आनंदयोग : प्रकाशाची उपासना..
मुखपृष्ठ >> लेख >> आनंदयोग : प्रकाशाची उपासना..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आनंदयोग : प्रकाशाची उपासना.. Bookmark and Share Print E-mail

 

भीष्मराज बाम ,बुधवार, १३ जून  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

प्रकाश त्याच्या  वाटेत आलेल्या वस्तूंना वेढून टाकत पुढे जात असतो. त्यामुळे प्रकाश जसा वाढत जाईल तसे वस्तूंचे आकार आणि रंग स्पष्ट होत जातात. प्रकाश नुसता पाहण्याने उत्साह वाटत असेल, तर त्याची उपासना केल्याने उत्साहवृद्धी का नाही होणार!
मुंबईत महाराष्ट्र वीज मंडळाची एक बैठक त्यांच्याच कार्यालयात होती. लिफ्टमधून वर जात असताना एकदम साऱ्याच इमारतीतले दिवे गेले.

लिफ्ट दोन मजल्यांमध्ये अडकली. आम्ही १२ जण लिफ्टमध्ये होतो. सुरक्षारक्षकांना लिफ्ट अडकल्याचे ध्यानात आल्यावर त्यांनी वायर ओढून लिफ्ट वरच्या मजल्यावर आणली. जवळपास १५ मिनिटे आम्ही त्या लिफ्टमध्ये होतो. मिट्ट काळोख म्हणजे काय असते ते अनुभवायला मिळाले. वरच्या मजल्यावर एका दालनात मेणबत्ती लावलेली होती. तिचा प्रकाश थोडासा व्हरांडय़ात पडलेला होता. त्या तेवढय़ा मिणमिणत्या प्रकाशाचाच केवढा आधार वाटला होता.
लहानपणी आम्ही गच्चीवर झोपायला जात असू. तेव्हा उशाशी कंदील बारीक करून ठेवलेला असे. पण आभाळातल्या चांदण्या पाहाता पाहाता झोप कशी लागे ते कळत नसे. वडील पहाटे उठून खाली जात तेव्हा कधी कधी जाग येई. आभाळात रंगीबेरंगी चित्रे रेखाटणाऱ्या उषेचे दर्शन होई आणि पहाटे सर्व जगावर पसरणाऱ्या प्रकाशाची जादू अनुभवता येई. अश्विनी देवता प्रकाश सरळ वर घेऊन जातात. मग उषा देवता त्या प्रकाशाचे जाळे विणत त्याला पृथ्वीतलावर घेऊन येते. त्या देवतेचे स्वागत पक्षी आपल्या किलबिलाटाने करतात. पहाटे सूर्योदयापूर्वी जागे होणारे पशुपक्षी जो आवाज लावतात त्याला हिंकार असे म्हटले जाते. त्यामध्ये आपल्या उपासनेचा ओंकार आपण मिसळायचा असतो.
रात्रीच्या काळोखाला आपले डोळे सरावले की भोवताली असलेल्या झाडांचे आकार काळ्या रंगातच जाणवतात. पहाटे उषा देवीसोबत आलेला अंधुक प्रकाश त्यांचे आकार अधिक स्पष्ट करतो. प्रकाश आपल्या वाटेत आलेल्या वस्तूंना वेढून टाकत पुढे जात असतो. त्यामुळे प्रकाश जसा वाढत जाईल तसे वस्तूंचे आकार आणि रंग स्पष्ट होत जातात. गुलमोहराच्या झाडाच्या फांद्या, पाने, फुले, शेंगा हे आपापल्या आकारात आणि रंगात प्रतिष्ठित होतात. पूर्व दिशेला रंगांची उधळण करून उषादेवी पुढे निघून गेलेली असते. सूर्यबिंब वर येण्याआधी प्रकाशाचा झळाळ नजरेला पडतो. ही सूर्याचा सारथी अरुण याची किमया असते. ती दिसली म्हणजे आता सूर्य देवता दर्शन देणार याची ग्वाही मिळते.
मग भगवान सूर्यनारायण स्वत: प्रगट होतात. त्यांचे दर्शन प्रभात आणि संध्या समयालाच घ्यायचे असते. कारण आपले तेज त्यांनी आवरलेले असते. त्याचा आपल्या डोळ्यांना त्रास होत नाही. हा प्रकाशाचा तेजोमय नाटय़प्रयोग पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला रोज पाहावयास मिळतो. जागे होऊन आपापल्या कामाला लागण्याची सूचना करीत उषादेवी पश्चिमेकडे जात असते तर सूर्याच्या मागोमाग काम आवरते घेऊन विश्रांतीच्या तयारीला लागण्याची सूचना करीत संध्यादेवी येते, तेव्हा पश्चिमेच्या आकाशात रंगांची उधळण चालू असते.
पतंग उडवण्याचा नाद असल्याने हिवाळ्यातल्या बऱ्याच सायंकाळी गच्चीवरच जात. तेव्हा संध्यादेवीच्या प्रकाशनाटय़ाची जादू पाहायला मिळत असे. मोकळ्या आकाशातल्या उषादर्शनाचा योग बाबा आमटय़ांसोबत हेमलकशाला गेलो असताना आला. जंगलातल्या घराच्या अंगणात खाटा टाकून निजण्याचा अनुभव वेगळाच होता. पिलू, अनू आणि मोक्षा या बाबांच्या तीन नातवंडांनी माझ्या गंजलेल्या नक्षत्रज्ञानाची परीक्षा घेतली. माझी काही उत्तरे चुकल्यावर त्यांनी मोठय़ाने हसून गोंधळ घातला. मग त्यांचे शिष्यत्व पत्करून सगळे समजून घेण्याला पर्यायच नव्हता. अभूत पूर्व असे उषादर्शन आणि नद्यांच्या काठावर घेतले गेलेले संध्यादर्शन मन:पटलावर अजून कोरलेले आहे. बाबा आमटे त्या दृश्याबद्दल म्हणाले होते, ‘‘हे निसर्गसौंदर्य पाहिल्यावर ऋषींना उपनिषदे लिहिण्याचा मोह आवरला नसावा असे वाटते.’’
दिल्लीला असताना एका बैठकीहून परतत होतो. माझी काहीच चूक नसताना मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोष दिला होता त्यामुळे मन उद्विग्न झालेले होते. धौला कुआँ भागांत एका सिग्नलजवळ गाडी थांबली आणि माझे लक्ष आकाशाकडे गले. नुकताच पाऊस पडून गेला होता. समोर एक पांढरा शुभ्र स्तंभाच्या आकाराचा ढग स्वच्छ सूर्यप्रकाशांत न्हाऊन निघाला होता. त्याचे तेज अक्षरश: डोळे दीपवणारे होते. मी गाडी बाजूला उभी केली आणि काही वेळ शांतपणे ते दर्शन अनुभवले. माझी उद्विग्नता कोठल्या कोठे नाहीशी झाली आणि मी आनंदात ऑफिसमध्ये पोहोचलो. नवल म्हणजे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मला फोन आला. त्यांच्या ध्यानात आले होते की माझी चूक नसताना मला दोष दिला गेला होता. त्यांनी चक्क माझी माफी मागितली. माझ्या उल्हसित वृत्तीत आणखी भर पडली. वरिष्ठांच्या खास अधिकारांबद्दल मी नर्म विनोद केला. त्यावर ते म्हणाले, ‘‘तू इतक्या मोकळेपणाने हसू कसा शकतोस? माझ्या बाबतीत असे घडले असते तर मी आठवडाभर संतापलेलाच राहिलो असतो.’’ मी अर्थातच प्रकाशदर्शनाचे गुपित तेव्हा त्यांना सांगितले नाही. पण नंतर त्यांनी ते माझ्याकडून काढून घेतलेच.
वंदना अत्रे ही चांगली लेखिका आणि पत्रकार. माझ्या लिखाणात आणि अनुवादाच्या कामात तिची चांगलीच मदत होत असते. तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि तेही बऱ्याच उशिरा ध्यानात आले. अर्थातच तिला चांगलाच धक्का बसला आणि ती विषण्णतेच्या गर्तेत गेली. मी तिला म्हटले, ‘‘तू इलाज करून घेत आहेस ना? तुझ्या मनाची कणखरता वाढवण्यासाठी काही उपासना उपयोगी पडतील. मी रोज सकाळी ठीक सहा वाजता तुझ्याकडे येईन. आपण त्या उपासना करत जाऊं.’’
दुसऱ्या दिवसापासून आमचा प्रयोग सुरू झाला. वंदना, तिच्या घरची मंडळी, तिच्या एक दोन मैत्रिणी यांच्याबरोबर रोज सकाळी तासभर उपासना होत असे. हलकासा व्यायाम, प्राणायाम, ध्यान आणि प्रार्थना असे त्या उपासनेचे स्वरूप होते. २/३ दिवसांनंतर असा काही प्रयोग चालू असल्याची बातमी फुटली आणि उपासनेला येणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाऊन हॉलमध्ये जागा पुरेनाशी झाली. मग आमच्या घरासमोरच्या एका इमारतीच्या गच्चीवर आम्ही जमायला लागलो. तीन आठवडे अगदी नियमित हा प्रयोग चालू राहिला. मलाही एक नवाच अनुभव मिळाला. आम्ही सूर्याच्या ध्यानापाशी पोहोचत असू तेव्हा सूर्य उगवून दर्शन देत असे. मन आनंद आणि उल्हासाने भरून जात असे.
वंदना घेत असलेल्या उपचारांना यश आले आणि ती पूर्ण बरी झाली. मग तिच्या आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या आग्रहाखातर मी अधूनमधून कॅन्सरच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना व्याख्यान देऊ लागलो. आता तर वंदना आणि इतर काही बऱ्या झालेल्या रुग्णांनी एक कॅन्सर सपोर्ट ग्रूपच तयार केला आहे. प्रकाशाच्या उपासनेचा फायदा आता इतरांनाही होतो आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो