‘असेही एक नाटय़संमेलन’ एक आनंदसोहळा!
मुखपृष्ठ >> बातम्या >> ‘असेही एक नाटय़संमेलन’ एक आनंदसोहळा!
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘असेही एक नाटय़संमेलन’ एक आनंदसोहळा! Bookmark and Share Print E-mail

बुधवार, २० जून २०१२
मराठी नाटय़सृष्टी अशोक मुळ्ये, अरुण होर्णेकर यांच्यासारख्या काही मनस्वी व्यक्तिमत्त्वांमुळे नेहमी ‘जिवंत’ वाटते. ही माणसं काहीएक वेड जपत जगत असतात. त्यातही अशोक मुळ्ये या माणसाचा करिष्मा तर आजच्या तद्दन व्यवहारी जगात अविश्वसनीय वाटावा असाच! अत्यंत परखड, फटकळ स्वभाव. कुणाची भीडभाड बाळगायचं त्यांना कधी माहीत नाही. मग तो जवळचा मित्र का असेना! परंतु वृत्तीतला प्रामाणिकपणा इतका, की त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाचा आर्थिक वा अन्य भार उचलणाऱ्यांनी त्यांना कधी हिशेब विचारला नाही, की त्यांनीही कधी तो कुणाला दिलेला नाही. खिशात दमडा नसला तरी भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्याची आणि ते तेवढय़ाच उत्साहात पार पाडण्याची धमक ही या माणसाची खासीयत. मुळ्यांनी एखादं ‘कार्य’ काढलं की त्यांची मित्रमंडळी ते जणू घरचंच कार्य असल्याच्या जबाबदारीनं ते यशस्वीपणे पार कसं पडेल यासाठी राब-राब राबत असतात. त्याच्या बदल्यात आपल्याला काही मिळेल,  अशी कुणी अपेक्षाही करत नाही. गेल्या आठवडय़ात पार पडलेलं ‘असेही एक नाटय़संमेलन’ हे त्यातलंच एक! नाटय़-चित्रपट-मालिका क्षेत्रांत आज एक खणखणीत नाणं म्हणून वाखाणल्या जाणाऱ्या मुक्ता बर्वे हिला या संमेलनाचं अध्यक्षपद देऊन मुळ्यांनी तिच्या कर्तृत्वाला सलाम केलेला! मुक्तानंही मुळ्यांच्या ‘पांढऱ्या प्रेमळ दहशतवादा’पुढे मान तुकवून ते शिरोधार्य मानलेलं! म्हणूनच तिने ‘गंभीर’ अध्यक्षीय भाषणाऐवजी मुळ्येंच्या या आनंदसोहळ्याचे आपण एक ‘निमित्तमात्र’ आहोत, हे आधीच स्पष्ट केलं.
खरं तर अशोक मुळ्येंचे चाहते त्यांचं भल्याभल्यांच्या टोप्या उडविणारं धमाकेदार भाषण ऐकायला आतुर असतात, आणि ते करण्यासाठी काहीतरी तोंडीलावणं लागतं. त्यासाठीच ते अशा संमेलनाचा घाट घालतात, असं मुक्तानं मुळ्यांच्याच बेधडक पद्धतीनं जाहीरपणे सांगून टाकलं. परंतु त्याचबरोबर मुळ्येंसारख्या मनस्वी माणसांमुळेच आजच्या नकारात्मक वातावरणात जगायला आपल्याला उभारी मिळते, हे सांगायलाही ती विसरली नाही. यापुढे असं संमेलन आयोजित करून मित्रमंडळींना फुकट राबविण्याचे पातक आपण करणार नसल्याची जी घोषणा मुळ्ये यांनी आपल्या प्रास्ताविकात केली होती, ती कुणी फारशी मनावर न घेऊ नये, असे सांगत, हवं तर या संमेलनाऐवजी एखाद्या मैदानावर मुळ्येंचं चौफेर फटकेबाजी करणारं भाषण आयोजित करावं, अशी गमतीची सूचना  मुक्ताने केली.  
प्रमुख पाहुणे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनीही आपल्या भाषणात याच मुद्दय़ावर भर दिला. न्यायालयाच्या रूक्ष, गंभीर कायदेकज्ज्यांच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी ‘असेही एक नाटय़संमेलना’सारख्या मनाला रिझवणाऱ्या, संतोष देणाऱ्या कार्यक्रमांना मी अधूनमधून जातो. तिथे सृजनशील कलावंतांच्या आविष्कारांचा आस्वाद घेतो आणि ताजतवाना होतो. कलावंतांचे हे ऋण कधीच विसरता येणार नाही, असे ते म्हणाले. बुजुर्ग अभिनेत्री आणि संमेलनाच्या स्वागताध्यक्ष उषा नाडकर्णी यांची प्रकट मुलाखत हे या संमेलनाचं प्रमुख आकर्षण होतं. त्यांच्या परखड स्वभावामुळे त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा कलाक्षेत्रात नेहमीच राहिला आहे. आपल्या मनमोकळ्या संवादात उषा नाडकर्णी यांनी, लोक आपल्याला उगाचच घाबरतात, असा दावा केला.
मी स्पष्टवक्ती आहे, पोटात एक आणि ओठांत एक असं वागणं माझ्या स्वभावातच नाही. पण त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो, असं त्या म्हणाल्या. नाटक हीच खरीखुरी जिवंत कला आहे, असं सांगून मालिका वगैरे पोटापाण्यासाठी ठीक, असं रोखठोक मतही त्यांनी व्यक्त केलं. परंतु तिथंही मी चोख काम करत असल्यानेच मला हिंदी मालिकांच्या बेगडी दुनियेतसुद्धा आदरानं वागवलं जातं, हेही त्यांनी अभिमानानं सांगितलं. नशिबाच्या पलीकडे आणि ते उजाडण्यापूर्वी माणसाला काहीही मिळत नाही, हे मला अनुभवांती पटलेलं आहे. अन्यथा इतकी वर्षे अभिनयक्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आता या वयात मला हे यश मिळालं नसतं, असंही त्या म्हणाल्या.
या सोहळ्यात अनेक कलावंतांचा वेगवेगळ्या कारणास्तव ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. कामगार रंगभूमीचा इतिहास लिहिणारे नारायण जाधव, ‘मिफ्टा’ पुरस्कार सोहळ्याकरता तीन-चारशे मराठी कलावंतांना परदेशी घेऊन जाण्याचे शिवधनुष्य पेलणारे महेश मांजरेकर, ‘काकस्पर्श’मधील हृद्य भूमिकेबद्दल मेधा मांजरेकर, ‘विदूषक’ चित्रपटातील भूमिकेसाठी पुलंच्या शाबासकीची थाप मिळविणाऱ्या, परंतु पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या मधु कांबीकर, दूरचित्रवाणीवर अकराशेहून अधिक विक्रमी मुलाखती घेतलेल्या स्मिता गवाणकर, ‘उंच माझा झोका’मध्ये ऐतिहासिक विषय उत्तमरीत्या हाताळल्याबद्दल दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान, उत्कृष्ट संवादलेखनाबद्दल आनंद म्हसवेकर, प्रामाणिक व चोख नाटय़निर्माते आनंदा नांदोसकर, विविधरंगी भूमिकांसाठी नयना आपटे, तरुण वयात नाटय़लेखनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मनस्विनी लता रवींद्र यांना माझा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुक्ता बर्वे हिला नाटय़समीक्षकांच्या हस्ते हाच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये डावलल्या गेलेल्या ‘लव्हबर्ड्स’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाला उत्तम नाटकासाठीचा माझा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी अशोक मुळ्ये यांनी प्रास्ताविकात चौफेर टोलेबाजी करत, अनेकांना खुमासदार चिमटे काढत या संमेलनामागची आणि ‘माझा पुरस्कारा’मागची भूमिका स्पष्ट केली. परंतु या संमेलनासाठी मित्रमंडळींना आणि हितचिंतकांना किती कष्टवायचे, याचा विचार करता यापुढे हे संमेलन न भरविण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
 या आनंदसोहळ्यात दीपाली विचारे आणि कविता कोळी यांच्या ग्रुप्सनी बहारदार नृत्ये पेश केली. तर मधुरा कुंभार, केतकी भावे-जोशी, श्रीरंग भावे, सागर फडके आणि शाल्मली सुखटणकर या ‘सारेगम’मधील तरुण गायकांनी सुश्राव्य नाटय़संगीत सादर केले. संतोष पवार व अंशुमन विचारे यांनी आयोजक अशोक मुळ्ये यांच्यावरच चिमटे काढणारं प्रहसन सादर केलं. तर अरुण कदम आणि संजीवनी जाधव यांनी ग्रेस आणि विंदांच्या कविता पेश केल्या. विजय व पद्मश्री कदम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर स्मिता गवाणकर यांनी निवेदन केलं. ‘जीवनगाणी’ प्रस्तुत या आगळ्यावेगळ्या नाटय़संमेलनास रसिक आणि नाटय़-चित्रपट-मालिकांतील कलावंतांनी रवींद्र नाटय़मंदिरात तुडुंब गर्दी केली होती.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो