लालकिल्ला : अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा महिना
मुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा महिना
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लालकिल्ला : अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा महिना Bookmark and Share Print E-mail

 

सुनील चावके - सोमवार, ११ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भाजप वा संघ परिवाराला ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’चा प्रत्यय नवा नाही. वाजपेयी-अडवाणीं मतभेद होतेच. मात्र, त्यात विचारधारा आणि पक्षहिताला प्राधान्य असल्याने ते भाजपला मागे नेणारे ठरले नाहीत, हे लक्षात घ्यावे लागेल..
दिल्लीत उन्हाळ्याची सुरुवात मे महिन्यापासून होते आणि जून-जुलै महिन्यांत उन्हाची तीव्रता शिगेला पोहोचते. देशाचा अर्थसंकल्प पारित करण्यासह सर्व राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर दिल्लीतील राजकीय नेत्यांसाठी श्रमपरिहाराचा सीझन सुरू होतो.

त्यामुळे सततचे राजकारण करून तापलेली डोकी शांत करण्यासाठी तमाम बडे नेते सिमला, मनाली, मसुरी, नैनिताल, श्रीनगर, धर्मशाळासारख्या उत्तर भारतातील थंड हवेच्या ठिकाणी किंवा कुठला ना कुठला बहाणा काढून अतिथंडगार युरोपच्या दिशेने मार्गस्थ होतात. अशा परदेशवाऱ्यांमुळे प्रतिस्पर्धी पक्षांसोबत कायम सुरू असलेल्या राजकीय संघर्षांला तात्पुरता विराम मिळतो, पण त्याला अपवाद भारतीय जनता पक्ष. तसेही अंतर्कलह हा भाजपला जडलेला असाध्य रोग आहे. तंबाखूच्या सेवनामुळे दुर्धर आजार होणार याची पूर्वकल्पना असूनही त्याचे व्यसन लागलेल्या व्यक्तीप्रमाणे प्रत्येक उच्चपदस्थ भाजप नेत्याला अंतर्कलहाचे अतीव आकर्षण आहे. महत्त्वाकांक्षी नेत्यांची वाढती गर्दी, वानप्रस्थासाठी पात्र ठरलेल्या बुजुर्ग नेत्यांचा दैनंदिन कारभारातील हस्तक्षेप आणि आवश्यकतेपेक्षा जास्त पक्षांतर्गत लोकशाही असल्यामुळे भाजपमधील कलह अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत उठून दिसतो.
उन्हाच्या झळा आणि चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य देशवासीयांप्रमाणे काटकसरीचे जीवन जगत असल्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात उन्हाळ्यात स्वाभाविक वैफल्य खदखदत असते. जून महिन्यातील दिल्लीच्या भीषण उन्हाळ्यापासून दूर युरोपातील गारव्यात पोहोचूनही मनात दाटलेली ही खदखद काही केल्या शमत नाही आणि तापलेले डोके शांत होत नाही, कारण आरोप-प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या माध्यमातून अभिव्यक्तीचे प्रकटीकरण हा भाजप नेत्यांचा आवडता उद्योग. तसाही भाजपच्या मानसिक जडणघडणीवर जून महिन्याचा अतिशय गहिरा प्रभाव आहे. दिवंगत इंदिरा गांधींनी याच जून महिन्यात देशावर आणीबाणी लादून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली तेव्हा भाजपच्या आदल्या अवतारातल्या जनसंघातील असंख्य संवेदनशील मनांनी या हुकूमशाही वृत्तीचा उघडपणे किंवा भूमिगत राहून सर्व शक्तिनिशी प्रतिकार केला आणि १९ महिन्यांनंतर इंदिरा गांधींचे ऐतिहासिक राजकीय पतन घडवून आणले. भाजपची खरी सात्त्विक आणि राजकीय शक्ती ३७ वर्षांपूर्वीच्या या यशातच एकवटली आहे. आज पक्षातील नव्या पिढीला भलेही या पूर्वेतिहासाचे भान नसेल, त्यांच्या लेखी आणीबाणी इतिहासजमा झाली असेल, पण आणीबाणीविरुद्धच्या (दुसऱ्या स्वातंत्र्याच्या) लढय़ात सामील होऊन काँग्रेसविरोधी सत्ताकारणात प्रस्थापित होणाऱ्या बेइमान समाजवाद्यांप्रमाणे भाजप पथभ्रष्ट झालेला नाही. वयोवृद्ध लालकृष्ण अडवाणी दरवर्षी न चुकता जून १९७५ सालच्या नोस्टाल्जियात पोहोचून आपल्या राजकीय वारसांना आणीबाणीच्या स्मृतिदिनाचे स्मरण करून देत असतात. परिणामी भाजपसाठी जून महिना हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महिना ठरला आहे. देशवासीयांप्रमाणेच भाजपमधील नव्या पिढीसाठी आणीबाणी विस्मृतीत जमा होत असली तरी ‘खलनायिका’ इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात नित्यनेमाने आगपाखड करण्याची सवय लागलेल्या भाजप नेत्यांना दरवर्षी जून महिन्यात कोणाला तरी टार्गेट करायची खुमखुमी होते. अशा स्थितीत जून महिन्यात दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते उपलब्ध नसतील तर भाजपचे नेते स्वपक्षीयांनाच लक्ष्य करून आरोप आणि कुरघोडय़ांतून मिळणारा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा परमानंद पदरी पाडून घेतात.
मोहन भागवत संघाचे सरसंघचालक होऊन तीन वर्षे लोटली असतील, पण संघपरिवारात जून महिन्यातील अभिव्यक्तीच्या अखंड अशा ‘सामूहिक श्रीमद् भागवत सप्ताहा’ची ही परंपरा तीन दशके जुनी आहे. इंदिराविरोधी लाटेवर स्वार होऊन सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई सरकारच्या पतनाची सुरुवात ३३ वर्षांपूर्वी याच जून महिन्यात झाली होती. त्या वेळी संघाचे सदस्यत्व सोडण्याचा दबाव झुगारताना वाजपेयी-अडवाणींनी मोरारजी सरकारमधील मंत्रीपदांचे राजीनामे देणे पसंत केले होते आणि त्याची परिणती जुलै १९७९ मध्ये मोरारजी सरकार गडगडण्यात झाली होती. तेव्हापासून सत्तेत असो वा नसो, जून महिन्यात कुठला ना कुठला राजकीय धमाका करण्याचे भाजप नेत्यांना जणू व्यसनच लागले.
गेल्या दहा-बारा वर्षांत तर भाजपला मुळासकट हादरविणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद जून महिन्यातच झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश घटनांच्या केंद्रस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राहिले आहेत. १९९९ साली लोकसभेत मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान अवघ्या एका मताच्या फरकाने वाजपेयींनी केंद्रातील १३ महिन्यांची सत्ता गमावली, पण त्याच वर्षी जून महिन्यात शिगेला पोहोचलेल्या कारगिल युद्धामुळे देशवासीयांनी त्यांना पुन्हा सत्तेत आणून बसविले. २००१ मध्ये पाकिस्तानातील सत्तासूत्रे हाती घेतल्याघेतल्या लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याशी मैत्रीचा जुगार खेळण्याची उपरती वाजपेयींना जून महिन्यातच झाली होती आणि त्यातूनच आग्रा शिखर परिषदेच्या फसगतीची भारतावर नामुष्की ओढवली होती. मुशर्रफ यांच्याशी हातमिळवणीचा प्रस्ताव अडवाणींना मंजूर नसल्यानेच ही शिखर परिषद फसल्याचे आजही मानले जाते. त्याच दरम्यान वाजपेयींच्या दुसऱ्या गुडघ्यावर ब्रीच कँडी इस्पितळात शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांच्या ‘अनुपस्थिती’त कधी नव्हे ती काळजीवाहू पंतप्रधान बनण्याच्या अडवाणींच्या इच्छेची पूर्तता झाली. पंतप्रधान होण्याच्या आशेने सतत हात चोळत अस्वस्थ राहणाऱ्या अडवाणींना सरतेशेवटी उपपंतप्रधान म्हणून इतिहासात आपले नाव ‘नोंदविण्याची’ संधी मिळाली तीही २००२ च्या जून महिन्यातच. याच वर्षी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपची सुमार कामगिरी झाल्याने भाजपमध्ये अपेक्षेप्रमाणे कलह उद््भवला आणि उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदावरून कलराज मिश्रा यांची तर राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निष्क्रिय जना कृष्णमूर्ती यांना घालविण्यासाठी जून महिन्याचाच मुहूर्त निवडण्यात आला. कृष्णामूर्तींच्या जागी एम. वेंकय्या नायडू यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तडजोडीचा भाग म्हणून कृष्णमूर्ती यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले. आपण अत्यंत कष्टाने बांधलेल्या सदनात वाजपेयींनी कर्तापुरुष म्हणूून दिमाखाने वावरणे अडवाणींना मान्य नव्हते, पण विचारधारा आणि पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला वारंवार मुरड घातली. तरीही ही महत्त्वाकांक्षा अनेकदा उफाळून आली. त्या वेळी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अडवाणी समर्थक एका चाणक्याने अटलजींची तब्येत सतत ढासळत असल्याचा सविस्तर वृत्तांत जगप्रसिद्ध ‘टाइम’ नियतकालिकाच्या जून २००२ च्या अंकात पत्रकार अ‍ॅलेक्स पेरीच्या सौजन्याने छापून आणल्याची वदंता आहे. झारीतील शुक्राचार्यावर सूक्ष्म नजर राखणाऱ्या वाजपेयींनी मग यथावकाश या चाणक्याला आपल्या मंत्रिमंडळातून रजा देत पक्षकार्यासाठी भाजपमध्ये पाठवले आणि अ‍ॅलेक्स पेरीला विमानतळावर गाठून इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यथोचित मनस्ताप दिला. शेवटी ‘टाइम’ला वाजपेयींची दिलगिरी व्यक्त करणे भाग पडले. जून २००२ मध्येच अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्दय़ावरून विश्व हिंदूू परिषदेचे अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया वाजपेयींवर हल्ला चढवीत होते. वाजपेयी न डगमगता आपल्या परिवारातून होत असलेल्या या चौफेर हल्ल्यांना सामोरे जात होते, पण वाजपेयींची सद्दी संपविण्याची अडवाणींची जिद्दही संपली नव्हती. अडवाणींचे हनुमान बनलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी २००४ सालची लोकसभा निवडणूक भाजप वाजपेयींसोबतच अडवाणींच्या चेहऱ्यावर लढणार असल्याची घोषणा केली आणि वाजपेयींचा पारा भडकला. ‘ना टायर्ड, ना रिटायर्ड’ या त्यांच्या अविस्मरणीय वाक्याने अडवाणींचे अवसान पार संपुष्टात आणले आणि नायडूंना पळता भुई थोडी झाली. हेही जून महिन्यातच घडले. पुढे वर्षभरानंतर वाजपेयी सरकारचा लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला आणि जून महिन्यात मनालीच्या थंडाव्यात पराभवाचे चिंतन करताना वाजपेयींनी नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून न हटविणे ही भाजपसाठी घोडचूक ठरल्याची भावना व्यक्त केल्याने भाजपमध्ये नेहमीप्रमाणे कलह माजला. त्याच महिन्यात मुंबईत झालेल्या चिंतन बैठकीनंतर भाजप कार्यकर्ते ‘अब की बारी, अटलबिहारी’ अशा घोषणा देत असताना आता ‘आता नको बारी, पुष्कळ झाले’ अशी गुगली टाकत वाजपेयींनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. अडवाणींनी पाकिस्तानचे जन्मदाते महमद अली जिनांच्या कराचीतील मजारवर स्तुतिसुमने उधळून भाजपच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीत जून महिना सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवला. हजारो निष्पापांच्या कत्तलीसाठी आणि भारताच्या फाळणीसाठी जबाबदार असलेल्या जिनांना ‘सेक्युलर’ ठरविण्याची अडवाणींनी केलेली नालस्ती भाजप-संघपरिवाराला ४४० व्होल्टस्चा शॉक देणारी ठरली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या अडवाणींना संघाच्या वतीने त्यांचेच संघटन महामंत्री संजय जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला. अडवाणींच्या दृष्टीतून संजय जोशींच्या हातून पवित्र गाईच्या हत्येपेक्षाही मोठे पातक घडले होते. त्याचा दंड त्यांना सहा महिन्यांनंतर तथाकथित सीडीकांडात आरोपी ठरवून देण्यात आला. दुसरीकडे जिनांवरील स्तुतिसुमनांची प्रेरणा देणारे सुधींद्र कुलकर्णींचाही बळी देण्यात आला. त्यानंतरही दरवर्षी जून महिन्यात भाजपमध्ये कलह माजतच राहिला. २००७ च्या जून महिन्यात प्रतिभाताई पाटील यांची यूपीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा होताच आपले अंतर्कलह विसरून भाजप नेत्यांनी अडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर यथेच्छ चिखलफेक केली. जून २००८ मध्ये भाजपला भारत-अमेरिका अणुसहकार्य करारावर सरकारचे दिवसरात्र वाभाडे काढण्याची संधी मिळाली. एवढे करूनही भाजपसाठी जून २००९ क्लेशदायकच ठरला. अडवाणींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकांमध्ये आलेल्या सलग दुसऱ्या अपयशाने भाजपमध्ये सुंदोपसुंदी माजली. त्यात अडवाणींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागले. अडवाणींची पसंती नसलेल्या नितीन गडकरींच्या हाती राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. गडकरी यांची तीन वर्षांची पहिली टर्म संपण्यापूर्वीच त्यांना दुसरी टर्म मिळणार असल्यामुळे अडवाणींनी ब्लॉगद्वारे रोष व्यक्त करीत भाजपने पेट्रोल बंदच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदवर पाणी फेरले. संजय जोशींचे पक्षातील पुनरागमन मोदी-अडवाणींना खुपत असल्यामुळे गुजरात आणि दिल्लीमध्ये पोस्टर युद्ध भडकवून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. भाजपची वाटचाल ‘निश्चित’ करणाऱ्या अशा अनेक घटना जून महिन्यात घडल्या आणि त्यात पक्षातील अनेक नेत्यांना आपल्या ‘कल्पकते’चा आविष्कार करण्याची संधी मिळाली. जून १९७५ पासून लाभलेले हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य इष्टापत्ती की आपत्ती, याचे चिंतन करण्याची वेळ भाजपवर नक्कीच आली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो