उन्हें कहीं से बुलाओ..
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> उन्हें कहीं से बुलाओ..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उन्हें कहीं से बुलाओ.. Bookmark and Share Print E-mail

 

भीमराव पांचाळे - रविवार, १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

१३ जूनची पहाट ग़जलच्या दर्दीसाठी बेदर्दी होऊन आली. उस्ताद मेहदी हसन खाँसाहेबांच्या मृत्यूची दु:खद वार्ता घेऊन आली. मन सुन्न होऊन गेलं. गेल्या अनेक वर्षांपासून ग़जलच्या आस्वादाची जुळून आलेली तार तुटून गेली. संगीताच्या आकाशात उदासीचं मळभ दाटून आलं.
कफस उदास हैं यारों, सबा से कुछ तो कहो
कहीं तो बहरे-खुदा, आजजके- यार चले..


मेहदीसाहेब आपल्याला सोडून गेल्याची उदास चर्चाच तर होती सर्वत्र! कुणी तरी खूप जवळचं माणूस गेल्यासारखे सगळे एकमेकांशी संपर्क करीत होते.. हळहळ व्यक्त करीत होते. आपल्या या अज्ज कलावंताच्या मृत्यूने व्यथित झालेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात चाहत्यांचे रुदन फोन, मेसेजेस ,मेल, फेसबुक इत्यादी मार्गाने पोहोचत होते माझ्यापर्यंत.
आँखों में अश्क और होटों पे हँसी न रही
ग़जल तेरे हाथों में मेहदी की मेहंदी न रही..
दु:खाच्या शेअरिंगचा असा हा सिलसिला सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अखंड सुरू होता.
ही आहे मेहदीसाहेबांच्या गजल गायकीची जादू.. आणि जवळजवळ अर्धशतक रसिकांच्या मनावर कायम असलेलं त्यांच्या स्वरांचं गारुड!
धृपद-धमार, ख्याल, ठुमरी, दादरा, हीर, राजस्थानी लोकगीतं, सिनेमाची गाणी इत्यादी सगळे गायन प्रकार या उस्तादांच्या समर्थ गळ्यातून साकार झाले असले तरी त्यांची ओळख ग़जल गायक म्हणूनच राहिली आणि ही ओळख त्यांनीच ग़जलला दिली होती. स्वत:चं एक रूप आणि व्यक्तिमत्त्व ग़जलला त्यांनी दिलं होतं.
 ग़जल गायकीला उपशास्त्रीय संगीताचा दर्जा असला तरी स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख तिला नव्हती. ठुमरी असो, दादरा - चैती - होरी असो की सुगम संगीतातील कव्वाली, लावणी, अभंग, पोवाडा असो; प्रत्येक गायन प्रकाराला स्वत:ची अशी एक ओळख आहे. म्हणूनच ख्याल व धृपद गायकी सारखी नाही. एवढेच कशाला, लावणी पोवाडय़ासारखी किंवा अभंग कव्वालीसारखा कुणी गात नाही. भूतकाळात डोकावून बघितले तर, शास्त्रीय संगीत गाणारे आणि विशेषत: उपशास्त्रीय संगीत गाणारे कलावंत ग़जल गायचे.. आजही गातात, पण त्यांच्या गायकीत ठुमरी अंगाचाच प्रभाव दिसून येतो. स्वरप्रधान गायकीमध्ये स्वरांना फुलवण्यासाठीचा आधार म्हणूनच काव्यरचनेचं अस्तित्व असणं तसं स्वाभाविकच म्हणायला हवं.. म्हणूनच-
तोरी बाट तकत नैन हारे
आजा सावरियां रे..
अशी दोन ओळींची रचना, अध्र्या तासाची पहाडी ठुमरी पेश करण्याकरिता पुरेशी ठरू शकते. गायकाची कृती काव्यसक्त असेल तर तो-
कागा सब तन खइयो, चुन चुन खइयो मांस
दो नैना मत खइयो, मोहे पिया मिलन की आस.. बाट तकत..
अशी समर्पक पुस्ती जोडून त्या ठुमरीत गहिरे रंग भरू शकतो, पण ग़जलच्या बाबतीत असं काही संभवत नाही. उलट, स्वरांपेक्षा शायराचे शब्द आणि त्यात ठासून भरलेला अर्थ याकडेच गायकाचं लक्ष केंद्रित असावं ही ग़जलची स्वाभाविक अपेक्षा आहे, कारण ग़जल हा एक अनोखा व आशयघन काव्य प्रकार आहे.
ग़जल क्या है, ग़जल का फन क्या है
चन्द लफ्जों में कोई आग छुपा ही जाए..
शब्दांमध्ये आग बंदिस्त केलेल्या या काव्यप्रकाराचे वर्णन ‘गागर में सागर’ असेही केले जाते. सागराएवढा आशय साठविण्याची क्षमता दोन ओळींच्या शेरात असते आणि ग़जलचा प्रत्येक शेर हा एक परिपूर्ण कविता असते. म्हणूनच कविवर्य सुरेश भट ग़जलला ‘कवितांची कविता’ असे संबोधतात.
या काळजातून उसळली आणि त्या काळजावर बरसली.. असा ग़जलचा बाज आहे. मनापासून मनापर्यंतचा तिचा प्रवास आहे.
हा प्रवास साध्य होणं, असा स्वतंत्र बाज गवसणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते..
मेहदीसाहेब या प्रक्रियेतून घडले.. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घडले. म्हणूनच असा कलावंत निर्माण होणं फार दुर्मिळ असतं. असं वाटतं की, मेहदी हसन या नावाच्या अर्थानुसार खुद्द निसर्गानेच त्यांना आम्हा रसिकांसाठी दीक्षित केलं आणि श्रेष्ठ बनवलं असेल की काय?
देख तो, दिल के जां से उठता है
ये धुआं सा कहां से उठता है..
खुदा-ए-सुखन जनाब मीर तक्री ‘मीर’ यांनी या सुंदर आणि आशयसंपन्न ग़जलला जन्म दिला आणि आपल्या प्रगल्भ गायकीचं कोंदण देऊन मेहदी हसन यांनी ही रचना अमर केली. त्यांनी एकेका शब्दातील आशय, आशयाचं एकेक चित्र आपल्या मनाच्या डोळ्यांना दाखवलं. शायराच्या भावनांना महसूस करण्याची जिगर दिली. ‘धुआं सा’ या शब्दाला स्वरांचं असं काही परिमाण त्यांनी दिलेलं आहे की, .. आळसावलेली धुराची लकेर उठलेली आणि वातावरणात हळुवारपणे विलीन झालेली आपण ऐकताना बघू शकतो. हा करिश्मा आहे मेहदींच्या सुरांचा..
कितीही ग़ज़्ाला ऐका, जादू बरकरार असते त्यांच्या गायकीची..
दमदार तरीही मृदुमुलायम असा रियाजी आवाज, घरंदाज शास्त्रीय संगीताची बैठक, शायरांच्या शब्दांना न्याय देणारी, आशयावर गायकीचा भार होणार नाही असा शास्त्रीय संगीताचा संयत वापर ही मेहदीसाहेबांच्या गायकीची बलस्थानं आहेत. शायराचं मनोगत जाणून घ्यायचं आणि श्रोत्यांना ते आपल्या स्वरांच्या मार्फत जाणवून देण्याची कळकळ त्यांच्या पेशकशमध्ये प्रकर्षांने दिसायची. शब्दांचे सुस्पष्ट उच्चार, काही महत्त्वाच्या शब्दांचा वारंवार उच्चार, पॉजेस या त्यांच्या वैशिष्टय़ांमुळे आपण रसिक ग़जलमधील आशयाच्या अवतीभवती रेंगाळत राहतो, शेराच्या सानी मिसऱ्याची उकल ऐकण्यासाठी जिवाचा कान करतो.
शेर पूर्ण उलगडतो आणि अंतर्मनातून उसळून दाद येते.. वा:! क्या बात है!!
ग़जलगायकीचं चालतंबोलतं ‘स्कूल’ असलेले खाँसाहेब जवळजवळ बारा वर्षे आजारपणामुळे गाऊ शकत नव्हते.. मैफिली होत नव्हत्या, प्रसिद्धीच्या झोतातून ते पूर्णपणे बाहेर होते. अनुभव असं सांगतो की, कोणत्याही कलावंताला विस्मृतीत न्यायला यापेक्षा निम्मा काळही पुरेसा असतो, पण मेहदीसाहेबांच्या बाबतीत असं घडलं नाही. त्यांच्या निधनानं सगळं कलाजगत दु:खी झालं.. हळहळलं.. जणू काही नुकत्याच रंगलेल्या मैफिलीत ही दु:खद घटना घडली असावी.
आजारी असल्याच्या, आजार बळावल्याच्या बातम्या आणि कधी कधी तर ‘गेले’ अशा अफवासुद्धा कानावर येत होत्या. मध्यंतरीच्या काळात ‘उपचारासाठी भारतात येणार’ अशी एक सुवार्ताही आली. पुन्हा आशा पल्लवित झाल्या.. वाटले, की इथे आल्यावर त्यांच्या तब्येतीला नक्की आराम पडणार.. पुन्हा मैफिल रंगणार! पण तसे घडले नाही. आशा-निराशेचा खेळ अखेर संपला.. उस्ताद गेले.. ग़जल पोरकी झाली..
‘मैं कब का जा चुका हूँ, सदाएँ मुझे ना दो’
असं त्यांनी बजावलं असलं तरी ग़जलप्रेमींनी ते ऐकून घ्यायची काही गरज नाही, कारण
उस्ताद मेहदी हसन खाँसाहेब फक्त शरीराने इथे नाहीत, त्यांचा आवाज कायम सोबत असणार आहे आणि जगण्याला आधार देत राहणार आहे. आयुष्याच्या वाटेवर, आयुष्याच्या अंतापर्यंत.
कैसे तय होगी राहे-उम्र सहारे के बगैर
तुम हमे दूर से आवा़जही देते रहना..
अलविदा..!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो