ओन्ली फॉर लेडीज
मुखपृष्ठ >> लेख >> ओन्ली फॉर लेडीज
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ओन्ली फॉर लेडीज Bookmark and Share Print E-mail

alt

मेघना जोशी , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, असं बोललं जातं. त्याविरोधात काहीजणींनी माँ दुर्गेचा अवतार धारण केलेलाही आपण पाहतो, पण अनेकजणी मात्र त्याकडे दुर्लक्ष करणंच अधिक पसंत करतात, विशेषत: पुरुषांच्या टिंगलटवाळीकडे, गलिच्छ शेरेबाजीकडे.. ‘ओन्ली फॉर लेडीज’ असणारा हा अनुभव स्त्रियांसाठी अनेक प्रश्न उपस्थित करणारा तर पुरुषांनी अधिक संवेदनाक्षम व्हायला हवं हे सांगणारा..
गेल्याच महिन्यातील संध्याकाळ. साडेतीन वाजलेले. एका अनोळखी मार्गावरून प्रवास करण्यासाठी, तोही पाच-साडेपाच तासांचा, मी एस.टी. स्टँडवर पोहोचले. चक्क लगेचच बस मिळाली. मला कंडक्टरच्या मागची सीट मिळाली. बस २x२ सीट्स असलेली होती. त्यामुळे प्रवास त्यातल्या त्यात आरामशीर होईल म्हणून हायसे वाटले. पोहोचायलाही रात्रीचे नऊ वगैरेच वाजतील म्हणजे फारसा उशीर नाही असे वाटून सुटकेचा नि:श्वास टाकला. एकटीच प्रवासाला निघालेली असल्याने आजूबाजूला कोणी स्त्री-प्रवासी आहेत का ते पाहण्यासाठी नजर फिरवली. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ाच स्त्रिया गाडीत दिसत होत्या. इतक्यात गाडीची घंटा वाजली. एकदाचा जीव भांडय़ात पडला. कारण घंटा वाजवणारी ‘लेडी कंडक्टर’ होती. या अनोळखी मार्गावरून प्रवास करताना गाडीत फारशा स्त्री-सहप्रवासी नसतील, पण ही असेलच की शेवटच्या स्टॉपपर्यंत असं मनात आलं. त्याचबरोबर ‘अरे, हे माझ्या सोबतीचं झालं, पण हिच्या सोबतीचं काय?’ मानसशास्त्रात शिकलेली ‘सहअनुभूती’ उफाळून आली आणि ही ‘सहअनुभूती’ काही आपली पाठ सोडत नाही असं वाटून स्वत:शीच हसू आलं.
गाडीने प्रवास सुरू केला होता. तिकीट काढल्याशिवाय डुलकी काढणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आपोआपच त्या कंडक्टरचं निरीक्षण सुरू झालं. बारीक चणीची, साधारण उंचीची, दिसायला थोडीशी डावी, काहीशी अ‍ॅनिमिक अशी ती २२-२३ वर्षांची मुलगी युनिफॉर्मच्या आतून डोकावणाऱ्या कपडय़ांमधून व एकंदर सौंदर्यप्रसाधनांवरून कनिष्ठ मध्यमवर्गीयच वाटत होती. कदाचित तिच्या कुटुंबातील ती ‘फर्स्ट जनरेशन एज्युकेटेड’ स्त्री असावी असाही विचार नकळतपणे मनात डोकावला. पण तिच्या कामात मात्र ती अचूक  आणि समर्थ दिसत होती. तिचा आत्मविश्वास, प्रवाशांशी असणारी सौजन्यपूर्ण वागणूक, प्रवाशांशी संवाद साधण्याचं कौशल्य, प्रवाशांच्या शंकांचं निरसन करण्याची पद्धत हे सारंच वाखाणण्यासारखं होतं. मी मनाशी तिची एक ‘जबाबदार’ कंडक्टर अशी नोंद केली. आजवर अनेकदा एसटीने प्रवास करताना कंडक्टरचे शेकडो प्रकार आणि असंख्य स्वभाव , छटा पाहण्याचा योग आलेला होता. तिचं एवढं प्राथमिक निरीक्षण करेपर्यंत ती माझ्यापर्यंत पोहोचली. मी तिकीट घेतलं. बघता-बघता दोन-अडीच तासांचा प्रवास झाला. आता गाडी एक निमशहरी गावातील स्टँडवर काही वेळासाठी थांबली. आधीपासून असणारे काही प्रवाशीही उतरले. पण इथे गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची प्रचंड झुंबड उडाली. गाडीला प्रचंड गर्दी झाली. गर्दीत कामगार वर्गातील प्रवाशांची संख्या फार मोठी दिसत होती. थकलेले-भागलेले, मळकट कपडय़ातले कामगार दिवसभरातील कामे आटोपून घरी निघालेले असावेत. काही विद्यार्थी, थोडेफार वयस्क आणि आठ-दहा सोमे-गोमेही त्यात होते. पण स्त्रिया जवळजवळ नव्हत्याच. गाडीत आता बसलेल्या प्रवाशांच्या दीडपट ते दुप्पट प्रवासी उभे होते. थोडक्यात, गाडी खचाखच भरली होती. पण एवढय़ा गर्दीतही ती लेडी कंडक्टर लोकांना दोन रागांमध्ये व्यवस्थित उभं राहाण्याचं आवाहन करीत होती. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना न कंटाळता, न वैतागता उत्तरं देत होती. गाडी कुठे थांबेल, कुठे थांबणार नाही हे सर्वाना समजावं म्हणून वारंवार सांगत होती. तिकिटाचे सुट्टे पैसे काढून ठेवण्याची विनंती करत होती. खरं तर या सगळ्यासाठी तिचं कौशल्य पणाला लागत होतं. पण ती चिडत नव्हती, ओरडत नव्हती, करवादत नव्हती. हे तिचं वैशिष्टय़ होतं. या गर्दीत पुलंच्या ‘म्हैस’मधले सगळे नमुने दडले असावेत असं वाटून ते शोधण्याचा प्रयत्न करणार इतक्यात डबलबेल वाजली आणि गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.
दिवस लहान असल्याने बाहेर सूर्य मावळला होता आणि संधिप्रकाश पसरला होता. त्या संधिप्रकाशात मात्र प्रवाशांची काळी बाजू गडद व्हायला लागली आहे याची मला जाणीव झाली. जे घडतंय ते काही तरी विचित्र आहे असं माझा सिक्स्थ सेन्स मला सांगू लागला. त्याची सुरुवात माझ्या सीटच्या शेजारी उभ्या असणाऱ्या म्हाताऱ्याने (?) केली. त्याने कंडक्टरला तिकिटाच्या रकमेपेक्षा चार रुपये कमी दिले. ते मुद्दामहून दिले असावेत हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून सहजच लक्षात येत होतं. साहजिकच तिने त्या चार रुपयांची मागणी केली असता, तो म्हणाला, ‘‘बाई, आधी मागे तर जाऊन या, मग पुरवतो की पैसं.’’ त्याचे ते पुरवतो वगैरे शब्द ऐकून मी पुरती हादरले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून संतापलेच होते. आता ही कंडक्टर याला चांगलाच शाब्दिक झटका देईल किंवा बाहेरचा रस्ता दाखवील असं वाटलं. पण तिने यातलं काहीच न करता त्या चार रुपयांचाही नाद सोडून दिला. कारण तो माणूस उतरेपर्यंत तिने ते मागितलेले मी तरी पाहिले नाहीत.
गाडी खचाखच भरली असल्याने तिकिटे काढण्याचं काम गोगलगाईच्या वेगानं चालू होतं. ती माझ्या नजरेच्या टप्प्यातून मागे सरकली आणि आपोआपच इतर प्रवाशांचं निरीक्षण सुरू झालं. कंडक्टर सीट रिकामी होती, त्याच्या शेजारच्या सीटवर २०-२२ वर्षांचा तरुण बसलेला असावा. तो मला नीटसा दिसत नव्हता, पण समोर उभे असलेले त्याचे दोन मित्र सहजच दिसत होते. भडक कपडे, तोंडात गुटखा, हातात मोबाईल घेतलेले ते आणि तो बसलेला तरुण यांच्यात जोरजोरात हास्यविनोद सुरू झाले होते. बहुधा ते एक टोळकंच होतं. आजूबाजूला दमलेले, वैतागलेले बहुसंख्य कामगार होते, एक-दोन बाजारहाट करून पिशव्या सांभाळत घरी निघालेले गृहस्थ व एक-दोनच कुठेतरी नोकरी करणारे पांढरपेशे असावेत, चार-दोन कळकट-मळकट टोप्याही गर्दीत तोल सावरत उभ्या होत्या. हळूहळू सगळे आपल्या जागी व्यवस्थित सेट झाले होते. सहप्रवाशांची वाढती गर्दी, वाढती महागाई आदी विषयांवर गप्पाही सुरू झाल्या होत्या.
 इतक्यात कंडक्टर सीटशेजारी उभ्या असणाऱ्या टोळक्याने ‘चिकणी चमेली’ आणि ‘कोलावरी’सारख्या गाण्यांची उजळणी करायला सुरुवात केली. ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ या  न्यायाने त्यांच्यासारखेच अजून दोन-चार जण त्यांना साथ देण्यासाठी सीटजवळ सरकले. गप्पांचा विषयही सिनेमा, त्यातील नट-नटय़ा यावरून तमाशावर घसरला. आदल्या रात्री पाहिलेला तमाशा व त्यातील कलावंतीणी याविषयीच्या गप्पा मारताना नजरा मात्र मागे तिकीट फाडणाऱ्या कंडक्टरवर होत्या. पुढील टोळक्याची त्या कंडक्टरवरची नजर आणखी धारदार होत होती. एक स्त्री म्हणून मला माहीत आहे; तुम्ही उच्चपदस्थ असा वा निम्नपदस्थ, गृहिणी अगर नोकरदार, शहरी अथवा ग्रामीण अशा नजरा तुमची पाठ सोडत नाहीत. हे किती र्वष चालणार कोण जाणे, असं वाटून मी एक सुस्कारा सोडला. एवढय़ात माझ्या सीटजवळून त्या कंडक्टरचा आवाज आला. अजून कोणी तिकीट घ्यायचं शिल्लक आहे का, असं विचारत ती पुढे येत होती. येताना त्या चार रुपयावाल्या म्हाताऱ्यानं तिला दिलेला धक्का माझ्या नजरेतनं सुटला नव्हता. मी पुढे बघितलं, कंडक्टर सीट रिकामीच होती. चला, त्या हक्काच्या सीटवर बसली की या म्हाताऱ्याची कटकट नकोच असं वाटून गेलं.
ती जाऊन स्वत:च्या सीटवर बसली. मात्र समोर उभ्या असलेल्या तरुणांमधील एकजण तिला विचारत होता, ‘‘मॅडम, जरा सरकता का?’’ त्याआधीच त्यातला एकजण त्या सीटवर बसला होता. ती म्हणाली, ‘‘ऑलरेडी तिघं आहोत, चौघं कुठे बसणार. यावर दिनवाणेपणाने दात विचकत तो म्हणाला, ‘‘काय मॅडम, बसू द्या की जरा?’’ तोंडाने असं म्हणता-म्हणता हा बाब्या टेकलाच की तिथे. म्हणजे दोन माणसांसाठी असलेल्या सीटवर आता चौघं बसली होती- कंडक्टर आणि ते तिघे. त्या तिघांच्या गाणी आणि गप्पांना आता चेव चढला होता. माझं आणि आसपासच्या अनेकांचं लक्ष त्या पहिल्या सीटवर केंद्रित झालं. पहिल्यांदा ती कंडक्टर व्यवस्थित टेकून बसली होती आणि हे दाटीवाटीने. हळूहळू त्यांच्या गप्पा, हंशा, टाळ्या यांना ऊत आला. ते तिच्याजवळ सरकले. त्यामुळे तिला पुढे सरकून बसण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तिघे तिला त्रास व्हावा असं वर्तन सहेतूक करत होते आणि इतर २०-२५ जण हा फुकटचा तमाशा पाहत होते. त्या तिघांमधील एकाने आता लीडरशिप पत्करली होती. त्याला हटकावेच, हटकावेच का चक्क थोबडवावे असा विचार करून माझे हात शिवशिवत होते, पण त्या रात्रीच्या वेळी सारासार विचार न करता हातघाईवर येणं योग्य ठरणारं नव्हतं. परत एकदा नजर आजुबाजूला फिरली. त्या गर्दीत माझ्यासारखा पेशन्स ठेवून उभे असणारे अजून दोघे दिसत होते. तेवढंच मृगजळ, बाकी सगळे प्रसंगाची मजा लुटत होते. ते तिघे जोरजारात गप्पा मारण्यात मग्न होते. एवढय़ात त्या तिघांपैकी एकाने तिच्यामागून खिडकीचा बार पकडला आणि त्या आगाऊपणे बसणाऱ्या चौथ्याने तिच्यापुढून. खिडकीच्या बारला हात धरला. त्यांचे हास्यविनोद, अचकट-विचकट गप्पा व्यवस्थित सुरू होत्या आणि ती मात्र अवघडल्या स्थितीत बसली होती. भयंकर अस्वस्थ वाटलं. परत एकदा आजुबाजूला पाहिलं तर त्या दोन सद्गृहस्थांखेरीज कोणीही माझी पाठराखण करील असं वाटत नव्हतं. मला काय करावं सुचत नव्हतं. भावना आणि विचार यांचा प्रचंड संघर्ष चालला होता. एकीकडे रागाची भावना अनावर होत होती. संताप, चीड ऊतू जात होता. पण विचार म्हणत होते ती कंडक्टर हे सारं का सहन करते आहे? ती का नाही त्यांना समज देत? तिचा त्यांना पाठिंबा आहे का? मी रागाने उठून काही बोलाचाली झाली आणि तिने स्वत:ची कोणतीच तक्रार नाही असा पवित्रा घेतला तर? ती रोज याच मार्गावरून प्रवास करत असेल आणि तिचा त्रास माझ्यामुळे वाढला तर? ती लग्नेच्छू किंवा नवविवाहिता असेल आणि तिच्या आयुष्यात माझ्या कृतीमुळे व्यत्यय आला तर? या भांडणातून पोलीस स्टेशनपर्यंत जावे लागले आणि तिच्या नोकरीवर संकट आलं तर? भावना म्हणत होत्या काय होईल ते होवो, तू पुढे हो. पण विचार सबुरीचा सल्ला देत शेवटी विचार व भावना यांच्यातील संघर्ष सोडवत मी जवळजवळ दीड तास चडफडत बसले होते. शेवटी एकदाचं एक शहराचं ठिकाण आलं. ते तिघेही उतरून गेले. मी अस्वस्थ होतेच. त्यामुळे बसखाली उतरून त्या कंडक्टरशी बोलण्याचा निर्णय घेतला. खाली उतरले आणि पाहिलं तर मघाच्याच गर्दीत अस्वस्थ दिसणाऱ्या दोघांपैकी एकजण त्या कंडक्टरशी बोलत होता. तिने अशा प्रसंगांना कणखरपणे तोंड द्यावं याची जाणीव करून देत होता. तिला युनिफॉर्मचं महत्त्व पटवून देताना तो म्हणाला, ‘‘मॅडम, मी इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरीला आहे. त्यामुळे युनिफॉर्ममध्ये असणारी शक्ती मी जाणतो. ती तुमच्या युनिफॉर्ममध्येही आहे. तिचा योग्य वापर करा.’’ त्या गृहस्थांबद्दल मला कृतज्ञता वाटली. ती व्यक्त करत मीही त्या गप्पांत सामील झाले. मी म्हणाले, ‘‘मॅडम, अशा वेळी तुम्ही फक्त एकदा विरोध करून बघा. आमच्यासारखे अनेकजण नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुमच्या युनिफॉर्मच्या ताकदीचा अशा प्रसंगी कणखरपणे वापर करा. यासाठी थोडंसं धैर्य अंगी बाणवा.’’ माझं हे मत ऐकून ती, ‘‘जाऊ दे हो मॅडम, हे असं नेहमीच घडायचं. विरोध करून मनस्तापच जास्त होतो.’’ असं अगतिकपणे म्हणत गाडीत चढली. मला समजेना ज्या अगतिकतेने तिने हे स्वीकारलं त्याची कीव करावी की राग राग करावा? का स्वीकारत असेल ती हे सारं? बदनामीला घाबरून? नोकरी विनाव्यत्यय टिकावी म्हणून? कुटुंबस्वास्थ्य टिकावं म्हणून? समाजात तमाशा नको म्हणून? तिच्या एकटीच्या नोकरीवर जर घर चालत असेल तर त्यात काही अडचण नको म्हणून? माझ्या मध्यमवर्गीय मनाला पटणारी एक ना हजार कारणं मला त्यात दिसत होती.
ही सगळी कारणं असू शकतात आणि त्यावेळी काय करावं हे सुचत नाही हे माझ्या बहिणीच्या अनुभवांवरून मला माहीत होतं. एका खेडेगावत एक शिक्षिका प्राथमिक शाळेत नोकरी करणारी माझी बहीण नोकरीत जेव्हा नवीन होती तेव्हा एक अधिकारी शाळा तपासणीसाठी वारंवार येई आणि प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना ठराविकच प्रश्न विचारे. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी शब्दांवरून हे अचकट विचकट प्रश्न असत. माझी बहीण असे हे अपमानकारक प्रश्न सहन करीत असे त्याला वरीलप्रमाणेच कारणं होती. पण एकदा तिला हे सगळं असह्य़ झालं. थोडासा धीर एकवटून तिने त्या अधिकाऱ्याला असं झापलं की ज्याचं नाव ते. पण त्यानंतर मात्र त्या अधिकाऱ्याची असे गैरप्रश्न विचारायची हिंमतच झाली नाही. पण नोकरी नवीन असताना, सामाजिक जीवनाचा फारसा अनुभव नसताना गांगरून किंवा बुजून गेल्यामुळे स्त्रिया अशा परिस्थितीत मूग गिळून गप्प बसतात असं तिच्याशी बोलताना लक्षात आलं.
फक्त नोकरदारच नव्हे तर व्यावसायिक स्त्रियांनाही असे अनुभव येतच असतात. माझ्या परिचयाच्या लेडी डॉक्टरला अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं होतं. नकळत होतात असं दाखवून केले जाणारे सहेतुक स्पर्श, द्वर्थी बोलणं असे अनुभव तिला अनेकदा आले होते. ती घटस्फोटिता होती म्हणून की काय पण सहन करत होती. कदाचित आजही करतेच आहे.  छोटय़ा गावात लेडीज वेअरचं दुकान चालवणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीकडे अशा अनुभवांची यादीच आहे. ती म्हणते, ‘‘शहरात अशा दुकानांवर ‘येथे पुरुष गिऱ्हाईकांना प्रवेश नाही’ अशी पाटी सर्रास दिसते, पण इथे व्यवसाय चालू राहण्याच्या दृष्टीने मी असं करू शकत नाही. आधीच गिऱ्हाईकांची संख्या कमी आणि पाटी लावली तर संपलंच. मग अशा परिस्थितीत दुर्लक्ष करून, समजलंच नाही असं दाखवून किंवा योग्य समज देऊन मी परिस्थितीतून मार्ग काढते.’’
हे अनुभव कमावत्या स्त्रियांसाठीच राखीव नाहीत. रोज पहाटे मॉर्निग वॉकला जाणाऱ्या एका छोटय़ा गावातील माझ्या गृहिणी मैत्रिणीलाही असे अनुभव आले आहेत. वागण्यातला फरक सहज लक्षात येतोच. वाटेत मुद्दाम वाट पाहत उभे राहणे, सहज भेटल्यासारखे दाखवून पुढे सलगी वाढवण्याचा प्रयत्न करणे. एखाद्या दिवशी ती वॉकसाठी गेली नाही तर ‘अरे वहिनी, काल तुम्ही आला नाहीत? मी वाट पाहात होतो.’’ असं बोलणं. हे सगळं लक्षात आल्यावर तिने मार्ग आणि वेळ बदलण्याचं चातुर्य दाखवलं. ती म्हणते, ‘‘भांडण, वाद हे बुद्धीला पटणारं असलं तरी रोजच्या आयुष्यात झेपणारं नसतं. त्यामुळेच हे असंच आहे हे स्वीकारून त्यातून मार्ग काढणं हे उत्तम!
पण हे सगळं आपण एवढं स्वीकारतो की कधी कधी अशा वृत्तीला विरोध करणं सहजशक्य आहे हे विसरून जातो. या स्वीकृतीबाबत माझी एक सहकारी म्हणाली होती, ‘‘अगं, साधी पत्त्यातली राणीही राजा आणि एक्क्य़ांकडून मारली जाते. तीही त्यांना वरचढ होऊ शकत नाही तर आमचं काय?’’ तिचं हे असं हातपाय गाळणं योग्य होतं की अयोग्य, माझ्यासाठी हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न ठरतो.

मी शिकवला धडा
तरुणींची, स्त्रियांची छेड काढणाऱ्या, मस्करी करणाऱ्या इतकंच नव्हे तर अन्याय करणाऱ्या पुरुषांना धडा शिकवण्याइतकी संवेदनशीलता आता वाढू लागली आहे, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. तुम्ही दाखवलंय कुणाला चौदावं रत्न? फक्त टिंगलटवाळीविरुद्धच नाही तर सामाजिक आयुष्यातही अन्यायाविरुद्ध कुणाला शिकवलाय धडा? तर आम्हाला कळवा. आम्ही तुमचे अनुभव प्रसिद्ध करू ‘चतुरंग’मधून. आमचा पत्ता- चतुरंग, लोकसत्ता, प्लॉट क्र . ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई  ४००७१०
इमेल- This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज स्त्रिया म्हणून आपण सर्व क्षेत्रात समान हक्क आणि आरक्षण मागणार असू तर अशा प्रसंगांना कणखरपणे सामोरं जाण्याचं बळ नक्कीच बाणवलं पाहिजे. पब्लिक सव्‍‌र्हिसेसमध्ये असो अगर सामाजिक जीवनात असो समर्थपणे वावरणारी स्त्री कोणाच्याही हातचं बाहुलं मुळीच बनता नये. म्हणूनच नोकरीत किंवा व्यवसायात पदार्पण करणाऱ्या स्त्रियांना नोकरी/व्यवसायपूर्व समुपदेशनातून अशा प्रसंगांना कणखरपणे सामोरं जाण्यासाठी सक्षम करणं गरजेचं आहे. कारण हे प्रसंग व्यक्तीपुरतेच मर्यादित नसतात तर ते सामाजिक आरोग्य नकळत बिघडवत असतात. आजुबाजूला वावरणारी बाल, कुमार पिढी ‘अनुकरणातून शिक्षण’ या उक्तीनुसार या गैरवर्तनाचं अनुकरण करण्याची शक्यता असते.
अर्थात हे सर्व अनुभव छोटय़ा गावातले आहेत. आज शहरातल्या स्त्रिया, तरुणी काही प्रमाणात का होईना ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याची हिंमत दाखवतात. मस्करी करणाऱ्याला कानफटात मारायला, चप्पल दाखविण्यासाठी कमी पडत नाहीत. हे प्रमाण गावात मात्र म्हणण्याइतकं दिसत नाही, असा माझा अनुभव आहे जो कदाचित चुकीचाही असू शकतो, परंतु आपल्यावर होत असलेला अन्याय सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवणं ही काळाची गरज आहे.
वर वर्णन केलेले प्रसंग ‘ओन्ली फॉर लेडीजच’ असतात. कारण असे प्रसंग पुरुषांवर गुदरतच नाहीत. शतक कितवंही असो, त्यांची झेप गगनापर्यंत असो वा गगनापार हे असंच घडतं, असं म्हणून हातावर हात घेऊन भागणार नाही हे नक्की. अशा प्रसंगांचं पूर्णपणे पानिपत करण्यासाठी कायद्याबरोबरच याबाबतची साक्षरता निर्माण होणं गरजेचं आहे. त्यातून झालेले बदल सकस व टिकावू असतील. संगणक साक्षरतेबरोबरच स्त्रीबद्दलची, तिच्या जाणिवाबाबतची संवेदनक्षमता वाढायला हवीय. तर बदल नक्की होणारच यात शंका नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो