ग्रंथविश्व : दक्षिण आशियाई देशांमधील सेवा- क्रांतीचा मागोवा..
मुखपृष्ठ >> ग्रंथविश्व >> ग्रंथविश्व : दक्षिण आशियाई देशांमधील सेवा- क्रांतीचा मागोवा..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व : दक्षिण आशियाई देशांमधील सेवा- क्रांतीचा मागोवा.. Bookmark and Share Print E-mail

 

ज. शं. आपटे - शनिवार, २३ जून २०१२

दक्षिण आशियातील आर्थिक विकास गेल्या ३०-३२ वर्षांत चांगल्या प्रकारे झाला आहे. दक्षिण आशिया म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव हे देश समावेश असलेला भूभाग. भारत व इतर दक्षिण आशियाई देशांमधील आर्थिक वृद्धीच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की जलद आर्थिक वृद्धी, रोजगार निर्मिती, स्त्री-पुरुष समानता, सेवा यामुळे झालेली दारिद्रय़ात घट या साऱ्या बाबी शक्य आहेत. सेवा-क्रांती म्हणजे नेमके काय? उत्पादन करणाऱ्या कारखान्यासारखीच सेवा गतिमान होईल का,

विकासकार्यात उशिरा येणारे सेवांच्या जागतिकीरणाचा फायदे घेऊ शकतील का, अशा प्रश्नांची उत्तरे प्रस्तुत ग्रंथात दिली आहेत. या प्रश्नांचा विचार देश, विभाग आणि जागतिक पातळीवर घेण्यात आला आहे.
तीन विभागांत आठ लेख असलेल्या या पुस्तकाचे संपादन जागतिक बँकेतील आर्थिक सल्लागार इजाझ घनी यांनी केले आहे. आठ प्रकरणे लिहिली आहेत १३ अर्थतज्ज्ञांनी - तीन जागतिक बँकेतील व १० अमेरिका, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलियामधील प्राध्यापकांनी. दक्षिण आशियातील सेवा-क्रांतीचा आढावा घेतला आहे संपादक इजाझ घनी व ब्रुकलीन संस्थेतील ज्येष्ठ अभ्यासक होमी खरस यांनी. ३२ पानांच्या या लेखात लेखकद्वयीने २५ आकृत्या व १४ तक्ते यांमधून विवेचनास, विश्लेषणास आधार व आकडेवारी दिली आहे. आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादचे विकासाचे उदाहरण विकास प्रक्रियेत उशिराने येणाऱ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. अवघ्या २० वर्षांत प्रामुख्याने गरीब, कृषी अर्थव्यवस्थेचे आंध्र प्रदेश राज्य हे प्रमुख सेवा केंद्र झाले आहे. सर्वात जलदगतीने वाढणारे जगातील दोन विभाग आहेत- पूर्व आशिया व दक्षिण आशिया. पूर्व आशियात आर्थिक वृद्धी झाली आहे कारखान्यांमधील उत्पादनातून आणि दक्षिण आशियाची भरभराट झाली सेवा मार्गाने, हा आढावा मुळातूनच वाचायला हवा.
इजाझ घनी यांनी ‘दक्षिण आशियासाठी सेवाक्षेत्रातील वाढ हे आश्चर्य आहे का?’ या ७८ पानी लेखात तक्ते, आकृतीद्वारा ते आश्चर्य कसे नाही हे विस्ताराने मांडून दाखविले आहे. १९८० च्या दशकानंतर भारताची आर्थिक वाढ सर्वात उच्च १० टक्के देशांमध्ये राहिली आहे. जगाचे लक्ष भारताने वेधले आहे. दक्षिण आशियातील इतर देश (बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका) यांनीही चांगली कामगिरी बजावली आहे. नैसर्गिक आपत्ती, संकटे व संघर्ष होऊनही दक्षिण आशियातील देशांनी उच्च वृद्धीचे प्रमाण कायम ठेवले आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील शहरी दारिद्रय़ामध्ये घट झाली आहे. याचे श्रेय सेवाक्षेत्रातील वाढीस देता येईल. बॅरी बॉसवर्थ आणि अन्न्ोमी मार्टेन्स यांनी आर्थिक वाढ व रोजगारनिर्मिती यांचा संबंध कसा आहे हे समजावून दिले आहे. मार्टेन बोस्कर आणि टॅरी गॅरेरसन यांनी नवा आर्थिक भूगोल व सेवा क्षेत्र यासंबंधी विवेचन, विष्लेषण केले आहे. अगदी प्रारंभापासून नवा आर्थिक भूगोल हा सिद्धांत कारखान्यातील उत्पादनाशी, कारखान्यांशी संबंधित आहे. प्रमाणित नवा आर्थिक भूगोल नमुन्यातील सेवा क्षेत्र बजावत असलेली भूमिका ही व्यापार होत नसलेल्या उपभोग्य वस्तूसंबंधीची आहे. उदाहरणार्थ- घरबांधणी, केशकर्तनालये अथवा रेस्टॉरंटमधील भोजनांची आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक अभ्यासक यांनी ‘सॉफ्टवेअर प्रॉडक्शन जागतिकीकरण आणि त्यांचे गर्भितार्थ यासंबंधी लिहिताना म्हटले आहे की, या उद्योगाचे वाढते आर्थिक महत्त्व ध्यानात घेता या व्यवसायाचा प्रारंभ, वाढ, वाढलेले मूल्य (श्ं’४ी अ्िर३्रल्ल) आणि सुप्त सामथ्र्य यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे, अगत्याचे आहे. हा अभ्यास प्रादेशिक विभागातील चार देशांसंबंधी- भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका करायला हवा. मार्च २००८ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत भारतीय माहिती-तंत्रज्ञान उद्योगाने ६४ अब्ज अमेरिकन डॉलर इतका महसूल मिळविला. प्रस्तुत प्रकरणात १९८० ते २००७ पर्यंत भारतातून झालेल्या एकूण सॉफ्टवेअर निर्यातीसंबंधी तक्ता दिला आहे. यावरून या उद्योगाची कशी वाढ झाली आहे हे समजते. जागतिक बँकेतील अर्थशास्त्रज्ञ संकेत महापात्र व कॅगलर ओझ्देन यांनी स्थलांतरण व परदेशातून पाठविले जाणारे पैसे यासंबंधी म्हटले आहे की, २.२ कोटी वा दक्षिण आशियाई लोकसंख्येपैकी १.५ टक्के लोक २००५ मध्ये आपल्या देशाबाहेर राहिले. २००७ मध्ये भारतात २७.० अब्ज डॉलर इतकी रक्कम बाहेरच्या देशांमधून आली. बांगलादेशात व पाकिस्तानात अनुक्रमे ६.४ अब्ज डॉलर व ६.१ अब्ज डॉलर रक्कम आदी शिक्षण व शैक्षणिक कौशल्ये यांना सेवा क्षेत्राच्या वाढीत विशेष महत्त्वाचे स्थान आहे. १५ आकृत्या व ७ तक्ते यांमधून यासंबंधीची आकडेवारी दिली आहे. शिक्षण, दूरसंचार आणि विमान वाहतूक या तीन क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे वाढीस गती मिळते, चालना प्राप्त होते व सेवावृद्धी कायम राहण्यास मोठे साहाय्य लाभते. जॉर्ज टाऊन विद्यापीठातील (अमेरिका) सहयोगी प्राध्यापक कार्ल डाहलमन यांनी शिक्षण व सेवेतील वाढ यासंबंधी लिहिताना म्हटले आहे की, मानवी भांडवलातील (ह्यूमन कॅपिटल) मोठय़ा संख्येमुळे भौतिक भांडवल (फिजिकल कॅपिटल) मिळणे सुकर होते. नवीन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार जोमाने, वेगाने होतो व दरश्रमिकामागे उत्पादन वाढते. दक्षिण आशियात मुक्त व दूरस्थ शिक्षणासाठी (डिस्टन्स एज्युकेशन) खूप वाव आहे असे लेखकास वाटते. या शैक्षणिक कार्यक्रमासाठी केंद्रे सुरू झाली असून त्यामुळे शाळा सोडलेल्या श्रमिक वर्गातील तरुणासाठी छोटे अभ्यासक्रम यांची सोय उपलब्ध झाली आहे. दूरसंचार विकास व प्रादेशिक सहकाराची भूमिका यासंबंधी पीएच.डी. अभ्यासक कॅरोर्लान सेकॉट व संशोधन केंद्राचे उपाध्यक्ष स्कॉट वॉलस्हेन यांनी म्हटले आहे की, प्रादेशिक विभागीय सहकारामधून खूपच कमी वाढ झालेली आहे. ‘विमान वाहतूक उदारीकरणा’संबंधी ऑस्ट्रेलियामधील विद्यापीठातील प्राध्यापक याहू झांग व अध्यापक ख्रिस्तोफर फडिन्ले यांनी दक्षिण आशियातील विमान वाहतुकीचा आढावा घेऊन वाहतूक धोरणासंबंधीच्या बदलांचा विचार केला. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भयादी आहे. ७४ तक्ते व ७९ आकृत्यांमधून केलेले विश्लेषण उद्बोधक, माहितीपर झाले आहे. त्यामुळेच अभ्यासकांनी हे पुस्तक वाचायला हवे.
द सव्‍‌र्हिस रिव्होल्यूशन इन साऊथ एशिया संपादन इजाझ घनी
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली पृष्ठे ३८२, किंमत रु. ७९५.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो