गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे Bookmark and Share Print E-mail

 संकलन: रोहन टिल्लू, सुनील नांदगावकर - रविवार, २४ जून २०१२

गाणं आपल्या मनात जन्मजात रुजलं आहे हे ध्यानी येताच, करायचं ते गाणंच, या ध्यासाने अजय-अतुल झपाटले गेले. लोकसंगीत ते सिनेसंगीत अशा अनेक ‘घराण्यां’तून त्यांनी गाणं शोषून घेतलं. त्यावर आपली सर्जनशील छाप कोरत, त्यामध्ये नवी ऊर्जा ओतत ते रसिकांपर्यंत पोहोचवलं. या जोडीचा हा सुरमयी प्रवास, त्यांच्यासमोर साकार होत जाणारं गाणं आणि रसिकांच्या मनावर थेट परिणाम करणारा त्यांच्या गाण्यामागचा ‘साऊंड’.. संगीत निर्मितीमधील अशा अनेक टप्प्यांविषयी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये संवाद साधला आज ‘साऊंड ऑफ महाराष्ट्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय-अतुल यांनी..


अजय - आमच्या घरात संगीताची पाश्र्वभूमी अशी अजिबात नाही, असं म्हणता नाही येणार. पण गेल्या सात पिढय़ांमध्ये संगीताशी कनेक्टेड असं कुणीच नाही. आमचे आजोबा मंगलाष्टक लिहायचे. वडीलही बुलबुल तरंग वाजवायचे. ते शिकले नव्हते, पण त्यांना साधारणपणे सुरांचं ज्ञान होतं. आईला गाणी ऐकण्याची प्रचंड आवड होती. रेडिओवर ती गाणी ऐकत असे. पण बाकी आमचं कुटुंब शेतकरी कुटुंब होतं. वडील सरकारी सेवेत होते, आत्ताच निवृत्त झाले. बाकी मोठे चुलतभाऊ, काका वगैरे सगळेच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्रपाळी आणि दिवसपाळी करणारे होते. आमचं बरंचसं लहानपण पुण्यात गेलं असलं, तरी वडिलांची नोकरी फिरतीची होती. वडिलांना खूप वाटायचं की, आपल्या मुलांनी पुण्यात राहायला हवं, इथल्या चांगल्या शाळांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला हवं. पण आजीला ते अजिबात मंजूर नव्हतं. तिचं माझ्या वडिलांना एकच सांगणं होतं, ‘बाबा रे, जिथे तू तिथे तुझी पोरं आणि कुटुंब!’
वडिलांनाही आजीच्या आज्ञेचा उपमर्द करता आला नसावा बहुतेक. कारण मी दुसरीत आणि अतुल चौथीत असताना आम्ही पुणे सोडून जवळच्याच शिरूर या गावात गेलो. पण मला आठवतं, त्या वेळी आमच्या घरात मोठी बैठकच झाली होती. आम्ही आमच्या काका-काकूंशी, इतर भावंडांशी खूपच जास्त कनेक्टेड होतो. मी लहान होतो, पण माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठय़ा असलेल्या अतुलला हे असं वेगळं होण्याचा धक्का खूप मोठा होता. पण शेवटी आम्ही मुलं होतो. त्यामुळे मग आम्हाला शिरूरला जावंच लागलं. शिरूरला जाऊन राहणं म्हणजे आमच्यासाठी दुसऱ्या जगात जाऊन राहण्यासारखंच होतं. मला वाटतं, संगीताबद्दल प्रेम, आवड आम्हाला तिथे वाटायला लागली. पुण्यातल्या आमच्या घरात आम्ही सगळेच एकत्र वाढलेलो. त्यामुळे निवांतपणा नव्हता. पण तो निवांतपणा शिरूरच्या वातावरणात ठासून भरला होता. खूपच छोटं जग होतं ते. दोन-तीन महिन्यांमध्येच हे दोघं गातात वगैरे ख्याती शाळेत पसरली. मग प्रार्थनेसाठी अजय-अतुल दोघांना उभं केलं जाऊ लागलं. त्यातून आम्ही चांगलं गातो, आमचं वक्तृत्व चांगलं आहे, अशा आमच्या गुणांचं कौतुक व्हायला लागलं. कदाचित हे गुण पुण्यातही आमच्या अंगी असतील, पण ते आहेत हे आम्हाला शिरूरमध्येच

जाणवलं. अंगात कला होती, पण त्या कलेला वाव मिळणं, रस्ता मिळणं, याची सुरुवात झाली.
त्या वेळी आम्हाला कुठेही गायला सांगितलं की, अतुलचा एक पोवाडा ठरलेला असायचा. तो पोवाडा अतुल आणि मी गातो, हे अख्ख्या शिरूरला माहिती होतं. त्यामुळे शिरूरमध्ये शिवसेनेच्या एका शाखेचं उद्घाटन होतं, त्या वेळी आम्हाला दोघांना पोवाडा गायला बोलावलं होतं. आम्ही असेच दुसरी-चौथीत वगैरे होतो. त्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके येणार होते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्हाला बाळासाहेब ठाकरे वगैरे काहीच माहिती नव्हते. आमच्या काकांना किंवा मामांना मात्र त्यांच्या भाषणांनी आणि विचारांनी झपाटलं होतं. आम्हाला आकर्षण होतं ते दादा कोंडके यांचं. ते येणार, कदाचित आपला पोवाडा ऐकणार, याचंच आम्हाला जास्त अप्रूप होतं. पण आयोजकांनी पाहुण्यांना उशीर झाला तर गर्दीचं मनोरंजन म्हणून आमचा पोवाडा ठेवला होता. बाळासाहेब आणि दादा कोंडके आले, त्या वेळी आयोजकांनी आम्हाला सांगितलं की आता थांबवा. पण बाळासाहेबांनी सांगितलं की, आधी पोवाडा होऊ दे. परत पोवाडा झाला. त्यानंतर बाळासाहेब आणि दादा कोंडके यांच्या हस्ते आमचा सत्कारही केला गेला. आम्ही ते हार आत्ताआत्तापर्यंत जपून ठेवले होते. ते आमचं पहिलं जाहीर कौतुक होतं. ती पहिली थाप महत्त्वाची होती.
अतुल - संगीताची आवड नाही असं घर, असा माणूस निदान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. अशाच अनेक कुटुंबांपैकी एक आमचं कुटुंब आहे. आमच्या संगीताच्या प्रेमाची सुरुवात नेमकी कुठून झाली, हे सांगणं खूप कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की की, कोणतंही गाणं, मग तो पोवाडा असो, भारूड असो किंवा साधी ओवी असो, ते ऐकल्यानंतर एक वेगळंच आकर्षण वाटायचं. खूप कुतूहल वाटायचं. ते संगीत आपलंसं वाटायला लागलं आणि आम्ही त्याकडे आकर्षित झालो. हे आपल्याला जमायला पाहिजे, असं वाटत गेलं. मग ते आपसूकच जमायला लागलं. आम्ही कधीच कोणासमोर शिकायला बसलो नाही किंवा कोणी आम्हाला शिकवलंही नाही. एक दिवस गणपतीच्या मंडळात कोणीतरी मला, ‘गायचंय का,’ असं विचारलं. मीसुद्धा, ‘हो’ म्हणत भीमसेनजींचं ‘माझे माहेर पंढरी’ सुरू केलं. या गाण्याचे शब्द आपल्याला कसे तोंडपाठ आहेत, हे माझं मलाच कळत नव्हतं. पण मी जसा गात गेलो, तसे एकामागोमाग एक अंतरे माझ्यासमोर येत गेले. त्या वेळी मी पहिली-दुसरीत होतो. पण एक गोष्ट तेव्हाही वाटत होती की, आपल्याला यातलं काहीतरी कळतंय. त्याहीपेक्षा आपल्याला ते आवडतंय. गाणं चालू झालं की, आपले पाय थिरकत आहेत, हातांनी काहीतरी वाजवावंसं वाटतंय. हे जे आवडणं आहे, तेच आजतागायत चालत आलं आहे. आमची आवड आम्ही जशीच्या तशी ठेवली आहे. आता आम्हीच आमच्या गाण्याची मजा घेऊ शकलो नाही, तर लोक त्या गाण्याची मजा कशी घेणार? पुढे मग आम्ही कुठेही संगीत वाजताना दिसलं की, आम्ही दोघं तिथे उभे राहायचो. मग तो डोंबाऱ्याचा खेळ असो, जागरण-गोंधळ असो, दिंडी असो, बॅण्ड असो किंवा ढोलीबाजा असो!
काकडआरती असली की, भल्या पहाटे डोळे चोळत आम्ही तिथे जाऊन बसायचो. पुण्यात पेटी-तबला आम्हाला कधीच हाताळायला मिळाले नाहीत. पण काकडआरतीच्या वेळी पेटी, मृदंग, तबला अशी वाद्यं हाताळायला मिळाली. आपल्याला या क्षेत्रातच काहीतरी करायचं आहे, हे पक्कं झालं होतं. काहीच नाही जमलं, तरी या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हाताखाली काम करायचं. मग ते धुणीभांडी करणं असो किंवा त्यांचा ड्रायव्हर म्हणून वावरणं असो. पण याच क्षेत्रात राहायचं हा विचार पक्का झाला. त्याच दरम्यान आमच्या वाटय़ाला कौतुकही खूप आलं. त्यामुळे हुरूप वाढला. प्रतिकूल परिस्थितीला प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं. पण आता असं वाटतं की, त्या वेळी ती प्रतिकूल परिस्थिती नसती, तर आज आम्ही तावूनसुलाखून निघालो नसतो. आमच्या आई-वडिलांना विश्वास होता की, काहीही झालं तरी आपलं रक्त वाया जाणार नाही. आई-वडिलांचा पाठिंबा होता म्हणूनच आम्ही मोठी झेप घेऊ शकलो.
शिरूरनंतर परत वडिलांची बदली झाली. आता आम्ही राजगुरूनगरला गेलो. चौथी ते सातवी सगळं ठीक होतं. पण नंतरचा काळ मुलांसाठी पौगंडावस्थेत वगैरे येण्याचा असतो. या काळात आम्ही खूप मस्ती केली. या दरम्यान संगीत वगैरे सुरूच होतं. गॅदिरग आलं की, एकाच वेळी बॅण्ड, एनसीसी, स्वागत गीत आणि शेवटचा नाच अशा सगळीकडेच अजय-अतुल जोडीनं असायचे. पण परीक्षा आली की, ‘पालकांना घेऊन या..’ हा डायलॉग हमखास ऐकायला मिळायचा. याच दरम्यान, मला सगळ्यात मोठा धक्का बसला तो मी दहावीला नापास झालो तेव्हा. त्या वेळी दहावी वगैरे गोष्टींचा खूपच बाऊ केला जायचा. मी गणितात नापास झालो होतो. गणितात मला दीडशेपैकी १४ गुण मिळाले होते. तीन तासांच्या पेपरात वेळ जात नव्हता
म्हणून मी चित्रं वगैरे काढून आलो होतो. पण आता मागे वळून पाहिलं की वाटतं, आपण काय चूक केलं. गणित आपल्याला येत नव्हतं. मग आपल्याला जे येत होतं, ते आपण काढून आलो. पण पुढे चार महिन्यांमध्ये मी पासही झालो. या काळात आम्ही शालेय शिक्षणापेक्षा इतर गोष्टीही खूप शिकलो. लोकांचा, गावाकडच्या माणसांचा, चालीरीतींचा आम्ही खूप जवळून अभ्यास केला. वडील कूळ कायदा हक्क नोंदणी कार्यालयात असल्याने त्यांच्याकडे सातबाराचा उतारा वगैरे घेऊन खूप माणसं यायची. त्यांचं बोलणं, वागणं आम्ही जवळून बघायचो. कित्येकदा तर त्यांच्याबरोबर त्यांच्या गावीही मी जाऊन आलो आहे. हे संस्कार होणं खूप गरजेचं होतं. पुण्यात राहून आमचा अभ्यास झाला असता. पण हे असे वेगळे संस्कार होणं केवळ अशक्य होतं. आम्ही केवळ गोंधळ बघितला नाही, तर गोंधळी कसा जगतो, तेदेखील पाहिलं. त्यातून आम्हाला आमचा स्वभाव बांधण्यात खूप मदत झाली. त्यामुळे पुण्यात येईपर्यंत काय करायचं हे ठरलं नव्हतं. पण काय करायचं नाही, हे निश्चित केलं होतं. आणि एकदा ते निश्चित झालं की, पुढे उरलेल्या सगळ्या गोष्टी करणं सोपं होतं.
रोहन टिल्लू - हे संस्कार होत असताना संगीतरचना करावी, हा विचार कसा आला आणि पहिली संगीतरचना कोणती?
अजय - आम्ही लहानपणापासूनच शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल वगैरे संगीतकारांच्या जोडय़ांबद्दल ऐकून होतो. वडिलांनी या संगीतकार जोडय़ांची महतीही सांगितली होती. त्यामुळे अशा बडय़ा संगीतकारांचा पगडा तर होताच. पण संगीतरचना सुरू झाल्या त्या पाठय़पुस्तकातल्या कवितांना चाली लावण्यापासून. कारण शाळेतल्या कवितांच्या चाली, खूपच वाईट असायच्या आणि आम्हाला त्या म्हणाव्याशाच वाटल्या नाहीत. उदाहरणार्थ ‘छोटेसे बहीण-भाऊ उद्याला मोठाले होऊ..’ ही कविता. त्याला ठोकळेबाज चाल लावली असायची. त्या कवितेत काही भावना आहेत, याचा पत्ताच आम्हाला लागू दिला नाही. पण आम्हाला ते पटायचं नाही आणि नाही पटलं की, आपण घुसायचं हे ठरवलं होतंच. आणि आम्ही हे करतोय
म्हटल्यावर मग ही कविता कर, ती कविता कर वगैरे ऑर्डरी वाढल्या. काही चाली आम्हाला म्हणता यायच्या. पण संपूर्ण शाळेला ती चाल म्हणता येईलच असं नाही. त्या वेळी आमच्या ते डोक्यातच नसायचं. सगळ्यांना गाता आलंच पाहिजे, असं गाणं करायचं हे काही माहीत नव्हतं. मग आम्ही विचार करायचो, ‘जाऊ दे, नका घेऊ आमची चाल.’ त्या वेळी कुठेतरी आम्ही शिकलो की, आपलं गाणं प्रत्येकाला गाता यायला हवं. गाणं हे सगळ्यांसाठी असतं. गाणं पटकन ओठांवर रुळायला हवं. ते साधं हवं. हा धडा आमच्यासाठी खूप मोठा होता.
गिरीश कुबेर -  संगीतकारांना किमान शास्त्रीय संगीताचा पाया असावा, असा एक विचार आपल्याकडे रूढ आहे. तर हे शिकणं तुमच्या आयुष्यात कधी आलं?
अजय - दुर्दैवाने आम्ही संगीत अजूनही शिकलो नाही. शिरूर-राजगुरूनगर वगैरे करून आम्ही पुण्यात परत आलो, तेव्हा आम्ही रीतसर संगीत शिकण्याचा प्रयत्न केला. पण क्लासची फी, घरच्या अडचणी अशा अनेक समस्यांमुळे ते जमलंच नाही. क्लास घेणारे आठवडय़ातून फक्त दोन दिवस घेणार. पण आम्ही ऐकलं होतं की मोठमोठे उस्ताद दिवसातले आठ-आठ तास आणि अशी चार-चार वर्षे रियाझ करतात. तेव्हा कुठे ते एखादी मैफल सजवू शकतात. कला ही नित्यनेमाने घडणारी गोष्ट आहे. ती अशी आठवडय़ांतून दोन वेळा, दोन तास बसून येत नाही. खरंतर शिकून संगीत येतच नाही. शिकता येतं ते शास्त्र. म्हणजे मला माझ्या मुलाला एखाद्या गाण्याला कशी चाल द्यायची ते शिकवता येणार नाही. आपण एखाद्याला वाद्य वाजवायला शिकवू शकतो, गायला शिकवू शकतो. पण संगीतरचना कशी करायची, हे शिकवणारा कोर्स अजून तरी जगाच्या पाठीवर कुठेच बनलेला नाही. देव तुमच्या कानात सूर सांगून जातो आणि दिग्दर्शक एखादा प्रसंग सांगतो. आता या दोन्हींचा संगम म्हणजे संगीतकार! देवाच्या कृपेनं ही गोष्ट आम्हाला खूप लवकर लक्षात आली आणि आम्हाला कळलं की, क्लासमध्ये संगीत वगैरे शिकणं आपल्याला जमणार नाही.
मुकुंद संगोराम - त्या काळात तुम्ही कोणती गाणी ऐकायचात?
अतुल - अशी एखाद्या प्रकारचीच गाणी आम्ही ऐकायचो हे निश्चित सांगू शकत नाही. एखादं संगीत कोण वाजवतंय, काय वाजवतंय किंवा ते कुठे वाजतंय याकडे आमचं लक्षच नसायचं. ते मनाला भिडतंय ना, मग ऐका. खरं सांगायचं तर अमुक गाणं लोकप्रिय आहे, हे सांगावं लागतच नाही. ते मनाला भिडतं. मग त्या गाण्याचे शब्द ओळखीचे नसले तरी मग ते संगीत म्हणून ऐकावंसंच वाटतं. मग असं ऐकावंसं वाटणारं संगीत आम्ही ऐकत गेलो, कानात आणि मनात साठवत गेलो. त्यातूनच आमची टेस्ट डेव्हलप झाली. पारंपरिक गाण्यांपासून ते रेडिओवर लागणाऱ्या बिनाका गीतमालापर्यंत आम्ही सगळंच ऐकायचो. अनिल विश्वास,
शंकर- जयकिशन यांच्यापासून ते भप्पी लाहिरी वगैरेंपर्यंत सगळ्यांना मनसोक्त ऐकलं. एकतर शिरूर-राजगुरूनगर अशा ठिकाणी सांगीतिक वातावरण वगैरे अजिबात नव्हतं. पण म्हणून आम्ही त्यासाठी कधीच थांबलो नाही. तिथे असताना मी अजयला नेहमी एक थाप मारायचो की, संगीतकार व्हायचं तर आपल्याकडे सगळी वाद्यं असणं आवश्यक आहे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे आपल्याला ती सगळी वाद्यं वाजवता येणं हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या वेळी अरेंजर वगैरे असतो, असं काही माहीतच नव्हतं. संगीतकार म्हणजे गाणं सुरू होताना जो म्युझिक पीस वाजतो त्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक घटकाला जबाबदार असलेली व्यक्ती, हे मनात ठसलं. त्यामुळे आजही अजय-अतुलच्या गाण्यांना अरेंजर नसतो. म्युझिक पीसेस, बॅकग्राऊंड, कोणती वाद्यं वाजणार वगैरे सगळ्याची जबाबदारी ही आमची, म्हणजे संगीतकारांचीच असते. आमची भावना त्या वेळी अशी होती की, आपल्यालाच जमलं नाही, तर ते त्या वादकाला कसं वाजवून दाखवणार किंवा एखादा तबल्यावर वाजवणारा तुकडा आपण वाजवून दाखवत नाही, तोपर्यंत तो तबलजीला कळणार कसा? असे मूलभूत प्रश्न डोक्यात यायचे. पण त्या वेळी मी अजयशी खोटं बोललो ते आज आम्हाला खूपच उपयोगी पडतंय.
अजय - आणखी एक गोष्ट म्हणजे आम्ही पुण्यात आलो, तेव्हा आम्हाला एक एक गोष्टी कळत गेल्या. कोणीतरी सांगायचं की, अमुक संगीतकाराचा अरेंजर तमका आहे. मी विचारायचो, अरे अरेंजर म्हणजे काय? मग उत्तर मिळायचं की, अरेंजर म्हणजे संपूर्ण वाद्यवृंद हाताळणारा आणि दोन कडव्यांच्या मधले म्युझिक पिसेस तयार करणारा माणूस. मग मला प्रश्न पडायचा की, संगीतकार नेमकं काय करतो. तर उत्तर तयार असायचं की, संगीतकार फक्त गाण्याची चाल बांधतो. तेव्हा वाटायचं की, अरेच्चा, मग हे तर आपण लहानपणापासूनच करीत आलोय. पण हे मधलं म्युझिक कसं करायचं, या खटपटीपायी एवढी र्वष घालवली.
अतुल - आपल्याकडे अरेंजरची मोठी परंपरा आहे. सबेस्टियन, उत्तम सिंग, डॅनिअल, अनिल मोहिले असे अनेक अरेंजर खूप नाव कमावून गेले. पण आम्हाला अरेंजर या घटकाची गरज कधीच पडली नाही. आताही आम्ही निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला गाणं सांगताना त्या गाण्याच्या मधलं म्युझिक वगैरे तोंडाने गाऊन दाखवतो.
गिरीश कुबेर - पण गाण्याकडे पाहताना तुम्ही एक संपूर्ण सादरीकरण म्हणूनच पाहता का?  म्हणजे चित्र नसलेल्या गाण्याचा विचारच करत नाही का?
अतुल -  ते चित्र समोर येतंच. किंवा माझ्या आयुष्यातील घटना डोळ्यांसमोर येते. म्हणजे हीरोला मुलगा झाला, तर तो मलाच मुलगा झालाय हे विचारात घेऊन मी गाणं कंपोज करतो. याचा अर्थ आम्ही या गोष्टींवर अवलंबून असतो, असा नाही. पण ती भावना मनाला भिडल्याशिवाय आम्ही ते गाणं करूच शकत नाही.
मुकुंद संगोराम - ‘विश्वविनायक’ हा तुमचा पहिला अल्बम करताना तुमच्या डोळ्यांसमोर नेमकं काय व्हिज्युअल होतं? कारण तो अल्बम मराठी नाही, तो संस्कृत किंवा हिंदी आहे.
अजय - छे, छे! ते व्हिज्युअलायझेशन आणि गाण्याची भाषा यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. ते दिसणं हे कल्पनेतून तयार झालेलं असतं आणि ते गाण्याबरोबर एकत्र येतं. आता हे कसं ते नाही सांगता येणार. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर ते कदाचित तुम्हाला तसंच दिसायला लागेल. नाहीतर ते गाणं ऐकताना तुमचा स्वत:चा स्क्रीन प्ले त्या गाण्याबरोबर तुमच्या डोळ्यांसमोरून तरळू लागेल. ‘विश्वविनायक’च्या वेळीसुद्धा गणपती बाप्पा कुठेतरी चालले आहेत. ते उंदरावर बसले आहेत. त्या वेळी कसला तरी धक्का लागला आणि बाप्पा पडले आणि मग चंद्र हसला. हे सगळं डोळ्यांसमोर होतं. आता तुमचा स्क्रीन प्ले माझ्यापेक्षा वेगळा असेल. पण त्या स्क्रीन प्लेमध्ये उगाचच मध्येच माधुरी दीक्षित नाही यायची. तो त्या प्रसंगाशी एकरूप झालेला स्क्रीन प्लेच असेल. दुसरी गोष्ट म्हणजे, त्या वेळी भक्तिसंगीत हे तबला, हार्मोनियम, पखवाज, सतार आणि बासरी यांच्यापुढे जातच नव्हतं. पण त्या अल्बममध्ये आम्ही ट्रंपेट, व्हायोलिन्स अशी सिंफनिक अरेंजमेंट केली. आता गंमत बघा, आम्ही पारंपरिक किंवा लोकसंगीतही शिकलेलो नाही, तर सिंफनी शिकणं वगैरे लांबच्याच गोष्टी आहेत. पण त्या वेळी ते आव्हान होतं आणि आम्ही ते पेललं.
गिरीश कुबेर - लोकसंगीताच्या काही मर्यादा आहेत असं वाटतं का? किंवा तिथे तालालाच जास्त महत्त्व दिलं जातं आणि मेलडी कमी पडते का?
अजय - तुम्ही कोणत्या प्रांताचं लोकसंगीत घेत आहात, त्यावर सगळं अवलंबून आहे. आता प्रत्येकाच्या प्रांतानुसार ते लोकसंगीत विकसित झालं आहे. आपल्याकडे मला वाटतं की, लोकसंगीतात सुरांवर ताल प्रभावी झालेला नाही. एका तुणतुण्यावर, दिमडीवर किंवा जात्याच्या घरघरीवरही आपल्याकडे गाणं फुलतं आणि ते खरं लोकसंगीत. मला कळत नाही की, लोकसंगीत म्हटल्यावर आजच्या पिढीला केवळ ‘ढांकचाकंक’ हा तालच का डोक्यात येतो! ते चूक आहे. वासुदेव यायचा तेव्हा तो केवळ हातात टाळ घेऊन यायचा. पण त्याचंही गाणं गोडच असायचं ना.
मुकुंद संगोराम - तुम्ही तुमची क्रिएटिव्ह प्रोसेस समजावून सांगू शकता का?
अतुल - एखादा थॉट डोक्यात घेतला की त्यावर आपोआपच विचार सुरू असतो. आपणच आपल्याशी बोलायला लागतो. समजावून सांगायला लागतो. आणि मग एका कन्क्ल्युजनला आपण येतो. मग एका पॉइंटला आल्यावर आम्ही एकमेकांशी बोलतो. आमच्या दोघांमधली एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांचे खूप चांगले टीकाकार आहोत. एखादी गोष्ट पटत नसेल, तर आम्ही एकमेकांना तसं स्पष्ट सांगतो. एवढा आदर एक कलाकार म्हणून आम्हाला एकमेकांबद्दल वाटतो. अशी अनेक गाणी आहेत की, आम्ही अर्धवट सोडून दिली आहेत. ही एवढी प्रोसेस झाल्यानंतर मग आम्ही जे गाणं दिग्दर्शक किंवा निर्मात्याला ऐकवतो, तेव्हा ते त्याला पसंत पडलेलं असतं. आणि आतापर्यंत एकदाही असं झालं नाही की, आम्ही ऐकवलेलं गाणं त्याने रिजेक्ट केलंय. कारण आमचा फिल्टरायझेशन प्लांट एवढा डेंजर आहे की, त्यातून बाहेर पडलेलं गाणं एकदम चोखच असतं. आमचं गाणं कसं असावं, यासाठी एक साधंसोपं माप आहे. आता माझी आणि एखाद्या माणसाची ओळख नाही आणि त्याने हे गाणं ऐकलं तर त्याच्या मनाला आणि आत्म्याला भिडलं पाहिजे. ते कधी होईल, तर ते गाणं ऐकताना आमच्या अंगावर काटा येईल तेव्हा. मग ते गाणं ‘कोंबडी’ असो किंवा ‘मन उधाण वाऱ्याचे’ असो! एक श्रोता म्हणून आम्ही ते गाणं ऐकताना आम्हाला तशी भावना वाटली, तर ते लोकांना आवडणार हे आम्हाला माहीत असतं.
प्रशांत दीक्षित - तुम्ही संगीताच्या बाबतीत नेहमीच ओरिजिनल राहिलात. ही ओरिजिनॅलिटी कशी जपलीत?
अजय - आम्ही आधी सांगितलं तसंच. काय करायचं हे आम्हाला माहीत नव्हतं. पण काय नाही करायचं, हे मात्र नक्कीच ठरलं होतं. ते आमचं कायम ठरलेलं असल्यानं या या गोष्टी नाही करायच्या, हे आम्हाला माहीत होतं. त्या गोष्टी आम्हालाच आवडत नसल्याने आम्ही त्या करण्याचं कटाक्षाने टाळलं. म्हणजे मी माझी चाल एखाद्याला ऐकवायला गेलो, आणि त्याने दाद दिली की, ‘अरे, हे तर आरडीसारखं वाटतंय,’ तर मी खूश न होता मला वाईट वाटायला हवं. मी खूश झालो तर चूक आहे. इन्स्पायर होणं हा वेगळा भाग आहे. पण पूर्णच्या पूर्ण तसंच असणं, हे धोकादायक आहे. आमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात, मुंबईला आलो तेव्हा खूप बिकट परिस्थिती होती. उपाशी फिरायची परिस्थिती होती. त्या परिस्थितीत आम्हाला घरात दूध वगैरे घेणंही शक्य नव्हतं. त्याही वेळी आमच्यासमोर रिमिक्स करण्याचा एक पर्याय होता, पण आम्ही ते नाही केलं. त्या वेळीही आम्ही ठरवलं होतं की, संगीतात काही जमलं नाही, तर पुण्यात परत जाऊ. मस्त वडापावची गाडी टाकू. उत्तम वडापाव विकू आणि पैसे कमवू. पैसे कमवण्यासाठी संगीत, हे कधीच डोक्यात नव्हतं आमच्या. देवाने जे दिलंय, त्याचा इन्सल्ट का करायचा? यातूनच आम्ही तो साधेपणा आणि ओरिजिनॅलिटी जपली आहे.
अतुल - यातला दुसरा भाग असा की, आम्ही खूप ऐकलेलं असलं, तरी आमचा विचार, आमची भावना आमच्या चालींमध्ये येते. आम्ही खूप ऐकलं हे खरं असलं तरी, त्या प्रत्येक गोष्टीवर आमचं असं एक मत आहे. त्या मताचा विचार करून आम्ही काम करतो. जागरण-गोंधळ आपण खूप ऐकलेत. मग आपण त्यात आणखी काय आणू शकतो, याचा विचार करतो. म्हणजे, ‘अगंबाई अरेच्चा’मध्ये जो जागरण-गोंधळ आहे, त्या वेळी ते बगाड वगैरे नेत असतात असा सीन आहे. त्या जागरण-गोंधळाच्या बाजूने आम्ही ढोल-लेझीम पण वाजवले. असे जागरण-गोंधळात ढोल-लेझीम पहिल्यांदाच कोणीतरी वाजवले होते. पण ते खूप चांगलं वाटलं.
अजय - अजून एक उदाहरण सांगतो. लावणीत ढोलकीबरोबर कडं वाजायला पाहिजे. पण ते वाजत नव्हतं. कारण पूर्वीच्या काळी हलगीवाले गण झाल्यानंतर वेग चालू  झाला की वगाला हलगी उलटी करून ठेवायचे. त्या हलगीत पैसे टाकले जातील, हा हेतू. पण त्यामुळे त्याच्या पुढच्या सगळ्या लावण्यांमध्ये हलगी वाजायची नाही. पण त्यामुळे असा पायंडा पडला की, लावणीला हलगी नाही. पण आम्हाला ‘का नाही’ ते कळायचंच नाही. ढोल वाजवायचा, ताशा नाही? भजनात टाळच नाही वाजवायचे? आम्ही विचार केला की, आमच्या हलगीवाल्याने हलगी उलटी केली नाही. तो ढोलकीबरोबर हलगी वाजवणारच. वाईट एवढंच वाटतं की, कित्येक लावण्यांमध्ये हलगी वाजली नाही.
रोहन टिल्लू - ओरिजिनॅलिटीचा आग्रह धरत असताना ‘कोंबडी पळाली’ ‘चिकनी चमेली’ बनून कशी आली? निर्मात्यांचा आग्रह की तुमची इच्छा?
अजय - ती चाल आमचीच आहे की. त्यामुळे ‘चिकनी चमेली’साठी आम्ही ती वापरली तर काय वावगं आहे? तुम्ही हा विचार करा की, ‘कोंबडी पळाली’ कोणी पळवली असती तर?
अतुल - दुसरी बाब अशी की, दक्षिणेतील अनेक संगीतकारांची अनेक गाणी दक्षिणेत पॉप्युलर असतात. महाराष्ट्राची समस्या अशी आहे की, आपलं संगीत कुठलं आणि हिंदी चित्रपट कोणता हे आपल्याला कळतच नाही. आता ‘अग्निपथ’मध्ये इतर पाच गाणी आमचीच आहेत आणि हे गाणं निर्मात्याच्या इच्छेखातर घ्यायला लागलं, तर वावगं काय? त्याच प्रसंगासाठी आम्ही दोन-तीन चाली तयार केल्या होत्या. पण दिग्दर्शकाने आम्हाला तो प्रसंग सांगितल्यानंतर आम्हालाही हे गाणं तिथे वापरावंसं वाटलंय. आतापर्यंत कुठल्याच मराठी चित्रपटातलं गाणं हिंदी चित्रपटात गेलं नाहीये.
रोहन टिल्लू - शब्दांना तुमच्या दृष्टीने किती महत्त्व आहे?
अतुल - आमच्यासाठी तरी नुसतेच शब्द महत्त्वाचे नाही. ते शब्द समर्पक हवेत. आम्हा दोघांनाही शब्दांचं खूप वेड आहे. आम्ही दोघांनीही आठवी ते दहावी १०० मार्काचं संस्कृत आग्रहाने घेतलं होतं. त्यामुळे शब्दाच्या नादमाधुर्याचं फॅसिनेशन आहे. त्यातच खेबुडकर, गदिमांनी लिहिलेल्या गाण्यांचे शब्द आणि चाल कसे हातात हात घालून जातात. त्या शब्दांना पर्यायी शब्द सांगा ना! आता ‘पिंजरा’मधल्या ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’, या चालीवर नवीन गाणं लिहून दाखवा ना! इतके हातात हात घालून जातात चाल आणि शब्द. आम्ही जेव्हा चाल समजावून देतो ना, ‘लालीलाला, नानीनानाना’ तेव्हा आम्हाला असं अपेक्षित असतं की आमच्या ‘ला’च्या जागी आकारान्त अक्षरच येईल, ‘ली’च्याजागी ईकारान्त अक्षर येईल. ‘खेळ मांडला’च्या जागी ‘वाट लागली’ असं आलं तर कसं होईल? याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. गीतकाराने शब्द लिहून आणले आणि निर्मात्याला आवडले की, मीटरमध्ये बदल करून ते बसवले जातात. पण मीटरमध्ये बदल करून होत नाही. शब्दांचं नादमाधुर्य महत्त्वाचं असतं. नाहीतर गाण्याचा डौलच बिघडतो. म्हणून शब्द महत्त्वाचे. उचित शब्द नाही मिळाले, तर कित्येक चाली चांगल्या असून ती गाणी भिडत नाहीत. ते नादमाधुर्य साधलं जात नाही. शब्दांशिवाय तुमच्या संगीतात तेवढी ताकद हवी की तुम्ही ती भावना पोहोचवू शकाल.
विनायक परब - संगीतकारांसाठी सुरुवातीचा काळ खूप मेहनतीचा आणि बेभरवशाचा असतो. तर तुमच्या आयुष्यात हा काळ किती होता आणि त्यावेळचे पण अजूनही मनावर कोरले गेलेले काही अनुभव आहेत का?
अजय - खरं सांगायचं तर, आता मागे वळून पाहिल्यावर ते दिवस किंवा तेव्हाची परिस्थिती बिकट वगैरे वाटते. पण त्या वेळी ते कधीच वाटलं नाही. आज त्याबद्दल वाटतंय की, अरे त्या वेळी फार कमी पैसे असायचे. पण त्या वेळी वाटत नव्हतं तसं. कटू आठवणी तर चिक्कार आहेत. पूर्वी आम्ही प्रोग्रामिंग करायचो. आम्ही कोणाकोणाकडून कीबोर्ड घ्यायचो आणि त्यावर गाण्याचं प्रोग्रामिंग करून आम्ही सेव्ह करायचो. असंच एकाच्या कीबोर्डवर एक गाणं तयार केलं होतं. तो कीबोर्ड त्याच्यापाशी ठेवला. घरी येऊन रात्री सगळ्यांना ऐकवलं. सगळ्यांनाच आवडलं. दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलो, कीबोर्ड ऑन केला. पण ते गाणं नव्हतंच. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते गाणं प्रोग्रामिंग केलं. तिसऱ्या दिवशी ते पुन्हा गायब. असं सलग पाच दिवस झालं. मी केलेल्या गाण्याची फ्लॉपी कोणीतरी उन्हात धरून त्यावरचा डाटा इरेझ करून टाकायचं. हे आम्हाला नंतर सहा वर्षांनी कळलं. त्या वेळी एक फ्लॉपी २५ रुपयांना मिळायची. पण तेवढे पैसेही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे एकच फायदा झाला की, एक गाणं प्रोग्रॅम करायला मला आधी एक दिवस लागायचा, ते काम मी अध्र्यापेक्षा कमी वेळात करायला शिकलो.
गिरीश कुबेर - त्या वेळी तुम्ही चाल बांधली आणि ती कोणीतरी परस्पर उचलली आहे, असं कधी झालं का?
अजय - अशा खूप चाली आहेत.. (एक मोठा सुस्कारा घेऊन आणि जोरदार हसून) पण असो!!!
शेखर जोशी - एखाद्या गाण्याच्या लोकप्रियतेची किंवा ते पडण्याची जबाबदारी कोणाची, गीतकार, संगीतकार की गायक?
अतुल - त्या गाण्याचा नायक म्हणून ती जबाबदारी संगीतकाराची आहे, असं आम्हाला वाटतं. कारण गीतकाराला दिग्दर्शक एखादा प्रसंग सांगतो. पण संगीतकारालाही गीतकाराला मार्गदर्शन करावंच लागतं. त्याच्याकडून आपल्याला हवं ते काढून घ्यावं लागतं. त्यानंतर येतो गायक. रेकॉर्डिगच्या वेळीच गायकाचा गाण्याशी संबंध येतो.  पहिलं गाणं संगीतकाराला समजतं आणि त्याची जबाबदारी आहे की ते गाणं दुसऱ्याकडे पोहोचवावं! व्हिजन कोणालाही डोनेट करता येत नाही. त्यामुळे संगीतकाराची ती जबाबदारी ठरते.
अजय - यातला आणखी एक मुद्दा म्हणजे, कोणताही माणूस काम करायला बसतो, त्या वेळी ठरवून काहीतरी वाईट करायला बसत नाही. तो बिचारा नेहमीच काहीतरी चांगलं करायलाच बसतो. आता यश वगैरे त्या सगळ्या प्रोजेक्टच्या नशिबावर अवलंबून असतं. आमचा प्रयत्न म्हणजे एक गाणं सगळ्याच लोकांना ‘सुपर्ब आहे’, असं वाटलं, तर ते यशस्वी गाणं म्हणायला हवं.
गिरीश कुबेर - पण मग लोकप्रियता हाच निकष लावला, तर त्याचा धोका वाटतो का?
अजय - आम्ही काम करताना काम आमच्यासाठी करतो. त्या वेळी आम्ही लोकांचा विचार करीत नाही. वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांना वेगवेगळ्या स्तरावरचं म्युझिक आणि पॅटर्न आवडतात. प्रत्येकाची चॉइस वेगळी आहे. अल्ताफ राजा, स्टीव्ह वंडर, रेहमान आपण सगळेच ऐकतो. त्यामुळे कुठेतरी आपल्याला आपलीच सीमारेषा ठरवावी लागते आणि आम्ही ती ठरवली आहे. काम करताना आमचं मन जे सांगेल, ते करतो. लोकप्रिय गाणं हे ठरवून करता येत नाही. आयटम साँग म्हणजे लोकप्रिय, असं नाही.
प्रशांत दीक्षित - शब्दांची ताकद, जी तुम्हाला मराठीत मिळू शकते, ती हिंदीतही तेवढय़ाच सहजतेने कळते आणि मिळते का?
अतुल - हो, त्याला सर्वस्वी संस्कृतचा अभ्यास जबाबदार आहे. आम्ही हिंदीत दोन-तीन चित्रपट केले. एका चित्रपटात एका गीतकाराला शब्दांचं महत्त्व माहीत होतं. पण दुसऱ्याच्या कानीकपाळी ओरडूनही त्याला लक्षात आलं नाही. शेवटी आम्हालाच ते एडिट करावं लागलं. आम्हाला एक इनर सेन्स सांगतो की, हा शब्द चालीबरोबर जात नाही. कुठेतरी तो हार्श किंवा शार्प वाटतोय. ती निवड आपसूक होते.
अजय - आमची ९९ टक्के गाणी घ्या, ती आम्ही चालीवर केली आहेत. पण गंमत म्हणजे त्या सगळ्याच गाण्यांच्या साइन लाइन्स, म्हणजे पहिल्या दोन ओळी आम्ही लिहिल्या आहेत. म्हणजे, ‘चमचम करता है ये नशीला बदन’, ‘अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली, पसरली लाली, रत्नप्रभा भवताली ’ हे आम्ही लिहिलंय. पुढे आमचा गुरू ठाकूर काम करून जातो. ‘मला जाऊ द्या ना घरी.’ आम्ही लिहिलं. शब्द आम्हाला त्याच वेळी ऐकू येतो, ज्या वेळी चाल ऐकू येते. पण चाल ऐकू आली की धडपड सुरू होते.
प्रभा कुडके - रितेशने तुमची करण जोहरशी कशी भेट घडवून दिली?
अजय - खरे सांगायचे तर ‘अग्निपथ’मुळे आमचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला असे नव्हे, तर ‘गायब’ हा चित्रपट आम्ही आधी केला होता. परंतु त्यानंतर आम्ही ‘गायब’ झालो असे म्हणता येईल. ‘अप्सरा आली ..’ हे गाणे संजय लीला भन्साळी यांनी ऐकले. हे गाणे कुणी केले याचा त्यांनी शोध घेतला. संजय लीला भन्साळी यांनी फोनवरूनच ‘अप्सरा..’ गाण्याबद्दल खूप कौतुक केले. असेच गाणे मला ‘बाजीराव मस्तानी’साठी हवे, असेही ते म्हणाले. नंतर त्यांनी ‘खेळ मांडला’ हे गाणे ऐकले त्याबाबतही प्रचंड कौतुक केले. त्यांनी आठच दिवसांत आम्हाला ‘माय फ्रेण्ड पिंटो’ या चित्रपटाचे संगीत देण्यासाठी विचारणा केली. तो चित्रपट करत असताना ‘सिंघम’ची ऑफर मिळाली. त्या चित्रपटाचे एक गाणे रेकॉर्ड करत असतानाच रितेश देशमुखांचा फोन आला.
अतुल - ‘अग्निपथ’चा रिमेक करण्याबाबत चर्चा करत असताना करण जोहर-रितेश देशमुख यांच्यात ‘नटरंग’च्या गाण्यांबद्दल बोलणे झाले. रितेश करण जोहरला म्हणाला की ‘अग्निपथ’चा रिमेक करणार असाल तर संगीतासाठी ‘नटरंग’ची गाणी नक्की ऐक. गाणी आवडली तर मग अजय-अतुलशी संपर्क साधा, असेही रितेशने सांगितले. ‘नटरंग उभा’, ‘वाजले की बारा’ ही गाणी ऐकताना याच टाइपचे अस्सल मातीतले संगीत ‘अग्निपथ’च्या रिमेकमध्ये असायला हवे असे दिग्दर्शक करण मल्होत्राला वाटत होते. त्याला ते बरोब्बर कळले होते. आता त्या अर्थाने बॉलीवूडचा किंवा हिंदी सिनेमाचा म्हणून एक वैशिष्टय़पूर्ण ‘साऊण्ड’ होता तो राहिलेलाच नाही. कोणतेही गाणे हे सिन्थेटिक म्युझिकने तयार केले जाते. त्यामुळे गाणी खूप काळ ऐकवत नाहीत. रेडिओवरची गाणी आजकाल आम्ही संगीतकार असून ऐकू शकत नाही. गाणी म्हणजे ज्या पद्धतीचे ‘टोन्स’ वापरले जातात ते ऐकवत नाहीत. जी वाद्ये निवडली जातात त्याचा ‘साऊण्ड’ ऐकवत नाही. त्यामुळे ‘फिल्म’चा ‘साऊण्ड’ असे आता राहिलेलेच नाही. ‘नटरंग’चे संगीत ऐकताना करण मल्होत्राला ते जाणवले म्हणून त्याने आम्हाला संगीत करायला दिले.
गिरीश कुबेर - म्हणजे तुम्हाला भव्य स्तरावरचा ऑर्केस्ट्रा असणे गरजेचे वाटते का?
अतुल - सिनेमाचा साऊण्ड हा सिनेमासारखा भव्य असायला हवा. ‘अग्निपथ’मध्ये एका गाण्याच्या वेळी गणपतीची भव्य मूर्ती आहे. मग तो गणपती आम्ही सांगितला तेवढा उंच आणि भव्य असायला हवा असे आम्हाला वाटते. मग त्या भव्य मूर्तीसमोर माणूस थिटा वाटला पाहिजे. मगच ते गाणे भव्य स्तरावरचे गाणे होऊ शकते. हे करण मल्होत्राने आमची गाणी ऐकून ओळखले. त्याने संपर्क साधला. अर्थात ‘धर्मा प्रॉडक्शन्स’कडून विचारणा होणे हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. ‘अग्निपथ’चे संगीत केले.
गिरीश कुबेर - टीकेचा एक मुद्दा आहे तो म्हणजे हिंदीमध्ये अनेक संगीतकारांनी त्यांच्या प्रांताप्रांतातले संगीत नेले. पण मराठी त्या मानाने कमी नेले आहे. मराठी संगीत जे हिंदीत केले गेले त्याची टिंगलच झाली. सुधीर फडकेंचा एकच सिनेमा हिंदीत झाला. त्यातील गाजलेले गाणे हेही पुन्हा मराठीच वाटते, असे बोलले गेले. तुमच्या गाण्यांचे तसे नाही, ते ‘हिंदीचे स्पिरीट’ घेऊन जाते. हा सांस्कृतिक बदल आहे तो कुठल्या पातळीवर झाला, कसा झाला?
अतुल - याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमच्या गाण्याचे शब्द मराठी आहेत म्हणून ते मराठी गाणे वाटते. परंतु, शब्द दुसऱ्या भाषेतले असले तर ते त्या भाषेचे गाणे वाटेल. आम्ही कुठलेही गाणे करताना ते ‘युनिव्हर्सल’ गाणे करतो. मराठी गाण्यांचा ‘साऊण्ड’ असा नव्हताच. लोकसंगीत होते तो म्हणजे त्यातला ताल. पण आमचीच गरज अशी असते की आम्हाला गाणे ‘युनिव्हर्सल’ करावेसे वाटते. कोरियातील माणसाने आमचे गाणे ऐकले तर त्याला शब्द कळणार नाहीत, पण सीडी ऐकताना त्याला त्यातला ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदीत आम्ही संगीत दिले आहे. गाण्याचे ‘साऊण्ड डिझायनिंग’, संगीत संयोजन हे सगळे जागतिक स्तरावर रसिकाला समजले पाहिजे, त्यातला आनंद त्याला मिळाला पाहिजे अशाच प्रकारे आम्ही संगीत देतो. शब्द फक्त मराठी असले तरी हरकत नाही.
प्रशांत दीक्षित - पण मग मराठीला ही मर्यादा आली होती त्याची कारणे..
अजय - मधल्या काळात या मर्यादा दुर्लक्षामुळे आल्यात असे वाटते. आपली मराठी गाणी कोण ऐकते? मराठी सिनेमा कुणी पाहते का? असा नकारत्मक विचार केला जायचा. आम्ही त्याबाबतीत एक ठरविले, ते म्हणजे निर्मात्यांना चित्रपट डॉल्बी करणार असाल तर आम्ही संगीत करतो असे सांगतो.
गिरीश कुबेर - त्या अर्थाने मराठीच्या सांस्कृतिक-सांगीतिक मर्यादा या अजय-अतुल यांच्यामुळे तुटल्या असे म्हणता येईल का ?
अजय - नाही, असे म्हणता नाही येत. याचे कारण नवीन पिढी जी मराठी सिनेमात आली त्यांनी चित्रपटाच्या तांत्रिक गुणवत्तेमध्ये तडजोड न करण्याचे मनापासून ठरविले. डॉल्बी, ३५ एमएमवरच सिनेमा करायचे त्यांनी ठरविले. निर्माते आम्हाला ए. आर. रहमान किंवा अशा गाजलेल्या संगीतकारांचे दाखले देऊन त्यांनी केली तशी गाणी हवीत असे म्हणतात. पण तीच गाणी मणिरत्नम किंवा अशा चांगल्या दिग्दर्शकांनी चित्रित केलीत तशी तुम्ही कराल का असे आम्हाला मात्र म्हणता येत नाही.
अतुल - संगीत हा सिनेमाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. सिनेमामध्ये संगीताचे महत्त्व आहे, तर अन्य गोष्टींप्रमाणे संगीत विभागासाठी योग्य तो खर्च करायला हवा असे आमचे मत आहे. भक्तिसंगीताचे अल्बम निघायचे तो २००१ म्हणजे आम्ही ‘विश्वविनायक’ हा अल्बम केला तेव्हाचा काळ पाहिला तर संगीताकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. आम्ही ‘विश्वविनायक’ हा अल्बम आठ लाख रुपये घेऊन केला. ते सगळे पैसे चांगले संगीत करता यावे म्हणून तांत्रिक गोष्टींसाठी खर्च केले. अवाच्या सव्वा पैसे देणे हे खटकणारे आहे. परंतु आवश्यक असेल तर एखादे गाणे आम्हाला हंगेरी देशातील बुडापेस्ट शहरातील स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करायचे असेल तर तशी बजेट्स हवीत.
अजय - मध्यंतरीच्या काळात संगीतच नव्हे तर सबंध सिनेमा ७-८ लाखांत व्हायचा.
अतुल- मराठी सिनेमाची ही स्थिती पाहिली तर इच्छाशक्ती नव्हती चांगले काम करण्याची हेच म्हणता येईल.
अजय- अतुल - नंतरच्या काळात प्रेक्षक मग इतका बदलला की, आता मराठीत काहीतरी चांगले होतेय तर ते ऐकूया याकडे तो वळला. मग इतका बदल झाला की कोल्हापूरमधील सौंदत्तीच्या परिसरातील एका सिनेमागृहात ‘जोगवा’ऐवजी ‘माय नेम इज खान’ लागला होता तो काढून प्रेक्षकांनी थिएटरवाल्याला आपला ‘जोगवा’ दाखविण्याचा हट्ट धरला.
दिनेश गुणे - मिळेल त्या भाषेतला चित्रपट करू  असे तुमचे धोरण आहे का?  
अजय - नाही, असे मात्र नव्हे. मुळात संगीत देणे हा व्यवसाय नाही. वेगवेगळ्या भाषांमधील सिनेमांचे संगीत करताना त्या त्या संस्कृतीचा अनुभव घेता आला, अभ्यास करायला मिळाला तर आम्ही जरूर करू.
अतुल - व्यावसायिकतेचा मुद्दा घेतला तर ‘नटरंग’नंतर दोन वर्षे आम्ही गप्प होतो, तसे राहिलो नसतो. बुंदी पाडल्यासारखी आम्ही गाणी पाडली असती. पण आम्ही तसे केले नाही, करीतही नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जास्त, भारंभार, भरपूर संगीत आम्हाला करायचेच नाही. आमच्या बुद्धीची एक क्षमता आहे त्यानुसार आम्ही करतो. ‘अग्निपथ’नंतर चार महिने आम्ही शांत राहिलो. कारण खूप कौतुक झाले. म्हणून फटाफट एकामागून एक चित्रपट संगीत करीत राहिलो नाही. विश्रांती घेतली, विचार केला.
मुकुंद संगोराम - कलात्मकता जपणे, संपू न देणे असे करणे हे तुमच्यासारख्या संगीतकारांना जमलेय असे वाटते. ए. आर. रेहमान त्यापैकीच एक आहे. हिमेश रेशमियाने पाच वर्षे संगीत केले, परंतु आता नवीन काहीच देत नाही. परंतु सगळ्यांना हे जमणे कठीण असते. याबद्दल काय सांगाल?
अतुल - आजघडीला वेगवेगळी व्यासपीठे, वाहिन्यांचे कार्यक्रम, सगळ्यांना नवतेची, नवीन संगीताची गरज मोठी आहे. रिअ‍ॅलिटी शोंची संख्या वाढली. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीमुळे त्यातील विजेते एका रात्रीत हीरो व्हायला लागतात. बोलायला संधी खूप असल्या तरी बोलण्यासारखे नसेल तोपर्यंत आम्ही बोलत नाही. दोन वाहिन्यांनी आम्ही संगीतकार असूनही आम्हाला एका पाककला कार्यक्रमासाठी बोलावले होते, म्हणजे सध्या काय चालले आहे ते पाहा. कशासाठी आम्ही हे करायचे? सगळ्यांना काही ना काही हवे आहे. पण आम्ही आमच्यापुरते ते मनोमन ठरविले आहे की किती दिवसांनंतर बोलायला हवे. दोन शब्दांमध्ये अंतर असते. व्याकरणात जसे महत्त्व अर्धविराम, पूर्णविराम याला आहे तसेच महत्त्व करिअरमध्ये पण हवे. आधी केले मग सांगितले अशी आमची वृत्ती आहे. लोकांच्या काहीही अपेक्षा हल्ली आमच्याकडून असतात.
गिरीश कुबेर - अतिसंधी या मुद्दय़ाला धरून सारेगमचे परीक्षक म्हणून अनुभव सांगा.
अजय, अतुल - महाराष्ट्रात तर खूपच गुणी गायक कलावंत आहेत. नक्कीच आहेत. गुणवत्ता भरपूर आहे. परंतु त्या एका कार्यक्रमाचे विजेते ठरलेल्यांना हे सांगणे आवश्यक आहे की संधी मिळाली, तुम्ही सिद्ध केलेत. परंतु अजून बरेच काही करायचे आहे, हे या रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्या मुलांना सांगण्याची गरज आहे. पण या स्तरावर पोहोचल्यानंतर बनचुके होऊ नका हे समजावून सांगायला हवे. जमिनीवर राहणे फार महत्त्वाचे असते. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आम्ही एक महिना गप्प बसलो.
अतुल - अजिबात एकही मुलाखत, बाईट दिला नाही. शांत राहिलो. बडबड केली नाही.
स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ - संगीत करण्यासाठी सिनेमा निवडण्याचे तुमचे निकष काय आहेत?
अजय - प्रॉडक्शन, कथानक, दिग्दर्शक यावर आम्ही ठरवतो.
अतुल - एक प्रकारे सिनेमा निवडताना मनात-मेंदूत घंटी वाजली पाहिजे. निकष हा की संबंधित निर्माता-दिग्दर्शक यांना भेटल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांकडे पाहतो, नजरेनेच ठरवतो हा सिनेमा करायचा की नाही करायचा ते. अतिसंधीच्या बाबतीत आणखी एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे, कितीतरी रिअ‍ॅलिटी शोचे गायक विजेते आपल्याला माहिती आहेत, त्यांचे कौतुकही प्रचंड झाले. त्यानंतर किती मुले मराठीत आली, किती जिंकली, कोणाचे प्लेबॅक सिंगर म्हणून गाणे आले. शोमध्ये बिझी राहिल्यामुळे या गायकांनी पाश्र्वगायन केलेच नाही. गायक आजकाल रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात. वास्तविक गायक-गायिकेने विजेता ठरल्यानंतर पुढे आपल्याला नक्की काय करायचे आहे ते ठरविण्याची गरज आहे. पण त्यांना ते ग्लॅमर आवडायला लागते. मग कष्ट करायचे, प्रयत्न करायचे ते सोडून देतात. म्हणून जिंकल्यानंतर पहिले या गायक-गायिकांचे आणि त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे.
गिरीश कुबेर - नवीन कलाकृती येणे, नवीन कलात्मकता येणे, संगीतामध्ये नवीन काही होणे थांबले आहे का? तेच तेच मराठी संगीतामध्ये ऐकायला मिळते.
अजय, अतुल - प्रत्येकाला काहीतरी नवीन हवे असते. वाहिन्या, कार्यक्रम, पुरस्कार सोहळे या सगळ्यामध्ये नवीन गाणी वाजवली जात नाहीत. आमची पण सगळी गाणी वाजवून झाली आहेत, आता सोहळ्यांमध्ये गाणी नाहीत. लवकर काहीतरी करा असे महेश मांजरेकर नेहमी सांगतात. इतके कार्यक्रम आहेत की मला वाटते हे चांगले चाललेय तोपर्यंत ठीक आहे. पण या एण्टरटेन्मेंटचा कहर होईल अशी भीती वाटते, इतके व्हायला नको.
अजय - झाले आहे असे की, चॅनल्सना गाण्यांचे स्वामित्व हक्क वगैरे याचा विचार करून जुनी-नवी गाणी निवडावी लागतात. परंतु, नव्यामधून घेण्यासारखे काही नसेल तर मग जुनी गाणी घेण्यावाचून पर्यायच उरत नाही.
संगोराम - अल्बम बंदच आहेत, मग नवं गाणं सध्या कुठे ऐकायला मिळते. फक्त चित्रपटातून गाणे आहे.
अजय - ‘विश्वविनायक’ अल्बमचा दुसरा भाग करणार आहोत. त्यामुळे नवीन गाणी ऐकायला मिळतील. आता हा अल्बम आम्हीच स्वतंत्रपणे करणार आहोत. जागतिक, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अल्बम असेल. अल्बमसाठी कंपनीचा विचार करणार नाही. आम्ही  तसे रेकॉर्डिग करून, व्यवस्थित खर्च करून अल्बम प्रदर्शित करणार आहोत.
रोहन टिल्लू - गायकांना रॉयल्टी मिळण्याबाबतच्या मुद्दय़ावर तुमचे मत काय?
अजय - इंटरनेट डाऊनलोडिंग, पायरसी यामुळे खूप हानी होतेय. त्याचे प्रमाण पाहिलेत आणि ते पैशात मोजलेत तर सहज लक्षात येईल की एखादे गाणे करण्यासाठी गीतकार, संयोजक, संगीतकार, गायक यांना किती कमी पैसे मिळतात. मोबाइल रिंगटोनवर आमची खूप गाणी आहेत. त्याचे पैसे कोणाला मिळतात हे आम्हालाच माहीत नाही.
अतुल - मोबाइलवरती गाणी डाऊनलोड करून ऐकणे हा वेगळा टोलनाका आहे असेच म्हणायला हवे. तिथे वाजणाऱ्या आमच्या गाण्यांचे मानधन मिळावे यासाठी आमची माणसं आम्हाला या टोलनाक्यावर बसवायची आहेत.
अजय - या सगळ्याचे पैसे मिळायला लागले तर त्या कलाकाराला शांतपणे आपली कलात्मकता जोपासता येईल, नवीन काही तो देऊ शकेल. रॉयल्टीचा मुद्दा लता मंगेशकरांनी मांडला नसता तर आज गायक, संगीतकार कुणाला रॉयल्टी मिळालीच नसती. त्याबाबतीत लतादीदींचे आभारच मानले पाहिजेत. जिथे अन्य माध्यमातून आमचे संगीत वाजवून पैसे कमावले जातात, त्यांना आम्हाला आमचे हक्काचे पैसे द्यायला काहीच हरकत नसावी. आज आपल्याला वाटत असेल की प्रॉडक्शन हाऊसमध्ये गेले की आपला धनादेश तयार असेल. आपण मागितलेल्या रकमेच्या तिप्पट रकमेचा धनादेश मिळेल. असे घडतच नाही. त्या दृष्टीने पाहिला तर हा व्यवसाय वाईट आहे. मग जाऊदे आपण असा विचार करतो की, कमी तर कमी पण मला पैसे गुंतवायला तर लागले नाहीत. मग लोक तडजोडी करून गरजा पूर्ण करण्यासाठी मिळतील ते मानधन मान्य करतात. मग त्या कलावंताच्या प्रतिभेचा गळा दाबला जातो.
अतुल - त्याच्या आतला माणूसही मरतो. रिकाम्या पोटी कलात्मक गोष्टी सुचणार नाहीतच.
अजय - याचा परिणाम कलावंतांच्या कलात्मकतेवर नक्कीच होतो. पैसे मिळण्यासाठी रोज काम करायचे तर मग दर्जावर परिणाम होतोच. मग त्यातूनच ऐकतोय कोण, हा विचार विकसित होतो. रॉयल्टीचा, कॉपीराइटचा मुद्दा संगीतकार, गायक कलावंत यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा ठरतो. मोबाइल म्युझिकची उलाढाल कित्येक कोटी असेल तर त्यापैकी मूळ गाणे ज्यांनी बनविले त्यांना एक टक्का रक्कम मिळाली तरी खूप आनंद होईल.
प्रशांत दीक्षित - रिअ‍ॅलिटी शोमधून ताकदीचे गायक मिळतात का?
अजय - आम्हाला ‘नयनों में बदरा छाये’सारखं गाणं करण्याची खूप इच्छा असते. पण तशा ताकदीचे गायक कलावंत नाही मिळत. वाजले की बारा या गाण्याची तानसुद्धा मुश्कीलीने मिळाली.
अतुल - मराठी कलावंतांची अडचण म्हणजे त्यांचे शब्दोच्चार. मराठी गायकांनी दुसऱ्या भाषेत गायले तरी टोन ऐकूनच हा मराठी आहे हे कळते. हरकती घेण्याच्या पद्धतीवरूनही लगेच समजते. सोनू निगम, शंकर महादेवन, सुखविंदर यांच्या बाबतीत असे होत नाही. मराठी गायकांनी त्यासाठी प्रयत्न, मेहनत, अभ्यास-सराव करण्याची खूप गरज आहे.
प्रशांत दीक्षित - संगीत क्षेत्रामध्ये गुलशन कुमारसारखे लोक आले तेव्हा तो ‘कल्चरल शॉक’ होता. त्याबद्दल काय सांगाल.
अजय - त्यांच्यामुळे गाणे स्वस्त झाले, स्वस्तात सीडी उपलब्ध झाल्या. कानाकोपऱ्यात गाणे पोहोचविणे शक्य झाले.
अतुल - गुलशन कुमार यांचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. राज कपूर यांचे ‘सून सायबा सून’ हे गाणे रेकॉर्ड झाले. शूटिंग करण्यासाठी ते काश्मीरमध्ये गेले असताना कॅसेटवर खुद्द राज कपूरनीच आपल्या चित्रपटातील गाणे जे अजून बाजारात आलेले नाही ते ऐकले आणि ते अवाक झाले. मग त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना गुलशन कुमार यांचे नाव समजले. दिल्लीत गुलशन कुमार ‘जय माता दी’ या नावाने म्युझिक कॅसेट कंपनी चालवत. ती फक्त दिल्लीपुरती होती. राज कपूरनी गुलशन कुमारना बोलावले. गुलशन कुमार भेटायला आले तेच मुळी मुख्य दरवाजापासून सोफ्यापर्यंत राज कपूर यांना लोटांगण घालत घालत आले. त्यांनी माफी मागितली. ‘सून सायबा सून’ हे गाणे आपल्या चित्रपटातील आहे हे माहीत नव्हते. राज कपूरनी सगळी चौकशी केली आणि याच्यासारखा आपले चित्रपटातील गाणे दूरवर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचविणारा चांगला वितरक मिळणार कुठे, असा विचार करून पहिल्यांदा अधिकृतरीत्या गुलशन कुमार यांना ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाचे संगीत हक्क टी-सीरिजला दिले.
गिरीश कुबेर - नवीन उपक्रम, आगामी चित्रपट वगैरे..
अजय - ढोल जनरेशन म्हणून एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्याची रूपरेषा आखत आहोत. तो आमचा वैशिष्टय़पूर्ण जोरदार उपक्रम आहे. फक्त भाषा असे होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला ढोल-ताशाची जोड आलीच. भव्यदिव्य ढोल पथक उभारायचे आहे. मिरवणुकीपुरते ढोल-ताशा न वाजविता ढोल-ताशाचा एक श्रोतृवर्ग निर्माण व्हावा, विकसित व्हावा अशी आमची इच्छा आहे. एकदम सहा-सात हजार लोक ढोल वाजवतील अशा भव्य स्तरावर आम्हाला हा उपक्रम करायचा आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाऊन तेथील ढोल पथकांतून उत्तम वाजविणारी मुले आम्ही निवडणार आहोत. यातून सहा-सात हजार मुलांना एकत्र आणून ढोल वाजविण्याचा विश्वविक्रम करण्याचा आमचा मानस आहे. मराठी सिनेमाही करतोय, अल्बमचा विचार एकीकडे सुरूच आहे. पुन्हा वर्षअखेरीस लाइव्ह शो करण्याची योजना आहे. आता आमचे लक्ष्य आहे ते ढोल  जनरेशन उपक्रमाद्वारे ‘साऊण्ड ऑफ महाराष्ट्र’ असे काही करण्यासाठी प्रयत्न आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो