विशेष : एका नाटककाराचे विस्मरण..
मुखपृष्ठ >> लेख >> विशेष : एका नाटककाराचे विस्मरण..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष : एका नाटककाराचे विस्मरण.. Bookmark and Share Print E-mail

 

माधव वझे - सोमवार, २५ जून  २०१२

सुमारे पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी नाटककार शं. गो. साठे यांनी नाटकांतून उद्याचे जे वास्तव रेखाटले ते आज प्रत्यक्षात अनुभवाला येत आहे. व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा लोप होण्याला काय कारणीभूत ठरेल हे नाटकांतून प्रत्ययकारीरीत्या मांडत त्यांनी वास्तववादी रंगभूमीला चालना दिली. विस्मृतीत गेलेल्या या नाटककाराच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या नाटकांचे आजच्या संदर्भातील औचित्य अधोरेखित करणारा हा लेख..
मराठी रंगभूमीवर वास्तववादाचे आगमन १९३३ मध्ये ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकाबरोबर  झाले, असे म्हटले जात असले तरी ते काही तितकेसे खरे नाही.


एक तर आरंभीचे ते नाटकच वास्तववादाला व्यवस्थित मुरड घालून आले होते. त्यानंतर वरेरकर, अत्रे आणि रांगणेकर यांनीही वास्तववादाच्या नावाखाली स्वच्छंदतावादीच नाटके लिहिली. म्हणजे इब्सेनची नोरा घराबाहेर पडली; पण अत्र्यांची निर्मला मात्र ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे’ असे बोधामृत पिऊन नाटकाअखेरीला घरातच राहिली. वास्तववाद अस्सल स्वरूपात आपल्या रंगभूमीवर येण्यासाठी स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे जावी लागली.
१९५४ मध्ये तेव्हाच्या मुंबई राज्य शासनाने राज्य नाटय़ स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली आणि स्पर्धेच्या पहिल्या काही वर्षांतच स्पष्ट झाले की, वास्तववाद खऱ्या अर्थाने प्रायोगिक रंगभूमीवर अवतरला आहे. तेंडुलकरांचे ‘माणूस नावाचे बेट’, व्यंकटेश माडगूळकरांचे  ‘तू वेडा कुंभार’ ही दोन ठळक उदाहरणे. स्पर्धेच्या त्या पहिल्या काही वर्षांत आणखी एका नाटककाराने मराठी रंगभूमीचे लक्ष वेधून घेतले होते. शं. गो. साठे. पेशाने प्राध्यापक असलेले साठे करकरीत वास्तव त्यांच्या नाटकात व्यक्त करू पाहत होते.
शं. गो. साठे यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. त्यानिमित्ताने हे सगळे पुन्हा नजरेसमोर आले.
त्यांचे ‘स्वप्नीचे हे धन’ हे नाटक स्पर्धेत पुण्याच्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेने केले.  अण्णासाहेबांना लहानपणापासून निसर्गाची ओढ होती. इतकी की, घर सोडून निसर्गाकडेच जावे असे त्यांना वेळोवेळी वाटत आलेले, पण आपल्या वडिलांना त्यांनी शब्द दिला आणि पुढची वीस वर्षे संसार आणि नोकरीशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार त्यांना करता आला नाही. अण्णासाहेबांनी तो शब्द पाळला. सुखी संसार, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, बंगला, बंगल्याभोवती बाग, तिची देखभाल करायला माळी, असे सगळे चौकटीतले आखीव जगणे आता बाजूला करून त्यांना पुन्हा एकदा, ते स्वच्छंदी बालपण जगायचे आहे. स्वत:चे असे आयुष्य जगायचे आहे. निवृत्तीचा निर्णय घेतला असतानाच त्यांची कंपनी त्यांना जास्त पगार, जास्त भत्ते, परदेश प्रवासाची संधी असे खूप काही देऊ करते. अण्णासाहेबांना आता त्याचा मोह नाही. म्हणून  कंपनीचे पत्र ते घरात कोणाला दाखवीतही नाहीत, पण त्यांच्या पत्नीच्या हाती ते लागते आणि चालत आलेली ती ऑफर अण्णासाहेबांनी स्वीकारलीच पाहिजे, असा हट्टच धरते. ‘‘हा संसार काय तुमच्या एकटय़ाचाच आहे असे समजता का?’’ असा कोंडीत पकडणारा प्रश्न ती करते. अण्णासाहेबांचा नाइलाज होतो. नाटक संपताना ते स्वत:लाच सांगतात की, संसाराच्या चौकटीत आता मी इतक्या हसऱ्या चेहऱ्याने जाऊन बसणार आहे की, माझ्या मनाच्या तडफडीचा कोणाला पत्ताच लागणार नाही.
महाराष्ट्रीय कलोपासकने केलेल्या प्रयोगात अण्णासाहेब हे वाक्य उच्चारत असताना पंख पसरलेला, पण तिथेच भिंतीवर खिळ्यांनी ठोकून ठेवलेला एक गरुड प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. येऊ पाहत असलेल्या औद्योगिकीकरणाच्या पोटी उद्याचे कोणते भीषण वास्तव दडले आहे आणि भिंतीवर ठोकले गेलेले असे किती गरुड घरोघरी असणार आहेत, ते या नाटककाराने १९५७ मध्येच पाहिले होते.
१९६० मध्ये साठे यांचे ‘पहाटेची चाहूल’ हे नाटक पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या नाटय़संस्थेने सादर केले. भाऊसाहेबांचा बाहुल्या तयार करण्याचा कारखाना आहे. तिथे संतू हा एक कामगार आहे. कारखान्यात जयंत एक अधिकारी म्हणून काम करतो.
जयंताच्या बंगल्याभोवती असलेल्या बागेतली माती घेऊन आपल्या स्वत:च्या कल्पनेप्रमाणे बाहुल्या तयार करण्याचा संतूला छंद आहे. जयंतालाही ते आवडते. पुढे कारखान्याची भरभराट झाल्यावर, सगळ्यांसाठी एकाच नमुन्याची घरे बांधून घेऊन सगळ्यांनी तिथेच राहायला जाण्याचे जसे काही फर्मानच भाऊसाहेब काढतात. इतकेच नाही तर नव्या गेस्ट हाऊसच्या उद्घाटनप्रसंगी सगळ्यांनी एका विशिष्ट गणवेशात यावे असा आग्रह धरतात. स्वत:च्या कल्पनेप्रमाणे मातीच्या बाहुल्या तयार करू पाहणाऱ्या संतूची ते निर्भर्त्सना करतात. आपली स्वत:ची ओळख आपल्या जीवनशैलीने जपणाऱ्या जयंतालाही अखेर असाहाय्यपणे तडजोड करावी लागते आणि तो ठराविक गणवेशातच समारंभाला जाण्याचे मान्य करतो. संतू तेवढा स्वत:च्या स्वतंत्र सर्जनशीलतेशी फारकत घेण्याचे नाकारतो. सपाटीकरणाच्या विरु द्ध उभा राहणारा एक संतू म्हणजे रात्र संपून उगवणाऱ्या पहाटेची चाहूलच असल्याचे सुचवून हे नाटक संपते.  
नाटककार शं. गो. साठे त्या वेळी उद्याचे नाटक लिहीत होते असे म्हणता येईल. औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरण व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा लोप घडविणार आहेत आणि सार्वत्रिक सपाटीकरण हे उद्याचे एक दारुण सत्य असणार आहे, असा इशारा साठे या नाटकामधून देताना आपल्याला दिसतात.  
आणि या दोन नाटकांनंतर आले त्यांचे आणखी एक नाटक, ‘ससा आणि कासव’. दोघांची शर्यत लागली असता, ससा वाटेत झोपला आणि कासवाने शर्यत जिंकली ही त्या काळात घरोघरी प्रिय असणारी गोष्ट होती. ससा झोपला तरी साठे टक्क जागे होते. त्यांना दिसत होते की, प्रत्यक्ष जगात, ससा मुळीच झोपत नाही; तो स्मार्ट असतो. तो केव्हा पुढे जातो ते कासवाला कळतसुद्धा नाही. बेसिक १०५ रु पयांची नोकरी, मग दर वर्षी अडीच रु पये वाढ; असे करता करता आयुष्यात केव्हा तरी १७० ला पोचणार आणि हेडक्लार्क होऊन समाधान पावणार, अशी भाबडी स्वप्ने पाहणारा श्रीधर, आपल्या मुकुंद या  मित्राला आपल्याच खोलीत काही  दिवसांसाठी आसरा देतो. नाटक संपते तेव्हा चित्र दिसते ते असे की, तसा उडाणटप्पू असणारा, पण चलाख, व्यवहारी, संधिसाधू असा मुकुंदच श्रीधरला तिथेच मागे ठेवून यशस्वी होऊन निघून जातो. नाटककार साठे या नाटकाच्या निमित्ताने आधुनिक इसापनीती कशी असणार आहे, ते जसे काही सांगू पाहत होते.
‘ससा आणि कासव’ १९६१ मधले. मुंबईच्या ‘रंगायन’ संस्थेने ते रंगमंचावर आणले आणि विजया जयवंत यांनी प्रयोगाचे दिग्दर्शन केले होते.
शं. गो. साठे यांच्या या तीन नाटकांची म्हणावी तशी दखल ना प्रेक्षकांनी घेतली ना समीक्षकांनी! आता मागे वळून पाहताना सहजच स्पष्ट होते की, या तीनही नाटकांचा संदर्भ आजही टिकून आहे. कदाचित याआधी नव्हता तेवढा तो आज आहे! खेद आणि खंत एवढीच आहे की, वास्तववादी रंगभूमीच्या पायाभरणीमध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या नाटककार प्राध्यापक  शं. गो. साठे यांचे २००० मध्ये निधन झाले तेव्हा आपल्या रंगभूमीचा पडदाही थरथरला नाही..! 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो