मुक्तायन : हळवा पहाड
मुखपृष्ठ >> मुक्तायन >> मुक्तायन : हळवा पहाड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुक्तायन : हळवा पहाड Bookmark and Share Print E-mail

मुक्ता बर्वे ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एरवी शांत- तटस्थ असलेले बाबा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ‘पहाड’ झालेले मी बघितले आहेत. माझ्या आई-बाबांच्या अशा स्वभावाशिवाय माझा भाऊ उत्तम चित्रकार आणि मी अभिनेत्री अशा अनवट वाटेवर चालूच शकलो नसतो. पण आता वयपरत्वे जाणवणारा फरक म्हणजे त्यांच्यातला वाढलेला हळवेपणा. कधीच डोळ्यात पाणी न आणणारे बाबा चक्क माझ्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतील सीन बघून हळवे झाले आणि तडक दुसऱ्या दिवशी माझ्या पुण्यातल्या प्रयोगाला हजर झाले. काही न बोलता पाच-दहा मिनिटं घोटाळले आणि डोक्यावर हात फिरवून बरी आहेस ना, काळजी घे म्हणून हलकेच निघून गेले.
गोड खाण्याची आवड आणि एकुणातच खाण्याची आवड मला माझ्या बाबांमुळे लागली. आंबा बर्फी खाईन तर चितळ्यांचीच, ताजी गरम जिलबी खाईन तर ‘काका हलवाईंचीच’; आंबा खायचा तर फक्त हापूस, मांडे जोशी स्वीटस्चे, खाकरा फक्त ‘कांता बेन’चा, रव्याचा लाडू केवळ आजीनं केलेला, खांडवी आणि गोडाचा शिरा फक्त आईच्या हातचा, श्रीखंड खायचं तर चक्का टांगून साग्रसंगीत सगळं व्हायला हवं. हे सगळं माझ्या बाबांचं म्हणणं.
माझे बाबा, वसंत गोविंद बर्वे. एकुणातच खूप नेटके आणि पर्टिक्युलर आहेत. जे काय करतील ते तब्येतीत, पण त्यांनी त्यांची शिस्त त्यांच्यापुरती मर्यादित ठेवली आहे. त्यांना वाचनाची आवड, त्यातल्या त्यात इतिहास विषय असला की मग विचारायलाच नको! वसईमधल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले, पण इंग्रजी भाषेबद्दल एक विशेष आपुलकी बाळगून असलेले. सतत इंग्रजीतले नवे शब्द त्यांचे अर्थ, त्यांचे उच्चार शोधत राहतात. इंग्रजीसाठी मोठमोठय़ा डिक्शनऱ्या आणि विविध माहितीसाठी मोठ्ठाले एनसायक्लोपडिया घेऊन बसले की, तासन्तास जागचे हलत नाहीत. स्वत:च्या कपडय़ांसाठी स्वत: मशीन लावतात. कपडे धुऊन वाळत टाकतात, स्वत: इस्त्री करतात. दहा उत्तम कपडे असले तरी मोजके दोनच कपडे वापरतात. (हा माझा त्यांच्यावरचा आरोप), अंमळ गॅजेट फ्रिक आहेत, कौतुकानं सफरचंद कापून दिलं तर नको म्हणतील पण हेच एखादं ‘अ‍ॅपल कटर’नामक काही यंत्र त्यांच्या हातात पडलं तर अगदी आवडीनं दिवसातून तीन-तीनदा सफरचंद खातील. इलेक्ट्रिक शेव्हरपासून पार केर काढण्यासाठीचा व्हॅक्युम क्लीनपर्यंत सर्व प्रांतातली यंत्रसामग्री त्याच्यामुळे घरात मुक्काम ठोकून आहे आणि त्यांचा पुरेपूर वापर केला जातो. माणसांपेक्षा त्यांचं यंत्रांवर जास्त प्रेम (माझ्या आईचे त्यांच्याविषयीच म्हणणं) लुटुपुटीच्या भांडणात गमतीत आईच्या तोंडून हमखास येणारं वाक्य हेच की, जेवढं प्रेम आणि काळजी या निर्जीव यंत्राची घेता ना तेवढी जिवंत माणसांची घ्याल तर फार बरं होईल म्हणावं!
खूप वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी टेल्को कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि निवृत्तीनंतरचं आनंदात चाललेलं, निवांत असं पुण्यातलं आयुष्य सोडून ते मुंबईत आले. आई आणि बाबा दोघेही आले. माझ्यासाठी आले. इकडे माणसांचा नवीन गोतावळा तयार केला. रमले. माझ्या मुंबईच्या घरात नवीन यंत्रांशी मैत्री केली. काही काळांनी ते नवीन छंदात स्वत:ला झोकून देतात. काहीकाळ स्वैंपाक शिकले, काही दिवस फक्त शब्दकोडी, काही काळ फक्त सुडोकू, काही काळ फक्त शेअर मार्केट, मध्येच जाऊन प्राणायाम शिकून आले. मुळात शिस्तीचे असल्याने रोज प्राणायाम करतात. काही गरजू आजारी लोकांना घरी जाऊन प्राणायाम शिकवायचे, मध्ये काही दिवस भाषा आणि वाणी स्वच्छ- सुंदर असल्यानं उच्चशिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचून दाखवायला जायचे, मध्ये काही दिवस इंग्रजी, मराठी भाषांतराचे काम करायचे या आणि अशा अनेक गोष्टी वेळ रिकामा घालवणं त्यांना पटत नाही आणि फार काळ एक काम करणं त्यांना आवडत नाही. कदाचित त्यांच्या कंपनीत कैक वर्ष रुक्ष पद्धतीत नोकरी करीत राहिल्याचा हा परिणाम असावा, पण जे काम हाती घेतील ते नेटक्या पद्धतीनं संपवतील. त्यांच्या नेटकेपणाचा एक दरारा आहे आम्हाला. अमुक गोष्ट अमुक पद्धतीनंच करायचं हा त्यांचा त्यांच्यापुरता अट्टहास ते आमच्यावर कधीच लादत नाहीत, पण त्यांच्यासमोर अघळपघळ काम करायला लागलं तर त्यांना फार काळ ते सहनही होत नाही.
शाळेच्या वह्य़ा-पुस्तकांना कव्हरं घालावीत तर बाबांनीच. भाजी चिरायला बसले तर बघत राहावं इतकं कांद्याची सुरी वेगळी, टॉमॅटोची वेगळी, बटाटा, कोबी फ्लॉवरची आणखीन वेगळी. कोशिंबीर करायचीय तर हा स्ट्रोक- सुकी भाजी असेल तर तो स्ट्रोक, रस्सा भाजी असेल तर त्याहून वेगळा स्ट्रोक, कपबशीच्या कडा काळ्या दिसल्या तर क्षणाचा विलंब न लावता लगबगीनं उठतील आणि लिक्विड सोपनं कप-बशा लख्ख करतील. तीच गोष्ट फरशीवरच्या डागाची. सकाळी दूध आईने तापवलं की, बाबांनी हे रिकाम्या झालेल्या पिशवीच्या कटवरून कळतं. एक नेटकं टूल कीट, स्टेपलर- त्याच्या एक्स्ट्रा पिना, पंचिंग मशीन, पांढरी- ब्राऊन रिकामी पाकिटं, रेव्हेन्यू स्टँप या रॅडम सामानाची बेगमी त्यांच्याकडे कशी काय असते आणि नेमक्या वेळेला ते त्या वस्तू कशा काय काढतात हे मला पडलेलं कोडच आहे.
रोजचा पेपर आजच्या तारीख-वारापासून ते पार हे वर्तमानपत्र येथे छापलेपर्यंत सर्व मजकूर वाचून काढतात. ही सगळी माहिती त्यांना का असते, ती कुठे स्टोअर होते, त्याचं पुढे काय होतं हे मला कळत नाही, पण अचानक कोणत्या तरी संदर्भात कधी मला समारंभात जायचं असतं, कोणाला भेटायचं असतं, काही वेगळ्या विषयावरचं नाटक-सिनेमा वाचायला येतो, कधी असेच लेख लिहिताना काही संदर्भ हवे असतात तेव्हा इंटरनेटवर सर्च मारावा तशी मी बाबांना फोन फिरवते आणि फोनच्या एका बटनावर सर्व माहिती उपलब्ध होते. (बाबांनी खरं तर पत्रकार व्हायला हवं होतं, दादाचं मत)
 माणसात राहून तसे स्वतंत्र जगतात. स्वत:च्या आयुष्याकडे अलिप्तपणे बघू शकतात. बालपणाविषयी बोलतात तेव्हा नॉस्टॅल्जिक होत नाहीत, उलट फारच विनोदी पद्धतीनं गमतीने वर्णन सांगतात. जणू काही आपण मालगुडी डेज बघतोय असं वाटत राहतं. त्यांचा आवाज मुळातच खूप मोठा आहे ते मूडमध्ये येऊन बोलू लागले की, आवाज आपोआप वाढत जातो. त्यांना मी गमतीत म्हणते, ‘बाबा तुम्ही जुन्या काळातले ‘नट’ असता तर तुमचा आवाज ‘वसंतरावी’ आवाज म्हणून फेमस झाला असता, भक्कम आवाजाच्या नटांना ‘वसंतरावी’ शैलीचा नट असं म्हटलं गेलं असतं. बाबांना हसताना बऱ्याचदा पाहिलंय, रडताना कधीच नाही. भरून आलं तर बाबा शांत होतात, पण डोळ्यात पाणी कधीच नाही. मुळातच आमच्या घरात लहान मुलांना रागवून मारून धाकधपटशा दाखवून शिस्त लावण्याची पद्धत नाहीच, पण त्यातून ओरडायचं झालं तर मुळात मोठ्ठा आवाज असलेले माझे बाबा त्या उलट अतिशांत संथ आवाजात, अतिशय मुद्देसूद बोलतात आणि त्यांच्या शांतपणाचीच भीती वाटते.
मी आणि दादा मोठे होत होतो आणि आई-बाबा-पालक असण्याच्या बरोबरीनेच आमचे मित्र-मैत्रीण होत होते, हे आमच्या नात्यातलं स्थित्यंतर फार सटल झालं, स्मुथ झालं.
आई-बाबा दोघेही नोकरी करायचे, दोघेही दमायचे, बाहेरची तशीच घरातली कामे कोणीही न ठरविता आपोआप त्यांच्यात वाटली गेली होती आम्ही चौघेही एकत्र असण्याच्या वेळात घरात गप्पाच्या मैफली रंगायच्या. आजही आम्ही घरची मंडळी जेव्हा एकत्र जमतो, तेव्हा वसंतराव खास त्यांच्या नर्मविनोदी पद्धतीनं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, भारताची शिक्षणपद्धती, पुरस्कार सोहळे खरं तर सर्वच विषयांवर हिरीरीने यथेच्छ भाष्य करीत असतात. माझ्या मित्र-मैत्रिणींशी त्यांची स्वतंत्र मैत्री होते. माझे अनेक मित्र-मैत्रिणी अनेकदा मला न सांगताच केवळ त्यांना भेटायला घरी येऊन जातात. कौतुक करतील तर खुल्या दिलाने. मी त्यांची मुलगी म्हणून कायम माझं काम चांगलंच आहे, असं म्हणतील असं नाही. जे वाटतं ते खरंखरं. मगाशी म्हटलं तसं स्वत:कडे तटस्थपणे बघणं त्यांना जमलंय. आमच्या दोघांच्याही (मी, दादा) आयुष्यातल्या कोणत्याही निर्णयाला त्यांनी कधीच विरोध केला नाही. निर्णय पक्का करण्यापूर्वी हा निर्णय घेतला तर त्यांच्या चांगल्या-वाईट परिणामांची शक्यता मात्र बोलून दाखवली. वेळोवेळी त्यांना शक्य त्या पद्धतीनं आमच्याही नकळत आमचा आधार म्हणून उभे राहिले.
 एरवी शांत- तटस्थ असलेले बाबा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ‘पहाड’ झालेले मी बघितले आहेत. माझ्या आई-बाबांच्या अशा स्वभावाशिवाय माझा भाऊ उत्तम चित्रकार आणि मी अभिनेत्री अशा अनवट वाटेवर चालूच शकलो नसतो.
बाबा एक गमतीशीर रसायन. ते त्यांच्या भावंडांमध्ये धाकटे, आम्हा चौघांत मोठे, पण त्यांच्यातलं धाकटं खोडकर मूल जास्त वेळा जिंकतं (हेल्थ कॉन्शन्स) स्वत:ची तब्येत, औषध, टापटीप प्रेमाने जपणारे बाबा, टी-शर्ट आणि ट्राऊजर्स हा त्यांचा ट्रेडमार्क, काळे-कुरळे केस, फिट्ट, ताठ असे ‘बर्वेकाका’ बघता बघता बर्वे आजोबा झालेत. वयपरत्वे आता जरी खांदे उतरलेत, केस पांढरे आणि काळे झालेत. पण त्याच्यातला ‘मिश्कील धाकटेपणा’ तसाच आहे. आता जाणवणारा फरक म्हणजे त्यांच्यातला वाढलेला हळवेपणा. कधीच डोळ्यात पाणी न आणणारे बाबा चक्क माझ्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतील माझा आणि विनय आपटेसरांचा वडील-मुलीचा सीन बघून हळवे झाले आणि तडक दुसऱ्या दिवशी माझ्या पुण्यातल्या प्रयोगाला मला न कळवता नाटकाच्या प्रयोगाआधी नाटय़गृहात येऊन माझ्यासमोर हजर झाले. काही न बोलता पाच-दहा मिनिटं घोटाळले आणि डोक्यावर हात फिरवून बरी आहेस ना, काळजी घे म्हणून हलकेच निघून गेले. नंतर आईकडून कळलं.या मालिकेतील राधा देसाई आणि महेश देसाई या वडील मुलीचे सीन बघून बाबा नेहमीच हळवे होतात.  एकदा त्यांनी विनय आपटेसरांना मेसेजही पाठवला. तुमचे सीन खूप सुंदर होतात. तुम्ही मुक्ताचे खरेच वडील वाटता अभिनंदन. मुक्ताचे खरेखुरे वडील.  मग उगाच काही कारणांनी, मुक्ता तिकडे नीट खाते-पिते ना, दुधात नाचणी सत्व वगैरे घ्यायला सांग, डोळे जरा खोल वाटले आज बघताना, वगैरे काहीतरी आईला सांगतात.
मला वाटतं सगळ्या मुलांना आपले आई-बाबा जगातले सुपर कुल आई-बाबा वाटतात तसेच मलाही. हा माझा पहिला लेख असेल, जो मी छापण्याआधी बाबांना वाचून दाखवला नाही आणि त्यांचं मत घेतलं नाही. हा त्यांनी थेट वाचावा, अशी माझी इच्छा आहे.
 Happy fathers day   बाबा.
 तुमच्या  Happy fathers day   ची वाट बघतेय.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो