गोष्टी भावभावनांच्या - आई - बाबा तुमच्यासाठी : खुन्नस
मुखपृष्ठ >> गोष्ट भावभावनांची >> गोष्टी भावभावनांच्या - आई - बाबा तुमच्यासाठी : खुन्नस
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोष्टी भावभावनांच्या - आई - बाबा तुमच्यासाठी : खुन्नस Bookmark and Share Print E-mail

नीलिमा किराणे ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पालक आणि मुलांमध्ये ‘मीच वरचढ’ ही खुन्नस एकदा सुरू झाली की पुढच्या वेळेस दोघंही जास्त शक्ती लावणार. त्यामुळे दरवेळी वाढती खुन्नस आणि जुन्या त्रासात भर असा तो डोंगर वाढतच जातो. कुणाच्या तरी एकाच्या हरण्यातून आलेली शांतता तात्पुरती असते. पुरेशी शक्ती जमली की खुन्नस पुढे चालू. शांतता हवी असेल तर कुणीतरी ते समजून पहिल्यांदा तलवार म्यान करावी लागते.
विंक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. वेताळाला खांद्यावर घेऊन तो पुन्हा चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘राजा, तू कंटाळून सोडून देत नाहीस याचं विशेष वाटतं. बघ एका नव्या घराची गोष्ट.’’  
‘‘आई, कॉलनीतली मुलं सिनेमाला जाणार आहेत. मी पण जाऊ ?’’ चौथीतल्या जीतूनं विचारलं.
‘‘ नको बाबा. ती मोठी मुलं टारगटपणा करतील, त्यांचं पाहून तुम्हीपण तेच कराल आणि अभ्यास पण राहिलाय ना? आपण जाऊ रविवारी.’’
‘‘नुसतंच म्हणतेस तू. नेत नाहीस.’’ जितू फुणफुणला.
‘‘उगीच काहीपण बोलू नको. कधीतरी नसेल जमलं आणि बुडाला एखादा सिनेमा तर बुडाला. अगदी जीवन-मरणाचा प्रश्न आहे का हा? ’’

‘‘ बाबा, शाळेची नववीची सहल जाणारेय रायगडला. मला जायचंय.’’ जितूनं बाबांना लाडीगोडी लावली.
‘‘नको. या सुट्टीत आपण जाऊ.’’
‘‘पण बाबा, मित्रांबरोबर मजा येते नाऽ. मला जायचंय.’’
‘‘जितू, हट्ट नकोय हं. आधी मार्काचे दिवे लावा. मग हक्कानं मागा.’’
‘‘आता इथे मार्क कुठे आले मधेच? आणि मला काही फार कमी मार्क नाहीत बाबा.’’
‘‘ आपल्या घरात सर्वाना पंच्याऐंशीच्या पुढे असतात. सुमेधकाका, प्राचीमावशी, नीताआत्या सगळ्यांची मुलं टॉपर असतात. तू मात्र ८०च्या आजूबाजूलाच फिरत असतोस.’’
‘‘ मला नाही आवडत त्यांच्यासारखं घासत बसायला. त्यांना अभ्यासाला स्वतंत्र खोल्या असतात, शांतता असते त्यांच्या घरात..’’
‘‘चूप. काहीतरी कारणं नको सांगूस. अभ्यास करायला नको, उलटून बोलायला पाहिजे तुला’’ बाबा भडकले.

‘‘आई, मला सायकल पाहिजे. मी, सौरभ आणि ऋत्विज या वर्षी सायकलनं शाळेत जाणार.’’
‘‘नको रे बाबा, शाळा तेवढीपण जवळ नाही, रहदारी केवढी..आपली रिक्षाच बरी.’’
‘‘ त्या दोघांच्या घरचे कसे पाठवतात? तुला उगीचच काळजी..’’
‘‘जितू आई ‘नाही’ म्हणतेय ना? तुझ्या मागण्या संपतच नाहीत.’’
‘‘मी नुसताच मागतो. तुम्ही देताय कुठे ?’’
‘‘बरं, या सहामाहीला ९० टक्के मिळव, मग देतो.’’
‘‘त्यापेक्षा सरळ ‘नाही’ म्हणा ना बाबा. तशीही चांगली सायकल आठ-दहा हजारांना पडते. तुम्ही ‘नाही’च म्हणणार हे मलाच कळायला हवं होतं.’’
‘‘माझी सटकवू नकोस हं जितू.  प्रश्न आठ-दहा हजारांचा नाही, तू जिद्द धरत नाहीस हा आहे.’’
‘‘मला जमेल तेवढं मी करतो. तुमचं समाधानच होत नाही..’’
‘‘जितू, मार खाशील हं आता, गप्प बस.’’

जितू आपल्या मित्राशी, सौरभशी बोलत होता.
‘‘सौरभ, लहानपणीपासून कशालाच पटकन ‘हो’ म्हटलेलं आठवत नाही मला. कायम ‘नाही’च म्हणतात आईबाबा. आईला कशाची तरी काळजी वाटते, बाबांच्या सारख्या अटी. टेबल टेनिसच्या मॅचेस मी जिंकतो त्याची नाही अट घालत ते. बरं, कष्ट करून चांगले मार्क मिळवले तरी ते कुणापेक्षा तरी कमीच असतात. कसाही वागलो तरी मी आगाऊपणेच वागतो. कारण तुलना कोणाशी, तर त्या प्राचीमावशीच्या परागशी. किती आज्ञाधारक मुलगा आहे म्हणे. मी नाही होऊ शकत एवढा घासू आणि शामळू. रोज बोलणी खाऊन मी कंटाळलोय सौरभ. बाबा कधीकधी एखादा दणकापण देतात. माझे वाटतच नाहीत मला ते. त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीच आहे, फक्त माझ्या मार्कावर आहे. हल्ली मी आईबाबांना ‘हो’ म्हणतो, पण मला जे करायचं तेच करतो. मला अभ्यास करायचाच नाहीये. पेपर कोरा देईन. मग काय करतील?’’
‘‘जितू, असं काही करू नको. आईबाबांशी खुन्नस घेऊन नुकसान तुझंच होईल.’’
‘‘कळतंय मला. पण होऊ दे. नाहीतरी मला केटिरगलाच जायचंय. फार जास्त मार्क नकोच आहेत. ते ‘नाही’ म्हणतात ना, आता मीही त्यांच्या सांगण्याला ‘नाही’ म्हणणार.’’
‘‘मला नाही पटत. परवा चाचणी आहे, मुकाटय़ानं नखरे न करता अभ्यास कर.’’ सौरभनं जितूच्या गळ्यात हात टाकला तसं जितू हसून ‘‘बरं’’ म्हणाला.

रविवारी जितू अभ्यासाला बसला, तेवढय़ात आईनं त्याला भाजीवाल्याकडून िलबू आणायला सांगितलं.
‘‘तू आण. आता बसलोय अभ्यासाला तर तू उठवतेस. ’’
हे ऐकून सकाळी सकाळी बाबा रागावले. तो चिडला.
‘‘काम सांगितलं की बरा अभ्यास आठवतो तुला. आजी-आजोबा, मोठय़ा घरातले सगळे येणारेत आज.’’
‘‘माहितीय.. सगळे येण्याआधी उद्याच्या चाचणीचा अभ्यास संपवायचाय..’’
आवाज ऐकून बाबा आत आले आणि जितूला रागावले. जितू धुसफुसत िलबू घेऊन आला. पुन्हा अभ्यासाला बसेपर्यंत पाहुणेच आले. सामान आणायला बाबांनी खालून हाक मारली. जितू जाईपर्यंत सामान उचलून आजी-आजोबा लिफ्टमधे चढले होते.
‘‘मूर्ख, पटकन का नाही आलास? कामचुकार. चारचौघांत अगदी लाज आणतोस. प्रकाशचा मुलगा त्याचं ऐकत नाही असं सर्वानी म्हटलं की तुला अगदी असुरी आनंद होतो.’’ बाबा खवळले.
‘‘मी काय केलं बाबा? आलो ना लगेच..चार जिने उतरायला तेवढा वेळ लागणारच.’’
‘‘वर आणखी उलटून उत्तरं देऊ नकोस. काय पण नशीब आहे माझं, ऑफिसात राजकारण, घरी हे दिवटं पोरगं. काम नको, अभ्यास नको, आम्ही राबतोय. वाया जाशील अशानं’’

 जेवताना ‘का रे गप्प?’ असं काकानं विचारल्यावर ‘उद्याच्या चाचणीचा विचार करतोय’ असं जितू म्हणाला आणि सगळे त्याला हसले. ‘वा. अभ्यास? तू? फॉर अ चेंज..’ कुणीतरी म्हटलं. जितूची अस्वस्थता आणि बाबांचा पारा चढत होता. त्यात जितूनं ‘भाजी नको’ म्हटल्यावर आजी, आजोबा सगळे भाजीचं महत्त्व त्याला पटवून द्यायला लागले आणि वैतागून जितू पानावरून उठला.  बाबांना त्याचं असं भरल्या पंगतीतून उठून जाणं आवडलं नाही. ते त्याच्या मागे गेले. थोडा वेळ वादावादी - बाबांचा चढलेला आणि जितूचा दबलेला आवाज आला आणि मग खाडकन थोबाडीत मारल्याचा आवाज. जेवणारे सगळे एकदम चूप झाले. जितू थरारला. त्याला ढसाढसा रडायलाच आलं. दिवसभर कोणाच्याच नजरेला तो नजर देऊ शकला नाही.

त्यानंतरच्या झरझर सरकणाऱ्या प्रसंगांत राजानं बघितलं - बारावीला बऱ्यापैकी मार्क घेऊन केटिरगला जाऊ इच्छिणारा जितू, बाबांचं जिद्दीनं डोनेशन देऊन त्याला इंजिनीअिरगला घालणं, दिवसेंदिवस संवाद अत्यंत कमी होत गेलेला जितू, त्याचं दुसऱ्या वर्षांनंतर परीक्षाच न देणं, फीचे पैसे असेच उडवणं.. बाबा आधी संतापत संतापत जाणारे आणि नंतर वैफल्यग्रस्त होत गेलेले.. मैत्रिणींना जितूच्या तक्रारी सांगणारी आई आणि कधी ‘कशी जिरवली’ अशा नजरेनं पाहणारा तर कधी भकास दिसणारा जितू..
वेताळ म्हणाला, ‘‘राजा, या घरातल्या दररोजच्या युद्धाचं कारण काय? कुणाचाच हेतू वाईट नसतो तरीही त्यांच्यात अंतर का पडतं? कोणाचं चुकतंय? यावर काय करायचं ?’’
‘‘जितू आणि बाबा यांचा हा पॉवर गेम-शक्तिप्रदर्शन आहे वेताळा. ‘मीच वरचढ’ ही खुन्नस एकदा सुरू झाली की पुढच्या वेळेस दोघंही जास्त शक्ती लावणार. त्यामुळे दरवेळी वाढती खुन्नस आणि जुन्या त्रासात भर असा तो डोंगर वाढतच जातो. कुणाच्या तरी एकाच्या हरण्यातून आलेली शांतता तात्पुरती असते. पुरेशी शक्ती जमली की खुन्नस पुढे चालू. शांतता हवी असेल तर कुणीतरी ते समजून पहिल्यांदा तलवार म्यान करावी लागते.’’
    ‘‘पण आईबाबा भल्यासाठीच सांगतात ना? आणि असा अपमान झाल्यावर बाबांचा हात उचलला गेला तर त्यात काय चुकलं? ’’
‘‘जितूचा नाही का सर्वासमोर अपमान झाला? पण तो हात उचलू शकत नाही. बाबांचं हात उचलणं हा या लढाईतला टìनग पॉइंट ठरला वेताळा. त्या अपमानानं जितूच्या आत्मसन्मानाला शेवटचा फटका दिला. कोण चूक कोण बरोबरचा निवाडा झाल्यानं कधी प्रश्न सुटत नाहीत. दोघांपैकी कुणाची तलवार धारदार हा मुद्दाच नसतो. काय घडतंय ते नीट समजून घेतलं तरच ते बदलता येईल. भावंडांशी जितूची तुलना करत राहून आईबाबा त्याच्या गुणांकडे आणि प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतातच आहेत. त्याच्या प्रयत्नांचं, टेबलटेनिसचं कौतुक त्यांनी मनापासून निखळपणे करायला पाहिजे.’’
जितूच्या मागण्यांना ‘नाही’ म्हणताना त्यांची स्वत:ची काही कारणं असतीलही, पण सततचा नकार किंवा प्रत्येक वेळी अटी यातून जितूला वाटतं, ‘त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा माझे मार्कच महत्त्वाचे आहेत’.त्याच्या केटिरगला जाण्याच्या इच्छेलाही त्यांनी नाकारलंच आहे. याकडे त्रयस्थपणे पाहून त्यांनी जितूच्या खुन्नसमधलं या नकाराचं वजन जाणीवपूर्वक कमी केलं पाहिजे.  
जितूचा आत्मसन्मान क्षणोक्षणी दुखावला जातो. बाबांसारखा आरडाओरडा किंवा मारणं हे तो करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध वागणं किंवा शाब्दिक तलवार उपसणं एवढंच त्याच्या हातात राहतं. खुन्नस सुरू होते तेव्हा अपमान हा शस्त्रासारखा वापरला जातो आहे, भांडण ट्रिगर करतो आहे हे बाबांनी समजून घ्यायला हवं.
‘‘बाबांनीच का ?’’
‘‘जितूचं चुकत आहेच. पण त्याचं हे ‘वेडं वय’ आहे. पुढचा विचार करून वागण्याची मेंदूची क्षमता अजून विकसितच झालेली नाही. शरीरानं मोठा दिसत असल्यामुळे नकळत जास्त प्रगल्भतेची अपेक्षा केली जाते. तसं तर प्रत्येक परिस्थितीचा स्वतंत्रपणे सारासार विचार करण्याची क्षमता बाबांच्या वयानं त्यांना दिलेली आहे. ‘हा कामचुकारच आहे, याच्या मागण्याच जास्त, उलटून बोलतो, माझं नशीबच असं’ अशा प्रकारच्या गृहितकांना त्यांनी स्वत:वर स्वार होऊ देता कामा नये.
प्रत्येकच वेळी युद्धपरिस्थिती समजून वार केल्यासारखं बोलण्याऐवजी थोडं मोकळेपणानं घेतलं, इश्यू करणं टाळलं तर परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल. कधीकधी जितूचा त्रागा ‘होता हैं, होता हैं, टीनएजमें होता हैं’ असं काहीतरी बोलून गमतीत घेता येऊ शकतो. ताण न घेता वागण्याचा असा वेगळा पर्याय अनुभवल्यानंतर जितूही आपलासा करू शकेल. बरोबर ना वेताळा ?’’
राजा थांबला. वेताळ खांद्यावरून गायब झाला होता.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो