करिअरिस्ट मी : तेजोमय नादब्रह्म
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : तेजोमय नादब्रह्म
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : तेजोमय नादब्रह्म Bookmark and Share Print E-mail

उत्तरा मोने ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
त्यांचं करिअर गाण्यातलं. पण त्यांना करिअर म्हणावं का?  त्यांच्यानुसार ती साधना असते. अविरत चालणारी. या साधनेत अखंड बुडालेल्या आरती अंकलीकर-टिकेकर ही संगीतकला स्वत:पुरती न ठेवता अनेकांना देत आहेत; अगदी गुरुकुल पद्धतीने. आज अनेकांच्या गुरू असणाऱ्या आरतीताई सांगताहेत; त्यांच्या गुरू  किशोरीताई आमोणकर यांच्याविषयी
३ जुलैच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने..
अमेरिकेतला एका कार्यक्रम .. सभागृह खच्चून भरलेलं.. प्रत्येक जण स्वरांच्या मैफलीत धुंद व्हायला उत्सुक.. कार्यक्रम सुरु करणार इतक्यात लक्षात आलं की, डग्गा फुटलाय.. मला गाणं तर सुरू करावं लागलं कारण समोर दर्र्दी श्रोते बसलेले.. पण दुसरा डग्गा शोधून आणेपर्यंत म्हणजे जवळजवळ वीस-पंचवीस मिनीटं मी तिथे बसून फक्त आलापीच करत होते.. रागाला शरण जाणं म्हणजे काय ते तेव्हा कळलं.. आणि आठवल्या त्या माझ्या गुरु किशोरीताई. कारण इतका वेळ केवळ आलापी घेत रसिकांना खिळवून ठेवणं थोडं कठीणच. त्या नेहमी सांगत रागालाही भाव असतो. त्याची उपासना कर. रागात प्रचंड शक्ती आहे. त्यामुळे ती सांगीतिक कलाकृती गाऊन त्या रागाला शरण जा, म्हणजे तो राग आपोआप तुझ्यासमोर उभा राहील.. तेव्हा वय लहान होतं त्यामुळे त्याचा अर्थ कळला नव्हता, पण तनामनात ते इतकं खोलवर भिनलं होतं की नंतर पुढच्या टप्पात तो अनुभव मी प्रत्यक्षात अनुभवला आणि नंतर अनुभवतच राहिले ..
 शास्त्रीय संगीतातला एखादा राग, एखादी ठुमरी, दादरा, नटखट बंदिश यांसारख्या गीतप्रकारांतून संगीत यशस्वीपणे रसिकांपर्यंत नेणाऱ्या आरती अंकलीकर-टिकेकर यांचा हा अनुभव. आपल्या गुरुंचं किशोरीताई अमोणकरांचं त्यांच्या संगीत जीवनातलं महत्व अधोरेखित करणारं. संपूर्ण जीवन संगीताला वाहिलेल्या आरतीताईंनी शास्त्रीय संगीताच्या मफली रंगवल्याच  शिवाय ‘तेजोमय नादब्रह्म’, ‘पिया बावरी’, ‘रागरंग’ यांसारख्या अल्बममधून किंवा ‘दे धक्का’मधल्या ‘उगवली शुक्राची चांदणी’सारख्या गाण्यातून आपलं वेगळेपण त्यांनी सिद्ध केलंय.
वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी ‘शारदा’ नाटकातली वल्लरीची भूमिका, आठव्या वर्षी ‘सुवर्णतुला’ नाटकातली कृष्णाची भूमिका आलाप, ताना, हरकतींसह त्यातली गाणी सादर करून रसिकांची मिळवलेली दाद वनिता समाज, इंडिया कल्चरल लीग, गोल्डस्पॉट यांसारख्या स्पर्धा यांतून मिळवलेलं यश किंवा वयाच्या १४ व्या वर्षी नाटय़दर्पणच्या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडेंनी आपला हार आरतीच्या गळय़ात घालून दिलेली शाबासकी.. किंवा वसंतराव कुलकर्णीच्या एकसष्टीच्या वेळी आरतीने गायलेल्या पूरिया धनाश्रीनंतर सी. आर. व्यासांनी ‘अरे ही तर गंधर्वकुमारीच आहे..’ अशी दिलेली पावती..  एकूणच लहानपणापासून अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांपासून ते सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत सर्वाची दाद मिळवणाऱ्या आरतीताईंनी देशात-परदेशात अनेक मफली गाजवल्या. पं. जसराज पुरस्कार, केसरबाई केरकर शिष्यवृत्ती, मध्य प्रदेश सरकारचं कुमार गंधर्व अ‍ॅवॉर्ड असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. सध्या पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात गुरुकुल पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम त्या करताहेत. विद्यार्थिनी त्यांच्या घरीच राहतात त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची संगीतसाधना अखंड चालू असते. त्यांच्या मते शास्त्रीय संगीतात जर करिअर करायचं तर चोवीस तास तुम्ही त्याच विश्वात असलं पाहिजे. शिवाय याला करिअर म्हणण्यापेक्षा त्याला त्या साधनाच म्हणतात. कारण त्यासाठी संगीत श्वासातच असणं आवश्यक असतं. कधीही कोणत्याही वेळी संगीतातली एखादी संकल्पना जेव्हा स्वराकार घेते तेव्हा ती तुम्हाला साकारता आली पाहिजे..
आरतीताईंवर लहानपणापासून संस्कारही तसेच झाले. शाळेचा अभ्यास आणि रियाज या दोन्ही गोष्टी वेळच्या वेळी झाल्याच पाहिजेत हा त्यांच्या वडिलांचा कटाक्ष होता. आरतीचे बाबा तर हातात एक मण्यांचा डबा घेऊन बसायचे.. कधी ५० मणी तर कधी १०० मणी. मणी संपेपर्यंत ती तान घोटत राहायची आणि कधी तरी चुकून आरतीने ‘कंटाळा आला,’ असं म्हटलं तर बाबा म्हणायचे, ‘‘तुला जर गाणं मनापासून शिकायचं नसलं तर गॅलरीतून खाली उडी मारलीस तरी चालेल.’’ इतकी त्यांची शिस्त होती.
मुळात जेव्हा तुमचं मन घडत असतं, बुद्धी घडत असते त्या वेळी परिश्रम झाले पाहिजेत. आरतीताईंच्या बाबतीत तेच झालं. अगदी लहानपणी शाळेतून घरी आल्यावर मत्रिणींबरोबर खेळण्याच्या ऐवजी त्या रियाज करत राहिल्या. त्याचं फळ त्यांना मोठेपणी आपसूक मिळालं. त्यांच्या मते याच दिवसात या क्षेत्रातले गुणीजन, विचारी, सखोल अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आपल्यासोबत असणं गरजेचं असतं आणि यांना त्या पं. रामनारायण, डॉ. अशोक रानडे, पु. ल. देशपांडे, विजया जोगळेकर दिनकर कायकिणी, के. जी. िगडे यांच्या रूपाने मिळाल्या. त्या तेरा चौदा वर्षांच्या असताना वरचा षड्ज लावला की खूप खोकला येत असे, खूप त्रास होत असे. आता अशा वेळी त्या डॉक्टरांकडे गेल्याच पण डॉ. अशोक रानडेंनी प्राणायाम, काही आसनं सांगितली. व्हॉईस कल्चरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलं जे त्यांना आजपर्यंत उपयोगी पडतंय. किंवा पु.ल. आणि वामनराव देशपांडेंनी त्यांना किशोरीताई आमोणकरांकडे शिकायला जा, तुझ्या आवाजाला त्यांची शैली योग्य ठरेल आणि अर्थातच त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळेल, असा मोलाचा सल्ला दिला.
 आरतीताई म्हणाल्या की, माझं परमभाग्य म्हणून मला ताईंकडे शिकता आलं. रागाच्या भावविश्वाची खरी ओळख त्यांनी मला करून दिली. राग ताल, स्वर यांचा एक सांगाडा आहे. त्या पलीकडे असलेला भाव ओळखून घ्या, असं त्या म्हणायच्या. म्हणजे आपलं जसं शरीर आहे, ज्यात मन, बुद्धी आहे तसाच आत्माही आहे. तसाच रागालाही आत्मा असतो. शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात जसं आपण आलापीने सुरुवात करतो मग विलंबित द्रुत बंदिश रागाचा विस्तार हे सगळं उत्तम रीतीने पेश करणं, रागाचं उलगडणं किती हळुवार पद्धतीने करता यईल ते मला त्यांच्याकडून शिकता आलं. अर्थात त्यांच्या श्वासातच संगीत आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास, त्यांची साधना, त्यांचं सांगणं हे वेगळंच होतं. मला ते खूप जवळून अनुभवता आलं. ताईंचं जगणं गाण्यापासून वेगळं काढताच येणार नाही. २४ तास त्या संगीतात आकंठ बुडालेल्या असतात. आपल्या संगीताला शेकडो  वर्षांचा वारसा आहे. अनेक विचारधारांची घराणी त्यात वेगवेगळे राग, ताल गायकी या सगळय़ातून स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण करणं आणि त्या जीवनानंदात तरंगत राहणं ही सोपी गोष्ट नाही. हा वेगळा विचार तुम्ही केलात आणि तो आपल्या गाण्यातून तुम्ही मांडलात तर ते गाणं त्यांना भिडतं याचा प्रत्यय ताईंच्या सहवासात राहून मला आला. खूप कमी काळ मला तो सहवास मिळाला पण त्या अतिशय प्रेमळ गुरू आहेत, ज्यांनी माझ्यावर अगदी आईसारखं प्रेम केलं. त्या आमचे खूप लाड करायच्या पण शिस्तही तेवढीच होती त्यांची. आम्हाला गाणं उत्तम यावं ही त्यामागची त्यांची कळकळ मला जाणवायची. एवढंच नाही तर त्या दिवसात मला सर्दीचा त्रास खूप होत असे तर ताई स्वत: मला डॉक्टरांकडे घेऊन जायच्या अगदी टॅक्सीचे पैसेसुद्धा त्यांनी कधी मला देऊ दिले नाहीत. कित्येक वेळा त्यांची नवी साडी मला कार्यक्रमाच्या वेळी घडी मोडायला द्यायच्या. खरं तर मला वाटतं ताईंसारख्या गुरूंची विचारसरणी शिष्याला व्यापून टाकते. माझंही तसंच झालं होतं. माझ्या हृदयात या गुरुमूर्तीची प्रतिष्ठापना मी केली होती. रोमारोमांत गुरूचं अस्तित्व व्यापून राहिलेलं होतं. त्यांची आवाज लावायची पद्धत, चेहऱ्यांवरचे हावभाव एवढंच नाही तर अगदी रुमालही मला ताईंसारखाच लागायचा. त्या म्हणजे एक ग्रंथ आहेत. त्यामुळे त्यांनी उच्चारलेलं एक एक वाक्यही मला अनेक महिन्यांचा विचार देतं.
 आत्मशोधासाठी संगीत हा एक उत्तम मार्ग आहे, असं आरतीताईंना वाटतं आणि त्यांच्या या म्हणण्यामागे अर्थातच त्यांच्या गुरू किशोरीताईंचा संस्कार आहे. जेव्हा त्या ताईंकडे जात होत्या तेव्हा १८/१९ वर्षांचं त्यांचं वय होतं. त्यांच्याकडून त्या वयात घेतलेलं ज्ञान अर्थातच खोल मनात झिरपत गेलं. गुरूच्या एखाद्या मैफलीत शिष्य म्हणून त्यांच्या मागे बसून गाण्यात एक वेगळीच धन्यता आहे आणि त्यात शिकणंही आहे. आरतीताईंना मिळालेल्या या संधीविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘त्यांच्या मागे बसून गायचं म्हणजे एक मोठं आव्हानच असायचं. कारण त्यांचा पाण्यासारखा प्रवाही विचार आणि गळाही. त्यामुळे त्यांच्या मनातल्या कोणत्याही विचाराला छेद न देता त्याला जोड देता आली पाहिजे. रागातल्या दोन स्वराकृतींमधला त्यांचा पॉजदेखील तितकाच सुंदर असायचा. त्यामुळे जागा मिळाली की गायचं असं नसे. आवर्तन कुठे भरायचं आणि कुठे नाही ते त्यांच्या एका इशाऱ्याने आम्हाला कळायचं. ताईंच्या मागे बसून गाणं म्हणजे देहभान हरपणं, एकाग्रता, तादात्म्य पावणं याचं उत्तम उदाहरण असायचं. अत्यंत फोकसड् असं गाणं त्यांच्या रूपाने त्यांच्या सहवासात दिसायला लागायचं. जर मालकंस राग असेल तर ताई मालकंस होऊन जायच्या, मीही मालकंस होऊन जात असे. खूप छान दिवस होते ते. त्या अर्थाने संगीतच नाही तर जीवन काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे मला त्यांच्या सहवासात कळलं, कारण ताई खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहेत. जी गोष्ट करतात ती पूर्णत्वाने. प्रत्येक गोष्ट सुंदर, सुबक असावी, असं त्यांना वाटतं. अगदी भाजी चिरण्यापासून रांगोळी काढण्यापर्यंत त्यांच्या सगळय़ाच गोष्टी सुंदर असतात. आजही जेव्हा त्यांच्याकडे जाऊन येते तेव्हा त्या महासागराला भेटून माझ्या ओंजळीत जमतील तेवढे मोती भरून मी घेऊन येते. त्यांची प्रसन्नता माझ्या ठायी साठवण्याचा प्रयत्न करते. व्यासंग, साधना म्हणजे काय? साधक म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहिलं की पुरेपूर पटतं. म्हणूनच तो एक आनंदमार्ग आहे.’’
आरतीताईंच्या बोलण्यातून किशोरीताईंविषयीचं प्रेम, आदर गुरूकडून घेतलेली विद्या आत्मसात करून आज आरतीताईंनी मिळवलेलं यशही नक्कीच कौतुकास्पद आहे. विशेषत: पूर्णपणे शास्त्रीय संगीतातच करिअर करणंही सोपं नाही. आज शास्त्रीय गायिका म्हणून तितकीच आव्हानंही समोर असतात. नोकरी, करिअर करणाऱ्या स्त्रियांसारखं भलंही त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागत नसेल पण घरी राहून संगीतातलं चिंतन, मनन, जुनी रेकॉìडग्ज ऐकणं यासाठी तिला वेळ देता आला पाहिजे. आरतीताईंच्या मते घरच्यांनी या सगळय़ा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सून म्हणून किंवा बायको म्हणून आपल्या जबाबदाऱ्या ती पार पाडतच असते पण ती घरी आहे म्हणजे ती रिकामी आहे हे समजून उपयोगाचं नाही. संगीतातल्या करिअरच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी असतात. त्यामुळे जेव्हा घरच्यांना वेळ असतो तेव्हा या कलाकारांना वेळ नसतो. साहजिकच कुटुंबीयांना क्वलिटी टाइम देण्याचा प्रयत्न ती करत असतेच पण घरच्यांनीही ते समजून घेतलं पाहिजे.
आरतीताईंच्या बाबतीत त्यांच्या सासूबाई सुमती टिकेकर आणि एस. जी. टिकेकर दोघंही संगीताच्या प्रांतातले. त्यामुळे सुनेला त्यांनी समजून घेतलं. किंबहुना आरतीताई तर म्हणतात की, आज या क्षेत्रात जे काही  काम मी करू शकले त्याचं बरचसं श्रेय सासूबाईंचं आहे. कारण अगदी माझ्या मंगळागौरीच्या दिवशीही मला कार्यक्रम करावा लागला होता. अशा अनेक प्रसंगांपासून ते घरातली आजारपणं किंवा माझी वकील झालेली मुलगी स्वानंदी हिच्या प्रत्येक फायनल परीक्षेला जातीने हजर राहण्यापर्यंत प्रत्येक वेळी मला त्यांचा पाठिंबा मिळालाय. किंवा उदय (उदय टिकेकर) आज अभिनयाच्या क्षेत्रात असूनही त्याची उत्तम साथ मला लाभली कारण माणूस म्हणून सासूबाईंनी त्याला तसा घडवला आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं, आजच्या करिअरिस्ट स्त्रीला एकत्र कुटुंब हे एक वरदानच आहे. आणि शेवटी कसं आहे, रागातले वादी-संवादी स्वर कसे असतात तसा या कुटुंबातला संवादच आपल्या क्षेत्रात आपल्याला पुढे नेत असतो.
आज उदय टिकेकर आणि आरतीताई आपापल्या स्वतंत्र क्षेत्रात काम करतायत. दोघांची एकमेकांना चांगलीच मदत होते. आणि त्यांचा अभ्यास त्यांच्या कला, त्यांच्यात होणाऱ्या चर्चा यांचा संस्कार स्वानंदीवरही कळत-नकळत झालाच. लॉ कॉलेजला शिकताना तिनेही तिथल्या आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेत उत्कृष्ट गायिका, अभिनेत्री आणि दिग्दíशकेचं बक्षीस पटकवलं, अर्थात तिचं क्षेत्र वकिलीचंच आहे. पण तिच्या स्वानंदासाठी ती या कलाही जोपासते आहे हे महत्त्वाचं. स्वानंदीचं नाव ती सार्थ करत आहे याचं एक वेगळं समाधान आरतीताईंना आहे.
आरतीताई म्हणतात त्याप्रमाणे या आनंदमार्गावरून जाण्यासाठी वेगळाच विचार एक ठेहराव तुमच्या स्वभावात असला पाहिजे. शब्द, स्वर, ताल, लय, आवाज यांचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे. केवळ कीर्ती, पैसा यांच्या मागे न लागता खऱ्या अर्थाने साधना केली पाहिजे. शास्त्रीय संगीताची ती मानसिकता मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणजे मेडिटेशनसाठी जसं आपण एखाद्या कोपऱ्यात शांत बसतो पण त्या मनोवस्थेपर्यंत जायला वेळ लागतो. तसंच  शास्त्रीय संगीत हे मेडिटेशन आहे. जे योग्य पद्धतीने गुरूकडून शिष्याकडे आलं तर शिष्याला समृद्ध करत असतं. किशोरीताईंकडून आरतीताईंना मिळालेल्या वारशांसारखं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो