ज्युबिलंट डायमण्ड क्वीन!
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> ज्युबिलंट डायमण्ड क्वीन!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ज्युबिलंट डायमण्ड क्वीन! Bookmark and Share Print E-mail

 

प्रशांत सावंत - रविवार, १७ जून २०१२

किंग जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर २ जून १९५३ रोजी राजकन्या एलिझाबेथ हिचा ‘राणी एलिझाबेथ दुसरी’ म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. यंदा राणीच्या राज्यारोहणास ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने इंग्लंडमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा हा ऑंखों देखा हाल..
इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची सुप्त इच्छा असते की, केव्हा तरी राणी एलिझाबेथचे आपल्याला दर्शन घडावे.

केवळ भारतीय आणि राष्ट्रकुलातील देशांनाच नव्हे, तर जगभरातील लोकांना बकिंगहॅम पॅलेस, विण्डसरचा किल्ला, राणीचे शाही लष्कर यांची मोहिनी आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे राणी एलिझाबेथ दुसरी हिने या देशावर तब्बल ६० वर्षे राज्य केले आहे. युरोपातील बंडांनंतर स्पेन, इटली, फ्रान्स, पोर्तुगाल आदी देशांतील राजांना आपल्या सत्तेला मुकावे लागले. इंग्लंडच्या जनतेनेही राजसत्ता उलथून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले. आणि अखेरीस केवळ पदापुरती राजाची नेमणूक केली. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडचे जगावरील आधिपत्य वेगाने कमी होऊ लागले. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश असे इंग्रजांच्या आधिपत्याखालील देश स्वतंत्र होऊ लागले. इंग्लंडमध्येही राजसत्ता रद्दबातल करून प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचे वारे वाहू लागले. पण जसे माझी अमेरिकन मैत्रीण सब्रिना म्हणते, त्याप्रमाणे इंग्लंडमध्ये खवळून क्रांती करण्याची चर्चा केवळ चहाचे पाणीच गरम करते! ब्रिटिशांची बंडाबद्दलची अनास्था, किंबहुना त्याहून जास्त त्यांचे इतिहासावरील प्रेम यामुळे येथील राजसत्ता अबाधित राहिली आहे. अर्थात कालानुरूप तीत भरपूर बदल झाले. या सर्व बदलांना साक्षी आहे ती सध्याची राणी एलिझाबेथ दुसरी. किंग जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर २ जून १९५३ रोजी राजकन्या एलिझाबेथ हिचा ‘राणी एलिझाबेथ दुसरी’ म्हणून राज्याभिषेक झाला. वयाच्या केवळ २७ व्या वर्षी राजशकटाची जबाबदारी अंगावर पडणे म्हणजे त्या व्यक्तीचा पुनर्जन्मच. राणीचा हा नवा प्रवास आजतागायत सुरू आहे.
आजवर राणीने तब्बल १२ विविध ब्रिटिश पंतप्रधानांसमवेत काम केले आहे. राजसत्ता लोकाभिमुख करण्याचे महत्त्वाचे कार्य राणीने केले आणि नवे पायंडे पाडले. उदाहरणार्थ- तिच्या राज्याभिषेकाचे प्रथमच दूरचित्रवाणीवर थेट प्रसारण करण्यात आले. अनेक लोकांनी तेव्हा प्रथमच टी.व्ही. सेट विकत घेतला. पबमध्ये अ‍ॅण्ड्रय़ू अजूनही त्या दिवसाला उजाळा देत असतो. तो तेव्हा राहत असलेल्या लंडनच्या पूर्व भागांत सर्वाकडे टी.व्ही. नव्हता. म्हणून त्यांच्याकडे अनेकांची गर्दी झाली होती. राणीने इंटरनेटचाही खुल्या दिलाने वापर केला. काही वर्षांपूर्वी राणीची वेबसाइट तयार केली गेली आणि फेसबुकवर संकेतही निर्माण केला गेला. अ‍ॅण्ड्रय़ू, सायमन, जोआना यांसारखे अनेक ब्रिटिश लोक राणीची राजवट पाहत मोठे झाले. आज इंग्लंडची ५० टक्क्य़ांहून अधिक जनता १५ ते ६५ वर्षे वयोमर्यादेची आहे. या साऱ्यांसाठी राणी एक आई आणि आजीच्या रूपात वावरते आहे. म्हणूनच २०१२ हे साल सर्वाना महत्त्वाचे वाटते. कारण या वर्षी राणीच्या राज्याभिषेकाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. Diamond Jubilee for a diamond Queen ची चर्चा गेल्या वर्षीपासूनच सुरू झाली आहे. उत्साहाला आणखी उधाण यायचे कारण म्हणजे सरकारने या निमित्ताने दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली. प्रजा खूश!
१९९७ मध्ये प्रिन्सेस डायनाच्या अपघाती मृत्यूनंतर लोकांचे राणी आणि तिच्या कुटुंबीयांविषयीचे मत कलुषित झाले होते. त्या वेळी राणीने लोकांच्या आक्रमक प्रश्नांना उत्तरे न देता वाद टाळून आपले कर्तव्य आणि लोकहिताच्या कामांना वाहून घेतले. साम्राज्यवादी सेसिल ऱ्होडस् याला एकदा जर्मनीचा राजा कैसर विलियम (राणी व्हिक्टोरियाचा नातू) याने विचारले होते की, ‘मी इंग्लंडमध्ये प्रसिद्धी कशी मिळवू?’ यावर सेसिल उत्तरला, ‘काही न करणे हे कर!’'Keep calm & carry on' हे ब्रिटिशांचे तत्त्व आहे. याच तत्त्वाने आज इंग्लंडभर 'Keep calm & reign on' अशा संदेशाचे फलक झळकत आहेत. राणीच्या आजवरच्या कालक्रमणेबद्दल प्रजेत निराशेची भावना नाहीए.
राज्याभिषेकाची ६० वर्षे साजरी करण्यासाठी सरकारने एक जंगी, भव्यदिव्य सोहळा योजला होता. जगप्रसिद्ध थेम्स नदीवरून राणीची तिच्या कुटुंबासह मिरवणूक, सैन्याची आणि हवाईदलाची नेत्रदीपक सलामी- असा होता रविवारचा बेत. सोमवारी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर गेल्या सहा दशकांतील दिग्गज गायकांची मैफल. मंगळवारी सेंट पॉल या ऐतिहासिक चर्चमध्ये राणीसाठी आभारप्रदर्शन आणि नंतर पारंपरिक पद्धतीने तिची बकिंगहॅम पॅलेसपर्यंत मिरवणूक. याव्यतिरिक्त गेले वर्षभर आणि येणारे वर्ष यादरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. सध्या इंग्लंडची तसेच जगाची आर्थिक स्थिती बिकट आहे. युरोपात खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आणि जनतेकडून कठोर प्रयत्न केले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर हा राज्याभिषेकाचा हीरकमहोत्सव सोहळा साजरा करणे अनाठायी असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवायला सांगताना राणी मात्र डोक्यावर सर्वाधिक किमतीचा हिरा मिरवते आहे, असा गेनोरचा रागाचा सूर आहे. गेल्या वर्षी सरकारने प्रिन्स विल्यम आणि केट यांच्या लग्नासाठी कामाचा एक दिवस वाया घालवला आणि आता दोन दिवस वाया घालवले, अशी तक्रार आहे ग्रॅहमची. ग्रॅहम हा ‘प्रजासत्ताक’ चळवळीचा एक खंदा सभासद. २००३ साली या संस्थेची सभासद संख्या होती- ३००. आज आहे २०,०००. म्हणजे आकडेवारी पाहता अजूनही जवळपास ९९ टक्के जनतेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राणीला मान्यता आहे. पण पॅट्रिक, वेन यांसारखे टॅक्सीचालक मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कमाई जास्त होईल, या आशेने खूश होते. जॉन ल्युइस, मार्क्‍स अ‍ॅण्ड स्पेन्सर्स, टेस्को यांसारखी सुपरमार्केट्स गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज होती. वेगवेगळ्या आकारांच्या व पद्धतीच्या स्मरणिका आणि स्मृतिचिन्हांनी दुकाने सजली होती. ऑक्सफर्ड सर्कल, रिजंट स्ट्रीट ही शॉपिंगची मक्का-मदिना. सारे रस्ते युनियन जॅकनी नटलेले. राणी हा ब्रिटिश व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक. त्यामुळे तिच्याशी निगडित गोष्टींना भरपूर प्रसिद्धी मिळते. उदा.- राणीला कोर्गी जातीची कुत्री आवडतात. म्हणून या कुत्र्यांची खरेदी अचानक वाढली! टी-शर्टपासून टिश्यू पेपपर्यंत युनियन जॅकचा प्रसार होतो आहे.
जसजसे या सोहळ्याचे दिवस जवळ येऊ लागले, तसतसे आजवर नाके मुरडणाऱ्या लोकांनीही कार्यक्रमाची आखणी सुरू केली. अनेक ठिकाणी स्ट्रीट पार्टीचे आयोजन करण्यात आले. इथे उत्सवाचे स्वरूप साचेबद्ध असते. निवासी भागांत रस्त्यांवर पताका लावून, घरी बनवलेले पदार्थ शेजाऱ्यांत वाटून, गप्पागोष्टी-गाणी यांत वेळ व्यतीत केला जातो. मोठय़ा पार्कमध्ये छोटेखानी गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मुख्य कार्यक्रमात मोकळ्या हातांनी रोषणाई आणि आतषबाजी केली जाते. या प्रसंगी साऱ्या इंग्लंडभर लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाची चादर पांघरली आहे असाच भास होत होता. बच्चे कंपनी चेहऱ्यावर युनियन जॅक रंगवून किंवा राणीचे मुखवटे घालून धुमाकूळ घालत होती.
लंडनमध्ये लोकांचा उत्साह ओतप्रोत वाहत होता आणि पाऊस-थंडी-वाऱ्याची पर्वा न करता लोकांनी थेम्स नदीच्या किनारी अहोरात्र ठाण मांडून राणीच्या दर्शनासाठी जय्यत तयारी केली होती. चेलसी ब्रिजकडून सुरू होणारा हा राणीचा वाहता ताफा थेम्समधून लोकांच्या उत्साहाच्या आणि प्रेमाच्या भरतीवरून टॉवर ब्रिजपाशी येऊन ठेपला. शुभ्र वस्त्रे परिधान केलेली राणी, तिला कायम साथ करणारा तिचा पती डय़ुक ऑफ एडिनबरॉ प्रिन्स फिलिप, पुत्र प्रिन्स चार्ल्स, त्याची पत्नी आणि मुले, राणीची इतर मुले आणि नातवंडे या साऱ्यांना पाहण्यासाठी केवळ इंग्लंडमधीलच नव्हे, तर जगभरातील लोकांनी गर्दी केली होती.
शहरापासून दूर या सोहळ्याचे स्वरूप पाहण्यासाठी आम्ही ‘रिजवे’ या स्विंडननजीकच्या गावातून जाणाऱ्या रस्त्यांवरून पदभ्रमंती करायचे ठरवले. नेहमीच्या ग्रुपमधील मॅथ्यूला या उत्सवात फारसा रस नव्हता. स्कॉटलंडमधील एडिनबरॉ येथे जन्मलेल्या मॅथ्यूला रॉयल फॅमिलीविषयी फारसे आकर्षण नाही. किंबहुना सध्या स्कॉटलंडमध्ये वेगळा देश स्थापन करण्याचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांच्या सोहळ्यांमध्ये स्कॉटलंडमधील उत्सवी स्वरूप नरमच होते. बर्नार्ड आणि डॅमियन यांनी तयारी दाखविली. दोघेही मूळचे फ्रेंच. लंडन ही त्यांची कर्मभूमी. फ्रेंच लोकांनी बंड करून लोकशाही राज्य आणले आणि निवडून दिलेले राष्ट्रपतीच राजासारखे वागू लागले म्हणून अनेक फ्रेंचांनी लंडनला आपले घर मानले आहे!
या सोहळ्याला गावागावांत छोटेखानी जत्रांचे स्वरूप आले होते. मुख्य रस्त्यांवर लाल, पांढऱ्या, निळ्या रंगांच्या पताका स्वागत करीत होत्या. गोरिंग ऑन थेम्स येथे प्रत्येक घराच्या दरवाजावर युनियन जॅकच्या रंगाचे बो बांधलेले होते. राणीचे पुतळे, फोटो यांची सजावट मेरीने तिच्या आईबरोबर राणीच्या यापूर्वीच्या राज्याभिषेक सोहळ्यांचा (२५ वर्षे, ५० वर्षे) आनंद लुटला होता. आज ती तिच्या नातवंडांना घेऊन आली होती. डोक्यावरील पांढरे केस सावरत नातवाचा हात घट्ट धरत ती म्हणाली, 'I showed him now, in ten years he will show me!' गेली ६० वर्षे राज्य करणारी राणी इथल्या लोकांसाठी सातत्य आणि परंपरेचे प्रतीक आहे. ब्रेड, बिस्किट, केक यांवर युनियन जॅक फडकत होते. घोडय़ांची शर्यत, छोटय़ा बोटींची शर्यत, सायकल स्पर्धा, धावणे आदी स्पर्धाचे आयोजन करून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहित केले जात होते. सुट्टीचा फायदा घेऊन शहरात काम करणाऱ्यांनी गावाकडे येऊन आपल्या कुटुंबीयांसमवेत, मित्रांसमवेत वेळ घालवणे पसंत केले. ‘व्हिलेज इन’ या पबचा मालक लोकांना 'ऊ्रंेल्ल िद४ील्ल इी१'ची चव घेण्यासाठी आग्रह करीत होता. किचनमध्ये त्याची बायको आणि मुले 'Diamond Queen Beer' बनविण्यात गर्क होते. शहरांतील नेत्रदीपक जल्लोष असो किंवा गावाकडील साधेपणाचा उत्सव असो, या साऱ्यांच्या आनंदाचे कारण एकच होते- गेली ६० वर्षे सातत्याने त्यांच्यासोबत असणारी राणी एलिझाबेथ! हा जल्लोष अनुभवून परतणाऱ्यांच्या मनात एकच भावना होती की, 'It's just a beginning!'

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो