे १२ लक्ष लोक मलेरियाने मृत्युमुखी पडतात. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर गडचिरोली हा जिल्हा मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेला (एन्डेमिक) जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुळातच मागासलेला तसेच जंगल आणि नक्षलवाद यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यातील आदिवासींना मलेरियाचा बीमोड करायला मदत करण्यासाठी चारुता गडचिरोलीत येऊन पोहोचली आहे.  
महानगरीय वातावरणात लहानाची मोठी झालेली चारुता जेव्हा शिकायला घराबाहेर पडली तेव्हा तिला ती शिकत असलेल्या ज्ञानाचा संदर्भ हळूहळू स्पष्ट होऊ लागला आणि सोबतच या ज्ञानाचा उपयोग कशासाठी व कोणासाठी करायचा, हा प्रश्न तिला पडायला लागला. ‘या ज्ञानाचे नेमके काय करू,’ हे ठरवायची वेळ आली तेव्हा तर प्रत्यक्ष एखाद्या समस्येशी चारहात करून पाहायला पर्याय नाही, असे तिला वाटले आणि चारुताने लगेच गडचिरोली गाठले.
तसा ‘निर्माण’मुळे तिचा गडचिरोलीशी संबंध या आधीच आला होता! सन २००६ साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी सुरू केलेली ‘निर्माण’ ही प्रक्रिया युवकांना समाजातील विविध प्रश्नांकडे बघायची दृष्टी देते व स्वत: कृती करायची प्रेरणा आणि मार्गदर्शन देते. समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि आपले व्यावसायिक कौशल्य यांची सांगड कशी घालता येईल, या दृष्टीने निर्माणी प्रयत्न करतात. या गटाचा भाग असल्याने चारुतालाही हुरूप आला व तिने गडचिरोलीतील मलेरिया ही समस्या काम करण्यासाठी निवडली.
गेल्या वर्षांपासून चारुता ही डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेत आदिवासी गावांतील मलेरिया नियंत्रणावर काम करत आहे. चौफेर जंगल आणि भाताची शेती असल्यामुळे समस्येची तीव्रता खूपच आहे! या दोन्ही गोष्टी नष्ट करणे शक्य नाही. तरीही मलेरिया कमी करणे मात्र गरजेचे आहे. मायक्रोबायोलॉजी शिकताना प्रयोगशाळेच्या अति नियंत्रित वातावरणात सूक्ष्मयंत्राखाली जंतू न्याहाळण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजात, हाडामासांच्या माणसांमध्ये मलेरियाच्या ‘प्लास्मोडियम फॅल्सिपेरम’ या जंतूचे थमान बघणे हा तिच्यासाठी अगदीच वेगळा अनुभव होता. या वास्तवाचा सामना करणे हे चारुतापुढचे आव्हान होते. त्यामुळे प्रयोगशाळेतून बाहेर पडून प्रत्यक्ष आदिवासी गावांमध्ये जाऊन समस्येची अचूक नाडी पकडणे हा तिच्यासाठी शिकण्याचा चांगलाच अनुभव ठरला. आता आदिवासी पाडे हीच तिची प्रयोगशाळा बनली आहे. मलेरियाबद्दल जनजागृती करणे, औषधात बुडवलेल्या मच्छरदाण्यांचा प्रसार करणे, ताप आलाच तर त्वरित निदान करता यावे, यासाठी ‘रॅपिड डायग्नोस्टिक किट’चा उपयोग करणे, गरोदर स्त्रिया व लहान मुले यांसाठी ‘केमोप्रोफॅलॅक्सिस’ व गावपातळीवरील आरोग्य कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण अशा विविध अंगांनी चारुता सध्या काम करत आहे.
चारुताचे काम सध्या गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील ४५ गावांमध्ये सुरू आहे. कामाच्या सुरुवातीला तिने या ४५ गावांमधील लोकांचे मलेरियासंदर्भात मत व समज यांचा अभ्यास आणि नोंदी केल्या. त्याला शास्त्रीय भाषेत के. ए. पी. - ‘- knowledge, attitude, practice'  स्टडी असे म्हणतात. मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी प्रामुख्याने पाच स्तरांवर काम केले जात आहे. १. मच्छरदाण्यांचे वाटप, त्याचा उपयोग व्यवस्थित होतो आहे की नाही, यासंबंधीच्या नोंदी, लोकांच्या अडचणींवर त्यांना योग्य सल्ला देणे इत्यादी. २. लोकसहभागाच्या मार्गाने जनजागृती करणे. ३. मलेरियाचे निदान अधिक लवकर- प्राथमिक पातळीवर व्हावे,  यासाठी प्रयत्न करणे ४. फवारणी करणे. ५. ‘सर्च’च्या फिरत्या दवाखान्याशी व नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्राच्या मदतीने लोकांना मलेरियावर त्वरित व योग्य उपचार उपलब्ध करून देणे.
सुरुवातीला सर्व गावांमध्ये सभा भरवून त्यांना मलेरियाबद्दल माहिती दिली जाते. नंतर गावकऱ्यांच्याच सहभागाने पुढील टप्प्यांची आखणी केली जाते. सर्व ४५ गावांसाठी एक मॉडेल प्रोग्राम निर्माण करणे व राबवणे हे आव्हान चारुताने स्वीकारले आहे.  
शाळा, कॉलेजमध्ये इतकी वर्षं शिकून, माहितीचे ओझे बाळगूनही सध्याचे शिक्षण हे आपल्याला आत्मविश्वास देतेच, असे नाही. बहुतांश वेळेला या शिकण्यामागचे प्रयोजनच कळत नसते आणि आपल्या मातीतल्या समस्या समजून घेण्याची संधीही मिळत नसते. चारुताला मात्र हा सुवर्णमध्य गाठता आला आहे. मायक्रोबायोलॉजी शिकताना संसर्गजन्य रोगांबद्दल ती शिकली होती. त्याचा उपयोग मलेरियासारख्या संसर्गजन्य रोगाशी लढताना तिला पदोपदी झाला. तसेच सार्वजनिक आरोग्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेताना शिकलेल्या अनेक संकल्पना -participatory approach, mass scale spread of disease, public behaviour इत्यादींमुळेच तिला आदिवासी लोकांसाठी त्यांना बरोबर घेऊन काम करता आले.
चार भिंतींच्या बाहेर पडले तर असंख्य अनुत्तरित प्रश्न आ वासून उभे असलेले दिसतात. या समस्या कपोलकल्पित नाहीत. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला कदाचित अजून वाट बघावी लागेल. परंतु, तोपर्यंत वैयक्तिक कृती आणि सामाजिक बांधीलकी मात्र गोठवून ठेवायची गरज नाही. शेवटी करिअर म्हणजे फक्त पसा कमावणे नाही. स्वत:च्या ज्ञानाचा, कौशल्यांचा, अनुभवाचा योग्य वापर करून स्वत:च्या व इतरांच्या गरजापूर्ण करणे, समाजातील प्रश्न सोडविणे, हे खरे करिअर. चारुताचा प्रवास हा याचेच प्रत्यंतर देतो आणि म्हणूनच तो कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.
 चारुताचा मेल - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

alt
चारूता गोखले

जन्म - डोंबिवली!
शिक्षण - मुंबईतील सेंट झेव्हियर्समध्ये मायक्रोबायोलॉजी या विषयात!
पदव्युत्तर शिक्षण - पुण्यात मास्टर्स इन पब्लिक हेल्थ!
सध्या - मुक्काम पोस्ट गडचिरोली!