करिअरिस्ट मी : जगणं हेच करिअर
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : जगणं हेच करिअर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : जगणं हेच करिअर Bookmark and Share Print E-mail

रसिका मुळ्ये ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
छान आयुष्यात २५ वर्ष पदव्या कमावण्याची, पुढची २५ वर्षे पैसा कमावण्याची, आपण किती गोष्टी गमावल्या याचा अंदाजही लावता येणार नाही असा हा साचा म्हणजे करिअर हे कुणी ठरवलं? आयुष्यात ज्यावेळी जे महत्त्वाचं आहे, ते मनापासून करणं म्हणजे करिअर असं सांगणारे डॉ. अनिल अवचट. त्यावरच मार्गक्रमणा करणाऱ्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र चालवणारी मुक्ता पुणतांबेकर आणि ‘सहवेदना’ ही एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी काम करणारी संस्था चालवणारी यशोदा वाकणकर या त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य सावरणाऱ्या दोघी. जगण्यातच करिअर करणाऱ्या बाप-लेकींची ही गोष्ट!
‘‘पहिला नंबर मिळवण्यात काय आहे? तू नापास होऊन दाखव.. नापास झालीस की जग कळेल,   पराभव कसा पचवायचा ते कळेल..’’ आपल्या अत्यंत हुशार मुलीला असा सल्ला देणारे वडील आणि ‘‘आपलं जगणं हेच खरं करिअर..’’ वडिलांकडून हे तत्त्व उचलून येणारा प्रत्येक क्षण सकारात्मक बनवणाऱ्या लेकी.. डॉ. अनिल अवचट आणि त्यांच्या मुली मुक्ता पुणतांबेकर आणि यशोदा वाकणकर यांची ओळखच प्रत्येक क्षण जगणारे आणि जगणं म्हणजेच करिअर मानणारी व्यक्तिमत्त्व अशी करून देता येईल.
डॉ. अनिल अवचट, डॉ. अनिता, मुक्ता आणि यशोदा.. तसं पाहायला गेलं, तर डॉ. अवचटांचं चौकोनी कुटुंब. आपल्या मुलींच्या करिअरबद्दल अगदी त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांनीही स्वप्न पाहिली होती; पण ती स्वप्न ही वेगळी होती, अगदी त्यांच्या कुटुंबासारखीच! मुलींनी जग अनुभवावं, त्यातून काय घ्यायचं, काय टाकायचं हे त्यांचं त्यांनीच ठरवावं आणि एक समृद्ध माणूस व्हावं; असा माणूस ज्याला समाधान म्हणजे काय ते कळलेलं असेल आणि समृद्ध आयुष्य हेच त्यांचं करिअर व्हावं’.. असं काहीसं ते स्वप्न ! हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत घातलं. त्या दोघींनाही या शाळांनी सामाजिक जाणीव करून दिली. डॉ अवचट सांगतात ‘‘मुलं ही निसर्गाने सोपवलेली एक खूप लोभस जबाबदारी आहे, पण काही काळासाठीच! त्यांना जपणं, त्यांच्यामधल्या ‘माणसा’ ला हळुवार फुंकर घालून उमलवणं.. ही मुख्य जबाबदारी. त्यांना कोण व्हायचंय? कसं व्हायचंय? हे त्यांचं त्यांनी ठरवावं. मुलं पडतील, धडपडतील, आपली आपण पुन्हा उभी राहतील.. त्यातूनच शिकत जातील आणि मग आपोआप समृद्ध होत जातील. मुळात करिअर ही संकल्पनाच कशी तयार झाली असेल, हाच मला प्रश्न पडतो. छान आयुष्यात २५ वर्ष पदव्या कमावण्याची, पुढची २५ वर्षे पैसा कमावण्याची, आपण किती गोष्टी गमावल्या याचा अंदाजही लावता येणार नाही असा हा साचा म्हणजे करिअर हे कुणी ठरवलं? मुळात करिअर आणि जगणं हे वेगळं नाहीच. आयुष्यात ज्यावेळी जे महत्त्वाचं आहे, ते मनापासून करणं म्हणजे करिअर. मी माझ्या मुलींना साधं सजेशनही कधी दिलं नाही. करिअर हा शब्दच आमच्याकडे नव्हता.’’
पदव्यांची चळत मिळवण्यापेक्षाही कठीण अशा करिअरचा विचार अवचटांनी मुलींबद्दल केला होता, पण अगदी हा विचारही त्यांनी मुलींवर कधी लादला नाही. त्यांच्या दोन्ही मुलींनीही हे करिअर अगदी आनंदाने आणि स्वेच्छेने निवडले. यातूनच मग फुललं एक छान नातं.. चौकटीत बसवता येणार नाही असं, अनेक पदर असलेलं.. कधी बाप-लेकीचं, कधी सवंगडय़ाचं, कधी गुरू-शिष्याचं! याच नात्याच्या बळावर येणारा प्रत्येक क्षण या बाप-लेकीने जगला, प्रत्येक क्षणाकडे सकारात्मकपणे पाहिलं. यशोदाचं किंवा अनिता अवचटांचं आजारपण असेल, मुक्तांगणमध्ये उभ्या राहिलेल्या अडचणी असतील, प्रत्येक अडचणीला या कुटुंबाने खंबीरपणे तोंड दिलं.
यशोदाला ‘एपिलेप्सी’ चा आजार होता. या आजारावर मात करून तिने कमर्शिअल आर्टमधली पदवी मिळवली. आज ती ‘सहवेदना’ ही एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी काम करणारी संस्था चालवत आहे. बाबांबद्दल यशोदा सांगते, ‘‘आमच्यासाठी आमचे आई आणि बाबा वेगळे नव्हतेच. आम्हाला दोघांनीही खूप वेळ दिला. मी आजारी होते म्हणून मला कधी काही वेगळी ट्रिटमेंट मिळाली नाही. आम्हाला कधीच बाबांनी हे कर, ते कर असं साधं सुचवलंही नाही, पण त्यांना बघत, नकळत आम्ही शिकत गेलो. मी नातं म्हणजे काय ते शिकले, आई-बाबांची केमेस्ट्री पाहूनच मी सहजीवन म्हणजे काय ते शिकले. माझ्या करिअरमध्ये बाबांचं स्थान खूप मोठं आहे, कारण बाबांनी मला जगण्याचं मूल्य दिलं आणि म्हणूनच ‘करिअर म्हणजे काय, तर बाबांना अपेक्षित असलेलं समृद्ध, समाधानी आयुष्य.. हे मला कळलं.’’
मुक्ता अभ्यासू ! पहिलं यायचं, मार्क्‍स मिळवायचे, खूप अभ्यास करायचा.. अशा विचारांची ! बाबा तिला सांगायचे ‘मुक्ता चल, आज शाळा बुडव.. आपण खेळूया भरपूर! आणि त्यावर मुक्ता गंभीरपणे उत्तर द्यायची ‘‘बाबा नाही हं! अजिबात शाळा बुडवणार नाही. खूप महत्त्वाचं शिकवणारेत आज ..!’’ जेव्हा आठवीतल्या मुक्ताने ‘‘मी उद्यापासून शाळेत जाणार नाही ’’ असं जाहीर केलं त्यावेळी या घरात आकांड-तांडव, रागवारागवी, चिडचिड, आरडाओरडा, काळजी, समजावणं.. असं काहीही घडलं नाही. बाबा म्हणाले, ‘‘ठीक आहे.’’ ही भूमिका अगदी मुक्तालाही थोडीशी अनपेक्षितच होती. शाळेत न जाता बाबांबरोबर सगळीकडे फिरत असताना एकदा बाबांनी विचारलं, ‘‘मुक्ता शाळेत जाणार नाही, हे सांगितलंस, पण का ते नाही..?’’ गणित विषय आवडत नाही, असा शाळा सोडण्याच्या निर्णयाचा उलगडा झाला.’’. बाबा म्हणाले, ‘‘मलाही गणित येत नाही. फार ‘ढ’ आहे मी गणितात. आपण दोघेही जरा बघूया असं का होतं ते..’’ पुढे मुक्ता बारावीला राज्यात मुलींमध्ये तिसरी आली. क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एमए केलं आणि आज मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा ती कणा आहे.
मुक्ताची एक आठवण बाबा सांगतात, ‘‘एकदा मुक्ताच्या परीक्षेच्या वेळी, पेपरच्या आदल्या दिवशी शेजारच्या बाई मुक्ताकडे फुटलेला पेपर घेऊन आल्या होत्या. तेव्हा मुक्ताने त्यांच्या तोंडावरच दार लावून घेतलं होतं. त्यावेळी मला खूप समाधान वाटलं, कारण माझ्या लेकीला ‘यश’ म्हणजे काय ते कळलं होतं. तिला जगण्याचं मूल्य कळलं होतं. तिच्या सगळ्या पदव्या, शिक्षण या सगळ्यांपेक्षाही माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं.’’
मुक्ताला यश म्हणजे काय हे नेमकं कळलं होतं, म्हणूनच पीएचडी आणि मुक्तांगणमधील काम यापैकी मुक्तांगणमध्ये काम करण्याचा पर्याय मुक्ताने स्वीकारला. पीएच डीसाठीचे फिल्डवर्क करण्यासाठी म्हणून मुक्ता व्यसनमुक्ती केंद्रात जायला लागली आणि आईबरोबर तेथील कामात गुंतत गेली. ‘समाधानी, समृद्ध आयुष्य म्हणजे करिअर किंवा आपलं जगणं म्हणजे करिअर’ अशी काही व्याख्या मुलींना कधी कुणी शिकवली नव्हती. बाबांना पाहात, अनुभव घेत या मुलींच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पना समृद्ध होत गेल्या.
बाबांच्या आणि तिच्या नात्याबद्दल मुक्ता सांगते, ‘‘आई आणि बाबा दोघंही वेगळेच होते. लहानपणी कधी कधी आपल्याकडे असं कसं काय? आपले बाबा कधी चिडत कसे नाहीत, असे प्रश्न पडायचे. पण आज जेव्हा काऊन्सिलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस पाहते, त्यावेळी ‘आम्ही वेगळे आहोत’ याचा अभिमान वाटतो.  बाबा म्हणजे माझ्यासाठी एक पंचिंग बॅग आहेत, ते माझे काऊन्सिलर आहेत. एकदा मुक्तांगणमध्ये कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी नुकतीच आईही गेली होती, ‘मुक्तांगण’ची घडी विस्कटली होती. अशा वेळी काय करायचं ते मला कळतच नव्हतं. बाबा थोडे मऊ पण त्यांनी त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकदम कडक भूमिका घेतली. बाबांची भूमिका मला नेहमीच वेगळं काही शिकवून जाते. बाबांच्यात आणि आम्हा मुलींच्यात मतभेदही खूप आहेत, कारण आम्ही स्वतंत्र विचार करू शकतो. अशी स्वतंत्रपणे विचार करण्याची संधीही आम्हाला आई-बाबांनी दिली. आज पालक म्हणून भूमिका निभावताना आणि आजूबाजूचे इतर पालक पाहताना मला बाबांनी आमच्यात नकळतपणे रुजवलेला करिअर बाबतचा, आयुष्याबाबतचा दृष्टिकोन प्रकर्षांने कळतो आहे.’’ डॉ. अवचटांनी नकळतपणे दाखवून दिलेल्या करिअरच्या वेगळ्या वाटेवर आज त्यांच्या दोन्ही मुली चालत आहेत आणि ‘जगण्याचं करिअर घडवत आहेत.’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो