स्त्री समर्थ : अथक प्रवास ‘विश्रांती’चा!
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : अथक प्रवास ‘विश्रांती’चा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : अथक प्रवास ‘विश्रांती’चा! Bookmark and Share Print E-mail

डॉ. प्रिया अमोद ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तिचं नाव विश्रांती; परंतु आयुष्याने तिच्या वाटय़ाला दिला तो अथक प्रवास. स्वत:ला जगवण्याबरोबरच तिने गावातल्या अनेकींना स्वत:च्या पायावर उभं केलं. त्यासाठीही तिला त्रास सहन करावा लागला. प्रसंगी गोड बोलून तर कधी धमकी देऊनही कामं करवून घ्यावी लागली. विश्रांतीच्या या प्रवासाबाबत..
कुणीही थक्क होईल, असा विश्रांती भुसनरचा प्रवास आहे. संकटाला मुळी दादच द्यायची नाही हा तिचा खाक्या. ‘बचतगट’ हा शब्द विश्रांतीसाठी जणू परवलीचा शब्द बनला आणि विश्रांतीने आपलं आणि आपल्या गावातल्या स्त्रियाचं आयुष्यच बदलून टाकलं.
मंगळवेढय़ातलं गोणेवाडी हे विश्रांतीचं माहेर. तिसरीत असताना आई वारली. वडिलांनी आजोळी आणून सोडलं आणि ते मजुरी करायला दूर निघून गेले. आठवीपर्यंत शिकल्यावर आजीने विश्रांतीला सून करून घेतलं. धाकटय़ा मामाशी विश्रांतीचा १५ व्या वर्षी विवाह झाला. २० व्या वर्षांपर्यंत आदित्य आणि सौरभ ही दोन मुलं झाली. नवरा व्यसनी, दारू प्यायचा. मारायचा. विश्रांतीला स्वत:ची लाज वाटायची. आपण शेतात खुरपायला जातो. कष्ट करतो, पण नवरा काही करत नाही. आपण अनाथ म्हणून व्यसनी नवऱ्याशी लग्न लावून दिलं गेलं.. तिला आयुष्याचा खूप राग यायचा..
आयुष्य कसं बदलेल या विचारात असतानाच २००४ च्या एप्रिल महिन्यात शिरढोण (ता. पंढरपूर) मधील दाजी भुसनर या प्रगतिशील शेतकऱ्याने विश्रांतीला त्यांच्या शेतात कामावर असताना बचतगटाविषयी माहिती सांगितली. विश्रांतीने आपल्या मैत्रिणींना तीच माहिती दिली. पंचायत समितीत जाऊन आणखी माहिती घ्यायची ठरलं. विश्रांतीने नवऱ्याला विचारलं, ‘मी पंचायतीत जाऊ का?’ नवऱ्याने विरोध केला, पण विरोधाला न जुमानता विश्रांतीने पंचायतीत जाऊन माहिती घेतली. माहिती मैत्रिणींना सांगितली. घरी आल्यावर नवऱ्याला कळलं, त्याने विश्रांतीला मारलं. एवढंच नव्हे तर घराबाहेर काढलं. रात्रभर ती दारातच बसून राहिली आणि दुसऱ्या दिवशी तशीच कामावर गेली. गावातल्या चार बायकांनी येऊन नवऱ्याला समजावलं, आपण बचतगटात काम करणार नाही, अशी हमी दिल्यावर नवऱ्याने विश्रांतीला घरात घेतलं. पण त्यामुळे मागे हटेल, ती विश्रांती कसली?
विश्रांतीच्या डोक्यातून बचतगटाचा विषय मुळी गेलाच नव्हता. मंगळवारी आठवडय़ाच्या बाजारादिवशी विश्रांतीने मैत्रिणींना एकत्र केलं, सगळ्याजणी बँकेत गेल्या आणि ‘माय्याक्का महिला बचत गट’ या नावे बँकेत खातं उघडलं. प्रत्येकीचे ५० रुपये भरले. घरात आल्यावर विश्रांती आणि तिच्या आणखी दोन मैत्रिणींना मार मिळाला. दुसऱ्या दिवशी दोघीजणी येऊन ‘बचत गटातून आपलं नाव कमी कर’ म्हणून विश्रांतीला विनवू लागल्या. विश्रांतीने त्यांना धीर दिला. आपण गुपचूप पैसे भरू आणि सगळ्यांना बचतगट बंद केला असं सांगू. विश्रांतीने मैत्रिणींची समजूत काढली.
सहा महिने गुपचूपपणे बचतगट सुरू राहिला. एक दिवस पंचायत समितीत विस्तार अधिकारी आले. त्यांनी गावात आल्यावर ‘विश्रांती भुसनर कुठे राहते?’ एवढं विचारलं. झालं, ही गोष्ट विश्रांतीच्या नवऱ्याच्या कानावर गेली. त्याने तिला मारायला सुरुवात केली. ‘त्या सायबानं तुजच कसं नाव इचारलं? तुजं  नि      त्याची भानगड हाय’ असे आरोप केले. कुणाच्याही शेतात कामावर जायला बंदी केली, बचतगट बंद करण्याविषयी हमी घेतली. इतकंच नाही तर दारूविक्रीचा व्यवसाय करायला लावला. विश्रांतीने नवऱ्यापासून लपून विस्तार अधिकाऱ्यांना परिस्थिती सांगितल्यावर, त्यांनी तुमच्या बचतगटाला २५ हजार रुपये कर्ज मिळालं आहे, असा दिलासा दिला. विश्रांतीला २५ हजार रुपयांचा चेक मिळाल्यावर गावातले सगळेजण तिच्याकडे यायला लागले. बचतगटाची माहिती घ्यायला लागले.
मिळालेल्या कर्जातून बचतगटासाठी दहा उस्मानाबादी शेळ्या आणि एक बोकड घेतला. विश्रांतीने गावात दारिद्रय़रेषेखालचे आणखी दहा बचतगट सुरू केले. सगळ्यांचा हिशेब लिहिणे, मीटिंग घेणे हे काम करायला लागली. झालं, नवऱ्याचा जळफळाट सुरू झाला. एका रात्री विश्रांतीच्या नवऱ्याने ‘शेताला पाणी द्यायला पायजे, पंप सुरू करायला जाऊ या’ म्हणून तिला मध्यरात्री नदीवर नेलं. नदीत उतरून विश्रांती पंप सुरू करायला लागली तर आधारासाठी वर बांधलेला पदर त्याने सोडला आणि विश्रांतीला नदीत ढकलून दिले. ती वर येऊ लागली. की नवरा वरून मारायला लागला. अंधारात तशीच अर्धा किलोमीटर काठाकाठाने ती वाहत गेली. एका खांबाला धरून पाण्यात लपली. थोडय़ा वेळाने नवरा निघून गेल्यावर पोहत वर आली. गावातल्या एका भल्या कुटुंबात रात्रभर राहिली. इकडे तिच्या नवऱ्याने सकाळी उठून, ‘विश्रांती बचतगटाच्या सायबाबरोबर पळून गेली’ असा कांगावा केला. गाव गोळा झाला. इतक्यात विश्रांती आणि तिला रात्रभर आश्रय दिलेलं कुटुंब आलं. गावकरी सगळे अवाक् झाले. मग नवरा म्हणू लागला ‘ही असली बचतगटाचं काम करणारी बायकू मला नको. मी दुसरं लग्न करणार.’ लोकांनी समजावले पण त्याचा आपला एकच ठेका. विश्रांती पुढे झाली, तिने नवऱ्याला घटस्फोट द्यायची तयारी दर्शविली. मुलांच्या शिक्षणासाठी दोन एकर शेती आपल्या नावावर करून द्यावी, असा प्रस्ताव मांडला. पंच कबूल झाले. विश्रांती दोन मुलांना घेऊन शेजारीच वेगळं राहू लागली.
विश्रांतीने आणि बचतगटातील महिलांनी जोरात काम सुरू केले. इतर
बचतगटांना गायी-म्हशी घेण्यासाठी कर्ज मंजूर झाले. त्यामुळे गावात विश्रांतीला अनुकूल मत तयार झालं. पूर्वी महिलांना चोरून भेटावे लागायचे, शेतात मीटिंग घ्याव्या लागायच्या. आता तो अडथळा उरला नाही. विश्रांतीला आपण काहीतरी वेगळा व्यवसाय करावा, असे वाटत होते. सोलापूरला सिद्धेश्वरच्या यात्रेत सगळ्या बचतगटाचे अध्यक्ष माहिती घ्यायला गेले होते. तिथे जाऊन विश्रांतीने बऱ्याच व्यवसायांची माहिती घेतली. तोवर गावात ‘निर्मलग्राम’ योजना आली. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी विश्रांतीही झटू लागली. ग्रामसेवक म्हणाले, पहिल्यांदा तुम्ही शौचालय बांधा, विश्रांतीने आपल्या घरी गावातले पहिले शौचालय बांधले. शौचालय बांधायला वीट आणि वाळू लागते, वाळूचा प्रश्न नव्हता. गाव नदीकाठी असल्यामुळे मुबलक वाळू होती. विश्रांती, मैना भुसनर आणि यशोदा भुसनर या तिघींनी वीटभट्टी सुरू करायचं ठरवलं. बँक म्हणाली आम्ही वीटभट्टीसाठी कर्ज देऊ शकत नाही. सगळ्या बचतगटांकडून थोडे थोडे पैसे कर्जाऊ घेतले. माढय़ाचे आमदार धनाजी तात्या साठे यांनी दहा हजारांचे बगॅस, एक ट्रक कर्जाऊ दिले. मैना, यशोदा आणि विश्रांतीच्या शेतात वीटभट्टी सुरू झाली. विश्रांतीला वीटभट्टीवर काम करण्याचा अनुभव उपयोगी आला. गावात घरोघरी शौचालय बांधायला विश्रांतीने सवलतीच्या दरात विटा दिल्या. गाढवांकडून नदीतील वाळू वाहून आणली, जमेल तेव्हा पैसे फेडण्याचा वायदा झाला. वीटभट्टीला जोरदार यश मिळाले. गेली तीन वर्षे विश्रांतीचा हा व्यवसाय जोरात सुरू आहे. आज विश्रांती विविध शासकीय बांधकामांना वीटपुरवठा करते. स्वत: जाऊन निविदांची माहिती घेते. कुणी दाद दिली नाही तर माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागते. नऊ अंगणवाडय़ा, पशुधन दवाखाने यांच्या बांधकामासाठी तिने विटा पुरविल्या आहेत. तिच्या गावाला ‘निर्मलग्राम पुरस्कार’ही मिळाला आहे.
पंढरपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृहाला सकस आहारपुरवठा करण्याचे कंत्राट विश्रांतीच्या बचतगटाला मिळाले आहे. शिरढोण पंढरपूरपासून तीन किलोमीटरवर असल्यामुळे विश्रांती रोज तिकडे जाते. सकाळी आठ वाजता स्कुटी चालवत ती पंढरपूरच्या बाजारात जाऊन सफरचंद, अंडी, चिकन आदी खरेदी करते. दोन्ही वसतिगृहांना पोहोचविते. गावी येऊन निराधार महिलांच्या पेन्शनचं काम इतर शासकीय योजनांची माहिती घेते. वीटभट्टीवर देखरेख, हिशेब एवढी कामे झाली की पुन्हा चार वाजता पंढरपूर. वसतिगृहाची खरेदी करून पोहोचती करते.
विश्रांती शेतकरी संघटनेचे काम धडाडीने करते. ‘मी ऊसकरी शेतकरी आहे, मला उसाला दर पाहिजे तर मी आंदोलन केले पाहिजे’ ही तिची भूमिका. तीन वर्षांपूर्वी शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या होत्या. विश्रांतीच्या बचत गटाने अडीच लाख रुपयांचा चारा पुरवला होता. एकूण सगळ्यांचे बिल ८६ लाख रुपये होते. मागणी करूनही बिल मिळत नव्हते. सगळ्या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन मागणी केली. सर्वानुमते एक वेगळीच चाल खेळायचे ठरले. इतरांना तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षाबाहेर नेले. विश्रांती हळूच कक्षात गेली आणि आतून कडी लावून घेतली. ‘‘आत्ताच्या आत्ता आमचं बिल द्या. नाहीतर मी साडीने पंख्याला फास लावून आत्महत्या करणार’ असा विश्रांतीने पवित्रा घेतला. मोठी गडबड उडाली, ‘बाहेर ये’ असं सगळे म्हणू लागले, पण विश्रांती ऐकेना. जिल्हाधिकारी आले, ‘चार दिवसांत बिल देतो’ म्हणाले, विश्रांती म्हणाली, ‘‘तुम्हाला एका दिवसात ५० लाख रुपये खर्चायचा अधिकार आहे. चेक द्या.’’ शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी ५० लाखांचा चेक दिल्यावरच विश्रांती बाहेर आली.
बचतगटाचा मंत्र मिळाल्यानंतर प्रत्येक अडचणीवर मात करीत विश्रांतीने विलक्षण प्रगती केली आहे. वीटभट्टीवर मिळालेल्या पैशांतून तिने  दीड एकर शेत घेतले आहे. २० तोळे सोने घेतले आहे. आपल्या नवऱ्यालाच ती महिना दोन हजार रुपये देते, घरात किराणा भरते. तोही वीटभट्टीवर काम करतो. आपल्या दोन्ही मुलांना तिने पंढरपूरला एमआयटी गुरुकुलच्या निवासी शाळेत ठेवले आहे. दोघांची मिळून वर्षांची अडीच लाख रुपये फी विश्रांती आज चेकने भरते. आयकर रिटर्न, पॅनकार्ड, एटीएम कार्ड हे सगळं वापरते. मुलं सुट्टीला घरी आली की त्यांना शेतात वीटभट्टीवर काम शिकवते. कष्टांचा विसर पडू नये हाच त्यामागचा उद्देश. विश्रांतीने आपल्या पतीच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलीच्या नावावरही २५ हजार रुपयांची ठेव ठेवली आहे.
विश्रांती गावातल्या प्रत्येक कामात पुढे असते. झाडे लावणे, ग्रामस्वच्छता, दारूबंदी, तंटामुक्ती या सगळ्या कामात तिचा सहभाग असतो. महिला दिनादिवशी पंचायत समितीत विश्रांती भुसनरच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विश्रांतीला तेव्हा भरून आले. आपण काहीतरी करू शकल्याचे समाधान मनात दाटून आले. विश्रांती म्हणते, ‘‘मी अनाथ असल्याने माझ्या वाटय़ाला कष्टाचे जगणे आले, हाल झाले. निदान काही अनाथ मुलांच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून मला एक अनाथाश्रम काढायचा आहे.’’ विश्रांती तिचं हे स्वप्नं नक्की पूर्ण करील.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो