पसाय-धन : या रे या रे लहान थोर..
मुखपृष्ठ >> पसायधन >> पसाय-धन : या रे या रे लहान थोर..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पसाय-धन : या रे या रे लहान थोर.. Bookmark and Share Print E-mail

अभय टिळक, शुक्रवार, ६ जुलै  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
काही वेळा असे घडते, की एखाद्या नामवंताच्या पुस्तकाला दुसऱ्या एखाद्या तशाच भारदस्त व्यक्तिमत्त्वाने लिहिलेली प्रस्तावना मूळ ग्रंथापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सरस उतरते. साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण उपाख्य तात्यासाहेब केळकर यांचा ‘मराठे आणि इंग्रज’ हा ग्रंथ या संदर्भात आठवतो. तात्यासाहेबांच्या त्या ग्रंथाला ज्येष्ठ इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेली प्रस्तावना सततच गाजत आलेली आहे.

त्या प्रस्तावनेच्या अखेरीस, मराठी राज्य लयाला का गेले याची विलक्षण सडेतोड, अशी जी चिकित्सा खरेशास्त्रींनी केलेली आहे, त्या परिच्छेदातील एक वाक्य प्रचंड ताकदीचे आहे. सर्वसामान्य मराठी माणसाच्या मानसिकतेवर त्या एका वाक्यात खरेशास्त्रींनी झगझगीत प्रकाशझोत टाकलेला आहे. ब्रिटिश सत्ता आणि मराठी राजसत्ता यांच्या संघर्षांत मराठी सत्तेचा बीमोड होण्याच्या व्यावहारिक, भौतिक, सामाजिक आणि व्यूहात्मक कारणपरंपरेची मीमांसा मांडून झाल्यानंतर एतद्देशीय समाजाच्या गुणावगुणांची एक प्रातिनिधिक जंत्री तिथे नोंदविलेली आहे. मराठी सत्तेच्या अस्तास मराठी समाजाच्या अंगी वसणारे जे विविध दुर्गुण कारणीभूत असल्याचे वासुदेवशास्त्री ठसवतात, त्यातील एक म्हणजे ‘समूहाने कार्य करण्याची नालायकी’! समूहरूपाने एकत्रित येऊन एखादे कार्य तडीस नेण्याची तितिक्षा एतद्देशीय समाजात मुदलातच नसल्याने सत्तेचा ऱ्हास घडून आला, असे शास्त्रीबुवांचे विवेचन आहे.
खरेशास्त्रींनी मांडलेल्या या विश्लेषणाच्या पाश्र्वभूमीवर, संतांच्या शिकवणुकीतील समूहकेंद्रिततेचे महत्त्व प्रकर्षांने मनावर बिंबते. संतविचार हा स्वरूपत:च समूहकेंद्री, समाजकेंद्री आहे. संतांच्या त्या समूहप्रधान विचारप्रणालीच्या संस्कारांचा ठसा काळाच्या ओघात पुसट झाल्यामुळेच ‘समूहाने कार्य करण्याची’ शिस्त समाजव्यवहारांतून लयास जाऊन अखेर त्याची परिणती पारतंत्र्यात झाली असावी का, असा एक ‘हायपॉथिसिस’ खरेशास्त्रींच्या निरीक्षणातून उद्भवतो. संतांचे आवाहन ‘अथपासून इति’पर्यंत आहे ते संपूर्ण समाजाला. संतविचार व्यक्तिकेंद्री नाही. संतदृष्टी आणि संतहृदय व्यापक आहे. ‘बुडती हे जन देखवेना डोळां’, ही तुकोबांची तळमळ आहे. ‘अवघा चि संसार’ सुखाचा करण्याची आणि तिन्ही लोक आनंदाने भरून टाकण्याची ऊर्मी ज्ञानदेवांच्या मनी दाटलेली आहे. ‘आम्ही वैकुंठवासी’ अशा शब्दांत आपले अधिष्ठान स्पष्ट करणारे तुकोबा ‘एकंदर शिका’ म्हणून समाजमनाला हाकारतात, कारण ‘आडरानी भरले जग’ हे त्यांच्याच्याने बघवत नाही म्हणून.
स्वत:च्या उद्धारापेक्षाही जगाचे कल्याण संतविचारात अग्रस्थानी आहे, त्याचे गमक हेच. हीच आमची परंपरा आहे, याचा दाखला तुकोबा देतात तो थेट भक्त पुंडलिकांच्या कथेद्वारे. वैकुंठपद प्राप्त करून घ्यायचे तर त्यासाठी ‘जीवा नाश लागे करणे बहू’ अशी कठोर तपस्या आचरावी लागते. आता, असे ‘तपाचे सायास’ सर्वसामान्यांना कसे झेपतील? मग, वरकड समाजाच्या उन्नयनाची वाट काय? तुकोबांच्या विश्लेषणानुसार ‘तया पुंडलिके केला उपकार। फेडावया भार पृथिवीचा’ पुंडलिकमुनींनी पृथ्वीवरच्या यच्चयावत जिवाच्या शाश्वत कल्याणासाठी प्रत्यक्ष वैकुंठच भूमीवर आणले! पंढरीला ‘भू-वैकुंठ’ असे म्हणतात त्यामागील इंगित हेच. संपूर्ण संतविचाराचा गाभा इथे सापडतो. मराठी भूमीमध्ये ही अशी समूहप्रधान समाजमनस्कता पार १३ व्या शतकापासून उमटलेली आहे. संतांच्या त्या विशाल दृष्टीची अगदी सुरुवातीची चुणूक ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायात दृष्टोत्पत्तीस येते. भक्ताचे स्वरूपवर्णन करताना ज्ञानदेव त्याचे लक्षण सांगतात. आपण एकेकटय़ानेच उठून, स्वत:चा उद्धार करून वैकुंठात जायचे, ही भक्ताची मनोकामना कधीच नसते. तर आपल्यासकट समाजातील प्रत्येकालाच वैकुंठसुखाचा लाभ घेता यावा, ही संतांची ईष्र्या, ज्ञानदेवांनी, ‘कहीं एकाधेनि वैकुंठा जावें। तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें,’ अशा मोठय़ा प्रत्ययकारी शब्दांत मांडलेली आहे.
संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवणे, ही संतदृष्टीची खासियत आहे. आपण आणि जग अथवा समाज यांच्या परस्पर नात्याबाबत संतांना स्पष्ट जाण आहे. आजची परिभाषा वापरायची तर संतांच्या लेखी ते संपूर्ण समाजाचे ‘फ्रेंड-फिलॉसॉफर अ‍ॅण्ड गाइड’ आहेत! संतांची वकिली करण्याचा अथवा संतविचाराचा प्रचार करण्याचा विचार इथे अणुमात्रही नाही. संतांनी त्यांच्या मुखानेच या नात्याचा उच्चार ठायी ठायी केलेला दिसतो. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ हे ज्ञानदेवांचे उद्गार आपण, अन्यथा, कशाचे द्योतक मानणार?
उभ्या विश्वाच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी झटण्याची ही प्रेरणा संतविचारात येते कुठून, असा प्रश्न मग स्वाभाविकच मनात उमटतो. जगाने दिलेल्या त्रासाला विटून पर्णकुटीचे दार दडपून आत एकांतात बसलेल्या ज्ञानदेवांच्या मनी दाटलेल्या विषादावर समजुतीच्या चार शब्दांची फुंकर घालताना मुक्ताबाईंच्या मुखातून जे शब्द उमटले त्यांच्या अभंगरूपाला ‘ताटीचे अभंग’ असे म्हणतात. वारकरी संप्रदायात हे ‘ताटीचे अभंग’ नित्याने म्हटले जातात. असे एकूण १० किंवा ११ अभंग आहे. गंमत म्हणजे, या अभंगांत, केवळ एक अपवाद वगळता, मुक्ताईंच्या नावाची खूण कोठेही नाही. अभंगांच्या त्या गुच्छात, एके ठिकाणी, मुक्ताबाई ज्ञानदेवांना समजावतात की, जगाने आपल्याशी कितीही कटू आणि कठोर व्यवहार केला तरी आपण मात्र जगावर यत्किंचितही रागवायचे-रुसायचे नाही. कारण, शेवटी ‘जग’ म्हणजे तरी काय, त्या एकाच शिवतत्त्वाचा आविष्कार नाही का! ज्ञानदेवांना हे समजावताना मुक्ताबाई, मोठय़ा खुबीने, जग आणि त्या जगाचे वास्तव रूप आकलन झालेला विवेकी यांच्यातील नात्याचे स्वरूप उलगडतात आणि त्याच वेळी जगाच्या संदर्भात अशा विवेकी व्यक्तीचे जे कर्तव्य असते त्याचे सूचनही करतात. संतविचार समाजकेंद्री का आहे, समाजातील प्रत्येक जिवांच्या कल्याणाची चिंता संत का वाहतात याचे उत्तर इथे सापडते. विश्वाने आपल्याशी कसाही व्यवहार केला तरी आपण मात्र आपल्या चित्तात कणभरही विकल्प उमटू देता कामा नये, कारण, ‘एकापासुनि अनेक जालें। त्यांसी पाहिजे सांभाळिले’, हे आपले ब्रीद आहे, याचे स्मरण मुक्ताबाई ज्ञानदेवांना करून देतात. हे एवढे पुरेसे नाही म्हणून की काय, ‘ब्रीद बांधिले चरणी। नवें दावितां करणी’, असा प्रेमळ, परंतु सज्जड दमही त्या ज्ञानदेवांना देतात! एकाच तत्त्वामधून विश्वाची निर्मिती झालेली असल्याने रागवायचे कोणी कोणावर, असा मार्मिक सवाल मुक्ताबाई करतात. केवळ इतकेच नाही तर, ‘जीभ दातांनी चावली। कोणे बत्तिशी ताडली,’ असा अंतर्मुख करणारा प्रश्नही मुक्ताबाई ज्ञानदेवांना विचारतात.
जगाकडे संत या भूमिकेतून बघत असल्याने संतविचार स्वरूपत:च समाजकेंद्री, समूहप्रधान आणि शुद्ध ऐहिक आहे. जग हे जणू आपल्याच अस्तित्वाचे बृहद् रूप आहे, ही संतांची धारणा. त्यामुळे, ‘उजवे वाम भाग। तुका म्हणे एक चि अंग’, या नात्याने आपल्या शरीराकडे जसे आपण समग्र दृष्टीने बघतो तितक्याच एकात्म दृष्टीने संत विश्वाकडे बघतात. ‘तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुख:दुख भोग जीव पावे’ या न्यायाने जगातल्या कोणत्याही घटकाबाबत डावे-उजवे करणे संतभूमिकेला मान्य नाही. ‘संत’ या पदाची व्याख्यादेखील तुकोबा, त्यामुळे, जगाच्या संदर्भातच करतात. ‘तुका म्हणे तो चि संत । सोशी जगाचे आघात,’ हे त्यांचे उद्गार या संदर्भात विलक्षण बोलके ठरतात. संतांचे सगळे संदर्भही, त्यामुळे, समाज अथवा समूहकेंद्रीच आहेत. माझा दावा (असेलच तर!) कोणाशी, हे सांगताना तुकोबा ‘परपीडक तो आम्हां दावेदार,’ अशीच व्याख्या करतात. ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण’, इतकी तुकोबांची दयेची व्याख्या विश्वव्यापक आहे. संकुचित मानापमानांना, व्यक्तिनिष्ठ रागलोभांना संतविचारात थारा नाही, याचे कारण हेच. ‘संकोचोनि काय जालासी लहान। घेई आपोषण ब्रह्मांडाचे।।’, इतके आपले अस्तित्व तुकोबा व्यापक बनवतात, त्याचे रहस्य हेच. इतके प्रखर समूहभान लखलखते असल्यामुळेच, ‘या रे या रे लहान थोर । याति भलते नारी नर,’ असा पुकारा तुकोबा करू शकले.. आणि त्याच विश्वात्मक संतांना जातिपातींच्या संकुचित कुंपणात कोंडण्याचे उद्योग आपण आज चालविलेले आहेत. शेवटी, वासुदेवशास्त्री म्हणतात तेच खरे!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो