बुक-अप : आदरणीय पक्षपाती
मुखपृष्ठ >> बुक-अप! >> बुक-अप : आदरणीय पक्षपाती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बुक-अप : आदरणीय पक्षपाती Bookmark and Share Print E-mail

 

गिरीश कुबेर - शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सत्ता..मग ती सरकारची असो वा सरकारबाह्य़..तिला आव्हान देत राहणे हेच पत्रकाराचे प्राथमिक कर्तव्य आहे, असे रॉबर्ट फिस्क ठामपणे मांडतो. हे मूलभूत तत्त्व डोक्यात ठेवूनच त्याची पत्रकारिता झाली आणि याच विचारांच्या बैठकीतून त्याची पुस्तके  तयार झाली. अमेरिकेसारख्या महासत्ताचा मस्तवालपणा आणि त्यामागे ब्रिटनचे फरफटणे तो सतत दाखवत राहिला. पश्चिम आशियाच्या वाळवंटावर रक्तशिंपण करणारी जवळपास सगळी युद्धं त्यानं जवळून पाहिली, त्यावर मुक्तपणाने लिहिलं. ते पक्षपाती असल्याचे आरोप झाले.. तरीही त्याचा पक्षपातीपणा आदरणीयच ठरतो.


मला एक गैरसमज दूर करायचाय. तो म्हणजे बातमीदाराने निष्पक्ष असावं. हे असं निष्पक्ष वगैरे काही नसतं आणि असलंच तर निरुपयोगीच असतं. पत्रकारानं पक्षपाती असायला हवं. हा पक्षपात पीडितांच्या बाजूचा असावा. हे पीडित मग कोणामुळेही झालेले
असोत - सरकारमुळे वा अन्यांमुळे. आपण त्यांच्या बाजूनंच उभं राहायला हवं. - रॉबर्ट फिस्क
स्थळ : प. आशियाच्या भकभकीत वाळवंटातल्या कोणत्याही देशाची राजधानी. कोणत्याही अशासाठी की याला ते सगळेच देश सारखे, अस्वस्थतेला जन्म देणारे. ती अस्वस्थता, अशांतता तो गेली २५ र्वष पाहतोय, अगदी जवळून. तोही त्या अस्वस्थतेचा भाग झालाय. तटस्थ असा. वास्तविक या सगळ्या अस्वस्थतेला सामोरे जाणाऱ्या त्या अस्वस्थ जीवांशी आणि त्यांच्या जीवनाशी हा इतका एकरूप झालाय की तो त्यांचाच भाग वाटावा, पण तो तसा असू शकत नाही. त्याला कागदोपत्री का होईना, तटस्थच राहावं लागतं.
कारण तो वार्ताहर आहे. एका देशात जन्मलेला. दुसऱ्या देशात राहून तिसऱ्या देशासाठी काम करणारा. वास्तविक त्यानं जे पाहिलंय त्यामुळे तो नक्कीच तटस्थ नाही. परंतु बातमीदारीचं काम असल्यानं त्याला आव तरी तटस्थतेचाच आणावा लागतोय. तर त्याला एकदा निरोप येतो. इतके दिवस बातमीदारी करतोयस. पण ती अपूर्ण आहे.
का?

माझी मुलाखत कुठे घेतलीयेस तू? ती जोपर्यंत तू घेत नाहीस, तोपर्यंत तुझी पत्रकारिता अपूर्णच राहील आणि या परिसरातील असंतोषामागची खरी कारणं समजूनच घेता येणार नाहीत.
त्यावर हा म्हणाला. मग येतो मुलाखत घ्यायला. कसं यायचं ते सांगा.
त्याची गरज नाही. माझी माणसं येतील उद्या तुला न्यायला.
आणि दुसऱ्या दिवशी ती त्याची माणसं खरोखरच आली. याला न्यायला. डोळे बांधले. हात बांधले. धरून मोटारीत बसवलं. सुरुवातीला रस्ता चांगला असावा. नंतर खाचखळगे, दगडधोंडे सुरू झाले. वळणंही संपेनात. त्याला कळलं डोंगरदऱ्यांचा रस्ता आहे. दहा-बारा तासांच्या या आंधळय़ा हालअपेष्टांनंतर एकदाचा तो प्रवास संपला. त्या मोटारीतल्या मंडळींनी याला गाडीतून उतरवलं. हात सोडले. डोळ्यांवरची पट्टी काढली. लगेच काही कळेना. जरासा भिरभिरलेलाच होता तो. डोळ्यांसमोरही अंधारी होती. थोडय़ा वेळानं ती गेली. दिसायला लागलं. यानं समोर बघितलं.
समोर होता ओसामा बिन लादेन.
रॉबर्ट फिस्क हा एकमेव पत्रकार असावा ज्याला पुढे ओसामाने तीन मुलाखती दिल्या. रॉबर्टचा लौकिकच तसा होता. सत्तरीच्या दशकापासून हा पत्रकारिता करतोय. मूळचा इंग्लंडचा. वडील लष्करात होते. पहिल्या महायुद्धात ते प्रत्यक्ष लढलेले. त्यामुळे युद्ध आणि त्यापाठोपाठ येणारी वाताहत याच्या कहाण्या त्याने जन्मापासूनच ऐकलेल्या. यालाही त्यामुळे त्याचं वेड लागलं. परंतु प्रत्यक्ष युद्ध लढण्यापेक्षा ते पाहणं, त्यामागची कारणं समजावून घेणं आणि इतरांना समजावून सांगणं. हेच त्याच्या जगण्याचं प्रयोजन बनलं. चांगलं शिकून वगैरे. म्हणजे युद्धशास्त्रात त्यानं डॉक्टरेट मिळवलेली आहे. रॉबर्ट रीतसर पत्रकारितेतच आला. यानं अनेक संघर्ष बघितले. अगदी पोर्तुगालमधील उठावापासून ते लेबनॉन, सीरिया आणि मग साऱ्या प. आशियाच्या आखातातलेच. १९७४ पासून रॉबर्ट लंडनच्या ‘द इंडिपेंडंट’ या दैनिकाचा प. आशियाचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. त्याच्या आधी तो लंडनच्याच ‘द टाइम्स’मध्ये होता. पुढे हे वर्तमानपत्र रूपर्ट मरडॉक यांच्या मालकीचं झालं तेव्हा हा इराणमध्ये होता. तिथून पाठवलेल्या त्याच्या एका वृत्तात मरडॉक यांनी फेरफार केली. रॉबर्टला जाणवलं आता इथे राहण्यात अर्थ नाही. नंतर तो ‘द इंडिपेंडंट’मध्ये गेला आणि कायमचा तिथला झाला.
या वर्तमानपत्रासाठी तो प. आशियातून बातमीदारी करतोय. साहजिकच तिथली सगळी युद्धं त्यानं जवळून पाहिलीयेत. दहा र्वष चाललेलं अयातोल्ला खोमेनी यांचा इराण आणि सद्दाम हुसेनचा इराक यांच्यातलं युद्ध, त्याच्या आधी इराणमध्ये शहा महंमद रझा पहेलवी यांच्या विरोधात झालेल्या बंडाळ्या, पुढे कुवेतच्या निमित्ताने घडलेलं युद्ध, दरम्यान अफगाणिस्तानात घुसलेल्या सोव्हिएत रशियाच्या फौजा. हे सगळं सगळं त्यानं जवळून पाहिलंय. त्या सगळ्यांचं वार्ताकन केलंय. इतकं जवळून की इराणमधल्या बाँबस्फोटानं तो बहिरा झाला होता आणि अफगाणिस्तानातून परागंदा होणाऱ्या निर्वासितांनी त्याला पकडून नेलं होतं. त्याला मार मार मारलं त्यांनी. शेवटी त्यांच्यातल्या एकाला कळलं हा शत्रुपक्षाचा नाही. खराच बातमीदार आहे तो. त्यामुळे तो सुटला. पुढे लगेचच त्यानं या सगळ्या अनुभवावर लिहिलं. त्याचा युक्तिवाद असा की, ज्यांनी याला मारहाण केली त्यांचा काहीही त्यात दोष नाही. आपण त्यांच्यावर जे काही लादतोय. तेच ही मंडळी सव्याज परत करतायत.
ही भूमिका सातत्यानं मांडणाऱ्यांमधला रॉबर्ट फिस्क हा एक अत्यंत आघाडीचा वार्ताहर. त्यानं या सगळ्या प्रदेशात इतकं काही पाहिलंय की ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं त्याचा उल्लेख प. आशियातील सर्वात लोकप्रिय पत्रकार असा केला. या सगळ्या परिसराचा त्याचा इतका अभ्यास झालाय की, त्याच्याइतका मोठा या परिसराचा दुसरा भाष्यकार नसेल कोणी. इतकं सगळं अनुभवल्यावर इतक्या लिहित्या वार्ताहरानं पुस्तक लिहिण्याचा विचार न करणं शक्यच नाही. लेबनॉनमध्ये हमा हत्याकांड जेव्हा झालं तेव्हा त्याची नृशंसता पाहणारा आणि जगाला सांगणारा तो पहिला पत्रकार होता. या सगळ्या संघर्षांवर त्याचं पहिलं पुस्तक आलं ‘पिटी द नेशन : द अ‍ॅबडक्शन ऑफ लेबनॉन’. इस्रायलचे रणगाडय़ाच्या देहाचे आणि चालीचे प्रमुख आरियल शेरॉन आणि पॅलेस्टाइन मुक्ती संघटनेचा सर्वेसर्वा यासर अराफत यांच्यातील संघर्षांत या देशाची कशी ससेहोलपट होतीय याची करुण कहाणी आहे ती, अगदी बारीकसारीक तपशिलांसह लिहिलेली. परदेशी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या एका त्या वेळच्या मित्रानं मला हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून रॉबर्ट फिस्क कायमचा लक्षात राहिला.
नंतर आलं त्याचं ‘द ग्रेट वॉर फॉर सिव्हिलायझेशन : द काँक्वेस्ट ऑफ द मिडलईस्ट’. अफलातून असंच त्याचं वणर्न करावं लागेल. परिशिष्ट वगैरे धरून चांगलं साडेअकराशे पानांचं आहे हे पुस्तक. रॉबर्टनं लिहिलेले अनेक लेख त्यात समाविष्ट आहेत. अगदी ओसामाच्या मुलाखतीसह. एका मुलाखतीत त्याला ओसामा म्हणाला. मला वाटतंय तू खूप सo्रद्ध आहेस आणि सर्व सo्रद्ध माणसं ही मुसलमानच असतात.
हे ऐकून रॉबर्ट चपापला. त्याला जाणवलं ओसामाला वाटतंय रॉबर्टनं अल कईदा या त्याच्या संघटनेसाठी गुप्तपणे काम करावं किंवा धर्मातर तरी. रॉबर्ट लगेच सावध झाला. तो म्हणाला. मी मुसलमान वगैरे काही नाही. पत्रकार आहे आणि सत्य सांगत राहणं हे माझं काम आहे. त्यावर ओसामा त्याला म्हणाला, तुला सत्याची आच आहे म्हणजे नक्की तू मुसलमानच असणार. हे ऐकून हसावं की रडावं हे रॉबर्टला कळेना. यातून दिसतं ते हेच. ओसामासारख्याला एका साध्या वार्ताहराची दखल घ्यावी असं वाटलं तेव्हा त्यावरून रॉबर्टचा दरारा काय असेल.
‘काँक्वेस्ट ऑफ द मिडल ईस्ट’ सगळंच्या सगळं असं वाचनीय आहे. अन्यांप्रमाणे रॉबर्ट अमुक दिवशी याला भेटलो तमुक दिवशी ते केलं. असे सनावळ्यांचे ठिपके मांडत बसत नाही. तो तारखाबिरखांच्या पलीकडची कहाणी ऐकवतो.
ती ऐकायला अनेकांना आवडत नाही. उदाहरणार्थ अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही सरकारांचा रॉबर्टवर अतोनात राग आहे आणि तो वेळोवेळी प्रगटही झालेला आहे. या दोन देशांच्या प. आशिया धोरणावर जेवढी टीका रॉबर्टने केली आहे तेवढी या देशांच्या शत्रूनंही केली नसेल. या परिसरात कोणत्याही युद्धात वा युद्धजन्य परिस्थितीत या दोन देशांतर्फे वार्ताहर नेले जातात. रॉबर्टचं म्हणणं, अशा मंडळींच्या लिखाणावर तर बिलकुल विश्वास ठेवू नये. अशा पद्धतीनं बातमीदारी करणाऱ्यांना तो हॉटेल जर्नालिस्ट म्हणतो. म्हणजे पंचतारांकित हॉटेलांत बसून बातमी लिहिणारे. रॉबर्टचं म्हणणं, हे खूपच उथळ असतात, त्यांना सत्य पाहायचं आणि समजावून घ्यायचंच नसतं.
पण हे सत्याच्या मागे लागणं फार महाग असतं. रॉबर्टला याची जाणीव आहे. अमेरिका आणि त्यातही जॉर्ज बुश यांच्यासारख्या अध्यक्षाच्या मागे हात धुऊन लागणं, त्यांना उघडं पाडणं. हे नेहमीच आव्हानात्मक असतं. हे करणं म्हणजेच पत्रकारिता असं तो ठामपणे मानतो आणि त्याप्रमाणे जगतो. रॉबर्टचे काही विचार खूप सोपे आणि पत्रकारिता करताना लक्षात ठेवावे असेच आहेत. त्यातला एक म्हणजे सत्तेला. मग ती सरकारची वा सरकारबाह्य़ केंद्राची. कोणाचीही असो. आव्हान देत राहायचं हे पत्रकाराचं पहिलं कर्तव्य आहे.
हे तो आयुष्यभर करत आलाय. अर्थातच त्याला डझनानं पुरस्कार मिळालेत. अमेरिकेत एका पुरस्कार समारंभात त्यानं केलेलं भाषण रॉबर्ट काय चीज आहे हे दाखवतं. तो म्हणाला : मला एक गैरसमज दूर करायचाय. तो म्हणजे बातमीदाराने निष्पक्ष असावं. हे असं निष्पक्ष वगैरे काही नसतं आणि असलंच तर निरुपयोगीच असतं. पत्रकारानं पक्षपाती असायला हवं. हा पक्षपात पीडितांच्या बाजूचा असावा. हे पीडित मग कोणामुळेही झालेले असोत - सरकारमुळे वा अन्यांमुळे. आपण त्यांच्या बाजूनंच उभं राहायला हवं.
रॉबर्ट फिस्क हा असा आदरणीय पक्षपाती आहे तो यामुळे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो