करिअरिस्ट मी : ‘बि’ वूमन
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : ‘बि’ वूमन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : ‘बि’ वूमन Bookmark and Share Print E-mail

alt

मनीषा सोमण , शनिवार , ७ जुलै २०१२
‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड प्लॅिनग’ या विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या अंजना घोष आज  ‘बिसलेरी’च्या ‘बिझनेस डेव्हलपमेंट आणि ह्य़ुमन रिसोर्स डायरेक्टर’ आहेत. जंगल रिसॉर्ट प्लॅिनग, स्टील प्लांट प्लॅिनग आदी वेगळ्या क्षेत्रांचा अनुभव घेणाऱ्या बिसलेरी अर्थात बिझनेस वूमन
अंजना घोष यांच्याविषयी..
पं चवीस वर्षांपूर्वी बी.एस्सी.नंतर मॅनेजमेंटला प्रवेश मिळाल्यावर ‘फायनान्स’, ‘मार्केटिंग’ किंवा ‘आय.टी.’ सारख्या त्या काळात चलती असणाऱ्या विषयांऐवजी अंजनांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड प्लॅिनग’ या वेगळ्याच विषयाला पसंती दिली.

त्यानंतर विविध प्रोजेक्ट्ससाठी काम करत त्या आज ‘बिसलेरी’ या सुप्रसिद्ध कंपनीच्या ‘बिझनेस डेव्हलपमेंट आणि ह्य़ुमन रिसोर्स डायरेक्टर’ आहेत. या त्यांच्या प्रवासाविषयी बोलताना त्यांनी उलगडलं ते बिझनेसचं तंत्र आणि मार्केटिंगचा मंत्र.
मी जेव्हा ‘मॅनेजमेंट’ केलं तेव्हा फायनान्स आणि आय.टी. या दोन क्षेत्रांची खूप चलती  होती. पण या दोन्ही विषयांत मला फार गम्य नव्हतं. केमिस्ट्री आणि फिजिक्स हे माझ्या आवडीचे विषय असल्याने करणं आणि घडवणं हे मला आवडलं असतं. म्हणून माझ्यापुढे शिलक्क असणारा ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड प्लॅिनग’ हा एकच वेगळा पर्याय मी निवडला. त्या वेळी या विषयात पुढे जाऊन काय काम करावं लागणार आहे याची अजिबातच कल्पना नव्हती आणि माझी ट्रेनी म्हणून कामाची सुरुवात झाली तीच मुळी ‘जंगल रिसॉर्ट प्लॅिनग’ या वेगळ्याच कामापासून!
त्या जेव्हा जंगल रिसॉर्ट प्लॅिनग म्हणतात तेव्हा साहजिकच त्यांच्या या कामाबद्दल कुतूहल वाटू लागतं. त्या सांगतात, ‘‘जंगल सफारींबाबतचं आकर्षण वाढावं याकरिता त्या काळी सरकारने जंगलाच्या आतमध्ये रिसॉर्ट बनविण्याची योजना आखली होती; ज्यायोगे पर्यटकांना जंगलात राहण्याची, जंगल जवळून अनुभवण्याची संधी मिळेल. त्या वेळी मी ज्या कंपनीत काम करीत होते तिथे कान्हा, रणथंबोर आणि जिम कॉब्रेटच्या जंगलात रिसॉर्ट बांधण्याची योजना होती. ती रिसॉर्ट कशी असावीत, त्यांचं इंटिरिअर कसं असावं; थोडक्यात त्यांचं संपूर्ण प्लॅिनग करून द्यायचं. खूप इंटरेस्टिंग काम होतं ते. या कामानंतर मला संधी मिळाली ती केमिकल कंपनीत.’’
रिसॉर्ट प्लॅिनगनंतर थेट केमिकल कंपनी?
‘‘ केमिकल कंपनीसाठी प्लांट प्लॅिनग करणं हे काम तरी ठीक आहे. पण त्यानंतर पंधरा वर्षे मी थेट स्टील कंपनीसाठी काम केलं. स्टील प्लांट उभारणं हे अगदीच वेगळं आणि शारीरिकमेहनतीचं काम असतं. त्यामुळे या क्षेत्रात एक स्त्री काम करू शकेल हे कोणाला पटत नाही आणि पचतही नाही. तेव्हा मी ते आव्हान म्हणून स्वीकारलं. स्टील प्लांट उभारताना उंचावर चढणं, ऊन-पाऊस-थंडीची पर्वा न करता साइटवर काम करणं हे अजिबात सोपं नसतं. ही इथे किती काळ तग धरेल अशाच नजरेने माझ्याकडे बघितलं जायचं किंवा मग खूप विपरीत परिस्थितीला तोंड देऊन काम करायचं असेल तेव्हा मला मागे ठेवलं जायचं. जसं ‘अंगार’मधल्या भूकंपानंतर तिथे जेव्हा प्लांट उभारायचा होता तेव्हा ‘अंजना कैसे वहाँ जाएगी?’ म्हणून आमच्या वरिष्ठांनी मला ऑफिस वर्क सांभाळायला मागे ठेवलं. जसा मी कधी कामाचा बाऊ नाही केला तसा मी याही गोष्टींचा बाऊ नाही केला. स्त्री म्हणून जे काही प्लस, मायनस आहे त्याला तोंड द्यावं लागणारच, हे गृहीत धरूनच मी काम करीत होते. ज्यामुळे मी स्वत:ला कधी त्रास करून घेतला नाही.
स्टील इंडस्ट्रीनंतर थेट ‘बिसलेरी’चं काम कसं काय सुरू झालं?
‘‘इतक्या वेगळ्या स्थित्यंतराचं मलाही तेव्हा आश्चर्यच वाटलं होतं. पण मला जेव्हा ही ऑफर आली होती तेव्हा या कंपनीला वेगवेगळ्या ठिकाणी प्लांट्स सुरू करायचे होते. पण काही कारणांनी ते काम रखडलं आणि आमच्या चेअरमननी मला बिझनेस डेव्हलपमेंटची ऑफर दिली. बिझनेस डेव्हलमेंट म्हणजे मार्केटिंगचाच प्रकार. मार्केटिंग म्हणजे दारोदारी आपला माल विकणं, जो मला खरंतर अजिबात आवडत नव्हतं. इथे जेव्हा आमच्या चेअरमननी हेच काम करायला सांगितलं तेव्हा मी त्यांच्याकडून हे काम समजून घेण्यासाठी वेळ मागून घेतला.’’
पण ‘बिसलेरी’ हा असा ब्रॅण्ड आहे की ज्याच्या डेव्हलपमेंटसाठी फार काही कष्ट करण्याची गरजच नाही. आज सर्वसामान्य माणूस जेव्हा दुकानात जातो तेव्हा मिनरल वॉटर किंवा पॅकेज्ड िड्रकिंग वॉटर मागत नाही तर तो ‘बिसलेरी देना’ असंच म्हणतो! तरीही..  
‘‘म्हणतो फक्त.. पण आपल्या हातात जी बाटली आहे ती ‘बिसलेरी’ ब्रॅण्डचीच आहे किंवा नाही हे पाहण्याची तसदी घेत नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी मी जेव्हा ‘बिसलेरी’त आले तेव्हा बॉटल वॉटरमध्ये बऱ्याच कंपन्या आल्या होत्या. त्या सगळ्याच बाटल्या निळ्या रंगाच्या होत्या. त्यात बिसलेरीचं वेगळं अस्तित्वच नव्हतं. म्हणून मी आल्यावर सगळ्यात पहिला निर्णय घेतला गेला तो बाटलीचा रंग बदलण्याचा.’’
या रंग बदलण्याच्या निर्णयामुळे मार्केटमध्ये किती फरक पडला?
 ‘‘आम्हाला जो अपेक्षित होता तो फरक नक्कीच पडला. त्या वेळी आमची धडपड मार्केटमध्ये उभं राहण्याची नव्हतीच मुळी. तो प्रश्नच कधी ‘बिसलेरी’पुढे आला नव्हता. त्या वेळी धडपड होती ते वेगळं उठून दिसण्याची आणि लोक ज्याची मागणी करतात तेच त्यांच्या हातात आहे की नाही ही त्यांची तपासून बघण्याची जागरूकता निर्माण करण्याची. बदललेल्या रंगामुळे हा फरक नक्कीच पडला. निळ्याच्या गर्दीत बिसलेरीची हिरवी बाटली उठून दिसू लागली.’’
‘बिसलेरी’आधी अंजनांनी ज्या कंपन्यांसाठी काम केलं तिथे थेट ग्राहकांशी संपर्क येण्याचं कारणच नव्हतं. पण इथे मात्र त्यांचा ग्राहकांशी थेट संपर्क येऊ लागल्याने काही वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं का?
‘‘आव्हानं होती, पण ती ग्राहकांशी संपर्क आला म्हणून नाही, तर एकूणच सेल्स आणि मार्केटिंगमधली होती. मी मघाशी म्हटलं तसं आम्हाला ब्रॅण्डचं नाव लोकांपर्यंत पोहाचवायचं किंवा किमतीमध्ये काही वर-खाली करायचं हा प्रश्नच नव्हता. इथे इतर सगळ्या ब्रॅण्डना आमच्याइतकी किंवा आमच्यापेक्षा कमी किंमत ठेवणं भागच होतं. माझ्यापुढे आव्हान होतं ते आमचं उत्पादन दुकानांपर्यंत पोहोचवून ते तिथे टिकून कसं राहील यासाठी प्रयत्न करणं. त्यासाठी दुकानदारांना जास्त मार्जिन देणं किंवा त्यांच्यासाठी काही योजना जाहीर करणं हेही मी आतापर्यंत कधीच न केलेलं काम करावं लागलं.’’
लोकांनी ‘बिसलेरी’चाच आग्रह धरावा यासाठी काय वेगळे प्रयत्न केलेत का?
‘‘त्यासाठी मी लोकांना हवं त्या आकाराचं पॅकेज देण्याचा प्रयत्न केला. आमचे पाणी असलेले छोटे ग्लासेस बाजारात उपलब्ध होते. ते पिण्यासाठी खूपच अयोग्य आहेत हे आमच्या लक्षात आलं. एक तर त्याला भोक पाडून स्ट्रॉ घालून पिणं यासाठीच कसरत करावी लागत असे. त्यात पाणी उरलं तर ते फेकून देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नसतो. म्हणून ६ रुपयांची छोटी बाटली देऊ लागलो. ज्याला आज प्रचंड मागणी आहे. आज विविध आकारांच्या सर्वात मोठय़ा ते सर्वात छोटय़ा बाटल्या मार्केटमध्ये आहेत. इतकं वैविध्य असणारा ‘बिसलेरी’ हा एकमेव ब्रॅण्ड आहे. प्रीमियम कॅटेगरीमध्ये ‘वेदिका’ हिमालयन वॉटर देऊ लागलो. आज पंचतारांकित हॉटेल्स, फाइन डायिनग, मोठे सुपर मॉल्स यामध्ये ‘वेदिका’ला चांगली मागणी आहे. शिवाय भारतभर ‘बिसलेरी’ पोहोचतेय की नाही हे बघण्यासाठी मी स्वत: मार्केटमध्ये फिरत असते.’’
मार्केट सव्‍‌र्हे करण्याच्या कामाचा अनुभव कसा असतो?
‘‘मार्केट सव्‍‌र्हेमध्येच तर खऱ्या अर्थाने त्या त्या भागातल्या लोकांची मानसिकता समजते. उत्तर आणि पश्चिमेकडच्या मार्केटपेक्षा पूर्वेकडचं मार्केट खूपच वेगळं आहे. तिथल्या          लोकांध्ये बॉटल वॉटर ब्रॅण्डबद्दल अजिबातच जागरूकता नाहीये. दक्षिणेत आम्हाला काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात कठीण मार्केट म्हणजे पुणे!’’
‘‘पुण्यात उभं राहणं कर्मकठीण! मी पुण्यातल्या एका दुकानात गेले तेव्हा मला पाण्याच्या बाटल्यांमध्ये ‘बिसलेरी’ सगळ्यात मागे ठेवलेलं दिसलं, म्हणून मी त्या दुकानदाराला विचारलं, ‘‘इथले लोक ‘बिसलेरी’ मागत नाहीत का?’’ तर त्यांनी मला सांगितलं, ‘‘लोक फक्त ‘बिसलेरी’च मागतात. म्हणूनच आम्ही या बाटल्या मागे ठेवल्या आहेत! इतर कंपन्या आम्हाला जास्त मार्जनि देतात तसं तुम्ही द्या म्हणजे तुमच्या बाटल्या पुढे ठेवू’ असं सांगून ‘आता धंद्याची वेळ आहे, तुम्ही नंतर या’ म्हणून वाटेला लावलं! एका दुकानात दुपारी एक वाजता पोहोचलो तेव्हा तो दुकानाचं दार लावत होता आणि मला ‘आता चारनंतर या’ असं सांगून निघूनही गेला! याच्या अगदी विरुद्ध अनुभव नागपूरला आला. तिथल्या दुकानदारांनी खूप छान स्वागत तर केलंच, शिवाय त्यांच्या अडचणी वगरे अगदी नीट समजावून सांगितल्या. असा भारतभरच्या मार्केटचा चित्रविचित्र अनुभव आहे माझ्याकडे.’’
भारतभर मार्केट सव्‍‌र्हेसाठी फिरताना घराकडे लक्ष द्यायला किती वेळ होतो?
‘‘घरापेक्षा ऑफिस मॅनेज करण्यात माझा जास्त वेळ जातो. रोज मी साधारण १० ते १२ तास ऑफिससाठीच देते. याची माझ्या घराला सवय झाली आहे. माझं नशीब म्हणजे माझ्या   घरातले सगळेच अगदी माझ्या मुलासह सगळे ‘नॉन डिमांडिंग’ आहेत आणि माझी ‘सपोर्ट सिस्टीम’ खूप चांगली आहे. माझा मुलगा सिद्धेश आता पंधरा वर्षांच्या असल्याने आता तो   त्याच्याच जगात असतो. पण तो लहान असतानादेखील त्यांनं आईला जास्त काळ बाहेरच राहिलेलं बघितल्याने त्याला सवय झाली आहे. माझे सासू-सासरे, नवरा कायम माझ्यामागे उभे असतात. जेव्हा सासू-सासरे नव्हते तेव्हा माझी बहीण जवळ राहत असे, तिच्याकडे सिद्धेशला सोडून जायची. थोडक्यात काय, तर व्यावसायिक स्तरावर मी जेवढी नशीबवान आहे तितकीच कौटुंबिक स्तरावरही.’’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो