धनसंपदा : निवृत्तीनंतर..
मुखपृष्ठ >> धनसंपदा >> धनसंपदा : निवृत्तीनंतर..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

धनसंपदा : निवृत्तीनंतर.. Bookmark and Share Print E-mail

alt

धनश्री राणे , शनिवार , ७ जुलै २०१२
निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करतांना दोन गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या पाहिजेत. मूळ गुंतवणुकीची सुरक्षा आणि त्याची वृद्धी.
गे ल्या भागात आपण निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीची आर्थिक तजवीज करणं किती महत्त्वाचं आहे ते पाहिलं. या भागात आपण या नियोजनासाठी कोणती कृती करणं आवश्यक आहे त्यावर चर्चा करणार आहोत. आयुष्याच्या तिशी-चाळिशीच्या टप्प्यावर आपल्या त्या त्या वेळच्या गरजा भागवण्यात आपण इतके गर्क असतो की, आपल्याकडे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काही तरतूद करण्यासाठी ना वेळ असतो ना अधिकचा पैसा. म्हणूनच या भागात पाहू या काही साध्या-सोप्या टिप्स ज्यामुळे तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची योजना हळूहळू आकाराला येईल.
वेगळे बँक खाते उघडा - सगळ्यात आधी निवृत्तीनंतरच्या पुंजीसाठी दर महिन्याला काही पैसे वेगळे काढून बँकेत खाते उघडून टाका. यात बचतीला सुरुवात करा. हे असेल निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचं विशेष खातं. तुमचा पगार वाढेल, तसतशी या निवृत्ती स्पेशल फंडमधली गुंतवणूक वाढवा. बोनस मिळाला किंवा इतर कोणतीही मोठी एकहाती रक्कम मिळाली तर त्यातले २० टक्के या फंडात जमा करा. निवृत्तीनंतरच्या काळात तुमच्या अडीअडचणीसाठी गाठीशी पैसा असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी आता थोडी काटकसर केली तर कुठे बिघडलं? समजा तुम्ही रोज ५० रुपये जरी निवृत्ती स्पेशल फंडसाठी वेगळे काढले तरी वर्षांअखेर तुम्ही १८ हजार रुपये बचत करता आणि हे नक्कीच फार कठीण नाही!
‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’चा पर्याय निवडा - पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात अर्थात पीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक दर वर्षांला किंबहुना उत्तरोत्तर वृद्धिंगतच होत जाते कारण तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळते. थोडक्यात (गुंतवणुकीची मूळ रक्कम + त्यावर मिळणारे व्याज + गेल्या वर्षी मिळालेल्या व्याजाची रक्कम) अशा स्वरूपात तुमची एकूण जमा तयार होते. शिवाय पीपीएफवरील व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. पीपीएफमधील गुंतवणूक १५ वर्षांच्या कालावधीसाठी असते. मात्र त्यातील काही रक्कम सातव्या वर्षांनंतर काढता येणे शक्य आहे तर तीन वर्षांनंतर तुम्ही या गुंतवणुकीवर कर्जही काढू शकता. दर महिन्याला किंवा मग वर्षभराचे एकदम असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. मात्र दर वर्षी न चुकता यात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. वर्षांला किमान ५०० रुपये तरी भरा. अन्यथा तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही वा तुम्ही यातून पैसे काढून घेऊ शकत नाही.
व्याजाची महती - दर दिवशी ५० रुपयांची बचत करून पीपीएफमध्ये गुंतवलीत तर १५ वर्षांनंतर तुम्ही तब्बल पाच लाख रुपये जमवलेले असता. अर्थातच जसजशी वर्षे सरतात, तशी आपली मिळकत वाढत जाते. त्यामुळे भविष्यासाठी अधिक पैसे वेगळे काढून गुंतवू शकता.
इतर गुंतवणुकीचे पर्याय
राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) - भारत सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना २००४ सालापासून लागू केली. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतोच. मात्र असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना २००९ पासून खुली करण्यात आली. वयाच्या साठीनंतर त्यांच्या हाती पेन्शनच्या रूपाने पैसा असावा हाच या योजनेचा उद्देश आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी स्वावलंबन योजनेची घोषणा केली. एनपीएस धारकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यात विशेष तरतूद करण्यात आली असून केंद्र सरकारतर्फे २०१४ सालापर्यंत एनपीएस धारकांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. मात्र अशा तरतुदींनंतरही ही योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचलेली नाही.
एनपीएस योजनेची ठळक वैशिष्टय़े -
*  गुंतवणुकीच्या स्वरूपाचा विचार करता अनेक पर्याय एनपीएसमध्ये उपलब्ध असून नियमित परतावा देणाऱ्या अ‍ॅसेटमध्ये किंवा भांडवली बाजारात ही रक्कम विभागून गुंतवली जाते. गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही स्वत: निवडू शकता. यामध्ये तुमच्या वयानुसार तुमचा पैसा भांडवली बाजारात किंवा कर्ज रोखे यांमध्ये गुंतवला जातो. तरुण कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक पैसा भांडवली बाजारात गुंतवला जातो मात्र निवृत्तीचे वय जवळ येते तशी भांडवली बाजारातली गुंतवणूक कमी केली जाते.
* भारतीय पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण अर्थात ‘पीएफआरडीए’ने पेन्शनधारकांच्या गुंतवणुकीची काळजी घेण्यासाठी सहा निधी व्यवस्थापकांची नियुक्ती केली आहे. भारतीय स्टेट बँक, कोटक, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, रिलायन्स व आयडीएफसीचा समावेश आहे. निधी व्यवस्थापक निवडण्याचे स्वातंत्र्यही तुम्हाला आहे.
* एनपीएससाठी फारच कमी शुल्क आकारले जाते
* एनपीएसच्या खात्यातून वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याशिवाय पैसे काढता येत नाहीत. मात्र त्याआधी पैसे काढायचे असल्यास त्यासाठी दुसऱ्या प्रकारच्या खात्यात रूपांतर करावे लागते. एनपीएसची सुविधा दोन प्रकारच्या खात्यांत येते; टायर एक (पैसे मुदतपूर्व काढता येत नाहीत.), टायर-टू (अडीनडीला मुदतपूर्व पैसे काढू शकतो.).
* नॅशनल सिक्युरिटीज डिपोझिटरी लि. (एनएसडीएल) पीएफआरडीएच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे व्यवस्थापन करते.
म्युच्युअल फंडांच्या निवृत्तीधारकांसाठी योजना
सध्या यूटीआय व फ्रँकलीन टेम्पलटन म्युच्युअल फंड रिटायरमेंट प्लॅनची सुविधा देतात. सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅनद्वारे यातून ५८व्या वर्षांनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. आपल्या रिकरिंग ठेवींच्या अगदी उलट ही योजना आहे. निवृत्तीनंतर, खात्यात जमा असलेल्या रकमेतून ठराविक राशी महिन्याला तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात मिळते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही भांडवली बाजार (जवळपास ४० टक्के) व उर्वरित कर्ज रोख्यांमध्ये अशी गुंतवली जाते. भांडवली बाजारातील गुंतवणुकीमुळे यातून आतापर्यंत चांगला परतावा मिळाला आहे. मात्र सोबत रिस्क फॅक्टरही जोडला गेला आहे. पण या म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक पीपीएफप्रमाणे ८० सी कलमाद्वारे करमुक्त ठेवण्यात आली आहे.
सारांश
निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करताना दोन गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या पाहिजेत. मूळ गुंतवणुकीची सुरक्षा आणि त्याची वृद्धी. निव्वळ पीएफसारख्या सुविधा सध्याचे व्याजदर बघता तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याला त्या निश्चितच पुरेशा ठरणार नाहीत. महागाईचा मुद्दा विचारात घेता पेन्शनची सुविधाही तोकडी पडू शकते. म्हणूनच ही चर्चा.
नियमित केलेली गुंतवणूक किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय निवडल्यास, तुमच्या गुंतवणुकीला शिस्तबद्ध स्वरूप येईल. शिवाय एक्झिट लोड तसेच लॉक-इन पिरियड अशा सुविधांना धन्यवाद दिले पाहिजे, कारण आपल्याला मिळणाऱ्या परताव्याची वृद्धी व स्थिरता यांचा समतोल यामुळे राखला जातो. वर म्हटल्याप्रमाणे आपण थोडी रक्कम आजपासून जरी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी वेगळी काढली तरी आयुष्याची संध्याकाळ ‘अर्थ’पूर्ण होऊ शकते. म्हणूनच वेळ न दवडता सुरू करा गुंतवणूक उद्यासाठी..
(लेखिका वित्त नियोजिका आहेत.)

निवृत्तीसाठीच्या गुंतवणुकीसंबंधी तुमचे काही प्रश्न असतील, तर ते आम्हाला नक्की पाठवा पुढील ईमेलवर This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो