आनंदाचं खाणं : फूड फॅड - चांगलं की वाईट?
मुखपृष्ठ >> आनंदाचं खाणं >> आनंदाचं खाणं : फूड फॅड - चांगलं की वाईट?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आनंदाचं खाणं : फूड फॅड - चांगलं की वाईट? Bookmark and Share Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , शनिवार, १६ जून २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कॉलेजवयीन मुलांना आपल्या शरीराचं फारच कौतुक असतं. कुठल्याशा हीरो-हीरॉइनसारखं ते असावं हे वाटण्यात गैर नाही. मात्र प्रत्येक व्यक्ती  वेगळी असते. आपल्या वयाचा, आपल्या वजनाचा, राहणीमानाचा नीट विचार करूनच खाण्याचं वेळापत्रक ठरवायला हवं.
माझ्या मनात परवा एक विचार आला - खूप गमतीशीर आहे, पण सत्य आहे. आपल्याला काही आजार झाला की डॉक्टरचा सल्ला घेणं अगदी मस्ट आहे. म्हणजे डोकेदुखी/ सर्दीसारखा आजार नाही बरं का. आपली गाडी बिघडली की बोनेट उघडून ‘फॉल्ट’ शोधण्याचा आपण एक निष्फळ प्रयत्न करतो किंवा उगीचच खाली वाकून टायर/ इंजिनमध्ये कुठे काही सापडतंय का या दृष्टीने खटाटोप करतो. पण शेवटी ‘मेकॅनिक’ला पर्याय नसतो. घराचं रंगरंगोटीचं काम असू दे किंवा साधी चप्पल दुरुस्त करायची असू दे - त्या त्या कामामध्ये प्रवीण असलेलेच आपल्याला मदत करू शकतात. मग आपल्या आहाराच्या बाबतीत आपण एवढे निष्काळजी का राहतो? सांगण्याचा मुद्दा असा की, माझ्या मित्राने सांगितलं की ‘ही’ पावडर खा - स्नायू बळकट होतील किंवा मैत्रिणीने सांगितलेला आहार घेतला की वजन कमी होईल - अशा सूचना आपण अगदी काटेकोरपणे पाळतो. मग असा सल्ला आपल्या शरीराच्या/ आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याची पडताळणी कोण करणार?
परवा माझ्याकडे एक रुग्ण आली होती - वय वर्षे १८. तिच्यावर टी.बी.साठी उपचार सुरू होते. वजन अगदी शाळेतल्या मुलीला लाजवेल एवढे कमी. विचारल्यावर कळलं, वजन कमी करायच्या मागे लागल्याने आहार एकदम कमी केला. जेवताना एकाच पोळीमध्ये भागतं. भात विचारायचाच नाही आणि नाश्ता करायला वेळ नाही. दूध पिण्यासाठी आता काही लहान नाही. फळं आणि भाज्या मनापासून आवडत नाहीत. हे सगळं विश्लेषण दिलं तिच्या आईबाबांनी. खूप काळजीत होते. एका महिन्यात १० किलो वजन तर कमी झालं, पण टी.बी.सारखा आजार झाला. ‘‘चांगली खाणारी मुलगी अचानक खाणं टाळायला का लागली कळलंच नाही’’ इति आई-बाबा.
माणूस खूप अनुकरणप्रिय आहे हे कुठेतरी मी वाचलं होतं. कॉलेजला जाणाऱ्या मुला-मुलींमध्ये अनुकरण पटकन करायची किमया असते. कोणीतरी ‘झीरो फिगर’ केली मग मी का नाही म्हणून जेवण कमी किंवा बंद होत किंवा कोणीतरी ‘६ पॅक्स’ कमावले तर लगेच जीमला जायची तयारी होते, पण या घाई-गडबडीत मित्रमैत्रिणींनो तुम्ही एक गोष्ट विसरता - ती ही की आपण प्रत्येकजण ‘युनिक’ आहोत म्हणजे आपल्यासारखी दुसरी व्यक्ती असूच शकत नाही, मग जो आहार किंवा दिनचर्या दुसरे फॉलो करतात तेच आपल्याला कसं लागू होईल?
मैत्रिणींनो तुमच्यासाठी :
प्रत्येकाचं वजन हे उंची, शारीरिक कसरत, शरीराची ठेवण आणि वयानुसार बदलते. म्हणून बारीक दिसण्याच्या नादापायी- मुलींनो, खाणं कमी किंवा बंद करू नका. कारण वयाच्या १८ वर्षांपर्यंत शरीरात वाढीची प्रक्रिया चालू असते. त्यासाठी लागणारे अन्नघटक योग्य प्रमाणात गेले नाहीत तर त्याचे दुष्परिणाम लगेचच किंवा/ आणि काही वर्षांनंतर दिसून येतात. लगेच आढळणारे दुष्परिणाम हिमोग्लोबिनची कमतरता, अशक्तपणा, कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती, निस्तेज त्वचा, केस गळणे, एकाग्रता कमी होणे, कारण नसताना चिडचिड होणे वगैरे नंतरच्या वर्षांत होणारे दुष्परिणाम. टी.बी., अ‍ॅनिमियासारखे आजार, अनियमित मासिक पाळी ज्याचे दुष्परिणाम भविष्यामध्ये गर्भारपणामध्ये होऊ शकतात. मी मागे एकदा सांगितलं होतं की, आपलं शरीर आपल्याशी संवाद साधतं. जर वजन कमी करण्याच्या नादामध्ये योग्य प्रमाणात कबरेदके, प्रथिने, फॅट्स, जीवनसत्त्व, मूलद्रव्य दिले गेले नाहीत तर वर दिलेली लक्षणं दिसू लागतात. आपल्याला कळण्यासाठी! आपण कुठेतरी चुकत आहोत. मुलींनो दुर्लक्ष करू नका. योग्य आहार आणि व्यायामाने वजन आटोक्यात राहू शकतं. वजन काही मुलींसाठी एकदम कमीच असतं. जर तसं असेल तर वजन का कमी आहे आणि आहारामध्ये काय बदल करणं जरुरी आहे ते समजून घ्या. लक्षात ठेवा - योग्य वजनाबरोबरच कोणतीही इतर लक्षणं नसणं हे आरोग्याचं योग्य रूप आहे जे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच साथ देईल.
मित्रांनो तुमच्यासाठी :
कोणत्याही ‘हीरो’सारखी शरीरयष्टी कमावण्याची इच्छा असणे यात गैर काहीच नाही. फक्त त्यासाठी योग्य मार्ग वापरणे गरजेचे आहे. आपल्या आहाराच्या वेळा आणि प्रमाण आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे हव्यात. कबरेदके आणि आहारातील फॅट्स एकदम कमी करून प्रथिने एकदम वाढवणे योग्य नाही. आहार नेहमी संतुलित हवा आणि प्रथिनांचे प्रमाण आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे हवे. मित्राने प्रोटिन पावडर चालू केली म्हणून आपणही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय सुरू करू नये. व्यायामाच्या आधी किंवा नंतर किती प्रमाणात कबरेदके घ्यावीत हे नीट समजून घ्या, जेणेकरून शरीरातील रक्ताची पातळी नीट राहील. वजन कमी किंवा जास्त करायचे असल्यास आधी समजून घ्या की कोणत्या कारणाने वजन जास्त/ कमी आहे. चुकीचा आहार की व्यायामाचा अभाव? मगच योग्य तो बदल करा. अशा संतुलनामुळे कोरडे केस, चेहऱ्यावर मुरुमे, बद्धकोष्ठता, चिडचिडेपणा वगैरे आपोआपच कमी होईल.
कॉलेजवयीन मुलामुलींसाठी अन्नघटकांचे दिवसभरातील प्रमाण
(उंची/ वय/ शरीरयष्टी/ व्यायाम इ.प्रमाणे बदल होईल)
धान्य : ७-८ वेळा (सर्व्हिंग)
गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी, राजगिरा वगैरे
१ चपाती/ १ वाटी भात/ १ प्लेट पोहे = १ सर्व्हिंग
डाळी/ कडधान्ये : २-३ सर्व्हिंग
तूर, मूग, कुळीथ, मसूर, चवळी, राजमा, चणे वगैरे
१ वाटी (शिजवलेली डाळ/ उसळ) = १ सर्व्हिंग
भाज्या : २-३ सर्व्हिंग (सर्व प्रकारच्या मोसमी भाज्या)
फळ : २-३ (सिझनल फळ)
बदाम/ अक्रोड/ मनुका/ अंजीर/ जर्दाळू/ खजूर वगैरे ड्रायफ्रूट्स : १ सर्व्हिंग
दूध किंवा दुधाचे पदार्थ : २-३ सर्व्हिंग
१ कप दूध/ १ छोटी वाटी दही = १ सर्व्हिंग
तेलबिया/ तेल/ साखर = योग्य प्रमाणात
कॉलेजवयीन विद्यार्थ्यांसाठी एक आहार तक्ता :
(केवळ उदाहरणादाखल देत आहे - प्रमाण/ वेळा बदलू शकतील)
सकाळी उठल्यानंतर : १ ग्लास कोमट पाणी
नाश्ता : १ ग्लास गाईचे किंवा सोयाबीनचे दूध (शक्यतो साखर नाही), ४-५ ग्लास, भिजवलेले बदाम/ २ अक्रोड + २ चमचे मनुका / २ अंजीर/ २ जर्दाळू. घरी बनविलेला नाश्ता (ब्रेड/ बिस्किट सोडून)
मधल्या वेळी : १ फळ/ नारळ पाणी (क्वचित फळांचा रस)
दुपारचा डबा/ जेवण : कोशिंबीर + चपाती + भाजी
घरी असल्यास = डाळ + दही / ताक
डब्यासाठी = सोयाबीनमिश्रित चपाती, मोड आलेली उसळ
संध्याकाळी = दूध/ लस्सी + फळ +
घरचा नाश्ता किंवा सुका नाश्ता जसे चणे-शेंगदाणे/ चिवडा/ खाकरा/ चिक्की वगैरे
रात्रीचे जेवण : कोशिंबीर, चपाती, भात, भाजी, डाळ/ उसळ, ताक
झोपताना : दूध किंवा फळ
मित्रमैत्रिणींनो, माझा तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला आहे. तरुणपणी चुकीचा/ अयोग्य आहार घेतला तरी कदाचित तुम्ही लगेच आजारी पडाल असे नाही. पण त्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसून येतात आणि जेव्हा दिसून येतात तेव्हा कदाचित शरीराचं नुकसान भरून काढण्यापलीकडे जाऊ शकतं. म्हणून ‘आपला आहार’ कसा आणि किती असावा हे योग्य तज्ज्ञाकडून जाणून घ्या. ''Prevention is better than cure''हे तुम्ही ऐकलं आहेच ना?  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो